मध्यंतरी युट्युबवर सर्फिंग करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या युट्युब चॅनेलवर '२००० पासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या बेस्ट टेस्ट इनिंग्स' असा व्हिडिओ मी पहिला. तेव्हा डोक्यात विचार आला अशा भारताच्या भूमीवर २००० सालापासून खेळल्या गेलेल्या बेस्ट टेस्ट इनिंग्सची आपण लिस्ट बनवू. आणि मग मी जरा शोध घेतला. तर अशा इनिंग्सची मी लिस्ट तयार केली आहे.
----------------------
२. लक्ष्मणची २८१ ची इनिंग. याबद्दल खूप बोलून झालं आहे.
४. २००४ साली साउथ आफ्रिकेची टीम भारतात आली होती. पहिली टेस्ट कानपूरला होती. दोन दिवस बॅटिंग करून साउथ आफ्रिकेने ५१० रन्स करून डाव घोषित केला. कसोटी सामन्यात डाव घोषित करणे हा सामन्यावर पकड आल्याचा पुरावा मानतात. पण भारतानेही प्रत्युत्तर चांगलं दिलं आणि सेहवाग आणि गंभीर यांनी पहिल्या विकेटसाठी २१८ धावांची भागीदारी केली. सेहवाग पुढे जाऊन १६४ पर्यंत खेळला. पण गंभीर त्याच्या आयुष्यातली दुसरी कसोटी खेळत होता. समोर पोलॉक आणि एन्टीनीसारखे बॉलर होते. पण सेहवाग बरोबर गंभीर उभा राहिला आणि ९६ धावांवर आउट झाला. त्या कसोटीमध्ये गंभीरपेक्षा मोठ्या इनिंग आहेत. पण आपल्या केवळ दुसऱ्या कसोटीत खेळत असलेला गंभीर मात्र उल्लेखनीय होता.
६. युनुस खानच्या पहिल्या इनिंगमधल्या २६७ बद्दल आपलं बोलून झालं, तीही इनिंग उत्तम होती.
७. २००५-०६ चा इंग्लंडचा भारत दौरा. तीन टेस्ट आणि ७ वनडे असा मोठा दौरा होता. पहिली कसोटी अनिर्णीत ठेवण्यात आपल्याला यश आलं होतं. दुसऱ्या कसोटीत रन्स फार निघालेल्या नाहीत, कुंबळेच्या दोन्ही इनिंगमधल्या मिळून ९ विकेट्स आणि द्रविडच्या ९५, आणि सेहवागच्या ७६ रन्सच्या जोरावर आपण कसोटी जिंकली होती. तीन कसोटींपैकी पहिली अनिर्णीत आणि दुसरी आपण जिंकून तिसरी डीसायडर कसोटी मुंबईला होती. त्यात इंग्लंडचा एक उत्तम ऑल राउंडर ऍंड्र्यू फ्लिन्टॉफ याच्या दोन्ही इंनिंगमध्ये अर्धशतकं आहेत. फ्लिन्टॉफपेक्षा जास्त रन्स केलेल्या इनिंग या सामन्यात आहेत, पण त्याच्या दोन फिफ्टीज आणि चार विकेट्स हा भारत आणि इंग्लडमधला फरक होता. मोहालीच्या दुसऱ्या कसोटीही त्याच्या दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरीज आहेत, पण त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे मुंबईच्या स्पिन बॉलिंगला अनुकूल पीचवर कुंबळे आणि हरभजनसमोर दोन्ही इनिंगमधल्या हाफ सेंच्युरिज उल्लेखनीय होत्या.
९. त्यानंतर २००८ साल. भारतावर इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. पण या वर्षात एकाहूनएक अफलातून टेस्ट इनिंगसुद्धा खेळल्या गेल्या आहेत. त्यामधली सेहवागची ट्रिपल सेंच्युरी. चेन्नईला साउथ आफ्रिकेविरुद्ध आलेली. त्याबद्दल खूप बोललं गेलं आहे. त्याच सिरीजमध्ये ए.बी. डिव्हीलीयर्सची एक डबल सेंच्युरी आहे, २१७ रन्सची. त्या टेस्टमध्ये स्टेनच्या वादळात पहिल्या इनिंगमध्ये भारताची अवस्था ७६ सर्वबाद झाली होती. त्यानंतर खेळायला आलेल्या आफ्रिकेने कॅलिसच्या १३२ आणि एबीच्या २१७ च्या जोरावर ४९७ चा डोंगर उभा केला होता. पण स्टेन, एन्टीनी, मोर्केल समोर आपल्याला ते शक्य नव्हतं. आपण इनिंग आणि काही धावांनी ती कसोटी हरलो होतो.
११. यानंतर, 1930 च्या अॅशेसमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात लीड्सच्या ग्राउंडवर ब्रॅडमनने कसोटी सामन्याच्या एका दिवसात ट्रिपल सेंच्युरी केली होती. आजपर्यंत ते ब्रॅडमनचं रेकॉर्ड कायम आहे. कसोटीच्या एका दिवसात ट्रिपल सेंच्युरी. पण या रेकॉर्डच्या जवळ पोहोचला तो परत एकदा आपला सेहवागच. २०१० साली मुंबईच्या ब्रेबॉनवर आपली आणि श्रीलंकेची कसोटी होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सेहवागचा पट्टा सुरू झाला तो नाबाद २८४ इथपर्यंत येऊन थांबला. त्यातसुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरवातीच्या काही ओव्हर्स श्रीलंकेच्या शिल्लक होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीलंका ६ ओव्हर्स खेळली, १० मिनिटांचा ब्रेक म्हणजे त्यात काही ओव्हर्स वाया गेल्या. अन्यथा, ज्या पद्धतीने सेहवाग खेळत होता, अजून जास्तीतजास्त दोन ओव्हर्समध्ये त्याने उरलेल्या १६ रन्स नक्की केल्या असत्या. पण दिवस संपला. ४४ फोर्स, आणि ६ सिक्सेसची २९४ ची ती इनिंगम्हणजे क मा ल होती.
१२. २००९-१० साली साउथ आफ्रिकेचा भारताचा दौरा होता. दोन टेस्ट आणि तीन वनडे असा छोटासा दौरा होता. याच वनडे सिरीजमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक सचिनने ठोकले होते. सचिनवरच्या प्रेमापोटी ते द्विशतक लक्षात राहतंच, पण क्रिकेटवरच्या प्रेमापोटी त्याच्या पुढच्या वनडेमध्ये अहमदाबादला एबीने आपल्याविरुद्ध केवळ ५९ बॉल्समध्ये ठोकलेली सेंच्युरीसुद्धा आठवतेच. पण, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आफ्रिकेने एक डाव आणि काही धावांनी जिंकली, दुसरी टेस्ट आपण एक डाव आणि काही धावांनी जिंकली. दोन्ही कसोटींत शेवटच्या इनिंगमध्ये सामना वाचवण्यासाठी खेळल्या गेलेल्या अफलातून इनिंग्ज आहेत. पहिल्या कसोटीमध्ये फॉलोऑन मिळाल्यावर त्याचा पाठलाग करताना सचिनची एक सेंच्युरी आहे. सामना वाचवण्यासाठी धोनी आणि सहाची जवळजवळ दोनशेहून अधिक बॉल्सची भागीदारी आहे. पण या कोणत्याच खेळी पुरेशा ठरल्या नाहीत, कारण पहिल्या इनिंगमध्ये हाशीम आमलाने २५३ आणि जॅक कॅलिसच्या १७६ आणि बाकीच्यांच्या मिळून साडेपाचासेहून अधिक धावांचा डोंगर होता. परंतु दुसऱ्या कसोटीमध्ये हीच परिस्थिती साउथ आफ्रिकेवर आली. भारताने सेहवाग, सचिन, लक्ष्मण आणि धोनी यांच्या शतकांच्या जोरावर सहाशेहून अधिक रन्स केल्या, आता एका डावाने होणारा पराभव टाळण्याची जबाबदारी साउथ आफ्रिकन फलंदाजीवर होती. कलकत्त्याच्या इडन गार्डनवर हाशीम आमला चौथा आणि पाचवा दिवस खेळून नाबाद राहिला, ३९४ बॉल्स खेळून केवळ १२३ धावांची खेळी त्याने खेळली, साउथ आफ्रिका ती कसोटी एक डाव आणि ५७ धावांनी हरली, पण हाशीम अमला पूर्ण वेळ उभा होता. १२३ च्या अमलाच्या स्कोरच्या खाली दुसरा स्कोर केवळ २३ चा होता. सामना हरून सुद्धा या कसोटीचा सामनावीर हाशीम अमलाच आहे.
१३. २०१०-११ चा न्युझीलंडचा भारत दौरा हा आधीच्या साउथ आफ्रिकेच्या दौऱ्याप्रमाणेच होता. सगळा दौराच अफलातून इनिंगने भरलेला आहे. वनडे टीमचा कॅप्टन गौतम गंभीर होता. त्याच्या सलग दोन सामन्यात दोन सेंच्युरीज आहेत. युसुफ पठाणची एक सेंच्युरी आहे. आणि पाच वनडे सामन्यांपैकी पाचही आपण जिंकलो होतो. पण त्यांच्या आधी आपली न्युझीलंड बरोबर तीन कसोटी सामन्यांच्या मालिका झाली होती. आणि तीनही कसोटी सामन्यात एकसेएक इनिंग्ज आहेत. पहिल्या सामन्यात द्रविड, जेसी रायडर, केन विल्ल्यमसन आणि हरभजनसिंग यांच्या सेंच्युरीज आहेत. हरभजनसिंगच्या पहिल्या इनिंगमधल्या ६९, दुसऱ्या इनिंगमधल्या ११५ आणि दोन्ही इनिंगमधल्या मिळून बॉलिंगसाठी त्याचा सामनावीर ठरवलं होतं. दुसऱ्या कसोटीतही हरभजनसिंगची ७ फोर्स आणि ७ सिक्सेस अशी दणदणीत सेंच्युरी आहे. पण दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या इनिंगमध्ये ओपनिंगला आलेल्या ब्रँडन मॅक्यूलमच्या द्वीशतकाच्या (२२५) जोरावर भारताला शेवटच्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी ३२७ चं टार्गेट मिळालं होतं. आपल्या ओपनिंग जोडीने राहिलेल्या सगळ्या ओव्हर्स खेळून काढून सामना वाचवला आणि दुसरीसुद्धा कसोटी अनिर्णीत राहिली. तीनपैकी पहिल्या दोन कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे तिसऱ्या कसोटीला महत्त्व होतं. ती होती नागपूरला. पहिल्या इनिंगमध्ये न्युझीलंडचा स्कोर २०० धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. त्याचा फायदा घेऊन भारतीय प्लेयर्स खेळायला उतरले. गंभीर आणि सेहवागच्या जोडीने आपल्याला चांगली सुरवात दिली. दोघेही प्रत्येकी सत्तरहून अधिक धावा करून आउट झाले. पण सेहवागच्या विकेटनंतर खेळायला आलेला राहुल द्रविड मात्र जो खेळत सुटला, तो बाकीचे सगळे खेळाडू आउट होईपर्यंत थांबला नाही. ३९६ बॉल्स खेळून राहुल द्रविड १९३ धावांची खेळी करून आउट झाला. त्याला सचिन आणि धोनीची पूरक साथ मिळाली आणि भारताची धावसंख्या साडेपाचशेहून अधिकवर जाऊन थांबली. तो डोंगर न्युझीलंडच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. त्याचा पाठलाग करताना न्युझीलंडच्या ११ खेळाडूंपैकी सगळ्यात मोठा स्कोर टिम साउदी या १० नंबरला खेळायला येणाऱ्या ओपनिंग बॉलरचा होता. (३१)
१४. २०१२ साली इंग्लंडचा भारताचा दौरा होता. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेने दौऱ्याची सुरवात होती. ती पहिली टेस्ट अहमदाबादला होती. पहिल्या इनिंगमध्ये सेहवागची तुफानी सेंच्युरी आणि चेतेश्वर पुजाराचं द्वीशतक यांच्याजोरावर आपण पाचशे धावांचा डोंगर उभा करून डाव घोषित केला. प्रग्यान ओझाच्या बॉलिंगसमोर इंग्लंडची टीम टिकू शकली नाही आणि केवळ १९१ धावांवर त्यांचा खेळ आटोपला. धोनीने फॉलोऑन देऊन इंग्लंडला पुन्हा खेळण्यासाठी पाचारण केलं. त्याला उत्तर देताना मात्र कॅप्टन कूकने कसोटी क्रिकेटला साजेशी १७६ धावांची खेळी केली, त्याचा इंग्लंडचा विकेट कीपर प्रायरने साथही चांगले केली आणि भारताच्या पहिल्या इनिंगच्या ७७ धावा पुढे ते जाऊ शकले. भारतासाठी शेवटच्या इनिंगमध्ये ७७ हे टार्गेट म्हणजे दर्यामी खसखस होतं, ते आपण सहज पूर्ण केलं. दुसऱ्या टेस्टमध्येही पुन्हा प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराने १३५ धावांची खेळी केली, पण यावेळी उत्तर देताना कॅप्टन कूक आणि इंग्लंडचा ऑल टाईम ग्रेट प्लेयर केवीन पीटरसन यांनी इंग्लंडचा डाव सावरला. कूकच्या १२२ आणि पीटरसनच्या १८६ मुळे इंग्लंडचा स्कोर चारशेपार गेला. ती पीटरसनची १८६ ची इनिंग भारतीय भूमीवर खेळली गेलेली एक one of the best test inning होती. पुढच्या दोन कसोटींमध्ये सुद्धा उत्तम इनिंग्ज आहेत, पण पीटरसनची इनिंग खास होती.
१५. २०१३ साल, हे वैयक्तिक माझ्या दृष्टीने क्रिकेटचा भारतीय क्रिकेटचा एक टर्निंग पॉईंट होता. सचिन याच वर्षी रिटायर्ड झाला. त्याच्या १०० सेंच्युरीज याच वर्षी, पूर्ण नवीन, अनअनुभवी टीमने इंग्लंडमध्ये जाऊन चँपियन्स ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीची ओळख भारतीय क्रिकेटला याच वर्षी झाली. शिखर धवनची कसोटी कारकीर्द याचवर्षी दणक्यात सुरू झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये लंचपूर्वी सेंच्युरी धवनने ठोकली होते. आपण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉष दिला होता. आणि ७ वनडे सामन्यांच्या मालिकेत आपण ऑस्ट्रेलियाला हारवलं होतं. त्या २०१३च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची पहिली कसोटी चेन्नईला होती. पहिल्या इनिंगमध्ये मायकल क्लार्कच्या १३० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा स्कोर ३८० पर्यंत पोहोचला होता. त्याला उत्तर देताना भारताची सुरवात फार काय आशादायक झाली नव्हती. मुरली विजय आणि सेहवाग दोघंही लवकर आउट झाले. पुजारा आणि सचिनने डाव थोडाफार सावरला. पण पहिल्या कसोटीत खरी जान आणली ती नंतरच्या कोहलीच्या सेंच्युरी आणि धोनीच्या द्वीशतकाने. केवळ २६५ बॉल्समध्ये २२४ धावांची तुफानी डबल सेंच्युरी धोनीने खेळली होती. चेन्नईची पहिली कसोटी आपण जिंकलोच, पण धोनीच्या त्या एका इनिंगने संपूर्ण मालिकेचा टोन सेट झाला. चेतेश्वर पुजाराचं एक द्विशतक, मुरली विजय आणि धवनची द्विशतकी भागीदारी, अश्विन आणि जडेजाची जादू अशा अनेक पाहण्यासारख्या इनिंग या चार कसोटींच्या मालिकेत होत्या, पण पहिल्याच टेस्टमध्ये धोनीची डबल सेंच्युरी ही काही औरच होती.
१६. शिखर धवनच्या कसोटी कारकीर्दीची पहिली कसोटी मोहालीला होती. वॉर्नर, स्मिथ, स्टार्क, कोवन अशांच्या इनिंग्जच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव चारशेच्या पार गेला होता. आणि भारताला स्टार्क, पीटर सिडल, नेथन लायन यांच्यासारख्या बॉलिंग समोर चांगल्या ओपनिंगची गरज होती. सेहवागच्या जागी संधी मिळालेल्या धवननी सेहवाग प्रमाणेच खेळायला सुरवात केली. मोहाली हे त्याचं होम ग्राउंड. धवननी लंच पूर्वी आपली सेंच्युरी पूर्ण केली. १७४ चेंडूंत १८७ धावांची तुफानी खेळी करून धवन आउट झाला. धवनच्या त्या इनिंगमध्ये ३३ फोर्स आणि दोन सिक्सर्सचा समावेश होता. तिसऱ्या इनिंगमध्ये अश्विन, जडेजा आणि ओझाच्या फिरकी समोर ऑस्ट्रेलिया टिकू शकली नाही, आणि चौथ्या इनिंगमध्ये भारताला जिंकायला केवळ १३३ धावांचं टार्गेट मिळालं. आणि ते पूर्ण करून आपण ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉष दिला.
१७. २०१५ साली पुन्हा एकदा साउथआफ्रिकेचा भारताचा प्रदीर्घ दौरा होता. सुरवातीला ट्वेंटी ट्वेंटी झाल्या, मग ५ एकदिवसीय सामने झाले आणि त्यानंतर चार कसोटी सामन्यांची मालिका होता. पहिल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी पैकी एक झालीच नाही, एक त्यांनी जिंकली एक आपण जिंकली. पाच एकदिवसीय सामन्यांपैकी दोन त्यांनी आणि दोन आपण जिंकल्या आणि शेवटच्या सिरीज डीसायडरसाठी मुंबईला झालेल्या सामन्यात साउथ आफ्रिकेने आपली पिसं काढली. डी कॉक, डिव्हीलीयर्स, ड्यूप्लेसी या तिघांच्या तुफानी सेंच्युरिजच्या जोरावर साउथ आफ्रिकेने आपल्याला पन्नास ओव्हर्समध्ये ४३९ धावांचं धेय्यं दिलं होतं. ते गाठताना आपण आपल्या पन्नास ओव्हर्ससुद्धा पूर्ण खेळू शकलो नाही. ट्वेंटी ट्वेंटी सिरीज बरोबरीत सुटली, वनडे सिरीज साऊथ आफ्रिकेने जिंकली अशा परिस्थितीमध्ये आपण कसोटी सिरीज खेळायला उतरलो होतो. त्यातली पहिली कसोटी मोहालीला होती. या पूर्ण कसोटी सिरीजमध्ये सगळेच पीच फिरकीसाठी अतिशय अनुकूल बनवले होते. त्यामुळे संपूर्ण सिरीजमधल्या १४ इनिंग्जमधला सर्वाधिक स्कोर ३३१ होता. पहिली कसोटी जडेजा आणि अश्विनच्या फिरकीच्या जोरावर आपण सहज जिंकली. दुसरी टेस्ट बेंगळूरुला होती, ती पावसामुळे झालीच नाही. तिसरी टेस्ट नागपूरला होती. पहिल्या इनिंगमध्ये आपल्या २१५ रन्स झाल्या होत्या त्याला उत्तर देताना साउथ आफ्रिकेच्या केवळ ७९ धावा झाल्या होत्या, त्या धक्क्यातून साउथ आफ्रिकेला बाहेरच येता आलं नाही. आणि तीही कसोटी आपण सहज जिंकली. अशा पहिल्या तीन टेस्टपैकी आपण २ जिंकल्या आणि एक झालीच नाही. अशा एकूण परिस्थितीमध्ये चौथी कसोटी खेळायला आपण दिल्लीला गेलो. या टेस्टच्या दोन्ही इनिंग्जमध्ये अजिंक्य राहणेच्या दोन सेन्च्युरीज आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आपला अजिंक्य राहणेच्या सेंच्युरीच्या जोरावर ३३१ धावांपर्यंत स्कोर पोहोचला. त्याचा पाठलाग करताना साउथ आफ्रिका केवळ १२१ पर्यंत पोहोचू शकली. आपण परत बॅटिंग करून २६७ धावा केल्या, आणि साउथ आफ्रिकेला शेवटच्या इनिंगमध्ये फिरकीसाठी अनुकूल पीचवर अशक्य असं ४८१ धावांचं टार्गेट दिलं. भारतातच नव्हे, पण जगातल्या कोणत्याही पीचवर हे टार्गेट खूप कठीणच होतं. आणि त्यात पीच स्पिनला अनुकून आणि त्या अनुकूल पीचचा अथोचीत फायदा उचलू शकणारे दोन वर्ल्डक्लास स्पिनर्स भारताकडे होते. आता साउथ आफ्रिकेला सामना वाचवण्यासाठी खेळायचं होतं. साउथ आफ्रिकेची पहिली विकेट लगेचच चौथ्या ओव्हरमध्ये पडली. पण त्यानंतर साउथ आफ्रिका एकून १४३ ओव्हर्स खेळली. म्हणजे ८५८ बॉल्स साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय बॉलर्सने टाकले. त्यापैकी बवूमा, अमला, डिव्हीलयर्स, ड्यूप्लेसी हे चौघे मिळून ७५५ बॉल्स खेळलेले आहेत. आणि या ७५५ बॉल्सच्या बदल्यात त्यांनी ११२ धावा केल्या होत्या. अमला, डिव्हीलियर्सतर दहाच्या स्ट्राईक रेटने खेळत होते. एकट्या डीव्हीलियर्सने २९७ बॉल्स खेळले आहेत. जो डिव्हीलियर्स ३१ बॉल्समध्ये शतक करू शकतो, एका इनिंगमध्ये १६ सिक्सर्स मारू शकतो. तो डिव्हीलियर्स २९७ बॉल्स खेळून केवळ ४३ धावाही करून सामना वाचवण्यासाठी चिवटपणे खेळू शकतो. या दिल्लीच्या शेवटच्या कसोटीचा सामनावीर दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी करून भारताला विजय मिळवून देणारा अजिंक्य राहणे ठरला. पण खरे सामनावीर आपले दोन स्पिनर्स आणि डिव्हीलियर्स आणि अमला होते.
१८. २०१७ ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतात होती. आणि या मालिकेची सुरवात पुण्यातल्या कसोटीपासून होती. क्रिकेटवरचं प्रेम, त्यातही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची पहिली कसोटी. आणि वॉर्नर, स्मिथ, स्टार्क, हेजलवूड आणि पुजारा, कोहली, राहणे, राहुल, अश्विन, जडेजा असे प्लेयर्स खेळणार. अशी कसोटी आम्ही चुकवणं शक्यच नव्हतं, गहुंज्याच्या नवीन मैदानावर ही कसोटी होती. मैदानावर कसोटी पाहण्यात एक वेगळी मजा आहेच, यात वादच नाही. पण टीव्हीवर खेळ सुरू होण्याच्या आधी जे जे एक्सपर्ट पीच बद्दल, प्लेईंग इलेव्हनबद्दल, एकून वातावरण आणि त्याचा पीच होणारा परिणाम याबद्दल वगैरे वगैरे जी जी माहिती देतात ती आम्हाला काहीच मिळालेली नव्हती. लांबून आम्हाला लहान लहान प्लेयर्सच्या फक्त हालचाली दिसत होत्या. आणि बाउंड्री लाईनला एखादा फिल्डर आला तर तो जवळून दिसत होता. त्यामुळे, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दिवशी २०५ धावांवर ९ विकेट असा स्कोर झाला होता, तो आम्हाला भारतीय बोलर्सचा विजय वाटत होता. त्यानंतर स्टार्कने ६३ बॉल्समध्ये ६१ धावा करून गणित बिघडवलं होतं. आणि तरीही ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमध्ये २६० इतका स्कोर पाहून आम्ही खुश होतो, की सामना आपल्या हातात आहे. पण पीच फिरकीलाही अनुकूल होतं. आणि भारतीय फलंदाज आयुष्यात प्रथमच टर्निंग पीचवर खेळत असल्यासारखे खेळत होते. २६० चा पाठलाग करताना आपला पहिला डाव १०५ मध्ये संपला. ओ कीफ नावाचा ऑस्ट्रेलियन स्पिनरने कोहली, राहणे सहित ६ विकेट्स काढल्या. आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा खेळायला उतरली. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट अश्विनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पडली आणि खेळायला उतरला आताचा जगातला बेस्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ. भारतातल्या आणि टर्निंग पीचवर जिथे भारतीय आणि इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडत होती, तिथे अश्विन आणि जडेजासमोर स्मिथने सेंच्युरी केली. पहिल्याच डावात आपण ऑस्ट्रेलियाच्या खूप मागे पडलो होतो. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्मिथच्या सेंच्युरीमुळे ऑस्ट्रेलिया त्या कसोटीत खूपच पुढे निघून गेली.केवळ दोन अडीच दिवसांत आपण ३३३ धावांनी पहिली कसोटी हरलो. पण स्मिथ त्या दिवशी वेगळ्याच पीचवर खेळत असल्यासारखा खेळत होता.
No comments:
Post a Comment