Saturday 22 August 2015

लकडी की काठी से लेके बीडी जलैले तक...




          आयुष्यातल्या अनेक श्रद्धास्थानांपैकीगुलज़ारहे एक श्रद्धास्थान आहे. आर्. डी. बर्मन आणि किशोर कुमार प्रमाणेच गुलजार हे नाव सुद्धा इतकंआपलंवाटतं की गुलज़ारचा उल्लेखअरे-तुरे येतो. याअरे-तुरेमध्ये कोणत्याच प्रकारचा अनादर नाही. हाअरे-तुरेआपलेपणातून, प्रेमातून येतो. गुलज़ार हा माणूस आयुष्याच्या इतक्या जवळ वाटतो, प्रेमाचा वाटतो. १८ ऑगस्ट रोजी ह्या गुलज़ारचा ८१ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म कधी झाला, त्याचा पहिला चित्रपट कोणता असल्या गद्य तपशिलांमध्ये मला पडायचं नाही. ती माहिती विकीपीडियावर मिळेल की. एखादा माणूस आपला वाटण्याची कारणे ही विकिपीडियावरच्या माहितीत मिळत नाहीत. ती अनुभवावीच लागतात. अजून एक प्रांजळ कबुलीजबाब. मला संपूर्ण गुलज़ारचं आयुष्य अथ पासून इति पर्यंत माहीत नाही. जे मला आवडलं, जे भावलं तेवढच मलागुलज़ार बद्दलमाहिती आहे.
           फाळणीचा अभ्यास करताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे फाळणी ही केवळ एका देशाची फाळणी नव्हती, केवळ काही लाख माणसे मृत्युमुखी पडली, इतक्या स्त्रियांवर बलात्कार झाले, इतकी माणसे बेघर झाली या आकडेवारीने फाळणी कळणार नाही. एकेका माणसाच्या वैयक्तिक गोष्टी वाचल्या म्हणजे फाळणीने काय परिणाम केले हे वाचले, पाहिले तर फाळणीचे घाव किती गंभीर होते हे लक्षात येईल. वैयक्तिक गोष्टी वाचल्या म्हणजे फाळणी काय होती हे लक्षात येते. फाळणीबाबत मन हेलावून टाकणारी एक गोष्ट सांगितली जाते. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेले निर्वासित दिल्लीजवळ रहात होते. अशा एका निर्वासितांच्या तंबूला भेटायला जवाहरलाल नेहरू गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची कन्याही होती. त्या तळावर एका माणसाने इंदिरा गांधींचा हात पकडला. अर्थात विनयभंगाचा प्रयत्न केला. ह्या कृत्यावर नेहरू प्रचंड चिडले. राजबिंडे, गोरेपान नेहरू लालबुंद झाले, ते पाहून तो मनुष्य नेहरूंना म्हणाला की, ‘तुमच्या मुलीचा मी केवळ हात पकडला तर तुम्हाला इतका राग आला. आमच्या स्त्रियांबरोबर काय काय झाले याची तुम्हाला कल्पना आहे का?’ असे कधी भरू शकणारे फाळणीचे घाव आपल्याला गुलज़ारच्या कथांमधून दिसतात. गुलज़ारने लिहिलेले दोन लघुकथा संग्रहरावीपारआणिदेवढी. या इंदिरा गांधी-नेहरु प्रसंगाप्रमाणे असे अनेक प्रसंग रावीपारमध्ये आहेत. ब्रिटिश भारताच्या, आत्ताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात यासंपूर्ण सिंह कालराचा जन्म झाला. लाखो भारतीयांप्रमाणे, मिल्खा सिंग प्रमाणे, खुशवंत सिंगांप्रमाणे गुलज़ार फाळणीनंतर निर्वासितांच्या  तंबूमध्ये रहात होता. या एका गुलज़ारसाठी दुःखद आणि रसिकांसाठी सुखद कारणांनी गुलज़ारच्या लिखाणात सजीवता आहे. ते भावण्याचे मुख्य कारणच आहे की गुलज़ारच्या कथा या स्वानुभवातून लिहिल्या गेल्या आहेत.
            गुलज़ारच्या एका कथेचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. रावीपार या कथा संग्रहातीलरावीपारयाच नावाची कथा आहे. कथेचा मूळ धागा सारखाच आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना अचानक बातमी मिळाली की आपण ज्या भागाला हिंदूस्थान म्हणत होतो त्या भागाची आता भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली आहे. धर्मांध मुसलमान आपल्याला मारण्यासाठी येत आहेत. अनेकांपैकी एक कुटुंब पाकिस्तान सोडून भारताकडे येण्यासाठी निघते, खच्चून भरलेल्या रेल्वे पाकिस्तानातून रोज भारतात येत असतात. असंच एक कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि दोन लहान मुलं. रेल्वेच्या वरती बसलेले असतात आणि रेल्वे भारतात येत असते. फाळणीने सगळेच आयुष्य उद्ध्वस्त झाले, दारिद्र्य आले, आपला देश सोडून दुसऱ्या देशात आपल्याला रहायचे आहे. नवीन काम मिळेल की नाही, कुटुंबाचे रोज आपण पोट भरू शकू की नाही, असंख्य प्रश्न त्या नवऱ्याच्या मनात येत असतात. दोन मुलांना सांभाळायचे कसे? या एका प्रश्नाने तो नवरा खूप अस्वस्थ झालेला असतो. अशा अस्वस्थ परिस्थितीत त्याचे मन निष्कर्ष काढते की दोन मुलांपैकी एक टाकून द्यायचे, तेच जे जन्मापासून आजारी आहे, अशक्त आहे, लहान आहे. त्या मुलाला रावी नदीत टाकून द्यायचे. एका सुदृढ, सशक्त, मोठ्या मुलाला आयुष्यभर सांभाळण्याची तजवीज होऊ शकते. पण हा निर्णय पत्नीला कसा सांगायचा? तेव्हा तो विचार करतो की नदीवर रेल्वे आली की तिला सांगताच मूल फेकून द्यायचे. ते लहान मूल आईच्या हातात असते, ते आईचे दूध पीत असते आणि रेल्वे रावी नदीच्या पुलावर येते. नवर्याचे मन अत्यंत अस्वस्थ पण ठाम आहे. तो ते मूल ओढतो आणि नदीत भिरकावून देतो. त्यावेळी त्या मुलाचा खोल जाणारा, रडणारा आवाज त्या दोघांनाही ऐकू येतो. त्यावेळेची काही क्षणांची निःशब्दताही गुलज़ारने मांडली आहे. ती डोळ्यातून पाणी काढतेच. कथा इथे संपत नाही, त्यांचे मनही शांत होते. तो तिला त्याची परिस्थिती समजावून सांगतो, तिलाही ती समजते, ती सुद्धा मनाची तयारी करते की उर्वरित आयुष्य एका मुलाबरोबर काढायचे. म्हणून ती झोपलेल्या दुसऱ्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न करते. रावी नदी मागे पडून आता बराच वेळ झाला आहे. आता आपण भारतातही पोचलो आहोत, अशा वेळी पत्नीच्या लक्षात येते की ज्या एका मुलाबरोबर आयुष्य व्यतीत करायचे आपण ठरवत होतो तो मुलगा सुद्धा जिवंत नाही. त्याला मरूनही बराच वेळ झालेला आहे. कदाचित आपण पहिल्या मुलाला (जिवंत मुलाला) फेकून दिले तेव्हाच हा मेलेला असेल. जिवंत मुलाला आपण  फेकून दिले. मृत मुलाबरोबर आयुष्य व्यतीत करायची आपण स्वप्न बघतो आहोत. अशी ही रावीपार!
            रावीपार या कथासंग्रहातल्या सर्वच कथा अंतरबाह्य हलवून टाकणाऱ्याच आहेत. माणूस आपला वाटण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे की, त्याने उभी केलेली पात्रे, लिहिलेल्या कविता, उभे केलेले प्रसंग सतत भेटत राहतात. यामुळे हा माणूस मलाआपलावाटतो.
हा झालाकथाकारगुलज़ार. आता कवी गुलज़ार. त्याच्या आधी, गुलज़ार एक चित्रकार.
            उर्दू भाषेतला सर्वश्रेष्ठ शायर गालिब. या गालिबचे गुलज़ारने चरित्र लिहिलेले आहे. पूर्वी दूरदर्शनवर लागणारीमिर्झा गालिबया मालिकेची पटकथासुद्धा गुलज़ारनेच लिहिलेली आहे. ‘मिर्झा गालिबहा अतर्क्य माणूस सहसा समजणारा माणूस गुलज़ारने सोपा करून दाखवला.
            कवी म्हणून गुलज़ारचं मला वाटलेलं वैशिष्ट्य आणि वेगळेपण. आपल्या मराठीत चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणतात आणि तीन ओळीच्या कवितेला त्रिवेणी. केवळ तीन ओळींत भावना आणि त्यामागचा आवेग गुलजारने लिहिलेल्या त्रिवेणीत आला आहे. गुलज़ारच्या त्रिवेणीचे वर्णन असे केले जाते - या अल्पाक्षरी कवितेत पहिल्या दोन काव्यपंक्तींचाच गंगा-यमुनेप्रमाणे संगम होऊन कविता पूर्ण होते. मात्र तिसरी ओळ या दोन प्रवाहांखालून सरस्वतीप्रमाणे गुप्तपणे वाहते. त्रिवेणी हा काव्यप्रकार गुलजारच्या प्रतिभेचा नवा आकृतीबंध आहे. गुलजारने लिहिलेल्या या त्रिवेणीचाशांता शेळकेयांनी मराठी अनुवाद केलेला आहे. ही एका गुलज़ारची त्रिवेणी... (मराठी अनुवाद)
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले,
किती तरी वेळी फांदी हात हलवत होती
निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

आता गुलज़ारची गाणी. चित्रपटांमधील अजरामर गाणी. चित्रपटांमधल्या गुलज़ारच्या गाण्याचा विचार करताना मला आर्. डी. बर्मन आणि किशोर कुमार शिवाय गुलज़ारचा विचार करताच येत नाही. या तिघांनीही एकमेकांचं सोनं केलयं असं म्हणूया. गुलज़ारच्या असामान्य प्रतिभेचे काही निवडक तीनचार चित्रपट. आँधी, इजाज़त, परिचय, घर, मासूम... मौसम. आँधी, इजाज़त, मौसम . चित्रपटांच्या पटकथासुद्धा गुलज़ारने लिहिलेल्या आहेत.
            ‘तेरे बिना ज़िंदगी से कोईकिंवामेरा कुछ सामान, ‘आनंदचित्रपटातील सर्व गाणी. मौसम मधलंदिल ढूंढता है, फिर वहीहे गाणं. ही यादी संपणारी नाही. सुरुवातीला एक गोष्ट सांगून मग मला क्लासिक गाण्यांकडे येऊ दे. पण या लेखाचे शीर्षक हे देण्याचे कारण म्हणजेजंगल जंगल बात चली है, पता चला हैपासूनबीडी जलैलेतेकजरा रे कजरा रेपर्यंतची गाणी गुलज़ारची आहेत. हा कॅनव्हास बघा किती प्रचंड आहे. आत्ताच्याजब तक है जानआणिकमीनेमधील सुद्धा गाणी गुलज़ारनेच लिहिलेली आहेत. २० पेक्षा जास्त वेळाफिल्मफेअरपुरस्कार. साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके, पद्मभूषण आणि ग्रॅमी पुरस्काराने गुलज़ारना सन्मानित करण्यात आले आहे. मला हे अगदी मान्य आहे ही माहिती गद्य आहे.
            गीतकार म्हणून गुलज़ार आवडण्याची कारणे. आनंद मधले गाणे आहे. ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुनेमुकेशच्या गोड, निरागस आवाजात गुलज़ारचे हे गाणे आहे. किनारा मधले - ‘मेरी आवाज़ ही पेहेचान है अगर याद रहेकिंवाजाने क्या सोचकर नही गुजरा एक पल रात भर नही गुजरा. अर्थात शब्द भिडणारे आहेतच पण शब्दांमधली आर्तता आर्.डी.च्या संगितातूनही व्यक्त होते. ‘घरचित्रपटातलेफिर वही रात हैकिंवाकोई होता जिसको अपना. अशी किती गाणी सांगावीत? आँधीमधल्या गाण्यांशिवाय, इजाज़त मधल्या गाण्यांशिवाय गुलज़ार पूर्णच होऊ शकणार नाही. तश्या तर असंख्य गोष्टी आहेत, त्यांच्याशिवाय गुलज़ार अपूर्ण राहील. एकच उदाहरण देतो माचिस चित्रपटाचे. त्यामध्ये एक डायलॉग आहे. फाळणीने उद्ध्वस्त झालेल्या एका माणसाच्या तोंडीआये ४७ मे, मारे गए आधे ८४ मे, अब किसके लिए जिना.’ पण माझ्यासाठी आँधी आणि इजाज़त मधली गाणी म्हणजे संजीवनी देणारी आहेत. कधी उदास निराश वाटत असले तर ही गाणी फ्रेश करतात.

            इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज़ कदम राहें,
            पथ्थर की हवेली को शीशे के घरोंदो मे
            तिनको के नशे मन तक, इस मोड से जाते है
            किंवा
            तुम गये हो, नूर गया है,
            नही तो चरागोंसे लौ जा रही थी।

            मला आवडणारे गाणे म्हणजे, केवळ गुलज़ारच नव्हे, केवळ आर्.डी. नव्हे, केवळ किशोर  कुमार, लता मंगेशकरच नव्हे. सर्वात जास्त आवडणारे गाणेतेरे बिना जिंदगी से कोईआणि त्यातले सुद्धा शेवटचे कडवे. ‘जी मे आता है, तेरे दामन मे सर छुपाके हम रोते रहे, रोते रहे।या गाण्यावर पुन्हा काही भाष्य करावे इतनी अपनी औकात नही। इनके सिर्फ अल्फाज़ही काफी है। असेच इजाज़त मधले सुद्धा. खरं सगळा इजाज़त हा चित्रपटच असामान्य आहे. सगळी स्टार कास्ट, पटकथा, गीत, संगीत, पार्श्वगायक सगळेच बेस्ट. पण गुलज़ार बद्दलचे लिखाणमेरा कुछ सामानशिवाय पूर्ण होणार नाही. नासिरुद्दीन शहाच्या प्रेयसीचे नासिरुद्दीन शहाच्या म्हणजे शहाच्या हिरोच्या घरी काय काय राहिले आहे हे प्रेयसी कवितेतून पाठवते. ‘सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे है।और मेरे इक खत में लिपटी रात पडी हैएक अकेली छत्री मे जब आधे आधे भीग रहे थे, आधे सूखे आधे गीले - सुखा तो मै ले आयी थी, गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो, वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो. या अजरामर गाण्याबद्दल आपण वेगळे काही बोलू नये. जे काय बोलायचे आहे ते गुलज़ार बोलला आहे. आपण फक्त ऐकायचे. डोळ्यातून पाणी आले तर येऊ द्यायचे. भावनांचा आवेग असह्य झाला तरच ते होत असत. ती ताकद गुलज़ारच्या लिखाणात आहे. कथेत आहे, त्रिवेणीत आहे, गीतात आहे.
शेवटची गुलज़ारची एक कविता :
मै कभी सिगरेट पिता नहीं, मगर हर आने वाले से

   पूछ लेता हूँ की माचिस है? बहुत कुछ है जिसे मैं फूँक देना चाहता हूँ

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....