Thursday, 24 March 2016

'मालदा'मध्ये नक्की काय झालं?

साधारण १० जानेवारी २०१६ रोजी पश्चिम बंगाल राज्यात 'मालदा'या ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगल झाली.

ह्या दंगलीची सुरवात नेमकी कशाने झाली, याची कोणत्याही मेन स्ट्रीम मिडिया ने दखल अर्थात घेतली नाही. माझे अनेक मित्र 'स्पर्धा परीक्षेची' तयारी करतात, त्यांचा 'चालू घडामोडींचा' विशेष अभ्यास असतो. ते अधिक काळजीपूर्वक रोजचे पेपर वाचतात. केवळ मराठी नव्हे तर इंग्लिश पेपर सुद्धा ते काळजीपूर्वक वाचतात. अशा जाणीवपूर्वक अभ्यास करणाऱ्यांनासुद्धा 'मालदा' मध्ये नक्की काय घडलं हे माहिती नाही. याचं कारण देशात तेव्हा दलित स्कॉलर आत्महत्या करत होते, भारताच्या एका महत्वाच्या आणि आघाडीच्या विद्यापीठामध्ये राष्ट्रविरोधी घोषणांचे कार्यक्रम आयोजित होत होते. त्यांच्या तुलनेत हिंदू-मुस्लीम दंगल म्हणजे काय? त्याला काय किंमत द्यायची? शेवटी हिंदू – मुस्लीम प्रश्न निर्माण केला आहे, हिंदुत्ववाद्यांनी. तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाला इतकं महत्व द्यायचं काय कारण? हिंदुत्व वाद्यांना कोंडीत पकडता येईल अशी ही रोहित वेम्युला, JNU ही प्रकरणं चांगली आहेत.

JNU प्रकरण सुरु होतं तेव्हाचं पश्चिम बंगाल येथे ह्या हिंदू-मुस्लीम चकमकी सुरु होत्या. पण तेव्हा पेपर वाचताना, न्यूज बघताना ह्या चकमकींच्या बातम्या कधीच दिसल्या नाहीत. किंबहुना त्या नव्हत्याच. ऑनलाईन न्यूज एजन्सी पोर्टल्सवर ह्याच्या बातम्या आहेत, पण मेन स्ट्रीम मिडीया वर सहजा नाहीत.

JNU मध्ये जो मुद्दा ‘मुख्य’ म्हणून बनवला गेला, तो ‘अभिव्यक्ती’ स्वातंत्र्याचा’ तोच मुद्दा मालदा मध्येसुद्धा अभिव्यक्तीचा मुद्दा ‘मुख्य’ म्हणून बनवता आला असता (पण आम्ही करणार नाही). आम्ही काही कम्युनिस्ट नाही, कि जिथे तिथे अभिव्यक्तीवर गदा येते.

मालदा मध्ये नक्की काय झालं?
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध बेकायदेशीर ठरवले. (खरं म्हणजे न्यायालयाचे हे मत प्रतिगामी आहे) पण शेवटी न्यायालयाचा निर्णय हा कायदा आहे. असो. असे संबंध बेकायदेशीर ठरवल्यावर ‘अरुण जेटली’ (भारताचे अर्थमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा) म्हणाले की, कोर्टाने आपल्या निर्णयाचा पुनर्रविचार करावा. त्यावर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशातील ‘समाजवादी पक्षाचे’ नेते आझम खान म्हणाले, अरुण जेटली म्हणत आहेत ते योग्यच आहे, कारण संघाचे लोकं समलैंगिक आहेत.’ त्याच्यावर उत्तर प्रदेशातील अखिल भारतीय हिंदू महासभेचा एक कार्यकर्ता ‘कमलेश तिवारी’ याने ‘प्रेस नोट’ काढली. त्यामध्ये प्रेषित महंमद पैगंबर हेच पहिले समलिंगी होते असं म्हणण्यात आलं होतं. कमलेश तिवारीच्या ‘प्रेस नोट’ मध्ये. उत्तर प्रदेश पोलिसांनी कमलेश तिवारीने डिसेंबर ३०, २०१५ रोजी ही प्रेसनोट काढली. आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला ३ जानेवारी २०१६ रोजी अटक केली. १० जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील ‘बिजनोर’ या गावी ‘देवाची निंदा’ (anti-blasphemy) केल्याप्रकरणी प्रचंड मोर्चा निघाला. त्या मोर्च्यामध्ये (ओळख पटू न शकलेल्या मुस्लीमाने) जो कोणी काम्लेख तिवारीचे मुंडके कापून आणेल त्याला ५.१ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तो काय म्हणाला बघा, ‘"To affront or comment on any religious thing is wrong. Today, all Muslims have protested against Kamlesh Tiwari. If the Utter Pradesh government or courts punish him – that's fine. Otherwise, the Muslims of Bijnor have announced that 5.1 million rupees will be given for his beheading. The Muslims of Bijnor will give 5.1 million rupees to anyone who will behead him."[6]
"Kamlesh Tiwari, whether you are in jail or anywhere else, you cannot escape. This is warning... [This statement is on the behalf] of Maulana Anwarul Haq Sadiq, of all Muslims of Bijnor, and of all the responsible ulema [Islamic religious scholars] of Bijnor."

देशाच्या अनेक भागात असे मोर्चे त्याकाळात निघाले. त्यामध्ये सर्वात मोठे मोर्चे इंदोर, भोपाळ मध्ये काढले गेले. ५ डिसेंबर रोजी भोपाळ येथील मोर्च्यात ‘जमियत-इ-उलेमा-इ-हिंद’चा सहभाग होता, त्याचंबरोबर खासदार असवूद्दिन ओवैसी यांचा पक्ष MIM चा सुद्धा सहभाग होता. या भोपाळ येतील मोर्च्यासमोर बोलताना मध्यप्रदेश राज्याच्या ‘जमियत’चा नेता मौलवी झियाउल्लाह खान म्हणाला, “"A person insulting the Prophet Muhammad is bound to get a death sentence, and we demand this for... [Kamlesh Tiwari] by the government of India." त्याच मोर्च्यात बोलताना MIM चा मुफ्ती अमीर जमाल म्हणाला कि, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आणि म्हणून सरकारने आमच्या भावनांचा सन्मान करावा.

असे देवबंद, मीरत, शामिली, मुझफ्फरनगर, लखनौ, उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये, महाराष्ट्रातील काही गावांमध्ये, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर अशा अनेक ठिकाणी हे मोर्चे काढण्यात आले होते.   
   
पुढे झालेली जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, सैनिकांवर हल्ले, वगेरे आहेतच.

कमलेश तिवारीची चूकच आहे. आझम खानला उत्तर म्हणून कोणीही या प्रकारचे बिनबुडाचे आरोप नाहीच केले पाहिजेत. दुसऱ्याच्या भावनांचा आदर हे हिंदू वैशिष्ट्य आहे. ते सोडून कसं चालेल? तेव्हा चूक कमलेश तीवारीचीच आहे. परंतु पोलिसांनी त्याला अटक केल्यावर सर्व ठिकाणचे मोर्चे उभे राहिलेले आहेत. प्रकरण कायद्याच्या हातात असताना जमावाने कायदा हातात घेणे बरोबर नाही. पण जेव्हा भाजपाचा एक नेता ‘कन्हैया कुमारची जीभ काढून देणाऱ्याला’ बक्षीस जाहीर करतो, आणि त्यानंतर सर्व मिडिया अकांडतांडव करतो, तसा कमलेश तिवारीच्या केसमध्ये का नाही? उलट भाजपाच्या ‘त्या’ नेत्याचे कोणीही समर्थन केले नाही. खुद्द पक्षातूनही त्याच्यावर टीका झाली. परंतु ‘प्रचंड’ जमवासमोर एक मुस्लीम नेता अशी घोषणा करतो आणि त्याच्याकडे आपली माध्यमं फक्त दुर्लक्ष करतात.

ज्या प्रकारे मुस्लीम जमाव एखाद्या घटनेवर ‘आक्रमक’ प्रतिक्रिया देतो, किंवा या घटनेमध्ये ज्या प्रमाणे मुस्लीम React झाले, त्याप्रमणे कोणताही ‘हिंदू’ कधीही React होत नाही.

मी ISIS च्या Sex Slavery चा अभ्यास करत असताना, अनेक जिहादी दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या वेबसाईट माझ्या पाहण्यात आल्या. ISIS ने प्रसिध्द केलेल्या Sex Slavery संदर्भातील जाहीरनामा मला एका वेबसाईट वर मिळाला. त्याचं वेबसाईट वर मला भारतासंबंधी एक बातमी दिसली. ती जेव्हा मी वाचली तेव्हा मला ‘माझ्या भारतात’ एका ठिकाणी झालेल्या ‘हिंदू-मुस्लीम’ दंगलीबद्दल कळलं. त्याची लिंक मी देतोच, परंतु त्यामध्ये ‘आझम खान’चा उल्लेख Azam Khan, a loudmouth pro-Islamist Muslim minister in the government of Uttar Pradesh.असा करण्यात आला आहे. भारतातल्या कोणत्याच वृत्तपत्रामध्ये मला इतकी विस्तृत बातमी वाचायला मिळाली नाही. 


ही आहे ती वेबसाईट - ज्याच्यावर या बातमीचे विस्तृत प्रक्षेपण वाचायला मिळेल. 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....