लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हिंदुस्थानची फाळणी होऊ नये यासाठी
ऐक्याच्या दूतांकडून समान इतिहासाचे आजही दाखले दिले जातात. पण बाबासाहेब मुळात
समान इतिहास आहे हेच मान्य करत नाहीत. त्याच्यापुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात कि,
“समान पूर्वेतिहास नसतानाही हिंदू वं मुसलमान एक राष्ट्र उभारू शकतात असा
दृष्टीकोन हिंदूंचा आहे. असा दृष्टीकोन बाळगणे भ्रम आहे” मुळात जो इतिहास हिंदू
आपल्या वैभवाचा मानतात तो इतिहास मुसलमानांना अपमानाचा वाटतो. २०१५ मध्ये सुद्धा
मुस्लीम मौलवी TV वरच्या चर्चेमध्ये औरंगजेब आमचा हिरो आहे असे सांगतात. बाबासाहेब म्हणतात १८५७ च्या
उठावानंतर (जिहाद नंतर) ब्रिटिशांचा शासन आल्यामुळे परिणाम असा झाला, तर ६०० वर्ष
मुसलमान हिंदूंचे राज्यकर्ते होते. ब्रिटीश शासनामुळे मुसलमानांना हिंदूंच्या
पातळीवर यावे लागले. हि मुसलमानांच्या दृष्टीने अधोगती होते. पण त्याही पेक्षा
मोठी अधोगती म्हणजे त्यांना हिंदूंच्या पातळीवर यावे लागले होते. हि जास्ती मोठी
मानखंडना होती. या असहाय्य परिस्थितीतून पाकिस्तानची मागणी आलेली आहे. आपण या
देशाचे राज्यकर्ते होते किंवा आपण असलो पाहिजे ही भावना मुसलमान विसरायला तयार
नाहीत.
या ग्रंथाचा दुसरा भाग प्रकरण चौथे यामध्ये भारतावरच्या परदेशी आक्रमणांचा
लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या १२ पांनांमध्ये आक्रमक इस्लामच्या नावाने
धर्मराज्य शापान करण्याच्या एकमेव उद्देशाने भारतावर आक्रमणं होत होती एवढंच आहे. ज्या
अकबराला सर्व पुरोगामी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दूत मानतात त्या अकबरानी बनारस आणि
इतर राज्यातील सर्व मंदिरे उध्वस्त करण्यात यावीत असा आदेश दिल्याचा पुरावा संदर्भ
म्हणून बाबासाहेबांनी दिला आहे. भारतावरच्या इस्लामच्या नावानी झालेल्या
आक्रमणापासून नादीरशहा आणि अहमदशहा अब्दाली पर्यत हा इतिहासाचा समान प्रवाह
असल्याचा बाबासाहेबांचा दावा आहे. हाच इतिहासाचा प्रवाह १८५७ च्या
उठावामध्येसुद्धा दिसतो. हाच प्रवाह संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा दिसतो. हे
कोणीही संघाच्या प्रवक्त्यानी किंवा कोणाही हिंदुत्वावाद्याने मांडलेलं नसून
ज्यांना कोणीही जातीय म्हणणार नाही अशा बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेलं आहे. या
इतिहासाच्या दाखल्यांवरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान (या दोन मनोवृत्तीमध्ये)
यांमध्ये कोणते ऐक्य हिंदुना दिसते? असा सवाल बाबासाहेबांनी केला आहे. एक
राष्ट्रीयत्वाच्या कोणत्याही निकषांवर भारत पाकिस्तान यांच्यातील ऐक्य काल्पनिक
आणि बनवत असे आहेत असेच म्हणावे लागेल, असेही बाबासाहेबांनी सांगितले आहे. या १२ पानांच्या
एकूण प्रतिपादनावरून केवळ भौगोलिक ऐक्याबद्दल बाबासाहेब बोलत नसून या दोन भावनिक
ऐक्याबद्दलच बोलत असल्याचे लक्षात येईल.
पुस्तकाच्या तिसऱ्या भागात ‘पाकिस्तानला
हिंदूंचा पर्याय’ या प्रकरणात लाला हरदयाळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी
पाकिस्तानला पर्याय म्हणून काही सिद्धांत मांडले आहेत. त्या सिद्धांतांची चिकित्सा
केली आहे. त्यामध्ये यादोघांवरही कठोर चिकित्सा केली आहे. पण हा चिकित्सेपेक्षाही
जास्त महत्वाचं म्हणजे ‘खिलाफत आंदोलन’ ते ‘चले जाव’ या वीस वर्षाच्या काळात भारतात
झालेल्या धार्मिक दंगलींचा एका अहवाल या प्रकरणात देण्यात आला आहे, आकडेवारीसह. आणि
या आकडेवारीवरून बाबासाहेबांचा असा निष्कर्ष आहे कि हिंदूंनी मुसलमानांवर केलेल्या
अत्याचारपेक्षा मुस्लिमांनी हिंदुंवर केलेले अत्याचार अधिक प्रमाणात होते.
भारत आणि पाकिस्तान अशी धर्माच्या
आधारावर फाळणी व्यावी अशी मागणी इथे होत असताना बाबासाहेबांचे जगात सर्वत्र लक्ष
आहे. जगात अशी कोणती ऊदहारणे आहेत का? तिथे तिथल्या समाजानी त्याला कसा प्रतिषद
दिला? याचा सविस्तर अभ्यास या प्रकरणात आहे. यासाठी बाबासाहेबांनी दोन देशांचा
अभ्यास केला आहे. एक तुर्कस्थान आणि झेकोस्लोव्हेकिया.
सामाजिक कोंडी या नावाचे प्रकरण
आहे. त्यामध्ये ज्या वाईट रूढी हिंदूधर्मात आहेत, तशाच प्रकारच्या सामाजिक दुष्ट
वाईट रूढी भारतातल्या इस्लाममध्ये आहेत, हे सिद्ध करणाऱ्या आकडेवारीचा एक तक्ताच
या प्रकरणात आहे. मला हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज वाटते कि ज्या माणसाला कोणीही
जातीय म्हणणार नाही अशा बाबासाहेब आंबेडकरयांनी कुराण मधल्या आयतींचा संदर्भ देऊन
इस्लाममध्ये महिलांना समान स्थान नसल्याचं सांगितलं आहे. बाबासाहेब म्हणतात, “कुराण
हा गुलामगिरीच्या बाबतीत मानवजातीचा शत्रू आहे आणि त्याचा सर्वाधिक त्रास
स्त्रियांना झालेला आहे” भारतातील इस्लाममध्ये जातीव्यवस्थेबरोबरच अस्पृश्याताही
असल्याचं या प्रकरणात बाबासाहेबांनी सांगितलं आहे. हिंदूंमध्ये ज्या प्रमाणे
प्रदीर्घ समाजसुधारकांची परंपरा आहे, त्याप्रमाणे इस्लाममध्ये नाही. भारताच्या
इतिहासात एक हमीद दलवाई सोडले तर इस्लाममध्ये कोणीही समाजसुधारक नाहीत. आणि हे
मागासलेपणाचे मुख्य कारण आहे.
११व्या प्रकरणाच्या सुरवातीलाच “हिंदूंच्या
तुलनेत मुसलमानांच्यातील कुरापतीची भावना हि प्राचीन असून ती त्यांच्यात मुळातच
भिनलेली आहे. ती त्यांना लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. कुरापातींच्या भावनांचे
प्रदर्शन करीत मुसलमानांनी हिंदुना बरेच मागे टाकेल आहे.’’ हा सार्वकालीन अभिप्राय
आहे. ‘जातीय कुरापती’ या प्रकरणाच्या शेवटी मुसलमान हिंदूंचा कसा गैरफायदा घेतात
याची काही उदाहरणं आहेत. गोहत्या करण्याचा वं मशिदीपुढे वाद्य वाजविणे बंद
करण्याचा मुसलमानांचा आग्रह आहे. बळी देण्यासाठी गोहत्या करण्याचा आग्रह मुस्लिम
कायदा धरत नाही. हज यात्रेच्या वेळी मक्का व मदिना येथेही कोणताही मुसलमान गायीचा
बळी देत नाही. परंतु भारतात अन्य कोणत्याही प्राण्याचा बळी देण्यावर ते (मुसलमान)
संतुष्ट राहत नाहीत. आजही यात काहीही फारक पडलेला नाही.
बहिष्कृत भारतामध्ये नेहरू
कमिटीवरच्या लेखात त्यांनी जी भीती बोलून दाखवली होती, कि इतर इस्लामिक देश जर
भारतावर चाल करून आले, तर भारतीय मुसलमान त्यांच्याविरुद्ध लढतील असा विश्वास वाटत
नाही. तीच भीती या ग्रंथातील ‘राष्ट्रीय निराशा’ या प्रकरणात पुन्हा एकदा व्यक्त
करण्यात आली आहे. दार-उल-हरब आणि दार-उल-इस्लाम हा सिद्धांत मौलवीनी भारतासाठी
लागू केला होता त्यावर बाबासाहेबांनी भाष्य केले आहे. मुसलमानांच्या दृष्टीने
हिंदू काफिर आहे, काफिर हा आदरास मुळीच पात्र नसतो, तो हलक्या जातीचा व हीनदर्जाचा
असतो. हिंदू सरकारची आज्ञा मुसलमान पळणार नाहीत ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.
हे बाबासाहेबांचेच शब्द आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक
महान समाजसुधारक नव्हते, तर प्रखर राष्ट्रवादीसुद्धा होते. १००० वर्षाच्या
इतिहासात कोणी केली नव्हती अशी इस्लामची चिकित्सा त्यांनी केली. हा ग्रंथ त्याचा
पुरावा आहे. केवळ फाळणीचा समर्थक म्हणून हा ग्रंथ वाचता कामा नये. फाळणी झाली,
पुन्हा अखंड भारत होण्याची शक्यता नाही. परंतु मुसलमान या देशात राहणार आहेतच.
इस्लामची चिकित्सा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी हा ग्रंथ वाचला पाहिजे.
आणि ऋणी सुद्धा असले पाहिजे.
No comments:
Post a Comment