Wednesday 9 July 2014

सुखं म्हणजे नक्की काय असत???

अजून एक खास पान
९ जुलै २०१४
बुधवार

५-६ दिवसापूर्वीच्या पेपर मध्ये 'अवतरले शिवकालीन वैभवाचे सक्षीदार : भाटघर कोरडे पडल्याने ऐतिहासिक वास्तू पाण्याबाहेर' अशी बातमी आली होती. आणि हे वैभव जवळ जवळ ११० वर्षांनी दिसतंय. कारण इतका कमी पाऊस याच वर्षी कमी झालाय, म्हणून हे दिसू शकतय. म्हणून मी ते पाहून यायचं ठरवलं. भोर म्हणजे पुण्यापासून ५० किमी पण नाही!!पुन्हा इतका कमी पाऊस कधीच पडू नये. आणि परत कधी असं बघायला मिळू नये.

मी ती पेपर मधली बातमी कापून घेतली, आणि तेवढ्याच माहितीवर जायचं ठरवलं. मी आणि माझे दोन मित्र. सकाळी सकाळी भोर ला पोचलो. तिथे पोचल्यावर कळल कि भोर परिसरातच अनेक मंदिर उघडी पडली आहेत. पण भोर पासून १७ किमी अंतरावर वेळवंडी नवाच गाव आहे तिथे जायचं आम्ही ठरवलं. त्याही गावात दिवसातून दोन वेळच ST जाते त्या दोनीही आमच्या miss झाल्या. ब-याच वेळच्या प्रतिक्षेनंतर आम्ही त्या गावात पोचलो. २-२.५ किमी चालत आम्ही वेळवंडी नदीच्या पत्रात पोचलो. आणि वैभव म्हणजे काय असत ते समोर अवतरून आलं. आमच्यावर ढगांची सावली पडली होती, पण पहिल्या पावसात हिरवागार झालेला राजगड समोर दिसत होता. त्यावर माध्यान्हीच ऊन पडलं होत. मध्ये जेमतेम ५-६ फुट पत्र उरलेली वेळवंडी नदी ( Actually हे वैभवाच प्रतिक नाही ). आणि मागच्या बाजूला रायरेश्वराच पठार आणि त्याला लागून रोहिडा. रायरेश्वराच्या पठारावर भरपूर धुकं आणि रोहीडा मात्र कोरडाच. आषाढ सुरु असताना देखील श्रावणाचा फील याला वैभव म्हणाव का आरिष्ट याच उत्तर मला मिळालेला नाही.

तसाच पुढे चालत गेलो. नदीच्या पाण्याला लागून काही अंतरावर ते मंदिर होत. तिकडे चालायला सुरवात केली. हिंदवी स्वराज्याची पहिली सक्षिदार हि माती आहे. त्या मऊ मातीवरून चालण्यात काय मजा आहे ती पुण्यात बसून कळणार नाही. किती वेळा या मातिने राजाचं दर्शन घेतलं असेल!! कित्येकदा या मातीत खलबत शिजली असतील!! आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो त्या मंदिरात बसून राजांनी न्यायदान केल्याचे उल्लेख आहेत. आणि ते मंदिर आज ११० वर्षांनी उघड पडलंय पाऊस न पडल्यामुळे..

जेमतेम ५ फुट बाय ५ फुट एवढाच त्या मंदिरच गाभा होता.त्याच्यासमोर चांगला २ फुट उंच नंदी होता. आणि अनेक शिळा, त्यावर लढाईची दृश्य कोरलेली, त्याच्या खाली काही स्त्रिया शिवलिंगाची पूजा करत आहेत. पण हे सर्व गाळा मध्ये रुतलेलं. या गाळा खाली काय काय दडलेलं असू शकत? अस्य कित्येक शिळा या गाळात असू शकतात!!

मला एकदा खरच सांगा सुख म्हणजे नक्की काय असत? आणि काय पुण्य असलं कि ते मिळत?
हे वैभव पाहण्यातल सुख. समोर राजगड, मागे रायरेश्वर, रोहीडा, मध्ये हे मंदिर, आणि मऊ मातीतून चालताना नदीच्या पत्रातून वाहणारा गार वारा!!!

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....