Friday 25 December 2015

ISIS चा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष (भाग - २)

इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक  

किंवा


इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड लॅव्हेंट 



हे ISIS तर्फे चालवण्यात येणारं मासिक आहे. 
DABIQ - या शब्दाचा अर्थ - 
हे 'उत्तर सिरीया' मधील एक शहर आहे. 
मुसलमानांची अशी  श्रद्धा आहे कि, 
मुसलमान विरुद्ध बिगर मुसलमान हा कुराण नुसारचा 
पवित्र लढा संपले अशी शेवटची लढाई या शहरात होणार आहे. 
आणि त्यानंतर सर्व जग इस्लामय झालेलं असेल. 
आपल्या मासिकाला जाणीवपूर्वक हे नाव देऊन 
ISIS ने आपली ध्येय्य स्पष्ट केलं
आहे. 
‘इस्लामिक स्टेट’ म्हणजे जिथे राजा मुसलमान आहे आणि कायदा शरिया लागू आहे. यापैकी दोन्हीही गोष्टी एकाच वेळी लागू पाहीजेत. एकच असून भागत नाही. कोणत्या परंपरेचा शरिया लागू आहे त्यांनी कोणताही फरक पडत नाही. कुराणची अशी आज्ञा आहे की मुसलमानांनी इस्लामिक स्टेट मध्येच (राजा मुसलमान आहे आणि कायदा शरिया लागू) राहिलं पाहिजे. भारतात औरंगजेब (मुसलमान) राज्य करत होता आणि (इस्लामचा कायदा) शरियानुसार राज्य करत होता, म्हणून तेव्हाचा भारत हा 'इस्लामिक स्टेट' होता. ‘Dabiq’ (दिबाक्) या नावानी 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' एक मासिक चालवतं. त्या ‘दिबाक्’ च्या पहिल्या अंकामध्ये पान क्रमांक १० वर ‘The World has Divided Into two camps’ अशी घोषणा करण्यात आली आहे. ते दोन भाग म्हणजे 'मुस्लीम आणि बिगर मुस्लीम.' आणि त्याच अंकाची Cover Story आहे ‘The Return Of the Khalifah.’ त्या पहिल्या अंकात असं म्हणण्यात आलं आहे कि आता पुन्हा एकदा खलिफा पद आणि खलिफा स्थापन झालं आहे. (खलिफा आहे म्हणजे राज्याचा प्रमुख मुसलमान आहे आणि तो ज्या भागावर राज्य करतो आहे त्या राज्यात कायदा 'शरिया' लागू आहे) जगाची वाटणी पुन्हा एकदा २ विभागांमध्ये झाली आहे. तर जिथे इस्लामिक स्टेट नाही तिथल्या मुसलमानांसाठी या 'दिबाक्'च्या अंकामध्ये ‘A Call To HIjarah’ देण्यात आला आहे. इस्लामची सुरवात होते मक्केमध्ये, परंतु इस्लामची मक्केमध्ये राज्य स्थापन करावी इतकी ताकद नव्हती. म्हणून जिथे आपली राज्य स्थापन करायची ताकद आहे अशा मादिनेमध्ये महंमद पैगंबर ‘हिजरत’ करून गेले. आणि मादिनेमध्ये राज्य स्थापन केलं. जे राज्य स्थापन केलं ते 'इस्लामिक स्टेट' होतं. तिथून पैगंबर यांनीही या जागची वाटणी दोन भागात केली होती. एक दार-उल-हर्ब (म्हणजे युद्ध भूमी) आणि दोन दार-उल-इस्लाम (इस्लामची भूमी). मुसलमानांना कुरण अशी आज्ञा देतं की दार-उल-हर्ब चे रुपांतर दार-उल-इस्लाम मध्ये झालं पाहिजे. त्यासाठी करायचा आहे जिहाद.
          
DABIQ - या मासिकाच्या या पहिल्याच अंकात मुसलमानांना
The Call To Hijrah देण्यात आलेला आहे. कारण
'World Has Divided into two camps'
एक  मुसलमान आणि दिन बिगर मुसलमान
एक - दार-उल-हर्ब (युद्ध भूमी)
दोन - दार-उल-इस्लाम (इस्लामची भूमी)   
इस्लामची रचनाच अशी आहे. महंमद पैगंबर यांचे चरित्र, कुराण, आणि हादीस या तिन्हींचा अभ्यास केल्यानंतर इस्लाम काय आहे हे कळायला लागते. कुराण हे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. ‘प्रेषितांच्या उक्ती आणि कृती’ म्हणजे हादीस आहे. या तिन्हीच्या आधारे इस्लामचा अभ्यास करायचा असतो. इ.स. ६१० मध्ये प्रेषितांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी इस्लामची स्थापना केली. परंतु कुराण हे काही एका दिवसात तयार झालेलं नाही. अल्लाहने प्रसंगानुरूप प्रेषितांना 'कुराण' कथन केलं ते प्रेषितांनी संपादित केलं. मक्के मध्ये इस्लामची स्थापना झाली. परंतु पहिले अनेक वर्ष इस्लामची धर्म म्हणून ताकद कमी होती. त्या मक्का काळात सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता सांगणाऱ्या आयती कुराण मध्ये आलेल्या आहेत. पण ताकद वाढवण्याच्या हेतूनी आणि इस्लामचे राज्य स्थापन करण्याच्या हेतूनी प्रेषित मदिनेला गेले. तिथे हळू हळू इस्लामची ताकद वाढली. तिथे प्रेशितानी ज्यू आणि ख्रिश्चन यांच्याशी ‘मदिना करार’ केला. त्याची कलमं काढून पहा केव्हातरी. आजही भारतातले हिंदू मुसलमान संबंध सुधारण्यासाठी मुसलमान ‘मदिना कराराचे’ दाखले देतात. (त्या करारात ज्यू आणि ख्रिश्चन यांना दुय्यम नागरिकत्व आहे) ताकद वाढल्यानंतर आलेल्या आयतींमध्ये फरक आहे. मादिनेमध्ये आलेल्या आयती माक्केपेक्षा जास्त आक्रमक आहेत. तिथून प्रेषित पुन्हा ‘मूर्तीपूजक’ असलेल्या मक्केवर चाल करून आले. तिथे अजून जास्त आक्रमक आयती आलेल्या आहेत. (मादिनेहून पुन्हा मक्केवर हल्ला केलेल्या प्रेषितांनी स्वतःच्या हातानी अनेक मूर्ती फोडल्या आहे) इस्लामी धर्मपंडीतांमध्ये आणि विचारवंतांमध्ये हा वाद गेली अनेक वर्ष सुरु आहे कि आपण कोणता इस्लाम स्वीकारायचा. मक्का काळ का मदिना काळ! अर्थातच 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' ची वागणूक मादिनेहून परत मक्केत आल्या नंतरच्या आयती मानणारी आहे. आज सुद्धा मुसलमान जिथे जिथे अल्पसंख्य आहेत, तिथे (वरवर) शांतपणे वागताना दिसतात. तो मक्का काळ आहे हे लक्षात घ्या. ऑस्ट्रेलिया मध्ये मुसलमानांना शरिया कायदा पाहिजे म्हणून आंदोलन झाली, पंतप्रधान ठाम राहिले आणि ज्यांना शरिया पाहिजे असेल त्यांनी ऑस्ट्रेलिया मधून जिथे शरिया आहे तिथे निघून जावं असं म्हटल्या नंतर आंदोलनं शांत झाली. पण पुन्हा शरिया साठी आंदोलनं होण्याची शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही.
हे ते अरेबिक लिपीतील पत्रक आहे, 
ज्यामध्ये स्त्रियांचा उपयोग SEX Slaves 
म्हणून केला पाहिजे असं सांगण्यात आलं आहे 
http://www.memrijttm.org/islamic-state-isis-releases-pamphlet-on-female-slaves.html
ह्या वेब साईट वर या अरेबिक लिपीचे इंग्लिश भाषांतर सापडेल. 

फतवा हा असच एक महत्वाचा मुद्धा आहे : रोज मुसलमान माणसांना जगायचं आहे. ते रोजच्या जगण्यातले प्रश्न घेऊन मुसलमान उलेंमांकडे जातो. हे उलेमा म्हणजे धर्मपंडित आहेत हे लक्षात घ्या. रोजच्या जगण्यातले प्रश्न घेऊन मुसलमान माणूस कोणाही ऐऱ्यागै-या कडे जात नाही. त्या प्रश्नाला उलेमा जे उत्तर देतील त्याला ‘फतवा’ म्हणतात. फतवा देणाऱ्या उलेमांचा इस्लामचा, हादीसचा, कुराणचा, अर्थातच पैगंबरांच्या चरित्राचा सखोल अभ्यास असतो. सर्व खालीफांच्या काळात दिलेल्या सर्व महत्वपूर्ण निर्णयांचासुद्धा त्यांचा अभ्यास असतो. तसच फतवा देण्याची परवानगी कोणालाही सहज मिळत नाही. वरती उल्लेखलेल्या सर्वांचा ज्याचा सखोल अभ्यास झाला आहे आशा व्यक्तीला किंवा संस्थेलाच फतवे देण्याचे अधिकार असतात. भारतात असे फतवे देण्याचा अधिकार देवबंद संस्थेला आहे. दार-उल-उलुम देवबंद या संस्थेच्या वेबसाईट वर असे विविध विषयावरचे हजारो फतवे आहे. नावानी 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' चा उदय झाल्यानंतर अनेक तरुण तरुणी सिरीयाला गेल्या. भारतातूनही अनेक प्रमाणत भारती झाली. त्यांच्या पैकी काही जणांना परत आणण्यात यश आलं. त्या 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' आतून पाहून आलेल्या स्त्रियांनी सांगितलं आहे कि ISIS स्त्रियांचा उपयोग Sex Slave म्हणून करत. बर हे पुन्हा आलेल्या मुलींनी सांगायची काय गरज. स्वतः नावानी 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक'ने मध्यंतरी एक पत्रिका मध्यंतरी प्रकाशित केली होती. अर्थात ती अरेबिक लिपीमध्ये होती. त्यामध्ये २७ प्रश्न-उत्तरांच्या स्वरुपात मुद्दे मांडण्यात आले होते. त्यात थेट स्त्रियांचा वापर Sex Slave म्हणून झाला पाहिजे असं सांगितलं आहे. ते असं पत्रक काढणारं ISIS मूर्ख आहेत असं आपण समजू, पण रोज भारतातले सुद्धा उलेमा याच प्रकारचे फतवे देतात ते मग काय शाहणे होतात का?? संदर्भासाठी नक्की बघा अरुण शौरी यांनी लिहिलेलं 'The World of Fatwas' त्यामध्ये संपूर्ण एक प्रकरण अशा ridiculous फातव्यानी भरलेलं आहे.  ते वाचताना सुद्धा कोणाही मेंदू ठिकाणावर असलेल्या माणसाला कळेल की किमान शरीराची सुद्धा माहिती नसलेले लोकं शरीराची रचना बिघडून जाईल असे फतवे देतात. 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' तेच करत आहे. आणि धर्माचा सखोल अभ्यास असलेले कर्मठ उलेमा तेच करत आहेत.
          
या ISIS च्या झेंड्याचा अर्थ काय?
झेंड्यातल्या वरच्या अक्षरांचा अर्थ -
'There is no god but Allah, Muhammad is messenger of god'
खालील पांढऱ्या गोलातील अक्षरांचा अर्थ -
Allah messenger Muhammad
इस्लामच्या दृष्टीने सर्वात मूलभूत मुद्दा सांगितला पाहिजे. इस्लामच सर्वात मूलभूत तत्व 'श्रद्धा' हे आहे. ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे, आणि महम्मद पैगंबर हे त्याचे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित’ या एका तत्वावर श्रद्धा म्हणजे इस्लाम. (या श्रद्धेसाठी मुसलमान परं द्यायला किंवा घ्यायला तयार असतो. काही दिवसापूर्वी लोकमतच्या पुरवणीवर ISIS ला पैसा कुठून मिळतो यावर एक लेख होतं. त्या साठी जे ग्राफिक केलं होतं त्यावरून महाराष्ट्रात बराच वाद झाला होतं. शेवटी लोकमतच्या संपादकांना माफी मागावी लागली. ते ग्राफिक म्हणजे इस्लामच हे प्रधान तत्व डुकराच्या तोंडावर लिहिलं होतं. आणि ते डुक्कर म्हणजे Piggy bank होती.) कोणालाही हे मान्य असेल तर तो मुसलमान झाला. मुसलमान असण्याचं सुद्धा प्रधन तत्व हेच आहे. आणि तोच 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' चा झेंडा सुद्धा. ९-१० वर्षाची मुलं म्हणतात कि आता आयुष्याचं धेय्य काय तर Killing of Infidels’ infidel म्हणजे नास्तिक. किंवा डिक्शनरी मध्ये याचा अर्थ ‘a person who has no religion or whose religion is not that of the majority’ असा आहे. इस्लाम नुसार मानवाला केवळ अल्लाहला मानण्याचा अधिकार आहे. नास्तिक म्हणजे तुम्ही ईश्वराच अस्तित्व मान्य करत नाही हा इस्लाम नुसार सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. अल्लाह शिवाय दुसऱ्या कोणाची पूजा हा तितकाच गंभीर गुन्हा आहे. ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे’ याचा अर्थ केवळ अल्लाह असा होतो. दुसऱ्या अशा ईश्वराच अस्तित्व इस्लामला मान्य नाही. तेच तत्व ISIS च्या झेंड्यावर आहे आणि तेच डोक्यातही आहे.
          
‘इस्लामिक स्टेट’ ह्या कल्पनेचा जन्म २००२-०३ मध्ये किंवा २०१३-१४ मध्ये झालेला नाही. इस्लामच्या स्थापनेपासून ‘इस्लामिक स्टेट’ हि कल्पना अस्तित्वात आहे. तोच 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' हे तीच फार तर आधुनिक रूप म्हणा. त्याला आधुनिक इस्लामिक स्टेट म्हणा. त्याचा जन्म २१ व्या शतकात झाला. नॉम चोम्स्की पासून थोमस फ्रीडमन आणि अनेक आणि सगळेच विचारवंत २००३ साली इराक वर केलेला सैनिकी हल्ला हि अमेरिकेची चूकच होती हे मान्य करतात. पण म्हणजे म्हणून तोच 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' च्या निर्मितीमागे अमेरिकेचा हात आहे असं समजण्याच कारण नाही. याच कारण ते मुसलमानाच्या १४०० वर्षाच्या इतिहासात आहे. त्याला फक्त अमेरिका निमित्त झाली. अमेरीकेच IS मधलं योगदान हे इराक युद्ध आहे. अमेरिकेने जिथे जिथे मध्यस्थी केली तिथे तिथे परिस्तिथी बिघडूनच गेली. इराक, लिबिया, सिरीया, इजिप्त यांच्या आताच्या परिस्थिती या अमेरिकेच्या अपयशाच्या द्योतक आहेत. त्यांनी तिथे सतत युद्धमय परिस्थिती ठेवली. अरब स्प्रिंगच्या वेळी सगळ्या जागाच लक्ष शांततामय आंदोलानांकडे होतं. पण त्याकाळत अनेक सशस्त्र गटांनी त्या त्या देशातील पोलीस स्टेशन, सैन्याचे तळ, बँका, तुरुंग यांच्यावर हल्ले केले होते. या सर्व देशांमध्ये निर्माण झालेल्या सत्तेच्या पोकळ्या तोच 'इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया अँड इराक' ला अनुकूल ठरल्या आहेत. सिरीया मध्ये गृहयुद्ध सुरु झालं त्याचा फायदा IS ला मिळाला. इस्लामिक स्टेट च्या आधुनिक रुपाची निर्मिती कशी झाली याची वर्णनं सगळीकडे मिळतील. २००३-०४ च्या इराक युद्धातून अमेरिका जिंकली. परंतु कमकुवत इराकच्या लष्कराच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेच्या सैन्यांनी प्रचंड युद्ध साहित्य इराक मध्ये ठेवलं होतं. हे सर्व अत्याधुनिक अमेरिकेचं युद्ध साहित्य IS च्या हाती पडण्याचं कारण इराकी सैन्याचं अपयश हे आहे. अमेरिकेची अंदाजे ४ दशलक्ष इतकं युद्धसाहित्य इराक मध्ये होतं. त्याची किंमत अंदाजे ५८० दशलक्ष $ इतकी होते. अमेरिकेचं अपयश हे आहे कि परिस्थिती कुठे जाते आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. पुन्हा सर्व पाश्चिमात्य अन्वयार्थांमध्ये IS च्या निर्मितीची गोष्ट सांगताना हमखास ९/११ चा उल्लेख येतो. हे सर्व सत्य जरी असलं तरी हि सर्व तत्कालीन करणं आहेत.
         
ISIS आता जरी त्यांचा प्रधान शत्रू अमेरिका सांगत असेल तरी तो खरच आहे का, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. इस्लामच्या स्थापनेपासून इस्लामचा मूळ शत्रू कोण राहिलेला आहे. आता त्यांना पैसा हवा आहे, जगाचं लक्ष हवं आहे म्हणून अमेरिका शत्रू क्रमांक एक असं ते म्हणत असतीलही. परंतु सर्व जग मुसलमान करणं हेच अंतिम उद्दिष्ट आणि त्याच्या मार्गात जो जो कोणी येईल तो तो शत्रू. इतक्या क्रूर आणि टोकाच्या संघटनेला मनुष्यबळ कसं मिळतं, हा एक मोठ्या संशोधनाचा विषय आहे. उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी IS कडे कसे आकर्षित होतात? जसं केवळ ७५ वर्षात त्यावेळी ज्ञात असणाऱ्या जगाचा दोन तृतीयांश भाग इस्लाममय झाला, हा जसा चमत्कार आहे, तस IS ला समर्थक कसे मिळतात हाही चमत्कारच आहे. थॉमस फ्रीडमन यांनी या आकर्षणाच एक साधं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणतात कि ज्यांना शारीरिक भूक लागली आहे, खिशात पैसा नाही आणि डोक्यात विचार नाही अशा मुलांना त्यांच्या शरीराच्या भुकेची व्यवस्था, पैशाची व्यवस्था आणि डोक्यात जिहादचा विचार भरवून देण्याची अशी व्यवस्था IS कडे आहे. आणि अशीच मुलं तिकडे आकर्षित होतात. मला हे स्पष्टीकरण उथळ वाटत. उच्च शिक्षित, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सॉफ्टवेअर डीझायनर IS कडे आहेत. IS शिवाय सुद्धा त्यांना चांगला पैसा मिळवण्याची संधी मिळू शकते. पैसा असला कि शरीराची भूकही भागवता येते. पण पुण्यातल्या एका 16 वर्षाच्या उच्च शिक्षित मुस्लीम कुटुंबातली मुलगी. दहावीत तिला ९०% मिळालेत. त्या मुलीची ‘स्यूसाइड बॉम्बर’ बनण्याची मानसिक तयारी कशामुळे होत असेल?
          
ISIS च्या बाहेरून आपण ISIS चे अन्वयार्थ असे लावतो कि ही दहशतवादी संघटना केवळ सालाफी पंथाची आहे. किवळ शिया किंवा केवळ सुन्नी आहे. हे दिशाभूल करणारे अन्वयार्थ आहेत. ISIS हे अमेरिकेचं पिल्लू आहे हा जसा भ्रम आहे, तसाच ते २००३-०४ साली जन्माला आलं हाही भ्रमच आहे. भ्रम म्हणण्यापेक्षा अर्धसत्य म्हणूया. इंटरनेट वर ISIS शोधलं कि त्यामध्ये कसं सामील व्हायचं इथपासून सर्व गोष्टी सापडतात. ISIS हे कसं वेड्यांच इस्पितळ आहे. ते कसा धर्माचा चूकीचा अन्वयार्थ सांगत आहे, मुळ इस्लाम चांगला आहे हे सर्व सापडतं. पण ते कसं इस्लामला धरून आहे. तोच इस्लाम आहे. असं कोणीही सांगत नाही. ISIS आणि इस्लाम वेगळे नाहीत, ते एकच आहे.

          
या धर्माच्या अतिरेकाला उत्तर काय? ‘सेक्युलॅरिझम’ हे त्याच्या वरच उत्तर आहे. सेक्युलॅरीझम म्हणजे इह्लोकातली धर्माची पकड संपवणे. वरचं सर्व वाचून सर्व जण म्हणतील कि हि हिंदुत्ववादी विवेचन झालं. परंतु, भारताच्या संधर्भात विचार करताना, ‘सेक्युलॅरीझम’ ची खरी गरज भारतातल्या हिंदूंनाच आहे. जर हिंदू सेक्युलर झाले तर मुसलमान आपले आपण सेक्युलर होणार आहे.  सेक्युलॅरीझम म्हणजे मध्ययुगीन धार्मिक मनोवृत्तीतून सर्वांना बाहेर काढणे. त्या त्या देशाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार कायदे करून वागणे सर्वात संयुक्तिक आहे. सर्वच धर्म आता कालबाह्य ठरले आहेत. (हिंदूंचे सर्व धर्मग्रंथ भारतीय राज्यघटनेनुसार कालबाह्य ठरलेच आहे. राहता राहिला प्रश्न बहुसंख्य मुसलमान अजूनही शरिया हाच कायदा मानतात.) माझ्या ओळखीतही असे काही जण आहे जे मुसलमानांच्या दृष्टीने उदारमतवादी म्हंटले पाहिजेत. पण ते सुद्धा शरिया हाच आमचा कायदा आहे. आम्ही त्यानुसार वागणार म्हणतात. सर्व म्हणजे सर्वच धर्मग्रंथ कालबाह्य झाले आहेत. हे मान्य करावं लागेल. आणि ISIS च्या (आणि बहुसंख्य मुसलमानांच्या संदर्भातही) संदर्भात सर्वात मोठा अडथळा तोच आहे. 

संदर्भ -

१. The Rise of ISIShttps://www.youtube.com/watch?v=pzmO6RWy1v8
२. अबू-बक्र-अल-बगदादी याचे एकमेव उपलब्ध भाषण
https://www.youtube.com/watch?v=yLPifzxA28o
३. Youtube - TestTube News Channel -

४. BBC ने ISIS वर एक उत्तम Documentary बनवलेली आहे. https://www.youtube.com/watch?v=AUjHb4C7b94 
५. The Atlantic या मासिकातील एक लेख - What ISIS Really Wants? - http://www.theatlantic.com/magazine/archive/2015/03/what-isis-really-wants/384980/
६. निळू दामले यांचे ISIS वरचे दोन लेख - 
७. आयसीस तर्फे प्रकाशित होणारे मासिक 'दिबाक' (Dabiq) चे सर्व १२ अंक. (कोणाला हवे असल्यास सांगावे)
८. जिहादी दहशतवादाचे समर्थन करणारी हि वेब साईट, ज्यावर Sex Slaves बद्दलचे नियम सांगण्यात आले आहेत. http://www.memrijttm.org/islamic-state-isis-releases-pamphlet-on-female-slaves.html
९. 'आयसीस'चे युद्धशास्त्र समजावून सांगणारे पुस्तक - 'The Management Of Savagery' त्याचा लेखक आहे 'अबू-बक्र-नाजी
१०. The Rise of ISIS (Book)David French, Jay Sekulow, Jordan Sekulow, and Robert W Ash 
११. मुस्लीम मनाचा शोध (पुस्तक) - प्रा. शेषराव मोरे
१२. प्रेशितानंतरचे चार आदर्श खलिफा (पुस्तक) - प्रा. शेषराव मोरे 




No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....