इस्लामी शब्दकोश

भारतात हिंदूंबरोबर दुसरा सर्वात मोठा धर्म म्हणजे इस्लाम. गेली एक हजार वर्ष भारतात हे दोन धर्म एकत्र रहात आहेत. पण एतद्देशीय भारतीयांनी कधीही इस्लामचा अभ्यास करायची इच्छा दाखवली नाही. फाळणी नंतरही भारतात हिंदू-मुस्लिम प्रश्न का सुटला नाही? याचं एक कारण मला वाटतं ते म्हणजे आपण भारतीयांनी इस्लामचा अभ्यास केला नाही. आता गेली ५-६ वर्षात मला असं जाणवलं की इस्लामच्या अभ्यासात मूलभूत अभ्यास इस्लामी संस्कृतीचा करणे गरजेचे आहे. त्याचा सर्वात बेसिक अभ्यास इस्लामी शब्दांपासून सुरु होतो.

म्हणून दुसऱ्या कोणीतरी मला अर्थ सांगावे हा हट्ट मी ठेवला नाही. आपण अभ्यास करून समजावून घेऊ. त्या प्रयत्नात जसे जसे अजून शब्द वाचून होतील तसे तसे लिहित जाईन. या मागचा मुख्य हेतू हा आहे की, उद्या आपल्याला चर्चा करताना आपण वापरणाऱ्या शब्दांचे योग्य आणि अचूक अर्थ माहिती पाहिजेत. जेव्हा एखादा विचारवंत 'जिहाद' हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याला काय अभिप्रेत आहे, याची आपल्याला सुस्पष्ट कल्पना पाहिजे. सगळा हा खटाटोप याकरिता सुरु आहे.

(इस्लामी विश्वकोशाचे १३ अवाढव्य खंड आहेत. जवळ जवळ १४००० पानं आहेत. 'इंटरनॅशनल युनियन ऑफ अॅकॅडमीज' यांच्या पुढाकारातून हे प्रचंड काम उभं राहिलेलं आहे. या शब्दांचे अर्थ लावताना मी इस्लामी आणि कुराणचा विश्वकोश संदर्भ म्हणून वापरला आहे. शिवाय इस्लामी शद्बकोशसुद्धा संदर्भ म्हणून वापरला आहे.)

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....