भूमिका


काही मोठ्या लोकांचे पाहून मी माझा ब्लॉग सुरु केला होता. एक वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार केलेल्या भाषणाचा 'Write Up' पहिला ब्लॉग म्हणून मी टाकला होता. ब्लॉग सुरु झालं तेव्हा या माध्यमाचं महत्व तितकस कळत नव्हतं. हौस म्हणूनच ती सुरवात मी केली होती. आज हौस म्हणून सुरवात केलेल्या ब्लॉग चे वाचक सुमारे नव्वद हजाराच्या वर गेले आहेत. तेव्हा आता तरी यामागची स्पष्ट भूमिका करणेआवश्यक आहे.

वाचनाची आवड लागल्यानंतर पहिल्या उत्साहात भरपूर वाचन झालं. पण त्यातलं बहुतेक उथळ होतं याची मला आज जाणीव आहे. पण वाचनाची खरी ताकद कशात आहे, त्याची गोडी कशात आहे हे लक्षात यायला मला बराच वेळ लागलं. मला याचं दु:ख होतं. पण Its Always Never Too Late. माझ्या वाचनात कुरुंदकर आले, पु.ग. सहस्रबुद्धे आले, शेषराव मोरे आले, श्री.म. माटे आले. असे अनेक आहे. सगळ्यांची नावं घेणं सुद्धा शक्य नाहीये. पण या सर्वांनी आयुष्य जास्त समृद्ध केलं हे मात्र नक्की. दरम्यान घरचा पुस्तक संग्रह ५००० च्या वर गेला. या वाचनावर मी कधीच समाधानी नव्हतो आणि असणारही नाही. पण जे काय थोड्याफार वाचनानी आपल्याला समजलं ते इतरांना सांगावं त्यांना काय कळल हे त्यांच्याकडून ऐकावं. यातून एक बौद्धिक चर्चा सुरु व्हावी. काही सकारात्मक विचार चिंतन सुरु व्हावं असा काही एक विचार डोक्यात घेऊन या माध्यमाचा वापर करावा असं डोक्यात आहे.

श्रद्धेवर माझा नितांत विश्वास आहे. माझी अशी पक्की श्रद्धा आहे कि 'धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धडीयले' धर्माच्या करिता म्हणजे लोकांकरिता, या देशाकरिता. आणि दुसरी प्रेरणा म्हणजे 'बुडती हे जन देखवे ना डोळा.' या दोन प्रेरणा मनात ठेऊन जबाबदारीपूर्वक लहान तोंडी मोठा घास घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

लोभ असू द्यावा! 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....