‘इस्लाम’शी निगडीत बहुतेक सर्व बाबी हिंदूंना अपरिचित आहेत. कुराणचे स्वरूप कसे आहे, शरियत, म्हणजे काय, इस्लामी इतिहास आणि मुसलमानी इतिहास यात काही फरक आहे का, धर्म तत्वज्ञान आणि राजकीय तत्वज्ञान यात फरक आहे का, राजकारण अर्थकारण समाजकारण हे धर्मापासून वेगळं काढता येतं का. असे इस्लाम संदर्भातले बहुसंख्य प्रश्न हिंदूना पडलेले आहे. पण काही अपवाद वगळता कोणीही या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आज मी तो प्रयत्न करणार आहे. मागच्या लेखात ‘कुराण’ची प्रार्थमिक ओळख करून देण्याचा मी प्रयत्न केला होता. आता ‘हादीस’ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.
मूळ ‘इस्लाम’चे अभ्यास करायचे तीन प्रमुख सोर्स आहेत. सर्वप्रथम मुहंमद पैगंबर यांचे चरित्र, त्यानंतर कुराण आणि शेवटी हादीस. कुराणची निर्मिती कशी झाली हे मागच्या लेखात मांडले आहे. कुराणची निर्मिती आणि प्रेषित पैगंबर यांचे चरित्र एक एकत्र प्रवास करणारे आहे, त्यामुळे कुराणातील वचनांचा अर्थ तेव्हाच यथायोग्य कळू शकेल जेव्हा आपल्या समोर प्रेषितांचे चरित्र उपलब्ध असेल. ‘कुराण’ म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब म्हणता येईल. पण कुराणचा आवाका मर्यादित आहे. ११४ सुरह म्हणजे अध्याय आणि ६२२५ आयती. त्याच्या तुलनेत सुद्धा प्रेषितांचे चरित्र खूप मोठे आहे. विशिष्ट एका परिस्थितीमध्ये प्रेषित कसे वागले, कसे बोलले याचा कोश म्हणजे ‘हादीस’. ज्या प्रश्नांची उत्तरं कुराणातून मिळत नाहीत, त्याची उत्तरं हादीसमध्ये शोधली जातात. शिवाय कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी ‘हादीस’चा सुद्धा आधार घेतला जातो. गेल्या लेखात ‘कुराण’ म्हणजे इस्लामी धर्मशास्त्राचा सर्वश्रेष्ठ आधार आपण पहिला. आता कुराणनंतर महत्व आहे ते हादीसचे, त्याची थोडक्यात ओळख आपण करून घेऊ.
अरेबिक शब्द ‘हादिथ’ याचा अर्थ संवाद, संभाषण, गोष्ट असा होतो. कुराणात सुद्धा वेगवेगळ्या अर्थाने ‘हादीस’ या शब्दाचा वापर एकूण २३ वेळेला केला गेला आहे. हादीसला समानार्थी म्हणून मुख्य ३ शब्द आहे. त्यामध्ये ‘खबर’, ‘अथर’, आणि ‘सुन्ना’. ‘खबर’ या शब्दाचा अर्थ ‘हादीस’या शब्दाप्रमाणेच घेतला जातो. ‘अथर’ या शब्दाचा अर्थ मात्र ‘प्रेषितांच्या सहकाऱ्यांच्या कृतींशी संबधित आहे’. ‘हादीस’ला सर्वात जवळ जाणारा शब्द म्हणजे ‘सुन्ना’ हा आहे, किंबहुना त्याचा अर्थ ‘हादीस’पेक्षा वेगळा आहे.
‘सुन्ना’ या शब्दाचा अरेबिक भाषाशास्त्रानुसार अर्थ ‘मार्ग’, ‘दिशा’, ‘नियम’, ‘आचरणाचा धर्म’ इत्याही होतात. कुराणात ‘सुन्ना’ किंवा याचा एकवचनी ‘सुनान’ हा शब्द सुमारे १६ वेळा वापरला आहे. आणि सगळीकडे वर सांगितलेल्या अर्थाने वापरलेला आहे. ‘प्रेषितांच्या सुन्ना’ काटेकोर पाळणारे लोक म्हणजे ‘सुन्नी’. इस्लामी कायद्याचा ‘हादीस’ हा दोन नंबरचा आधार आहे. त्यामुळे ‘हादीस’ संकलनाचे, अभ्यासाचे शास्त्र तयार करण्यात आले आहे.
प्रेषितांच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे ‘कुराण’च्या अधिकृत आवृत्तीची गरज भासू लागली, त्याप्रमाणे कुराणच्या मर्यादासुद्धा जाणवू लागल्या. म्हणून प्रथम कुराणची अधिकृत आवृत्ती तयार केली गेली. तेव्हाच ‘हादीस’ म्हणजे प्रेषितांच्या कृती आणि उक्ती सुद्धी गोळा केल्या पाहिजेत अशी गरज निर्माण झाली, पण ‘हादीस’मुळे कुराणकडे दुर्लक्ष होईल या भीतीने ‘हादीस’ संकलनाचे काम सोडून देण्यात आले. खलिफा उमर दुसरा (६८२-७३२) यांच्या काळात आणि त्यांच्याच आज्ञेने हादीस संकलनाचे काम पुन्हा सुरु झाले. अनेक संशोधकांनी जगभर फिरून प्रेषितांच्या स्मृतीकथा गोळा केल्या होत्या, पण काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या.
प्रेषितांच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे ‘कुराण’च्या अधिकृत आवृत्तीची गरज भासू लागली, त्याप्रमाणे कुराणच्या मर्यादासुद्धा जाणवू लागल्या. म्हणून प्रथम कुराणची अधिकृत आवृत्ती तयार केली गेली. तेव्हाच ‘हादीस’ म्हणजे प्रेषितांच्या कृती आणि उक्ती सुद्धी गोळा केल्या पाहिजेत अशी गरज निर्माण झाली, पण ‘हादीस’मुळे कुराणकडे दुर्लक्ष होईल या भीतीने ‘हादीस’ संकलनाचे काम सोडून देण्यात आले. खलिफा उमर दुसरा (६८२-७३२) यांच्या काळात आणि त्यांच्याच आज्ञेने हादीस संकलनाचे काम पुन्हा सुरु झाले. अनेक संशोधकांनी जगभर फिरून प्रेषितांच्या स्मृतीकथा गोळा केल्या होत्या, पण काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या.
आज उपलब्ध असणाऱ्या हादीस संग्रहांपैकी ‘इमाम मलिक’ यांचा सुमारे एक हजार कथांचा ‘मुवत्ता’ म्हणजे उपलब्ध आहे. पण त्यात केवळ प्रेषितांच्या कथा नाहीत, त्यात सुरवातीच्या खालीफांचे फतवे, तत्कालीन कायद्याच्या परंपरा असे सर्व त्यात आहे. पण त्यात हादीसचे पुरावे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इस्लामी परंपरेत ‘मुवत्ता’ हा हदीस संग्रह न मानता, कायद्याच्या परंपरेचा हादीस संग्रह मानतात.
आज ‘हादीस’चे संग्रह संकलकाच्या नावे प्रसिद्ध आहे. स्मृतीकाथांचे अनेक संकलक आहे, पण इस्लामी कायद्यात सर्वांचे स्थान सारखे नाही. हादीस संकलित करताना त्यांच्या विश्वासार्हता तपासून घेऊन संकलित केलेले सहा हादीसचे संग्रह सर्वात प्रमाण मानले जातात. त्यामध्ये १. सहिह बुखारी (हादीस संख्या – ७५६३) , २. सहिह मुस्लीम (हादीस संख्या – ७५६३), ३. अबू दावूद (हादीस संख्या – ५२७४), ४. जमियत त्रीमिधी (हादीस संख्या – ३९५६), ५. अन निसाई (हादीस संख्या – ५७७१) आणि ६. इब्न मजह (हादीस संख्या – ४३४१). या सहा संकालाकानी संग्रहित केलेले हादीस सर्व जास्त प्रमाण मानले जातात. या सहा पैकी सुद्धा पहिले दोन म्हणजे बुखारी आणि मुस्लीम सर्वात जास्त विश्वासार्ह आहेत, म्हणून त्यांना ‘सहिह’ म्हंटले आहे. यांच्या शिवाय शिया परंपरेचे सुद्धा चार संग्रह आहेत. पण शिया हादीस मध्ये प्रेषितांच्या गोष्टींबरोबर शिया इमामांच्या पण गोष्टी त्यात आहेत.
हादीसची रचना कशी असते ते सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. सर्व हादीसचे संकलक प्रेषितांच्या मृत्यूनंतर साधारण दीडशे वर्षांनी जन्माला आले आहेत. त्यामुळे प्रेषितांच्या गोष्टी त्यांनी इतर लोकाकांडून ऐकून संकलित केल्या आहेत. ‘अ’ ने ‘ब’ कडून ऐकलं, ‘ब’ ने ‘क’ कडून ऐकलं ‘क’ ने प्रेशितांकडून ऐकलं अशी एक साखळी निर्माण होते. या साखळीतला शेवटचा दुवा म्हणजे ‘अ’ तो हादीस संकलकाला तो गोष्ट सांगतो. मह त्याची सत्यता तपासून घेऊन संकलक त्याची नोंद करून ठेवतो. हादीसच्या सत्यातेच्या चार पातळ्या आहेत. ‘सहीह’ म्हणजे सर्वात विश्वासार्ह. त्यानंतर ‘हसन’ म्हणजे ‘सहिह पेक्षा कमी’, ‘दाईफ’ म्हणजे कमजोर आणि शेवट ‘मौदू’ म्हणजे प्रक्षिप्त, ढवळाढवळ केलेलं. प्रत्येक हादीसच्या वर त्याची सत्यतेची पातळी लिहिलेली असते. सहिह बुखारी आणि सहिह मुस्लीम यांच्या हादीस मध्ये सत्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून त्यांच्या संग्रहात असे शब्द दिसणार नाहीत, इतरांच्या संग्रहात दिसतील. मूळ नोंदवलेल्या गोष्टींची संख्या काही लाखाच्या घरात जाते, एकट्या बुखारी यांनी सुरवातीला नोंदवलेल्या गोष्टी काही लाखात जातात, पण त्यांची सत्यता आणि विश्वासार्हता तपासून घेऊन त्या सात हजाराच्या घरात आलेल्या आहेत.
आज मुसलमान कसे वागतात, किंवा असे का वागतात याची बहुतेक सर्व उत्तरं तुम्हाला ‘हादीस’ संग्रहात मिळतील. रोज भारतात ‘गज्वा ए हिंद’ ची चर्चा ‘तारेक फतेहच्या कृपेनी होती, त्या ‘गज्वा ए हिंद’ पासून मुसलमान दाढी वाढवतात पण मिशी कमी ठेवतात किंवा ठेवत नाहीत, इथपर्यंत सर्व गोष्टींची मूळं हादीसमध्ये सापडतील. उदाहरणादाखल काही हादीस इथे मुद्दाम सांगणार आहे.
अकबराच्या दरबारात ‘गोहत्येसंबंधात’ कुराण आणि हादीसचे काय म्हणणे आहे, अशी शंका अकबराने विचारली. तेव्हा त्याच्या दोन मौलवींनी नरकात जाणाऱ्या चार लोकांची यादी हादीसमध्ये आहे असं सांगितलं, ते चार लोकं कोण कोण तर – पिंपळाचे किंवा बोरीचे हिरवे झाड कापणारा, मनुष्य विक्री करणारा, गाईची वध करणारा आणि व्यभिचारी’. पण गोहत्या संदर्भात बुखारी (हादीस क्रमांक – १७०९) आणि मुस्लीम (हादीस क्रमांक – २४८६) यांची प्रत्येकी एक एक हादीस आहे, ज्यात प्रेषितांनी स्वतःच्या हाताने गाईची बळी दिला आहे, आणि ते गोमांस ‘धर्मादाय संस्थेला दान’ करावे असे सांगितले आहे. हे दोन्हीही हादीस बुखारी आणि मुस्लीम यांच्या संग्रहातील असल्यामुळे त्यांच्यासमोर त्यांची विश्वासार्हतेची पातळी सांगणारे शब्द दिलेले नाहीयेत.
पन तारेक फतेहच्या कृपेनी भारतात हल्ली ‘गज्वा ए हिंद’ बद्दल जागरूक झाली आहेत. त्यावर चर्चा करत आहेत. ते हादीस उदाहरणा दाखल सांगतो. अन निसाई यांनी ३१७७ क्रमांकाची हादीस नोंदवली आहे, त्यात ते म्हणतात थक़्बन नावाच्या मुक्त केलेल्या गुलामाने प्रेषित पैगंबर यांच्याकडून ऐकले होते कि, ‘माझ्या उम्माचे दोन गट आहेत, ज्यांना अल्लाह नरकाच्या आगीपासुन मुक्त करेल. पहिला गट जो भारतावर स्वारी करेल (invade india) आणि दुसरा गट जो ‘इसा बिन मार्याम’ बरोबर राहील’ यामध्ये invade india ला अरेबिक संकल्पना आहे ‘गज्वा ए हिंद’. अन निसाई यांनी या हादीसला ‘हसन’ चा दर्जा दिलेला आहे.
साधारणपणे फतवे जे काढले जातात ते ‘हादीस’चे संदर्भ देऊन काढले जातात. खऱ्या अर्थाने बेडरूम पासून युद्धमैदानापर्यंतचे सर्व आदेश किंवा दिशा हादीसमधून मिळतात.
- मुकुल रणभोर ©
- mukulranbhor111@gmail.com
- mukulranbhor.blogspot.in
- mukulranbhor111@gmail.com
- mukulranbhor.blogspot.in
No comments:
Post a Comment