एक_दिवस_एक_गाणं

माझा सगळ्यात आवडता छंद गाणी ऐकणे. पुन्हा ऐकणे, पुन्हा पुन्हा ऐकणे. आणि असं एक एक गाणं खुपदा ऐकलं की त्यातून एक गोष्ट दिसायला लागते. कधी ती चित्रपटातली असते, कधी आपली आपली असते. मग मला आपली आणि चित्रपटातली गोष्ट आणि त्या गाण्यावर लिहायला सुद्धा आवडतं. असं मी लिहायला घेतलं. पाहिलं गाणं खूप अंडररेटेड होतं. पण मला ते खूप आवडत. मोबाईलमध्ये प्लेलिस्टमध्ये रिपिट मोडवर हे गाणं कायम असतं. अशी खूप गाणी आहेत, अजून ऐकू तशी ही संख्या वाढत जाईल. पण सध्या गाण्यांवर लिहिलेल्या फेसबुक पोस्ट्सची संख्या सुद्धा १० च्या पुढे गेली आहे. आणि शिस्त म्हणून ज्या दिवशी अमुक अमुक गाण्यावर लिहायचं त्या त्या दिवशी मी त्या गाण्याची असंख्य पारायणंं केलेली असतात. आणि मग एक वेळ अशी येते की गाण्याच्या शब्दांनी, सुरानी, त्या अमुक अमुक गोष्टीनी आवेग अनावर होतो. तेव्हा समोर कीबोर्ड आणायचा आणि जे काय सुचेल ते टाईप करायचं, असं करत करत इतकी गाणी लिहून झाली आहेत.

१. युगायुगांचे नाते आपुले 

चित्रपट : तू तिथे मी
गायक : जयश्री शिवराम, रूपकुमार राठोड
संगीत : आनंद मोडक
गीतकार - विजय कुवळेकर

२.संधीप्रकाशात
गायक, संगीत : सलील कुलकर्णी
कवी : बा. भ. बोरकर

३. 
पुछो ना कैसे मैने रैन बिताईगायक : मन्ना डे
संगीत : एस. डी. बर्मन
चित्रपट : 
मेरी सुरत तेरी आखें
गीतकार : शैलेन्द्र

४. स्वर आले दुरुनी
गायक : सुधीर फडके
संगीत : प्रभाकर 
जोगगीतकार : यशवंत देव

५. जाने वो कैसे लोग थे
गायक : हेमंत कुमार
संगीत  : एस. डी. बर्मन
चित्रपट : प्यासा
गीतकार : साहीर लुधीयानवी

६. हुजूर इस कदर
गायक : सुरेश वाडकर, भूपेंद्र
संगीत: आर. डी. बर्मन
चित्रपट : मासूम
गीतकार : गुलझार

७. मेरा कुछ सामान
गायिका : आशा भोसले
संगीत : आर. डी. बर्मन
चित्रपट : इजाजत
गीतकार : गुलझार

८. अभी ना जाओ छोडकर 
गायक : महंमद रफी, आशा भोसले
संगीत : जयदेव
चित्रपट : हम दोनो
गीतकार : साहीर लुधियानवी


९. कुछ तो लोग कहेंगे 
गायक : किशोर कुमार
संगीत : आर.डी. बर्मन
चित्रपट : अमर प्रेम
गीतकार : आनंद बक्षी

१०. तेरे बिना जिंदगी से
गायक : किशोर कुमार, लता मंगेशकर
संगीत : आर. डी. बर्मन
चित्रपट : आंधी
गीतकार : गुलझार

११. कई बार युं भी देखा है
गायक : मुकेश
संगीत : सलील चौधरी
चित्रपट : रजनीगंधा
गीतकार योगेश

१२. खाली हात शाम आयी आणि फिर वही शाम
गायक/गायिका : आशा भोसले / तलत मेहेमूद
संगीत : आर.डी. बर्मन / मदन मोहन
चित्रपट : इजाजत / जहां अरां
गीतकार : गुलझार / राजेंद्र कृष्ण


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....