Monday, 1 February 2016

भारताची फाळणी अर्थात 'पाकिस्तान' (पुस्तक परीक्षण) - भाग - १

लेखक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

ज्यांना भारता सहसा कोणी जातीयवादी म्हणणार नाही अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारा हा ग्रंथ आहे. भारतात इस्लामच राज्य स्थापन झालं तेव्हा पासूनच भारतात (एक राष्ट्रात) दोन राष्ट्र निर्माण झाली होती. पण आपण हे मान्य करण्यात कमीपणा मानला. पण भारतातल्या इस्लामच्या स्थापने बरोबरच भारतात दुसरं राष्ट्र निर्माण झालं होतं, याची कबुली बाबासाहेबांनी आपल्या या ग्रंथातच दिली आहे. या ग्रंथाबद्दल काही बोल्यापुर्वी एक गोष्ट सांगितली पाहिजे. भारतात हिंदू मुस्लीम ऐक्य व्हावं यासाठी घटनानिर्मितीचे अनेक प्रयोग झाले. त्यापैकी एक १९२८ साली नेहरू अहवाल प्रसिद्ध झाला होता. हिंदू-मुसलमान दोघानाही मान्य होईल अशी अखंड भारताची घटना असं या अहवालाचं स्वरूप होतं. त्याचे सर्व तपशील इथे सांगण्याची गरज नाही. कोणत्याही स्वातंत्र्य लढ्याच्या पुस्तकात त्याचे सर्व तपशील मिळतील. परंतु या नेहरू अहवालावर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारताच्या ’१८ जानेवारी १९२९’ च्या अंकात ‘नेहरू कमिटीची योजना आणि हिंदुस्थानचे भवितव्य’ असा एक लेख लिहिला होता. तो मूळ लेखही सर्वांनी वाचवा, ‘पाकिस्तान – अथवा भारताची फाळणी’ या ग्रंथाइतकाच तो लेख काळाच्या बराच पुढे नेणारा आहे. या अहवालाचे फायदे तोटे समजावून सांगताना लेखाच्या शेवटी बाबासाहेबांनी लिहिले आहे – 
“स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानवर जा तुर्कस्थान, अफगाणीस्तान किंवा पर्शिया या तीन मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जरी मारा केला तर त्या प्रसंगी सर्व लोक (म्हणजे हिंदू मुसलमान दोघेमिळून) एक जुटीने तोंड देतील याची खात्री कोणी देईल काय? आम्हास तरी देता येत नाही. या देशात हिंदू वं मुसलमान हे दोन समाज नव्हेत हि दोन राष्ट्र नांदत आहेत. हिंदीमुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्राकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. हा ओढा इतका बेसुमार वाढला आहे कि मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश आमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय्य होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्थान अगर अफगाणीस्तानकडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश आपला आहे, या बद्दल ज्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्तीय हिंदू बांधवांविषयी ज्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते...”  याच लेखाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात, “नेहरू अहवालाची हि छाननी स्वार्थांध होऊन केलेली नाही. नेहरू कितीच्या योजनेला जो आम्ही विरोध केला आहे तो कमिटीने अस्पृश्यांची पायमल्ली केली म्हणून नव्हे, तिच्यात हिंदूंना धोका तसेच हिंदुस्थानवर अरीष्ट्य आहे म्हणून आम्ही विरोध केला आहे.” लेखाचा शेवट, सर्व अभ्यास आणि इतकं प्रदीर्घ लेख बाबासाहेबांनी हिंदूंच्या कल्याणासाठी लिहिला आहे हे आपण काही काळासाठी बाजूला ठेवूया (पण त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये). ४-५ दिवसापूर्वी संपूर्ण देशातून इराक आणि सिरीया मधल्या इस्लामिक स्टेटकडे आकर्षित झालेल्या आणि पकडलेल्या लोकांची मिडीयानी समोर आणलेली संख्या १४ आहे. मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून, मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करून जास्तीत जास्त काफिर देश आमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय्य आहे. फरक इतकाच आहे कि १९२९ साली बाबासाहेब प्रस्तावित पाकिस्तान बद्दल बोलत होते, खिलाफत आंदोलनाच्या अनुभवावरून. आज तेच शब्द isis बद्दल खरे आहेत. अगदी तंतोतंत.

आता मात्र ‘पाकिस्तान – अर्थात भारताची फाळणी’ या बद्दल बोलूया. वर उल्लेख केल्याप्रमाणे एका राष्ट्रात दोन राष्ट्र आहेत हे बाबासाहेबांनी १९२८ च्या नेहरू कमिशन वरच्या लेखातच लिहिले होते. आणि एका राष्ट्रात दोन राष्ट्र आहेत हे मान्य करणे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या फाळणी मान्य करणे नव्हे काय? हि फाळणी मान्य असल्याचे कायदेशीर आणि ऐतिहासिक अनेक पुरावे बाबासाहेबांनी आकडेवारीनुसार सिद्ध करून दाखवले आहेत. ‘तुमचे डोके दुखते आहे म्हणून तुम्ही ते कापून टाकत नाही’ अशा प्रकारचे भावनिक आणि उथळ उक्तिवाद पाकिस्तानच्या मागणीविरोधात होत होते.  पण ज्याप्रमाणे शरीराचे एक एक अवयव विकसित होत जावेत, त्यापद्धतीने मुस्लीम राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. म्हणून पाकिस्तानची मागणी हसण्यावारी न्यावी असे बाबासाहेबांना वाटत नाही, असे त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. भारतातील ९०% मुसलमानांचा उत्कट जरी नसला तरी केवळ भावनिक पाठींबा आहे या कारणास्तव पाकिस्तानची मागणी फेटाळून लावता येणार नाही, किंवा फेटाळून लावणे शहाणपणाचे ठरणार नाही, असे त्यांनी सांगितलं आहे. आपली राज्यव्यवस्था स्वतः ठरविण्याच्या तत्वाच्या फायद्यापासून मुसलमानांना वंचित करता येणारं नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सर्व ऐतिहासिक आणि तत्कालीन पुराव्यांच्या आधारे बाबासाहेबांचा असा ठाम विश्वास होता कि ‘भारताच्या’ भल्यासाठी हिंदुस्थानची हिंदू-मुसलमान अशी फाळणी होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा होतो कि प्राप्त परिस्थितीमध्ये भारतात हिंदू मुस्लीम ऐक्य शक्य नाही, यावर उपाय म्हणून भारताची फाळणी झालीच पाहिजे. देशात हिंदू मुस्लीम ऐक्य आहे का हे तपासून घेण्याची मुख्य कसोटी त्यावेळी कोणती उपलब्ध होती, कसोटी एकच होती ती म्हणजे दोघांनाही मान्य होईल अशी समान ‘राज्यघटना’. दोघांनाही मान्य होईल अशी राज्यघटना तयार करण्याचे प्रयोग भारतात १८९८ सालापासून सुरु होते. १८९८ ते १९४७ एकही राज्यघटनेचे प्रयोग मुसलमानांना मान्य झाले नाहीत. आणि असे म्हणणे भाग आहे कि मुसलमानांचे प्रतिनिधित्व मुस्लीम लीग आणि जिना करतात, कारण १९३५ नंतरच्या निवडणुकांमध्ये क्रमाक्रमानी मुस्लीम लीगचे निवडणुकांमधील मतांचे प्रमाण वाढलेले दिसून येईल. आणि हि वस्तुस्थिती कोणी अमान्य करणार नाही. कोणी असेही म्हणेल कि जीनांनी मुसलमान समाजाला ‘इस्लाम खतरे मै है’ सारखे भावनिक आवाहन केले आणि समाज आपल्या बाजूला वळवून घेतला. पण जिना अशा समाजाला भावनिक आवाहन करत होते, जो समाज भावनिक आवाहनाला बळी पडतो. शेवटी समाज आहे म्हणून नेता जन्माला येत असतो. In democracy people gets the government they deserve. म्हणजे जीनांनी समाज बिघडवला असे म्हणणे योग्य होणार नाही. समाज होताच, त्याला तसाच नेता मिळाला. जितका व्यवहारी विचार बाबासाहेबांनी केला आहे, त्याचं प्रमाणे विचार करायचा झाल्यास भारतात इस्लामचे राज्य स्थापन झाल्यापासून कधी हिंदू-मुस्लीम ऐक्य यशस्वी झालायं? जेव्हा जेव्हा हिंदू मुस्लीम ऐक्याची भारतात चर्चा होते, तेव्हा तेव्हा दोन घटनांची उजळणी होतेच. एक १८५७ चा उठाव आणि मोगल बादशहा अकबर. ब्रिटीश शासन उलथवून टाकाव यासाठी हिंदू मुस्लीम एकत्र येऊन लढले असा युत्किवाद केला जातो. आणि अकबरानी त्याच्या आयुश्याच्या एकूण कारकिर्दीतील ९ वर्ष ‘जिझीय’ कर काढला होता.

हिंदू मुस्लीम ऐक्य म्हणजे काय? ऐक्य याचा अर्थ समान अधिकार आणि लोकशाही व्यवस्थेत लोकसंखेच्या प्रमाणात पण अन्याय्य नसणारे समान अधिकार. वर वर विचार करणारे समान अधिकार म्हणून अकबराची ९ वर्ष सांगतील. पण अकबर काय होता हे जाणून घेण्यासाठी नरहर कुरुंदकर यांनी ‘आकलन’ या पुस्तकात अकबरावर एक लेख लिहिला आहे तो सर्वांनी नक्की वाचवा. एक अकबराचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. राज्यघटना निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत ५०% राखीव जागा किंवा वेगळे राष्ट्र या दोनच मागण्या घेऊन मुस्लीम लीग चर्चेला येत असे. ४७ च्या भारतात एकूण लोकसंखेच्या ९% असणाऱ्या समाजाला ५०% राखीव जागा हि मागणी कोणता शाहणा माणूस मान्य करेल! लीगची स्थापना झाल्यापसून ५०% जागांची मागणी लीगने कधीही सोडली नाही. लखनौ करारात लोकमान्यांचं आपण ऋणी असलं पाहिजे कि त्यांनी ५०% जागांची ही मागणी ३३% पर्यंत खाली आणून करार यशस्वी करून दाखवला. पण तरी ९% समाजाला ३३% राखीव जागा याला ऐक्य म्हणतात का? नाही म्हणत, म्हणून कोणतीही योजना भारतात यशस्वी होऊ शकली नाही. पण चर्चेदरम्यान १८५७ चा उल्लेख नेहमी येतो. या ‘तथाकातिक’ एक हजार वर्षात झालेल्या एकमेव ‘हिंदू-मुस्लीम’ ऐक्याबद्दल बाबासाहेब काय म्हणतात बघा – “ १८५७ चा उठाव... हा वस्तुतः ब्रिटिशांविरुद्धाचा मुसलमानांनी घोषित केलेला जिहाद\होता... हा उठाव... काही दशकांपूर्वी सय्यद अहमद यांनी, ब्रिटीश अमलामुळे भारत हा ‘दार-उल-हरब’ (युद्धभूमी) झाल्याचा प्रचार करून, जे आंदोलन सुरु केले होते त्याचे पुनरुत्थान होते. हा उठाव म्हणजे भारताला ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामची भूमी) करण्यासाठी मुसलमानांनी केलेला प्रयत्न होता” हा म्हणजे एक हजार वर्षाच्या इतिहासात हिंदू मुस्लीम ऐक्याचे एकही यशस्वी उदाहरण नाही. आणि म्हणूनच भारताच्या हितासाठी पाकिस्तान आवश्यक होतं आणि तो झालाही. परंतु अजूनही भारतातील हिंदू मुस्लीम समस्या संपलेली नाही. म्हणून बाबासाहेबांची इस्लाम आणि मुसलमानांसंबंधी कोणती मतं आहेत, ते जाणून घेणे आजच्या काळासाठी सुद्धा उपयोगी आहे. 


भाग - २ साठी खालील लिंक वर क्लिक करा http://mukulranbhor.blogspot.in/2016/02/blog-post_1.html

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....