रोज भारतात या 'सेक्युलॅरिझम' वर
चर्चा होतेच. प्रत्येक विद्यापीठामध्ये या विषयावर अभ्यास होतोच. प्रत्येकजण स्वतः
'सेक्युलर' म्हणवतो, दुसरा 'सेक्युलर' नाही म्हणतो.
तर मुळात 'सेक्युलॅरिझम' आहे काय?
हे जरा समजून घेऊ.
भारत हा बहुधर्मीय देश आहे. भारतात अनेक धर्म
(गुण्यागोविंदाने?) नांदत आहेत.
भारतात प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि पुढेही अनेक धर्म असणारच आहेत. दोन
धर्मांतील भांडणे हा प्रश्न काय गृहयुद्धाने सोडवण्याची भारताची मानसिकता नाही,
ती कधीच नव्हती. अनेक धर्मांचे सहअस्तित्व हेच भारताचे वैभव आहे. 'सेक्युलॅरिझम' हे धर्माधर्मातील कलह दूर करण्यावरचे
उत्तर नाही. 'सेक्युलॅरिझम' हि
भारतातली सर्वात गैरसमजुतीती अडकलेली संकल्पना आहे. भारतातले हिंदू मुस्लीम संबंध
किंवा हिंदू मुस्लीम प्रश्न हा 'सर्वधर्मसमभावा'ने सोडवला जाऊ शकत नाही. तो 'सेक्युलॅरिझम'ने सोडवला जाऊ शकतो. हा फरक मुद्दाम दाखवायचा प्रयत्न आहे. 'सेक्युलॅरिझम' आणि त्याचे मराठी शब्द (उदा.
सर्वधर्मसमभाव, धर्मसहिष्णुता,
निधर्मी) यांच्यात फरक आहे. भारतात एकापेक्षा जास्त धर्म आहेत म्हणून भारतात 'सेक्युलॅरिझम'ची आवश्यकता आहे हा युक्तिवाद चुकीचा
आहे. भारत समजा फक्त हिंदू धर्मीय प्रदेश असता तरीही आज जितकी 'सेक्युलॅरिझम'ची गरज आहे तितकीच त्यावेळी पडली असती.
ऐहिक जग आणि पारलौकिक जग यांच्यात फरक करणारी हि 'सेक्युलॅरिझम'
संकल्पना आहे. 'सेक्युलॅरिझम' हे दोन धर्मातील कलहावरचे उत्तर नाही.
भूतकाळाच्या अंधविश्वासातून बाहेर आणून आधुनिक
विज्ञानाच्या वाटेवर आणून सोडणारी 'सेक्युलॅरिझम' हि
कल्पना आहे.
कॉंग्रेसच्या किंवा स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या 'सेक्युलॅरिझम' बद्दल
आपण बोलूच नकोयत. त्यांना हिंदूंच्या विरोधात 'सेक्युलॅरिझम'ला उधाण येतं. पण हे पुरोगामीही
(स्वयंघोषित) चुकीचे आहेत. आणि त्यांच्या खोट्या 'सेक्युलॅरिझम' च्या विरोधात बोलणारे उजवेही चुकीचे आहेत.
शीर्षक अस लिहिण्यामागचं कारण secularism चा राज्यघटनेला जो अभिप्रेत अर्थ आहे तो इहवाद असाच आहे. राज्यघटनेच्या कलम २५
मध्ये जो धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे त्यात (२) (अ) : धर्माशी संबंधित असणा-या (associated
with religious practices) कोणत्याही आर्थिक, राजकीय
व अन्य इहालौकिक (Secular) बाबी नियंत्रित वं प्रतिबंधित
करणारे कायदे करण्याचा संसदेला किंवा शासन संस्थेला अधिकार असेल अस आजे. त्यामुळे हे तर उघड आहे कि शासनव्यवस्थेनी धर्म हि संस्था फक्त परलोकाचा
विचार करणारी आहे अस गृहीत धरलं आहे. आणि त्यानुसार आर्थिक, सामाजिक, राजकीय,
कौटुंबिक सर्व बाबतीतले कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. आणि Secularism या शब्दाचाही एक अर्थ असा होतो कि 'नैतिकतेचा पाया या जगात आहे.' पण राज्यशास्त्रा मध्ये जो Secularism येतो त्याचा
एक अर्थ होतो तो म्हणजे 'राज्यव्यवस्था लोकांमध्ये धर्मावरून भेद करणार नाही' किंवा 'राज्य
व्यवस्थेला कोणताही धर्म नसतो.' पण याचा अर्थ शासन व्यवस्था सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य
व दुसर्याचे मुलभूत हक्क यांच्या आधीन राहून धर्म
मुक्तपणे आचरण्याचा अधिकार लोकांना देते. उदा. शासन व्यवस्था लोकांच्या आरोग्याबाबत उत्तरदायी आहे म्हणजे काय उदय सरकारला वाटल कि उपास करणं हे
आरोग्याला हानिकारक आहे तर सरकार उपसाविरुद्ध कायदा करून उपास नियमबाह्य ठरवू शकतो. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमुळे सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला धोका
निर्माण होण्याचा प्रसंग आलं तर सरकार मिरवणुकीवर बंदि
आणू शकते. आणि असे कायदे किंवा नियम सरकारनी यापूर्वी सुद्धा काढलेले आहे. याचा अर्थ असा होतो कि धर्म
स्वातंत्र्य आपल्याला फक्त पारलौकिक बाबिंपुरत आहे. जे काही
धर्माच आचरण करायचं असेल ते फक्त मनात. देश सेक्युलर या तत्वावर उभं करायचा आहे याचा अर्थ सर्व धर्म पाळण्याच स्वतंत्र्य आहे पण मनात.
इहलोक आणि पारलोक हे एका पुसट अशा रेशेनी वेगळे
काढलेले आहेत. जोपर्यंत एखादी गोष्ट मनात आहे तोपर्यंत ती पारलोकात, ती मनातून शब्दाद्वारे व्यक्त झाली कि ती
इहलोकात. याचा अर्थ दरवर्षी गणपती जो आपण बसवतो तो तो मनात बसवायचा
आणि १० दिवसांनी मनातल्या नदीत विसर्जन करायचा. मनातच हज यात्रेला
जाऊन यायचा. बकरी ईदला बकरी जी कापायची ती मनातच
कापायची, ती प्रत्यक्षात
कापली तर तो इहलोक झाला. किंवा नमाज मनातच पढायची तो सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन म्हंटली म्हणजे इहलोक झाला. मग धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय?? राजाला किंवा आता शासनसंस्थेला कोणताही धर्म नसतो याचा अर्थ फक्त
पारलौकिक धर्म नसतो असा याचा अर्थ होत नाही. चाणक्यांनी
जी राजधर्माची सूत्र सांगितली आहेत त्यामध्ये तो म्हणतो एकादशी करणं हा राजाचा धर्म नव्हे, कुंभमेळ्यात स्नान करणं हा राजाचा धर्म नव्हे. कोट्यावधी लोकांच्या
एकादश्या सुरळीत झाल्या पाहीजेत त्यासाठी काम करणं हाच
राजाचा धर्म असतो. मंदिराचा पुजारी नेमणं हि इहलौकिक बाब आहे त्यामुळे त्याबाबतीत शासन कायदा करू शकते.
आरोग्याला हानी कारक आहे किंवा सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला जरा
धोका निर्माण झाला आहे अस सांगून जर नमाज किंवा हज
यात्रेवर सरकारनी बंदि घातली तर ते मुसलमानांना चालेल का? नाहीच चालणार!
भारतामध्ये पंचाईत अशी झाली आहे कि शासन व्यवस्था किंवा पोलीस सक्षम नसल्याने
आपल्यावर बंधनं येतात.
एक वेगळा उदाहरण देतो म्हणजे समजेल. काही दिवसांपूर्वी
पुणे पोलिसांनी राजमाचीवर रात्री जायला बंदी घातली, कारण चोरांचा सुळसुळाट. मला रात्री जातं येत नाही हि माझ्या स्वातंत्र्यावर आलेली गदा
आहे कारण पोलीस चोरांचा बंदोबस्त करू शकत नाहीत.
चोरांचा बंदोबस्त करणं हा उपाय आहे माझी राजमाची रात्री बंद करणं हा उपाय नव्हे. धर्माच्या नवे चालणारी
प्रत्येक कामे सुरळीत चालली पाहिजेत हि जबाबदारी सरकारची आहे, ती ते व्यवस्थित पर पडू शकत नाहीत म्हणून ते त्या कामांवर बंदी घालणार. हा मार्ग
बरोबर नव्हे. हे धर्म स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.
माझ्यामते मूळ घोळ जो सुरु होतो तो या मुद्ध्या पासून सुरु होतो कि धर्म ही संस्था फक्त परलोकाचा विचार करणारी संस्था आहे. अंतिम ध्येय जरी ते असलं तरी त्यासाठीची
सर्व कर्म इह्लोकताच येतात. गणपतीची स्थापना, दहीहंडी, नवरात्र
उत्सव किंवा हज यात्रा किंवा रविवारी चर्च मध्ये जाऊन केलेली प्रार्थना या सर्व गोष्टी धर्माच्या आहेत पण इहलोकात येतात. Secularism दिशेनी जर प्रवास करायचा असेल तर
धर्माच्या सर्व गोष्टी मनात बंदकरून ठेवाव्या लागतील, आणि हे अशक्य आहे का?
ज्या निधर्मी राज्य व्यवस्थेचा निश्चय नेहरूंनी केला होता
आणि त्यांचे वारसदार तो वारसा चालवतात तो निश्चयच
किती पोकळ, ढोंगी आहे याचा
विचार सर्वांनी करावा. धर्म सार्वजनिक जीवनात
आणायचा नाही हे जर मूळ तत्व देशानी स्वीकारलं तर धर्माच्या सर्व गोष्टी सार्वजनिक जीवनातून काढून
टाकाव्या लागतील. सर्वात बेसिक म्हणजे 'सत्यमेव जयते' सारखी
किमान २५० केंद्रीय संस्थांची बोधवाक्य हिंदू धर्माच्या 'उपनिषदा'तून घेतलेली आहेत. धर्म जर
सार्वजनिक जीवनात आणायचा नाही असा ठरवलं तर हि सर्व बोधवाक्य
काढून टाकावी लागतील.तरच ते खा-या अर्थानी सेक्युलर राज्य असेल. ज्या धर्माबद्दल
आपण बोलतो आहोत तो आजच्या काळाला किती लागू होतो असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
कारण सेक्युलर राज्य आणायचा असेल तर हा विचार कराव लागेल. पण मुळात हा मुद्धाच
चुकीचा आहे कि धर्म हा फक्त परलोकाचा विचार करतो. मानवी जिवनाच जे आदर्श वर्णन
केलं जातं ते म्हणजे हिंदू धर्मानी सांगितलेली आश्रमव्यवस्था, चार वर्ण, भारतातल्या
प्रत्येक घरात असणार देवघर, सर्व मंदिरे, हज यात्रा मुसलमान आहेत तोपर्यंत सुरु राहणारच आहे. त्यामुळे आजच्या कळला
किती लागू हा मुद्धाच येत नाही. जर सेक्युलर चा इहवाद किंवा जडवाद असा अर्थ होत
असेल तो तो व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित असावा. ते तत्व देशाच्या जडणघडणीला
घटक आहे. जर सेक्युलर चा इहवाद किंवा जडवाद असा अर्थ होत असेल तर शासन व्यवस्था
सार्वभौम होते. लोक नाही.लोकांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर जर सरकारची
मर्यादा असेल तर लोक सार्वभौम असतील??