प्रस्तावना
:
Sex विषयी
भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक
ठिकाणी बोलले जात नाही. Sex प्रमाणे ISIS या विषयावर भारतात आणि मुख्यतः
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात उदासीनता आहे. (उदा. प्रा. शेषराव मोरे, निळू
दामले, अतुल कहते आणि योगेश परळे या चारच जणांनी मराठीमध्ये काही अभ्यास करून
इस्लामिक स्टेटबद्दल लिहिले आहे. बाकी रोजच्या वृत्तपत्रांमध्ये बातमीशीवाय
इस्लामिक स्टेटबद्दल फारसं काही येतच नाही). या दोन विषयावर महाराष्ट्रात अजिबात
चर्चा होत नाही. तिसरा विषय आहे गुलामगिरीचा. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या परंपरेमुळे
सर्व प्रकारांची ‘गुलामगिरी’ महाराष्ट्रातून बहुतेक हद्दपार झाली आहे. ‘माणसाचा
संपत्ती म्हणून वापर’ ही कल्पना भारतात कधीच अस्तित्वात नव्हती, ती पश्चिमी
देशांमध्ये होती. त्या संपत्तीचा शरीरसुखासाठी उपयोग सुद्धा पश्चिमी देशांत केला
जात असे. भारतात ‘जातीव्यवस्था’ हेच गुलामगिरीचे स्वरूप होते. पण प्रबोधनाच्या
मोठ्या परंपरेनंतर आज कोणीही मराठी माणूस गुलामगिरीची जाहीर भाषा बोलणार नाही.
याचा अर्थ महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातून Sex, इस्लामिक स्टेट आणि गुलामगिरी
हे तिन्हीही विषय बहिष्कृत आहेत. आणि या तिन्हीही गोष्टी हातात हात घालून एकत्र
उच्छाद मांडू लागल्या, आणि त्याला जागतिक प्रतिष्ठासुद्धा मिळू लागली. इस्लामिक
स्टेट, Sex, गुलामगिरी आणि धर्म हे सर्व एकत्र येऊन मध्यपूर्वेत अत्याचार होत
आहेत. इस्लामिक स्टेटने कुराणातील आयतींचा संदर्भ सांगत ‘Sex गुलामी’ हा दहशतवादाचा
एक नवीन मार्ग तयार केला.इस्लामिक स्टेटने सुरु केलेल्या या नवीन व्यवस्थेचा
अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठीमध्ये कोणीही या विषयावर लिहिलेले नाही.
साधने
:
साधारणपणे
संदर्भ साहित्य शेवटी लिहावे असा संकेत आहे. परंतु ज्याच्यावरून हा अभ्यास करता आला
आहे त्या संदर्भांची पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून सुरवातीला संदर्भ
साहित्य.

इस्लामिक
स्टेटची एक महिला विंग आहे. त्या विंगचे नाव ‘अल-खानसा’ ब्रिगेड. या ‘अल-खानसा’
ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी शब्दांकन केलेला एक जाहीरनामा (Manifesto) प्रकाशित
आहे. ‘अल-खानसा’ हा इस्लामिक स्टेटचं अधिकृत महिला विभाग आहे. त्यांनी प्रकाशित
केलेल्या जाहीरनाम्याचे नाव ‘Women Of the Islamic State : Manifesto & Case
Study’ असे आहे. (अर्थात मूळ जाहीरनामा अरेबिक लिपीमध्ये आहे, पण त्याचे इंग्लिश
भाषांतर उपलब्ध आहे). या जाहीरनाम्यात काय आहे हे लेखात पुढे येईलच. परंतु ही
ब्रिगेड काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. या ब्रिगेडमध्ये मुख्यतः उच्चशिक्षित
पाश्चिमात्य महिला कार्यरत आहे. वीस वर्षाची एक ब्रिटीश मुलगी या ब्रिगेडमधली
महत्वाची सदस्या आहे (Leading Figure). पाश्चिमात्य उच्चशिक्षित महिलांनी इस्लामिक
स्टेटसाठी ४१ पानांचा जाहीरनामा तयार केला आहे. हा सुद्धा एक महत्वाचा दस्तऐवज
आहे.
इराकच्या
उत्तरेला असलेल्या ‘माउंट सिंजार’ या भागावर इस्लामिक स्टेटने २०१४ ऑगस्ट मध्ये
हल्ला केला. आणि तो भाग ताब्यात घेतला. या ‘सिंजार’ पर्वताच्या आसपास ‘याझीदी’
धर्माचे लोक राहतात. जगाच्या पाठीवर याझीदी एकूण १ लाख ते ५ लाख इतके आहे. एकूण
इराकच्या लोकसंख्येच्या केवळ १.५% हा समाज आहे. या धर्मात बाहेरून धर्मांतर करून
जाता येत नाही. या धर्मात जन्मच घ्यावा लागतो. ‘झोरोस्ट्रीयन’ यांच्याशी साम्य
असणारा हा धर्म आहे. म्हणून मुसलमानांच्या दृष्टीने ‘काफिर’ असलेल्या याझीदिंचा इस्लामिक
स्टेट उल्लेख Devil Worshipers असं करत. ऑगस्ट २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटने हा
प्रदेश ताब्यात घेतल्यावर स्त्रिया आणि पुरुष यांना वेगळे काढण्यात आले. १४
वर्षाच्या वरच्या सर्व पुरुषांची कत्तल करण्यात आली. आणि स्त्रियांना गुलामाच्या
बाजारात विकायला काढलं. Sex Slave म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. अशा पिडीत
महिलांपैकी काहींना इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सोडवण्यात यश आलं आहे. अशा
मुलींची मनोगते उपलब्ध आहेत. त्या पिडीत याझीदींच्या एका प्रतिनिधीला संयुक्त
राष्ट्रात पाचारण करण्यात आलं होतं. त्या मुलीचं संयुक्त राष्ट्र संघात झालेलं
भाषण उपलब्ध आहे. स्वतःवर झालेले भयंक अत्याचार स्वतःच्या तोंडाने सांगणाऱ्या मुलीचे
शब्द हा सुद्धा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. (अत्याचारांचे वर्णन पुढे आहे).
इस्लामिक स्टेट
ज्या कुराणातील आयतींचा संदर्भ देत आहे, त्या खऱ्या आयती आहेत का हे पाहण्यासाठी कुराण,
सुद्धा वापरण्यात आले आहे. ही सर्व साधने वापरून हा लेख तयार झालेला आहे.
जाहीरनामा
:
‘Women Of
the Islamic state’ मध्ये मांडण्यात आलेली तत्व ही इस्लामिक स्टेटची मार्गदर्शक
तत्व म्हणता येतील. स्त्रियांचे इस्लामिक स्टेट मधील स्थान काय आहे हे सांगणारा हा
जाहीरनामा आहे. जाहीरनामा सांगतो ‘मानवी शरीराचे इंच इंच झाकले जाईल असे काळे कपडे
स्त्रियांनी घातले पाहिजेत. यामध्ये पाय झाकणाऱ्या बुटांचा सुद्धा समावेश आहे.
त्याचप्रमाणे हात व हातांची बोटे झाकली जातील असे ग्लोव्हज सुद्ध त्यांनी वापरले
पाहिजेत. महिलांनी लपलेले असावे. महिलांनी
लपलेले आसवे आणि मस्तक अच्छादित ठेवावे. आधुनिक पाश्चात्य कपड्यांच्या दुकानांवर
बंदी असावी, कारण ते सैतानाचे कर्म आहे. प्रत्येक स्त्रीचे मुलभूत कर्तव्य आहे की
तिने आई बनावे आणि आपल्या नवऱ्याची आणि मुलांची सेवा करणे. स्त्रिया अपवादात्मक
परिस्थितीमध्येच घराच्या बाहेर पडू शकतात. उदा. जिहाद करण्यासाठी कोणी पुरुष
उपलब्धच नसतील तर स्त्रिया घराबाहेर पाडूय शकतात. केवळ जिहाद करण्यासाठी. किंवा
धर्माचा अभ्यास करण्यासाठी. (धर्म अर्थात इस्लाम)
या
जाहीरनाम्यात कुराण मधल्या आयतींचा संदर्भ देऊन मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न
केलेला आहे. Men are serving Women like themselves, man cannot distinguish
themselves from according to two features refered to by God : Men are incharge
of women by [right of] what God has given over the other and what they spen
[for maintance] from their wealth [कुराण ४:३४]
या
जाहीरनाम्यात मुलींनी कोणत्या वयात काय प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे येशे स्पष्टीकरण
आलेले आहे. वय वर्ष ७ ते ९ या वयाच्या मुलींनी तीन प्रकारचे पाठ घेतले पाहिजेत. एक
– समज (Fiqh – Undrestanding) धर्म (Religion) दोन – कुरण आणि अरबी
साहित्याचे लेखन आणि वाचन आणि शास्त्र (Accounting आणि नैसर्गिक शास्त्र) १० ते १२
वर्षाच्या मुलींनी मुख्यतः धर्माच्या अभ्यासावर भर दिला पाहिजे. मुख्यतः त्याची
समज (Fiqh) आणि त्याचबरोबर लग्न आणि घटस्फोटासंबंधीच्या दिल्या गेलेल्या
निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर विणकाम, शिवणकाम आणि स्वयंपाक हा
सुद्धा मुलींच्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे. १३ ते १५ वर्षाच्या मुलींसाठी मुख्य
भर ‘शरियाच्या अभ्यासावर’ असेल. आणि मुलांचे संगोपन कौशल्य विकास यावर असेल. या
वयोगटात शास्त्राचा अभ्यास कमी होईल कारण गरजेपुरते शास्त्र त्यांचे आधीच्या गटात
शिकून झाले आहे. त्याचप्रमाणे इस्लामचा इतिहास आणि प्रेषितांचे आयुष्य आणि त्यांचे
अनुयायी हा भाग या वयात शिक्षणात असला पाहिजे.
मुलींच्या
लग्नाचे योग्य वय ९ असल्याचे जाहीरनाम्यात म्हंटले आहे. तथापि वयवर्ष १६-१७ पर्यंत
लग्न झाले पाहिजे असा जाहीरनाम्याचा आग्रह आहे. कारण तोपर्यंत मुली Young &
Active असतात.
अत्याचारांचे
प्रकार :

या सर्वच
नियोजन आधीच तयार होतं हे म्हणण्याचं कारण म्हणजे वरील निकषांच्या आधारावर आणि
वयोमानाप्रमाणे खरेदी किमतीचा तक्ता इस्लामिक स्टेटने या पूर्वीच प्रकाशित केला
होता. ९ वर्षाच्या मुलीला १७० अमेरिकी डॉलर, वयवर्ष १० ते २० च्या मुलींना १३०
अमेरिकी डॉलर, आणि सर्वात कमी म्हणजे ९० अमेरिकी डॉलर २० ते ३० वयोगटातील मुलींना.
ही किमंत अर्थात प्रत्येक मुलीनिहाय बदलू शकते. मुलींची पैशाच्या भाषेतील किमंत Flat
chest & unattractiveness यामुळे कमी होऊ शकते. हे सर्व पाहून ‘लैंगिक
अत्याचार’ विषयी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या एका विशेष प्रतिनिधीने आपले मत
व्यात्क केले आहे, ती म्हणते, “ISIS has institutionalised rape and sex
slavery as a terror tactic. We have heard of 20 year old girl who was burned
alive because she refused to perform extreme sexual act”.
काय प्रकारचे
अत्याचार या याझिदी मुलींवर झाले ते प्रत्यक्ष याझीदी मुलगी सांगते आहे. परंतु
त्यापूर्वी अत्याचार फक्त याझीदिंवरच का? याचं उत्तर इस्लामिक स्टेटनेच दिलं आहे.
ते म्हणतात, “याझीदी People of the book नाहीत. याझीदी लोकं अनेकेश्वरवादी
आहेत. याझीदी लोकं ज्या सात पऱ्यांची पूजा करतात पैकी एक ‘तौस मलिक’ हा देव नाही.
(अर्थात अल्ला नाही. अल्लाशिवाय वेगळ्या देवाची पूजा हा इस्लामनुसारच सर्वात मोठा
गुन्हा आहे.) उलट ‘तौस मलिक’ ही सैतानाची निर्मिती आहे. याझीदी लोकं सैतानांनी
निर्माण केलेल्या देवाची पूजा करतात याचा अर्थ ते जिवंत राहायला लायक नाहीत.
मुसलमानांनी हाती घेतलेला जिहाद यशस्वी व्हावा म्हणून (याझीदी) स्त्रियांना गुलाम
म्हणून, आणि त्यांचा वापर शरीरसुखासाठी करण्याचा आम्हाला अधिकार आहे” अनेकेश्वरवादी, People of the book नाही
आणि अल्लाशिवाय दुसऱ्या देवांची पूजा करतात म्हणून अशा पाखंडी समाजाच्या स्त्रिया
गुलाम म्हणून ठेवण्याचा इस्लामनुसार मुसलमानांना अधिकार आहे असं इस्लमिक स्टेटचे
म्हणणे आहे.

याझीदींच्या
वेदना :

धर्म-शास्त्राचा आधार :
इस्लामिक स्टेटच्या अभ्यासामधील हा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. मुळात ‘इस्लामिक
स्टेट’ हा अमेरिका-इराक युद्धाचा एक परिणाम आहे असाच समज सर्वत्र पसरलेला आहे.
(अतुल कहते यांनी लिहिलेले मराठीमधील पुस्तक हाच धागा घेऊन इस्लामिक स्टेटचं
अन्वयार्थ लावतात) तो अंशत:च योग्य आहे, कारण ‘इस्लामिक स्टेट’ ही कल्पना प्रेषित
महंमद पैगंबर यांच्या काळापासून चालत आलेली आहे. अमेरिका-इराक हे एक तत्कालीन कारण
असू शकेल. पण इस्लामिक स्टेटची निर्मिती झाली पाहिजे असा आग्रह प्रेषित, त्यानंतर
आलेले पहिले चार खलिफा यांचा सुद्धा होता. आणि म्हणून २१ व्या शतकातील इस्लामिक स्टेट
जे जे काही करतं त्याला ते प्रेषित पैगंबर, कुरण, शरीय हादीस म्हधील संदर्भ देतात.
याचं एक उदाहरण त्यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात आलेलंच आहे, अशी पुढेही
अजून येणार आहेत. (इस्लामिक स्टेट म्हणजे काय? यावर सुद्धा मी दोन लेख लिहिलेले
आहे. त्यामध्ये केवळ अमेरिका – इराक युद्धाचा हा परिणाम नाही, यावर मी संदर्भ देऊन
लिहिलेले आहे. तेही सर्वांनी वाचवे. ISIS चा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष – भाग १ - http://mukulranbhor.blogspot.in/2015/12/blog-post.html आणि ISIS चा पूर्वपक्ष
आणि उत्तरपक्ष – भाग २ - http://mukulranbhor.blogspot.in/2015/12/blog-post_25.html
एक अभ्यासाचा दृष्टिकोन समोर आणायचा आहे. समजा १८५७ चा उठाव झाला, त्याचा
ब्रिटिशांनी लावलेला अर्थ म्हणजे हा ‘उठाव’ होता, सावरकर म्हंटले ‘हे स्वातंत्र्यसमर’
होतं. आता या लढाईला प्रत्यक्ष लढाई करणारे काय म्हणत होते? प्रत्यक्ष लढाई
करणाऱ्यांची भूमिका काय होती? ते कोणत्या हेतूनी ती लढाई ते लढत होते हे, ब्रिटीश
किंवा सावरकर यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तोच दृष्टीकोन इस्लमिक स्टेटच्या
अभ्यासाला लावणे आवश्यक मला आहे. इस्लामिक स्टेट प्रत्येक कारवाईनंतर याचे
स्पष्टीकरण देते आहे की आम्ही जे वागतो आहोत ते मूळ इस्लामला धरून आहे. आम्ही अल्लाहला
खुश करण्यासाठी असे वागतो आहोत वगेरे. तर त्याला जास्त महत्व आहे, बाकीचे इस्लामिक
स्टेटबद्दल काय म्हणत याला फारसा अर्थ नाही.
स्त्रीच्या गुलामगिरीचा व्यवस्था म्हणून स्वीकार कुराणमध्ये आहे, अर्थात
त्याचं आयातींच्या आधारे इस्लमिक स्टेट त्या व्यवस्थेचे समर्थन करते. त्यापैकी सुरह
२ आयात १७७, ४:२४-२५, ४:९२, ५:८९ अशा आयती आहेत, या आयातींमध्ये गुलामगिरीचा
व्यवस्था म्हणून स्वीकार आलेला दिसेल. ज्याप्रमाणे ज्ञानेशवर, शंकराचार्य हे
भगवद्गीतेचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत, त्याप्रमाणे सय्यद मौदुदी हे कुराणचे आणि
मौलाना बुखारी हे हादीसचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत. सय्यद मौदुदी २३:५-६ यावर
भाष्य करताना sex slave girl is lawful असं सांगतात. प्रेषितांची एक
हादीसमधील गोष्ट मौलाना बुखारी यांनी सांगितली आहे. त्यामध्ये युद्धलूट म्हणून
ताब्यात घेतलेल्या स्त्रीयांबरोबर लैंगिक संबंध ठेवणे पाप नसल्याचं प्रेषितांनी
सांगितलं आहे, असं बुखारी लिहितात. मूळ इंग्लिश वाक्य आहे, Mohammad casually
believes that slave women who are part of one fifth of the spoils of war can be
treated like sexual property.
आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाला उलेमांनी दिलेलं उत्तर म्हणजे ‘फतवा’. फतवा
जारी करण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. कुरण, शरिया, हादीस, प्रेषितांचे
चरित्र, इस्लामचा इतिहास, खालीफांचा इतिहास या सर्वांचा ज्याचा सखोल अभ्यास आहे
अशा इस्लामी पंडितलाच फतवा जारी करण्याचा अधिकार मिळतो. भारतात ‘दर-उल-उलूम,
देवबंद विद्यापीठाला’ आणि मुंबईमधील रझा अॅकॅडमीला ‘फतवे’ जारी करण्याचे अधिकार
आहेत. Sex Slavery किंवा गुलाम
स्त्रीबरोबर संभोगाचा अधिकार या विषयावरचे अनेक फतवे अनेक वेबसाईट्स वर उपलब्ध
आहेत.
प्रश्न – उत्तरांचा सारांश :
ज्या वेळी ही सर्व व्यवस्था निर्माण होत होती, त्याचं वेळी म्हणजे ऑगस्ट ते
ऑक्टोबर २०१४ याच काळात इस्लामिक स्टेटकडून अधिकृत पातळीवर याचे स्पष्टीकरण
करण्यात आलेले आहे. जसा ‘दिबाक’या मासिकातील लेख आहे त्याचं प्रमाणे एक माहिती
पत्रक इस्लामिक स्टेटने प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये Sex Slavery संदर्भात सर्व
उपस्थित होऊ शकतील अशा शंका आहेत, आणि त्यांची उत्तरही दिली आहेत. अर्थात मूळ माहितीपत्र
अरेबिक लिपीमध्ये आहे, परंतु त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे.
‘जिहादी टेरिरीझम थ्रेट मॉनिटर’ नावाची एक वृत्त संस्था आहे. ती वृत्त
संस्था सांगते की आमचा विशेष अभ्यासाचा विषय आहे ‘मूलतत्ववादी दहशतवाद’. इस्लामिक
स्टेटबद्दलच्या सर्व सविस्तर बातम्या या वृत्त संस्थेच्या वेबसाईटवर सापडतील. याचं
वेबसाईटवर हे मूळ ‘अरेबिक लिपीतील’ माहितीपत्र आणि त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध
आहे. त्यामध्ये एकूण २५ प्रश्न-उत्तरे आहेत. सर्व देणे शक्य नाही. तरी कोणताही प्रश्न
सुटणार नाही या पद्धतीने सारांश फक्त सांगतो.

एखादा जिहादी योद्धा मारला गेला, तर त्याच्या अन्य संपत्तीप्रमाणे
गुलामांचीसुद्धा वाटणी होईल. मात्र अशा स्त्रीयांबरोबर शरीर संबंध ठेवता येणार
नाहीत. तिच्याकडून फक्त सेवा करवून घेणे अपेक्षित आहे, असं ते म्हणतात. जिहादी
योद्ध्यांच्या परवानगीशिवाय गुलामांबरोबर शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत. ते
दुसऱ्याच्या संपत्तीवारचे अनधिकृत अतिक्रमण समजले जाईल. परंतु ती संपत्ती विकत
घेऊन हा प्रश्न सोडवता येईल असे ते म्हणतात.
शरीरसंबंधासाठी योग्य अशा वयात मुलगी आली की तिच्याशी संभोग करावा, मुलगी
अजून वयात आली नसेल तर मात्र संभोगाशिवाय तिचा उपभोग घेता येऊ शकतो, असे त्याचे
स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. शरीरसंबंधांच्या दरम्यान जास्तीत जास्त शरीरसुख
देणाऱ्या ‘कोणत्याही’ तंत्राचा वापर पुरुष स्त्री गुलामच्या परवानगीने किंवा
परवानगीशिवाय करू शकतो. स्त्री गुलामाला मारहाण करणे सुद्धा क्षम्य मानले आहे.
परंतु चेहेऱ्यावर मारहाण करू नये, असा संकेत आहेत. स्त्री गुलाम आपल्या मालकापासून
जर पळून जायचा प्रयत्न करत असेल तर तो अक्षम्य गुन्हा मानला गेला आहे, तथापि या
गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा कुराण किंवा शरियामध्ये ठरवून दिलेली नाही. ती शिक्षा
तो मालक स्वतःच्या मर्जीने देऊ शकतो. स्त्री गुलामाबरीबर लग्न सुद्धा करण्याची
परवानगी आहे. परंतु दुसऱ्या योद्ध्याच्या स्त्री गुलामाबरोबर लग्न केले तर मात्र
शरीरसंबंधाचा अधिकार कायदेशीररीत्या लग्न झालेल्या पुरुषाला मिळेल, मालकाला नाही.
सर्व प्रश्न उत्तरं वाचून असं लक्षात येईल की या जिहादी योद्ध्यांची
अल्लाहवर, कुराणवर, शरीयावर श्रद्धा आहे. सर्व समस्यांना, सर्व प्रश्नांना, सर्व
शंकांना उत्तरं ते त्यातूनच (कुराण, प्रेषितांचे आयुष्य, शरिया, हदीस) देण्याचा
प्रयत्न करतात.
सुटकेसाठी प्रयत्न :
याझीदींच्या सुटकेसाठी कमी-अधिक प्रमाणत जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
परंतु जागतिक पातळीवरचे थोडे प्रयत्न सुद्धा लगेच जागासमोर येतात, पण प्रादेशिक
पातळीवरचे मोठे प्रयत्न सहजा सहजी जगासमोर येत नाहीत. भारतातील योग गुरु श्री श्री
रविशंकर यांची स्वयंसेवी संस्था Art Of Living इराक मध्ये मदतकार्य करत
आहेत. Art Of Living चे अनेक कार्यकर्ते जीवावर उदार होऊन तिथे मदतकार्य
करत आहेत. १० अमेरिकी डॉंलरच्या बदल्यात एका अप्लवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार
करण्यात आला होता, त्या मुलीला सोडवण्यात Art Of Living ला यश आलं आहे.
त्याचबरोबर अत्यल्प दरामध्ये पाणी आणि अन्न सुद्धा हे कार्यकर्ते उपलब्ध करून देत
आहेत.

समारोप :
इस्लामचा अभ्यास करताना एक मुद्धा सतत लक्षात ठेवावा लागतो. तो आहे कुराणचे
कालक्रमानुसार पडणारे दोन भाग. एक मक्का काळ आणि दुसरा मदिना काळ. या दोन काळात
बदललेल्या परिस्थितीनुसार परस्परविरोधी सुद्धा आयती आलेल्या आहेत. तेव्हा ही
बदललेली परिस्थिती नेमकी काय होती याचा अभ्यास हिंदुनी करणे आवश्यक आहे. नाशिकमधील
प्राध्यापक संतोष शेलार यांनी यासंदर्भात लिहिले आहे की, बरेच अभ्यासक ‘इस्लाम’
कसा धर्मसहिष्णू आहे हे सांगताना ठराविक ६-७ आयातींचा संदर्भ देतात.या आयती
मक्काकालीन आहेत. त्यावेळी प्रेषितांची शक्तीही कमी होती.मदिनाकाळात मात्र या
सर्वधर्मसंभवू भासणाऱ्या आयती येणे बंद झाले होते, याउलट उघड उघड आक्रमक आयतीच
आल्या आहे.’ हे मात्र नक्की की ‘इस्लामिक स्टेट’ आपल्या सर्व कार्यपद्धतीची दिशा
कुराण’, ‘शरिया’, प्रेषितांचे आयुष्य’, ‘पहिले चार खलिफा’ यांच्यातूनच दाखवत आहे. अल्लाहला
खुश करण्यासाठी, स्वर्गात जागा मिळावी म्हणून, नारकाग्नीपासून मुक्तता मिळावी
म्हणून आम्ही हे सर्व करत आहेत, अशी त्यांची भूमिका आहे. या त्यांच्या भूमिकेचा
सखोल अभ्यास आपण केला पाहिजे.
या सर्वातून मला अजून न सुटलेला प्रश्न एकच आहे, तो म्हणजे उच्चशिक्षित
पाश्चात्य आणि पौर्वात्य तरुण/ तरुणी इस्लामिक स्टेटकडे आकर्षित होण्याचे कारण काय
असेल? इस्लामिक स्टेटमध्ये असं कोणतं आकर्षण आहे, की ज्यामुळे पुरुष आणि
महिलासुद्धा जीव द्यायला आणि तितक्याच क्रूरपणे जीव घ्यायला तयार होतात? मध्ययुगीन
धार्मिक कक्षेतून माणूस कधी बाहेर येणार?
(पूर्वप्रसिद्धी - नवभारत, ऑगस्ट २०१६)
(पूर्वप्रसिद्धी - नवभारत, ऑगस्ट २०१६)
ता.क.
१. 'दबिक़'या मासिकाचे एकूण १५ अंक प्रकाशित झाले आहेत.
२. अमेरिका, रशिया आणि नाटो सैन्यांनी इस्लामिक स्टेटच्या प्रदेशावर हवाई हल्ले सुरु केले. त्यातून 'खलिफा अबू-बक्र-अल-बगदादी' मारला गेल्याच्या अफवा अनेकदा उठल्या, पण तशी अधिकृत बातमी अजून आलेली नाही.
३. या हवाई हल्ल्यांमुळे इस्लामिक स्टेटची राजकीय, आर्थिक ताकद कमी होत असल्याचा सर्वसाधारण आपला समज होतो, पण 'दबिक़'चा शेवटचा अंक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित झालेला आहे.
४. 'टेलिग्राम'या सोशल मिडीया अॅप वर 'याझीदी' मुलगी लिलावात काढली आहे, अशी बातमी इस्लामिक स्टेटनी प्रकाशित केली होती. ती बातमी सुद्धा हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतरच आली होती.
५. रमजानच्या महिन्यात जगात अनेक ठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले इस्लामिक स्टेटनी घडवून आणले. त्यामध्ये मुख्य टार्गेट युरोप राहिलेलं आहे, पण बांगलादेश सुद्धा आशियातील केंद्र बनत चालले आहे.
१. 'दबिक़'या मासिकाचे एकूण १५ अंक प्रकाशित झाले आहेत.
२. अमेरिका, रशिया आणि नाटो सैन्यांनी इस्लामिक स्टेटच्या प्रदेशावर हवाई हल्ले सुरु केले. त्यातून 'खलिफा अबू-बक्र-अल-बगदादी' मारला गेल्याच्या अफवा अनेकदा उठल्या, पण तशी अधिकृत बातमी अजून आलेली नाही.
३. या हवाई हल्ल्यांमुळे इस्लामिक स्टेटची राजकीय, आर्थिक ताकद कमी होत असल्याचा सर्वसाधारण आपला समज होतो, पण 'दबिक़'चा शेवटचा अंक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित झालेला आहे.
४. 'टेलिग्राम'या सोशल मिडीया अॅप वर 'याझीदी' मुलगी लिलावात काढली आहे, अशी बातमी इस्लामिक स्टेटनी प्रकाशित केली होती. ती बातमी सुद्धा हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतरच आली होती.
५. रमजानच्या महिन्यात जगात अनेक ठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले इस्लामिक स्टेटनी घडवून आणले. त्यामध्ये मुख्य टार्गेट युरोप राहिलेलं आहे, पण बांगलादेश सुद्धा आशियातील केंद्र बनत चालले आहे.
-
मुकुल रणभोर
mukulranbhor.blogspot.in
No comments:
Post a Comment