आज देशभर विद्यापीठांतून आंदोलने सुरू आहेत. भाजपाच्या सरकारने दोन कायदे संसदेसमोर ठेवले. भारताकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांपैकी त्या त्या देशातील अल्पसंख्य लोकांनी आसरा मागितला तर त्यांना तो दिला जाईल, अशा आशयाचा तो कायदा आहे. कायद्याचे तपशील त्याची स्पष्टता हळूहळू लोकांना येईल. अभ्यासक विचारवंत यांचं ते काम आहे. फाळणीपासून देशात उरलेल्या मुसालमानांना जर कोणी दुय्यम नागरिक म्हणून आता हिणवणार असेल तर त्याचाही कडाडून विरोध झाला पाहिजे. पण गैरसमज पसरवून, सरकारवर हेत्वारोप करून आपले अजेंडे पुढे रेटणे बरोबर नाही.
आंदोलनांमध्ये मला विरोधाभास कुठे दिसला, तर जेएनयु, एएमयुमध्ये आणि देशभरच्या विद्यापिठांमध्ये गांधीजी आणि आंबडेकर यांच्या तसबिरी घेऊन विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गांधीजींच्या चरित्रात ज्या एका असामान्य आंदोलनाचा प्रसंग आहे, तो सगळ्यांनीच पुन्हा एकदा काढून वाचला पाहिजे. गांधीजींची पहिली ३ आंदोलनं, जी पुढे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी वापरली त्याचे प्रयोग होते. चंपारण, खेडा आणि अहमदाबाद मीलचा सत्याग्रह. यापैकी अहमदाबाद मिलच्या सत्याग्रहाचं वर्णन तिथे ड्युटीवर असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याने लिहून ठेवलेलं आहे, ते मी आता परत इथे सांगणार नाही. ते मिळवून वाचा, हिंट - लुई फिशरने तो प्रसंग दिला आहे. पण ज्यावेळी हातात फोटो गांधीजींचे असतात आणि आंदोलन हिंसक होतं, बेकायदेशीर होतं. तेव्हा त्यातली आयरनी दिसते. दुसरी आयरनी आहे बाबासाहेबांचा फोटो. जो सध्याच्या आंदोलनातला मुख्य मुद्दा आहे की, या देशात मुसलमान सोडून सर्व धर्माच्या लोकांवर दया दाखवली जाणार आहेत. तर त्या अनुषंगाने एक गोष्ट मला सांगायची आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा लढा उभा राहिलेला होता. आणि आज न उद्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित होतं. मुद्दा होता स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशाची घटना, देशाचा कारभार कोणत्या कायद्याच्या आधारे चालेल. त्याच्या प्रयत्नात १९२८ साली मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. तिचा रिपोर्ट आला. त्याच्यावर १८ जानेवारी १९२९ सालच्या 'बहिष्कृत भारत' या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपादक असलेल्या पाक्षिकात स्वतः बाबासाहेबांनी एक दीर्घ लेख लिहिला आहे. लेखाचं नाव आहे 'नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य' मूळ लेख खूप मोठा आहे. आधी सुरवातीला लेखात मतदारसंघ संयुक्त असावेत की विभक्त असावेत की राखीव असावेत वगैरे चर्चा आहे. लेखाच्या शेवटी बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे बघा. पुढचा परिच्छेद जसाच्या तशा देतो. या परीच्छेदात मी अक्षराचाही बदल केलेला नाही.
"एका संस्कृतीने बद्ध झालेले लोक या युरोप खंडात आहेत त्या युरोप खंडातील राष्ट्रातील यादवी असून मिटली नाही. आशिया खंडात बोलून-चालून विविध नवे विरोधी संस्कृतीच्या लोकांनी आपले ठाण धरले आहे. त्यांचा मिलाफ होईल अशी आशा धरून चालणे म्हणजे मृगजलाच्या पाठी लागून आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे. फाजील आशावाद न करता परिस्थितीची जाचणून ध्यानात घेऊन वागणे हे बरे. आहे या परिस्थितीत चीन व जपान या दोहोंपैकी कोणाकडूनही जरी (भारतावर) मारा करण्यात आला तर त्यात पराजय कोणाचा होईल, हे जरी सांगता आले नाही तरी, त्यांच्या माऱ्याला सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याबद्दल कोणालाही खात्री देता येईल. पण स्वतंत्र झालेल्या हिंदुस्तानवर जर टर्की, पर्शिया किंवा अफगाणिस्तान यातील मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जरी मारा केला, तर त्या प्रसंगी सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याची खात्री कुणी देऊ शकेल काय? आम्हास तरी देता येत नाही. या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे तर ही दोन राष्ट्रे नांदत आहेत. हिंदी-मुसलमान (म्हणजे भारतीय) लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावला आहे की, मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश त्याच्या अंमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडलेल्या मुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्तानकडे अगर अफगाणिस्थानकडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल त्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्ती हिंदू बांधवांनाविषयी त्यांना बिलकुल आपलेपणा नाही. असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे, असे आम्हास वाटते. स्वातंत्र्य संरक्षणाचा विचार करता नुसत्या मुसलमानांच्या मनोवृत्तीचा विचार करून चालावयाचे नाही. तर देशातील प्रांतरचनेचा विचार करणे प्राप्त आहे. सगळे मुसलमानी प्रांत हिंदुस्थानच्या हद्दीवर आहेत. विंध्य पर्वतापर्यंत सारी धरती मुसलमानमय आहे. यामुळे मुसलमान लोक हे स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानचे द्वारपाल आहेत. शत्रूला त्यांना अडवून धरले तर ठीक, पण जर का त्यांनी शत्रूला सहाय्य केले, नव्हे तटस्थ राहिले तर अर्धे मकान गाठेपर्यंत त्यांना कोणी शह देऊ शकणार नाही. घरच्यांच्या सहाय्याने आत आलेला शत्रू घर करून राहणार. त्याला बाहेर घालवणे अशक्य आहे याची जाणीव सर्व हिंदूंनी ठेवणे आवश्यक आहे."
हे बाबासाहेबांचं मत १९२९ सालचं आहे. याला कोणी pre mature, बालीश म्हणू शकेल. कारण तशी बाबासाहेबांना देशाच्या राजकारणात सक्रीय होऊन जेमतेम ८ वर्षं झाली आहेत. तर अशांनी १९४० साली लिहिलेलं 'पाकिस्तान' हे पुस्तक वाचावं. ते फुकट उपलब्ध आहे.
इतक्या स्पष्टपणे बाबासाहेब केवळ आक्रमक मुस्लीम देशाबद्दल बोलत नाहीत. ते या देशात असलेल्या मुसलमान समाजाच्या मानसिकतेविषयीही बोलत आहेत. चीन किंवा जपानचा हल्ला भारतावर झाला तर हा देश एकत्र येऊन त्याचा सामना करेल, पण जर तर्की, पर्शिया अफगाणिस्तान चाल करून आले तर हा देश एकसंधपणे त्यांच्या प्रतिकाराला उभा राहील याची खात्री बाबासाहेबांनाही देत येत नाही. अजून एक, मध्यंतरी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनी मांडला होता, असा सूर राष्ट्रीय पातळीवर उमटला होता. या परिच्छेदात बाबासाहेब स्वतः मांडत आहेत, की या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे तर दोन राष्ट्रे नांदत आहेत. सावकर तेव्हा रत्नागिरी स्थानबद्धतेत होते.
सुदैवाने हे शब्द अशा व्यक्तीच्या लेखणीतून उतरले आहेत, ज्याच्यावर कोणी जातीयतेचा आरोप उघडपणे करत नाही. बाबासाहेबांचे याहीपेक्षा आक्रमक विचार वाचायचे असतील तर त्यांनी पटकन या ( https://www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_08.pdf ) वेबसाईटवरून बाबासाहेबांचं 'पाकिस्तान' हे पुस्तक डाऊनलोड करून वाचायला घ्या. आणि त्यातही to narrwo it down हवं असेल तर, Break Up of Unity हे प्रकरण वाचा.
गांधीजींचा फोटो घेऊन आंदोलन हिंसक होतं. आणि आंबेडकर यांचा फोटो हातात असून देशाबाहेरून येणाऱ्या मुसालमानांना सहानुभूती दाखवणारं ठरतं आणि जेव्हा स्वतः बाबासाहेब ज्या मुद्द्यासाठी आयुष्यभर लढले, ते म्हणजे दलित शोषितांना न्याय मिळवून देणारे खूप महत्त्वाचे विषय अजून प्रलंबित असताना. (हे गेल्या पोस्टमध्ये मी शेअर केलं आहे.)
वर दिलेला बाबासाहेबांचा परिच्छेद महाराष्ट्र शासनाने २००८ साली प्रकाशित केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक' या ग्रंथातील २२४ पानावर आहे. मूळ लेख २१९ व्या पानावर सुरू होतो.

© - Mukul Ranbhor
No comments:
Post a Comment