इस्लामिक
स्टेट ऑफ सिरीया अँड इराक
किंवा
इस्लामिक
स्टेट ऑफ सिरीया अँड लॅव्हेंट
गेले अनेक
दिवस जगातल्या अशा घटनांचा मी विचार करत होतो, ज्या घटनांमुळे जग बदलेले. जगाच्या
समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱ्या अशा घटना कोणत्या. तेव्हा चर्चा
झाल्या आणि सर्वानुमते पर्यावरण हा आताच्या जगासमोरचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
पण 'इस्लामिक
स्टेट ऑफ सिरीया अँड इराक'चा उदय हा त्यानंतरचा जगासमोरचा सर्वात महत्वाचा आणि
क्लिष्ट प्रश्न आहे. सध्याच्या जगाला सर्वात मोठा धोका ठरलेल्या ‘इस्लामिक स्टेट’
बद्दल आपण जरा गांभीर्यानी विचार केला पाहिजे. (पर्यावरणाच्या संदर्भात जगातले
सर्व देश एकत्र येऊन त्यांनी फ्रान्स मध्ये सकारत्मक निर्णय घेतला, तो अमलात येईल
अशी आपण अशा करूया. पण असा निर्णय अजून 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' बद्दल
घेण्यात आलेला नाही) जागतिक अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांना धोका ठरलेल्या, अणुयुद्धाचा
धोका, कदाचित तिसऱ्या महायुद्धाचा धोका, असा आताच्या जगासमोरचा बहुतेक
पर्यावरणानंतरचा सर्वात मोठा धोका म्हणजे ‘इस्लामिक स्टेट’ हा आहे. अमेरिकेच्या
अध्यक्षपदाच्या निवडणुकींच्या चर्चांमधले विषय अमेरिकेची अर्थव्यवस्था नसून आयसीस
असण्यामागे काही कारणं आहेत. अमेरिका या धोक्या जास्त बाऊ करतो आहे असं कोणाच म्हणण
असल तर ते चुकीच आहे. हा धोका खरच मोठा आहे. जे पत्रकार हा अमेरिकेचा
'इस्लामोफोबिया' म्हणून ह्याची हेटाळणी करत आहेत, त्यांना परिस्थितीची जाणीव नाही
असच म्हणव लागेल.
६ जुलै २०१४ रोजी पुन्हा एकदा ‘खिलाफत’
किंवा ‘खलिफा’ पद स्थापन करून या संघटनेने खळबळ उडवून दिली. २००३-०४ च्या अमेरिका इराक
युद्धा दरम्यान तेव्हाच्या अल–कायदाचा एक अतिरेकी ‘अबू-बक्र-अल-बगदादी’ हा आता
खलिफा झाला. (तो आतापर्यंत एकदाच जगासमोर आला आहे. त्यावेळी त्याने त्याच्या
समर्थकांसाठी आणि इस्लामिक स्टेटच्या स्थापनेसाठीची धोरणं जगासमोर मंडळी) पहिल्या
महायुद्धनंतर तुर्कस्थानने ऑट्टोमन खिलाफत पद बंद करून जगातलं शेवटचं खलिफा पद
संपवलं. (एक लक्षात घ्या, कि तुर्कस्थानने हे उचललेलं चांगला पाउल होतं. पण ते
खलिफा पद पुन्हा निर्माण करावं यासाठी भारतातल्या मुसलमान समाजानी आंदोलन सुरु केलं.
त्याला गांधीजीनी पाठींबा दिला होता. आधुनिक जगाची वाटचाल धर्म मागे टाकून झाली
पाहिजे. कालबाह्य झालेले सर्वच धर्म मागे टाकून आधुनिक रस्त्यावरून जाणाऱ्या
तुर्कस्थानच्या विरोधात भारतातले आणि जगातले मुस्लीम एकत्र झाले होते खलिफा
पदाच्या पुनः स्थापनेसाठी) अनेक पाश्चिमात्य पत्रकारांच्या निर्घृण हत्या, अनेक गावांच्या
सरसकट कत्तली, धार्मिक स्थळांच्या तोडफोडी, बलात्कार, सक्तीची धर्मांतरं ह्या
प्रकारच्या गोष्टींचं जाहीर आणि धार्मिक समर्थन मध्ययुगानंतर जगाला बघण्याची सवय
नव्हती. अल-कायदा, किंवा पॅलेस्टाईन लिबरेशन फ्रंट सारख्या तत्सम धर्माच्या नावानी
दहशतवाद चालवणाऱ्या संस्था जगात अस्तित्वात होत्याच. परंतु अचानक जगातली सर्वात
श्रीमंत दहशतवादी संस्था, अद्ययावत शस्त्रास्त्र असणारी संस्था, सोशल मिडिया चा
प्रभावी वापर करणारी संस्था म्हणून इस्लामिक स्टेटचा कसा उदय होतो, ही बाब विचार
करायला लावणारी आहे. मध्यायुगाच्या आणि धर्माच्या जोखडातून बाहेर न आल्यानं काय
होऊ शकतं, हे इस्लामिक स्टेट कडे पाहून लक्षात येऊ शकेल. सध्याच्या जगासमोरचा
पर्यावरणानंतरचा हा सर्वात मोठा धोका बनला आहे. जगातल्या मोठ्या तेलाच्या विहिरी
त्यांच्या ताब्यात आहेत. अनेक तरुणांना त्याचं आकर्षण वाटत. त्यांच्याकडे पैसा आहे
या पेक्षा जास्त धोकादायक अनेकांना त्याबद्दल आकर्षण आहे, हे आहे.
'एका हातात कुराण , एका हातात ISIS चा झेंडा' हे 'एका हातात तलवार आणि एका हातात कुराण' याला समानार्थी वाटत नाही का? ISIS आणि इस्लाम हे वेगळे नाहीतच. ते एकच आहे. |
म्हणून हे रसायन कसं तयार होतं, ह्याचा
अभ्यास झाला पाहिजे. भारतात ‘इस्लाम’ या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायची
सरकारी पुरोगामी परंपरा आहे. मुळात इस्लामचा धर्म म्हणून, मग १४०० वर्षाच्या
इस्लामच्या इतिहासाचा आणि भारतातल्या १००० वर्षाच्या इस्लामच्या इतिहासाचा आपण
अभ्यास करण्यात कमी पडलो हेच सत्य आहे. दोन्ही टोकाची केवळ आपण टीका इस्लाम वर
केली. पण धर्म म्हणून इस्लाम समजून घ्यायचं आपण प्रयत्न केला नाही. जिथे आपण मूळ
इस्लामचा अभ्यास केला नाही, तिथे खलिफा पदाचा, संस्थेचाही आपण अभ्यास केला नाही या
आश्चर्य ते काय? म्हणून जर 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' समजून घ्यायचं
असेल तर सर्वात मूलभूत म्हणजे 'इस्लाम' समजून घ्यावा लागेल. आणि आताच्या ‘इस्लामिक
स्टेटचा’ अभ्यास करायचा असेल तर प्रेषित महंमद पैगंबर यांच्या मृत्यनंतर खलिफा पदावर
बसलेल्या चार खालीफांचा अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय सर्व पाश्चात्य अन्वयार्थ
'अर्धसत्य अन्वयार्थ' आपण
खरे मानत राहणार.
इस्लामिक स्टेट म्हणजे काय?
म्हणजे जिथे इस्लामचं राज्य आहे. इस्लामचं राज्य म्हणजे काय, जिथे राजा किंवा
राज्याचा प्रमुख मुसलमान आहे. केवळ राजा मुसलमान असून भागात नाही. राज्याचे कायदे
वेगळे आहेत आणि राजा मुसलमान आहे तर त्याला 'इस्लामिक स्टेट' म्हणत नाहीत. मग
कायदे कोणते पाहिजेत, तर कायदा पाहिजे 'शरिया.' आता शरिया म्हणजे काय? सर्वात
क्लिष्ट विषय इथून सुरु होतो. प्रेषित महंमद पैगंबर यांच्या मृत्यनंतर 'अबू-बक्र' हा पहिला खलिफा झाला. अजून ‘शरिया’ लिखित
स्वरुपात तर नाहीच पण अस्तित्वातही नव्हता. पैगंबर यांचा काळातही शरिया अस्तित्वात
नव्हता. कारण तेव्हा अजून ‘कुराण’चीच निर्मिती सुरु होती. मुद्दा हा आहे की पैगंबर
यांच्या काळात ‘शरिया’ कायदा अस्तित्वातच नव्हता. पहिल्या खालीफाचा म्हणजे
अबू-बक्रचा लोकांनी खून केला कारण तो ‘अल्लाह’ नी सांगितल्याप्रमाणे राज्य करत
नाही. म्हणजे 'इस्लामिक स्टेटची' निर्मिती करत नाही. पुढच्या तिन्हीही खालीफांचा खून झालेला आहे,
कारण ते अल्लाह नी सांगितल्याप्रमाणे (इस्लामिक स्टेटची निर्मिती करत नाहीत) राज्य
कारभार करत नाहीत. आता अल्लाहनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कसं, हे कोणालाही माहिती
नाही. जसं अल्लाह कोण हे कोणालाही माहिती नाही तस अल्लाह्नी सांगितल्याप्रमाणे
म्हणजे काय हेही कोणालाही माहिती नाही. पण या आदर्श समजल्या जाणाऱ्या पहिल्या चार
खलिफांनंतर खलिफा झालेल्या जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या खालीफांनी इस्लामचा
अभ्यास असलेल्या पंडितांना एकत्र आणून राज्य कसं चालवलं पाहिजे, याचे नियम लिहून
घेतले. आणि For The First time in the history of
Islam लिखित कायदा निर्माण झाला. प्रेषित
म्हणून आलेल्या महंमद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये इस्लामची स्थापन केली. इ.स. ६३२
मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग सुरु होतो खालीफांचा काळ. इस्लामच्या इतिहासामध्ये
ज्या खलिफांना सर्वात आदराच स्थान आहे अशा चार खालीफांचा काळ सुरु होतो. तो आहे
इ.स. ६३२ ते इ.स ६६१. या चारही खालीफांचा खून ‘इस्लामिक स्टेट’ ची निर्मिती करत नाही
म्हणून करण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांना इस्लामच्या
इतिहासामध्ये सर्वात आदराचं स्थान आहे.
आता हे लक्षात घ्या, कि आदर्श खालीफाना
सुद्धा जमलं नाही असं इस्लामिक स्टेट कोणतं? तर त्याचं उत्तर आहे, जे प्रत्यक्ष प्रेषितांच्या
काळात प्रेषितांनी निर्माण केलं तेच खरं इस्लामिक स्टेट. पण प्रत्येक खालीफानी आदर्श
इस्लामिक स्टेट निर्माण करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण कोणतं इस्लामिक स्टेट
आदर्श (किंवा कोणतं इस्लामिक स्टेट खरं?) यात वाद सुरूच राहिले. ते अजूनही सुरु
आहेत. म्हणून चौथ्या खलिफा म्हणजे ‘आली’ (खलिफा पदावर इ.स. ६५६ ते ६६१) नंतर
आलेल्या खालीफांनी इस्लामी धर्मपंडितांना एकत्र आणून इस्लामिक स्टेटचे कायदे कोणते
असावे यावर विचार करून धर्मशास्त्र म्हणजे कायदा निर्माण करण्याची विनंती केली.
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या जगातल्या चार खालीफांनी चार ‘त्यांच्या त्यांच्या
राज्याला अनुकूल’ असे कायदे करवून घेतले. त्या चार मुख्य परंपरा म्हणजे १.
हनाफी, २. हम्बाली, ३. मलिकी आणि ४. शफी. आजही शरिया या इस्लामी
धर्मशास्त्राच्या या चार परंपरा आहेत. भारतामध्ये ह्या चार मधली त्यातल्या त्यात 'उदारमतवादी'
समजली जाणारी पपरंपरा म्हणजे ‘हनाफी’ लागू आहे. ही परंपरांची फारकत बिगर मुसलमान
करतात. इस्लामच्या अभ्यासाच्या निमित्तानी आणि मुख्यतः 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड
इराक'च्या अभ्यासाच्या निमित्ताने मी अनेक डॉक्युमेंटरीज् पहिल्या. अनेक पुस्तकं
वाचली. 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' समर्थकांच्या मुलाखती पहिल्या. कुठेच
मला 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' कडून हे भेद दिसले नाहीत. आपली अशी ठाम
समजूत झाली आहे, कि मुळात इस्लाम चांगला असला पाहिजे. मुसलमान लोक वैयक्तिक
आयुष्यात वाईट वागतात म्हणून धर्म बदनाम होतो आहे. आदर्श समजल्या जाणाऱ्या चार
खालीफांची आयुष्य पहा. कत्तालींशिवाय त्यामध्ये काहीच नाही. जे आताची इस्लामिक स्टेट
ऑफ सिरीया अँड इराक करत आहे.
(भाग २ साठी वाचा - http://mukulranbhor.blogspot.in/2015/12/blog-post_25.html)(क्रमशः)
No comments:
Post a Comment