Friday, 13 November 2015

पुरस्कार वापसी हे 'ढोंगच'


सध्या देशात असं वातावरण निर्माण केलं जात आहे कि मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून प्रक्षोभक विधाने सातत्याने बाहेर पडत आहेत.
दिल्ली जवळ अशाच एक अफवेतून एका मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली. त्याच्या निषेध म्हणून देशातील अनेक पुरोगामी विचारवंतांकडून सरकारतर्फे मिळालेले पुरस्कार परत करण्यात आले.
देशात खरच असहिष्णुता वाढते आहे असा भ्रम निर्माण करण्यात या स्वयंघोषित पुरोगाम्यांना यश आल्याचे दिसते आहे.
आज सांगायचा मुद्दा वेगळाच आहे.
मागे जेव्हा बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्यावरून असच वादळ उठवण्यात आलं होत तेव्हा आणि संपूर्ण वादावर बाबासाहेब काहीच बोलत नव्हते. तेव्हा आमचा एक पुरोगामी आणि समाजवादी (आता ढोंगी) मित्र आम्हाला सांगत होता, कि या वादावर बाबासाहेब काहीतरी बोलले पाहिजेत. ते काहीच बोलत नाहीत, ते टीकाकारांना विचारातच घेत नाहीत हे 'ब्राह्मण्याच' लक्षण आहे. एकलव्या पासून हे सुरु आहे. तुम्ही त्यांचा किमान विचार करा. तुम्ही त्यांचा विचारही करत नाही हे त्यांच्या रागच कारण आहे हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेकडे तुम्ही किमान लक्ष द्या. (इथे आम्ही म्हणजे हिंदुत्ववादी आहोत आणि ते प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारे आहेत)
जेव्हा आम्ही (म्हणजे हिंदुत्ववादी) पुरस्कार वापसीवर बोलतो, कि शिखांच्या हत्याकांडवेळी पुरस्कार परत का केले नाहीत? खैरलांजी घडलं त्या वेळी पुरस्कार का परत केले नाहीत? काश्मिरी पंडितांच्या कत्तली झाल्या, खुलेआम बलात्कार करण्यात आले, त्यावेळी पुरस्कार का परत केले नाहीत? कलकत्याच्या भर रस्त्यावर एका 'हिंदू साधूची' ख्रिश्चन मिशन-यांकडून' गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तेव्हा पुरस्कार का परत केले नाहीत?
पुरस्कार परत करणाऱ्याकडून अशी टीका करणाऱ्यांना उत्तरं न देणं हे सुद्धा (आमच्या ढोंगी मित्राच्या दृष्टीनी) 'ब्राह्मण्याच' लक्षण आहे का? ते फक्त पुरस्कार परत करत सुटलेत, हातून एक वैचारिक सकारात्मक चर्चा व्हावी हा हेतू यामध्ये कोणाचाच दिसत नाही. हे नाटक केवळ 'पुरस्कार मिळाला तेव्हा अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही, किमान परत करून प्रसिद्धी मिळवू' म्हणून सुरु आहे.
एका महंमद इखालाखची हत्या म्हणून (ती हाती सुद्धा अत्यंत दु:खदच आहे, कोणीही त्या हत्येचे समर्थन करत नाहीत, केले तर ती माणसं नव्हेत) लागेच देशात असहिष्णुता वाढली? मोदी सत्तेवर येऊन सुद्धा आता दीड वर्ष उलटून गेलं तरी मोदी जिंकल्याची जी वैयक्तिक जखम अनेकांना झाली आहे ती दुरुस्त व्हायलाच तयार नाही.
आज जर देशात असहिष्णुता असेल तर ती काळ आज मध्ये वाढलेली नाही. समाज असा एका रात्रीत बदलत नाही. आणि हिंदू समाज तर पाच हजार वर्षात बदललेला नाही. आज अचानक ह्यांना वाढलेली असहिष्णुता का झोंबू लागली?



No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....