त्यावेळी इस्लामी संस्कृतीचं नेतृत्व 'अब्बासी' खिलाफतीकडे होत. अब्बासी खिलाफतीची राजधानी बगदाद होती. इस्लामी धर्मशास्त्राचा 'इमाम हंबाली' याच्याबरोबर 'तबरी' पहिल्यांदा बगदादमध्ये गेला. हंबालीच्या हाताखाली त्याने शरियाच्या हंबाली परंपरेचा तर अभ्यास केलाच, पण हंबाली च्या मृत्यूनंतर त्यांनी इतर तिन्ही परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्याकाळी जगातल्या सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक असणाऱ्या कैरो विद्यापीठाच्या आणि बगदाद विद्यापीठाच्या ग्रंथांचा 'तबरी' याने सखोल अभ्यास केला. 'कुराण' चे धर्मशास्त्र, त्याचा इतिहास आणि कुराण वरचे तबरीचे भाष्य आजही प्रमाण मानले जाते. पण त्याचे मॉन्युमेंटल काम म्हणजे त्याने लिहिलेला इस्लामी जगाचा इतिहास. अब्बासी कालखंड हा इस्लामी इतिहासातला सुवर्णकाळ मानला जातो. त्यावेळी ज्ञात असणाऱ्या जागांपैकी दोन तृतीयांश भागावर इस्लामी झेंडे पोचले ते अब्बासी काळात. अब्बासी काळात इस्लामी संस्कृतीचा सर्वांगाने विकास झाला. अब्बासी काळात उत्तमोत्तम इमारती उभ्या राहिल्या. साहित्य, काव्य या क्षेत्रात मोलाची प्रगती अरबी लोकांनी घातली. कैरो, बगदाद येथे जागतिक दर्जाची विद्यापीठ निर्माण झाली होती. व्यापार तर होताच. पण आताच्या निम्म्या पाकिस्तान पासून उत्तर आफ्रिकेतील आजचे सर्व देश, लिबिया, इजिप्त, अल्जीरिया, ट्युनिशिया, मोरोक्को आणि स्पेन इतका प्रचंड प्रदेश अब्बासी खिलाफतीच्या राजवटीखाली होता. अब्बासी कालखंडात या प्रदेशाला स्थैर्य सुद्धा मिळालं. इस्लमी धर्मशास्त्रच सर्वात महत्वाचं असं सर्व साहित्य बहुतेक अब्बासी काळातच तयार झालेलं आहे. शरियाच्या चार परंपरा, प्रेषित महंमद पैगंबर यांचे सहीह बुखारी, सहीह मुस्लिम यांनी एकत्र केलेलं हादीस. प्रेषीतांचे चरित्र असं खूप काही.
'अल तबरी' यांनी जगाच्या निर्मितीचा इस्लामी सिद्धांत इथपासून सुरवात करून इसवी सन ९१५ मध्ये खिलाफत पुन्हा एकदा 'बगदाद' मध्ये आली इथपर्यंतचा इतिहास लिहिला आहे. तो हि अब्बासी काळातच. 'अल तबरी' यांनी इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान अशा आणि मानवी जीवनाशी संबंधित असा सर्व विषयावर भाष्य केलेलं आहे. इस्लाम च्या अगदी सुवातीच्या काळात ह्या साहित्याची निर्मिती झालेली असल्यामुळे याला प्रचंड किंमत आहे. आज 'अल तबरी' यांनी लिहिलेल्या इतिहास ग्रंथांची संख्या ४० आहे. ४० खंडात हे साहित्य विभागलेलं आहे. विल ड्युरांट किंवा अर्नोल्ड टॉयनबी यांनी एक हाती जगाचा इतिहास लिहिला त्या खंडांची संख्या प्रत्येकी ११ आणि १२ अशी आहे. पण नवव्या शतकात एकट्या माणसानी त्यावेळी उपलब्ध साधनांचा अभ्यास करून एका प्रदेशाचा इतिहास लिहिला, त्याची संख्या ४० खंड आहे!
हा इतिहासत वाचताना काही अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या आहेत.
तोपर्यंत ब्लॉगची लिंक
https://mukulranbhor.blogspot.com/2021/03/blog-post.html
Ⓒ Mukul Ranbhor
धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियेले । ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले ।। - रामदास स्वामी
Friday, 23 April 2021
।। 'अल-तबरी' आणि त्याचा इतिहास ।।
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट
प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....
-
बाबासाहेबांच्या विचारांचा भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने काय उपयोग आहे? एकविसाव्या शतकातही बाबासाहेबांचे विचार भारताला कसे मार्गदर्श...
-
पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : छत्रपती शिवाजी महाराज – जीवनरहस्य लेखक : नरहर कुरुंदकर प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन , प...
-
प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....
No comments:
Post a Comment