Monday, 14 November 2022

मोपला बंड-खिलाफत चळवळीचा एक भाग


मोपला हे धर्मांध मुस्लिम, गरीब आणि अज्ञानी, सुमारे दहा लाख लोकांचा समूह आहे. ते वर वर्णन केल्याप्रमाणे मलबार किनार्‍यावर स्थायिक झालेल्या अरबांचे वंशज आहेत, इसवी सन पूर्व आठव्या किंवा नवव्या शतकात आणि त्यांनी बहुतेक भारतीय (एतद्देशीय) स्त्रियांशी लग्न केली. ते मलबारमध्ये सुमारे वीस लाख हिंदूंसह राहत होते. गुन्हेगारीमुळे त्यांना अवास्तव कुप्रसिद्धी मिळाली होती. ब्रिटिश राजवटीत धार्मिक उन्मादाच्या किरकोळ स्वरूपाच्या पस्तीस पेक्षा कमी उद्रेकांसाठी ते जबाबदार होते. परंतु त्यांचा सर्वात भयानक उठाव ऑगस्ट, 1921 मध्ये झाला आणि अधिकृत अहवालात खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. :

"1921 च्या सुरुवातीच्या महिन्यांत, मशिदीमशिदीमधून, गावागावांमधुन उद्रेकाचं लोण पेटत गेलं. अली बंधूंची हिंसक भाषणे, असहकाच्या पात्रांमधून भाकीत केल्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभिक दृष्टिकोन आणि खिलाफत परिषदचे जुलैचे ठराव  - या सर्वांनी एकत्रितपणे आग भडकवण्याचं काम केलं. संपूर्ण जुलै आणि ऑगस्टमध्ये, असंख्य खिलाफत बैठका झाल्या, ज्यामध्ये कराची परिषदेच्या ठरावांना उत्स्फूर्तपणे मान्यता देण्यात आली. चाकू, तलवारी आणि भाले गुप्तपणे तयार केले गेले, उठावाच्या तयारीसाठी अनेक टोळ्या गोळा तयार झाल्या. आणि इस्लामचे राज्य येण्याची घोषणा करण्याची तयारी करण्यात आली. 20 ऑगस्ट रोजी, कालिकतच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी, सैन्य आणि पोलिसांच्या मदतीने, तिरुरंगडी येथे शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या काही नेत्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक तीव्र चकमक झाली. ही चकमक म्हणजे त्या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उठाव करण्याचा संकेत होता. त्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते अडवले गेले, टेलिग्राफ लाईन कापल्या गेल्या आणि अनेक ठिकाणी रेल्वेचे डबे उद्ध्वस्त करण्यात आले. हे लोण उत्तरेकडे पसरू नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी कालिकतला परतले आणि बंडखोरांनी हल्ले केलेल्या अनेक कार्यालये आणि पोलिस ठाण्यांवर सरकारी यंत्रणा तात्पुरती कमी करण्यात आली. काही युरोपीय लोकांना या हल्ल्यातून यशस्वीपणे निसटून जाता आलं नाही, त्यांची अमानवी क्रौर्याने हत्या करण्यात आली. सुदैवाने असे लोकं संख्येने कमी होते. प्रशासनाच्या हालचाली थांबल्या आहेत आणि प्रशासनाकडून आता कोणताही प्रतिकार होणार आंही हे कळताच मोपला बंडखोरांनी  स्वराज्य स्थापन झाल्याचे जाहीर केले. एका ‘अली मुसलियार’ या व्यक्तीला राजा घोषित करण्यात आले, खिलाफतचे झेंडे फडकवले गेले आणि एर्नाद आणि वल्लुवानद यांना खिलाफत राज्य घोषित करण्यात आले. मोपलांच्या क्रूरतेचा मुख्य फटका सरकारला नव्हे, तर बहुसंख्य लोकसंख्येचा भाग असलेल्या दुर्दैवी हिंदूंनी सहन केला... नरसंहार, बळजबरीने धर्मांतरे, मंदिरांची विटंबना, स्त्रियांवर अत्याचार, लुटालूट, जाळपोळ आणि विध्वंस. थोडक्यात, देशाच्या या भागातील कठीण आणि बिकट परिस्थिती ताब्यात आणून शांतता निर्माण करण्यासाठी जोपर्यंत बाहेरून सैन्य आलं नाही तोपर्यंत क्रूर आणि अमानवी  रानटीपणाला बळी पडले मुख्यतः हिंदू.”


"बंडखोरांच्या ताब्यात मोठा प्रदेश असल्यामुळे, मद्रास जिल्ह्यात उपलब्ध सैन्य परिस्थितीला तोंड देऊ शकले नाही. आणि परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यबळ पाठवावं लागलं.  आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, त्यांची चार बटालियन, एक पॅक बॅटरी, चिलखती गाड्यांची एक तुकडी आणि इतर आवश्यक सहायक सेवा पाठवण्यात आल्या. पण बंडखोरांनी टेकड्यांचा आश्रय  केल्यामुळे, मोठ्या संख्येने बंडखोर प्रशासनाच्या ताब्यात येण्यासाठीही वेळ लागला. 1921 च्या अखेरीस परिस्थिती वर नियंत्रण मिळवता आलं आणि त्यानंतर बंडाची तीव्रता कमी झाली. पंडिकड येथे एका रात्री झालेल्या हल्ल्यावरून या लढाईच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते. त्या प्रसंगी धर्मांधांच्या जमावाने पहाटेच्या वेळी गोरखा बटालियनवर हल्ला केला. त्या हल्ल्यात सुमारे 60 गोरखा सैनिक ठार झाले. जेव्हा अंतिमतः धर्मांधांच्या या जमावाचा पूर्ण पराभव झाला तेव्हा सुमारे अडीचशेहुन अधिक गोरखा मारले गेले होते. संपूर्ण मोहिमेदरम्यान, एकूण सरकारी अधिकाऱ्यांपैकी  43 लोक मारले गेले आणि 126 जखमी झाले; तर  3,000 हून अधिक मोपला बंडखोर मारले. मात्र बंडाचा अंत झाल्याची एक मोठी शोकांतिका झाली होती. 19 नोव्हेंबर 1921 रोजी सत्तर मोपला कैद्यांची तुकडी रेल्वेने जात होती, परंतु रक्षकांच्या दुर्लक्षामुळे त्यांना ज्या बंद डब्यात ठेवले होते त्यामध्ये वेंटिलेशनची व्यवस्था नव्हती त्यामुळे त्या सत्तर कैद्यांचा गुदमरून मृत्यू झाला.”


मुस्लिम नेत्यांनी मोपला शहिदांची संख्या 10,000 इतकी नोंदवली आहे आणि त्यांनी बंड दडपताना ब्रिटीश सैन्याने केलेल्या मशिदींची विटंबना आणि इतर हिंसक कृत्यांचा उल्लेख केला. पण मोपला बंडाचे मुख्य बळी ठरले विशेषत: हिंदू. मोठ्या संख्येने हिंदूंवरील भयंकर अत्याचार. त्यांच्या नोंदी  वर वर्णन केल्याप्रमाणे सरकारी डॉक्युमेंट्समध्ये तर आहेतच, त्यांच्याशिवाय स्वतंत्र पणे काही लोकांच्या साक्षींनी सुद्धा त्यांची पुष्टी केली आहे. या विषयावर गोळा केलेल्या अनेक दस्तऐवजांपैकी काही कागदपत्रांचा आढावा घेणे गरजेचे आहे. 


1. केरळ प्रांतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोषाध्यक्ष, कालिकत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव आणि एर्नाद खिलाफत कमिटीचे सचिव आणि के. व्ही. गोपाला मेनन यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन, मोपलांच्या खालील दुष्कृत्यांचा संदर्भ देते: "त्यांची इच्छाशक्ती आणि हिंदूंवर विनाकारण केलेला हल्ला, एर्नाड आणि वल्लुवनद, पोन्नानी आणि कालिकत तालुक्यांतील त्यांच्या घरांची सरसकट लूट. बंडाच्या सुरुवातीला काही ठिकाणी हिंदूंची जबरदस्तीने धर्मांतरं केली गेली. आणि बंडाच्या नंतरच्या टप्प्यात जे दुर्दैवाने आपापल्या घरी अडकले त्यांचं घासरसकट धर्मांतरं करण्यात आली. ते काफिर आहेत, किंवा पोलीस यंत्रणा ज्या वंशाची आहे त्या वंशाचे आहेत एवढ्या कारणासाठी सनी दुसरं काहीही कारण नसताना निष्पाप हिंदू पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांची अतिशय जाणीवपूर्वक निर्घृण हत्या केल्या गेल्या. हिंदू मंदिरांची विटंबना आणि जाळपोळ, हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार आणि त्याची परिणीती मोपलांद्वारे त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर आणि अंतिमतः त्यांच्याशी विवाह."


के. व्ही. गोपाला यांनी नोंदवलं आहे की, हे आणि यासारखे अत्याचार ज्यांच्यावर झाले अशा लोकांशी आम्ही बोलले, ज्यांना या प्रकारचे अत्याचार सहन करावे लागले त्यांच्याशी झालेल्या संवादातून हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले आहेत याबद्दल शंकेचं लवलेश उरलेला नाही. 


मलबारच्या एका स्त्रीने त्यावेळच्या भारताच्या गव्हर्नरच्या पत्नी लेडी रिडींगला लिहिलेल्या पत्रांत पुढील नोंद आहे. 


"हे शक्य आहे की तुम्हाला दुष्ट बंडखोरांनी केलेल्या भयंकर आणि अत्याचारांची पूर्णपणे माहिती नाही; ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या धर्म सोडण्यास नकार दिला अशा आमच्या जवळच्या लोकांचे आणि प्रियजनांचे अनेकदा अर्धमेले किंवा कधी मृतदेह विहिरीत किंवा तलावात टाकून दिले गेले. गरोदर स्त्रियांचे तुकडे तुकडे करून जंगलात रस्त्याच्या कडेला टाकून दिले. आयांच्या मृतदेहातून न जन्मलेल्या निष्पाप बाळांना आम्हाला बाहेर काढावं लागलं. आमच्या निष्पाप आणि असहाय्य मुलांना आमच्या हातातून हिसकावून घेऊन आमच्या डोळ्यांसमोर मारले गेले. आमचे पती आणि वडिलांचा अनन्वित छळ करून शेवटी त्यांना जिवंत जाळण्यात आलं; आमच्या असहाय्य बहिणींना बळजबरीने सर्वासमोर नेले गेले आणि कोण्याही सहृदय माणसाला लाज वाटेल अशी कृत्य केली. त्या अमानवी, नीच आणि क्रूर कृत्यांची आपण कल्पना ही करू शकणार नाही, पण ते आमच्या मुलींशी घडलं. निव्वळ रानटीपणामुळे आणि विनाशाच्या दुर्दम्य भावनेतून हजारो घरे आज जमीनदोस्त झालेली आहेत.; आपल्या जागेवर पूजेची विटंबना व नासधूस केली गेली. जिथे फुलांचे हार पडत असत तिथे कत्तल करूनगोमांस टाकून आमच्या देवदेवतांचा आणि प्रतिमांचा अपमान केला गेला. आज आठवणी फक्त याच शिल्लक आहेत की कसं आम्ही आमच्या मूळ गावांतून बाहेर फेकले गेलो, उपाशी आणि नग्न, जंगलात भटकत राहिलो."

अत्याचाराचं वर्णन करणाऱ्या एका दीर्ध पात्रातील हा केवळ एक उतारा आहे. 


कालिकत येथील परिषदेची कार्यवाही झामोरिन यांच्या अध्यक्षतेखाली झाली: "ठराव VI. बंडखोरांनी केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यात स्वारस्य असलेल्या पक्षांनी विविध स्तरांत केलेल्या प्रयत्नांबद्दल परिषदेला संताप आणि खेद वाटतो, ते गुन्हे असे की : 


(१) क्रूरपणे स्त्रियांचा अपमान करणे; (Brutally dishonouring women

(२) लोकांना जिवंत जाळणे;


(३) पुरुष, स्त्रिया आणि मुलांची सरसकट कत्तल;

(४) कुटुंबच्या कुटुंब पेटवून देणे;

(५) हजारोंच्या संख्येने लोकांना जबरदस्तीने धर्मांतरित करणे आणि ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला त्यांची हत्या करणे;

(६) अर्धमेले लोकांना विहिरीत फेकून देणे आणि जोपर्यंत शेवटी मृत्यूने त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत बळी पडलेल्यांना तासनतास तडफडवत ठेवणे. 

याशिवाय मंदिरांचा विध्वंस आणि जाळपोळ या गोष्टी आहेतच. 


4. कालिकतयेथे 7 सप्टेंबर 1921 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या, आणि दुसरा, 6 डिसेंबर 1921 रोजी, न्यू इंडियामध्ये या अत्याचारांचे वर्णन करणारे अहवाल प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये स्त्रियांवरील अत्यंत भयंकर अत्याचारांची तपशीलवार माहिती दिलेली आहे, ते अत्याचार पुन्हा शब्दांत मांडताना सुद्धा त्रास होत आहे, आणि स्त्री जातीचा भयंकर अपमान पुन्हा शब्दांतही होऊ नये यासाठी तो इथे देत नाही. 


शंकरन नायर असे काही संदर्भ देतात जिथे पुरुषांच्या कत्तल करण्यापूर्वी त्यांची जिवंतपणी कातडी सोलली गेली किंवा त्या पुरुषांना स्वतःच्या कबरी खोदायला लावल्या. 

काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला या कथांवर विश्वास ठेवला नाही, परंतु जेव्हा शेकडो हिंदू निर्वासितांनी कालिकतला पोचलेल्या क्रूर आणि धर्मांध क्रूरतेच्या भयंकर कथांना पुष्टी दिली, तेव्हा कोणत्याही किंमतीवर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या कल्पनेने आंधळे झालेल्या हिंदूंमध्ये एक दहशतीची लाट पसरली. 


गांधींनी स्वतः "ईश्वराला घाबरणारे शूर मोपला" असा मोपला बंडखोरांचा गौरव केला होता. आणि त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते "ते ज्याला धर्म मानतात आणि ज्याला ते धार्मिक मानतात त्यासाठी लढत होते". खिलाफतच्या नेत्यांनी मोपलांच्या धाडसी लढ्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पास केले यात आश्चर्य नाही. काँग्रेस आणि खिलाफतच्या स्थानिक सदस्यांनी मोपलांना शांत करण्यासाठी अशांत भागात प्रवेश करण्याची परवानगी मागितली आणि मिळविली, परंतु ते काही परिणाम करू शकत नाहीत हे मान्य करून ते परतले. जेव्हा सत्य यापुढे दाबले जाऊ शकले नाही आणि आपल्या सर्व नग्न लज्जास्पदतेसह बाहेर आले, तेव्हा गांधींनी विविध स्पष्टीकरणे, नकार आणि अधिकाऱ्यांची निंदा करून हिंदू मत जुळवण्याचा प्रयत्न केला, जे अहमदाबाद येथे काँग्रेसने पारित केलेल्या पुढील ठरावात शब्दरूप होते.

"काँग्रेस आपला ठाम विश्वास व्यक्त करते की मोपला त्रास असहकार किंवा खिलाफत चळवळीमुळे झाला नाही, विशेषत: उद्रेक होण्याच्या आधी सहा महिने जिल्हा प्रशासनाने  असहकार आणि खिलाफत प्रचारकांना जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात प्रवेश नाकारल्यामुळे. गडबड होण्याच्या सहा महिने आधी पण दोन चळवळींशी पूर्णपणे संबंध नसलेल्या कारणांमुळे आणि अहिंसेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला असता तर उद्रेक झाला नसता. तरीसुद्धा, ही काँग्रेस काही मोपलांनी केलेल्या कृत्यांचा निषेध करते. बळजबरीने धर्मांतर करण्याचा आणि जीवन आणि मालमत्तेचा नाश करण्याचा मार्ग, आणि मद्रास सरकारने मौलाना याकुब हसन आणि इतर गैर-सहकारी यांची मदत स्वीकारून मलबारमधील अशांतता लांबणीवर टाकली असती असे मत आहे. महात्मा गांधींनी मलबारला जावे, आणि पुढे असे मत आहे की श्वासोच्छवासाच्या घटनेने मोपला कैद्यांना दिलेली वागणूक ही अमानुष कृती होती. आधुनिक काळात न ऐकलेले आणि स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या सरकारच्या लायकीचे नाही."


“काँग्रेसला स्पष्टपणे असं वाटतं की मोपला बंड हे असहकार आंदोलन किंवा खिलाफत कमिटीमुळे झालं नाही. प्रत्यक्ष बंड होण्याच्या आधी सहा महिने जिल्हा प्रशासनाने असहकार चळवळीचे प्रचारक किंवा खिलाफत कमिटीच्या प्रचारकांना त्या भागांत जाण्याची पूर्ण मनाई केली होती. जर त्यांनी परवानगी दिली असती तर अहिंसेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचला असता तर उद्रेक झाला नसता. तरीसुद्धा ही काँग्रेस मोपला बंडखोरांनी केलेल्या कृत्यांचा, सक्तीच्या धर्मांतराचा आणि जीवन आणि संपत्तीचा नाश या कृत्यांचा यांचा निषेध करते. तरी सुद्धा आम्हाला असे वाटते की मद्रास सरकारने मौलाना याकूब हसन याना किंवा असहकार चळवळीच्या काही सहकाऱ्यांना मलबारला जाण्याची परवानगी दिली असती तर मलबार येथे झालेली कृत्य टाळता आली असती. महात्मा गांधींना मलबार जाण्याची परवानगी मिळाली असती तरी हा उद्रेक टाळता आला असता. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या कैद्यांची गोष्ट कानावर आली, स्वतःला सुसंस्कृत म्हणावणाऱ्या सरकारला या कृत्यांची लाज वाटली पाहिजे.”

हा ठराव कोणत्याही अर्थाने विशिष्ट समुदायाचे नव्हे तर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस सारख्या महान राजकीय संघटनेने केलेला केविलवाणा प्रयत्न होता.  हजारो असहाय हिंदूंवर धर्मांध मुस्लिमांच्या टोळीने केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करून दाखवण्याचा हा  जाणीवपूर्वक प्रयत्न होता. हा प्रयत्न आणि साधारणपणे भारतीयांवर सरकारकडून, प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाचं सरकार जे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करते हे दोन्ही सारखंच. कोणत्याही निःपक्षपाती टीकाकाराने या दोन्ही गोष्टींचा तीव्र निषेध केला पाहिजे. कराची परिषदेच्या ठरावांना मान्यता देणार्‍या खिलाफतच्या बैठका आयोजित करणे, खिलाफतची घोषणा, खिलाफत राज्ये आणि खिलाफतचे ध्वज फडकवणे यासारख्या घटना स्पष्टपणे समोर असताना, मोपला बंड असहकार किंवा खिलाफत चळवळीमुळे झाली नाही, असे मानणे हास्यास्पद आहे..(१) आणि काँग्रेसच्या निवेदनामधले शब्द काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. 

श्रीमती बेझंट यांनी मोपला बंडाचा असहकार आणि खिलाफत चळवळींशी निश्चितपणे संबंध जोडला आहे आणि इतर अनेक मान्यवरांनीही असेच मत व्यक्त केले आहे. मुस्लिम नेत्यांनी मात्र प्रत्यक्षपणे या मताचे समर्थन केले. अशाप्रकारे ३० डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात हजरत मोहनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोपलांच्या अत्याचाराविषयी पुढील निरीक्षणे नोंदवली. 

"मोपला त्यांच्या कृतीचे समर्थन करतात कारण अशा गंभीर वळणावर जेव्हा ते इंग्रजांविरुद्ध युद्धात गुंतलेले असतात तेव्हा त्यांचे शेजारी (हिंदू) त्यांना (इंग्रजांना) केवळ मदत करत नाहीत किंवा तटस्थता पाळत नाहीत तर इंग्रजांना सर्व प्रकारे मदत करतात. निःसंशयपणे, ते असे म्हणू शकतात की, ते त्यांच्या धर्माच्या फायद्यासाठी बचावात्मक युद्ध लढत असताना आणि त्यांची घरे, मालमत्ता आणि सर्वस्व सोडून डोंगर आणि जंगलात आश्रय घेत असताना, त्यांच्या कमांडरिंगला लुटणे असे वर्णन करणे अयोग्य आहे. इंग्रज किंवा त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या सैन्यासाठी पैसे, तरतुदी आणि इतर आवश्यक गोष्टी."

मोपला कारवाईला इंग्रजांविरुद्धचे धार्मिक युद्ध असे वर्णन करताना, हजरत मोहनी निश्चितपणे याला एक राजकीय चळवळ मानतात ज्याला खिलाफत आंदोलनापासून वेगळे करता येणार नाही. मोपलांच्या अत्याचाराचे त्यांनी दिलेले समर्थन केवळ टोकाचेच नाही तर वस्तुस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये सैन्य या भागांत भागात येण्यापूर्वी 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी एर्नाड, वल्लुवनाड आणि पोनानी तालुक्यांतील हिंदू घरांची जवळजवळ घाऊक लूटमार करण्यात आली होती, या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करतात. 


मोपला बंडखोरांबद्दलच्या आपल्या या भूमिकांमुळे काँग्रेसने ब्रिटिशांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला. पंजाब मध्ये ब्रिटिश अत्याचार करतात अशी ओरड आता काँग्रेसचे लोकं करू शकणार नाही. आणि अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोपलांना ‘ईश्वराला घाबरणारे’ असं म्हणून कौतूक करणारे गांधीजींची शब्द आणि जनरल डायरच्या कृत्यांना ओडवायरची ट्रेलिग्राफद्वारा मिळालेली मान्यता सारखीच मानली पाहिजे. 

जेव्हा मोपलांनी केलेल्या रानटी आक्रोशाच्या सर्व दु:खद कहाण्या देशभर गाजल्या होत्या त्यासारम्यान 1923 मध्ये कोकानाडा येथे झालेल्या खिलाफत परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष होते महान राष्ट्रीय नेते, शौकत अली. अध्यक्षपदावरून त्यांनी अनाथ मोपला अनाथ आणि त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तरतूदी करावी असा ठराव मांडला. "हजारो मोपला शहीद झाले हे खरं आहे परंतु त्यांनी धार्मिक कार्यासाठी हा लढा केला म्हणून त्यांनी मनोभावे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती." मोपलांच्या हातून काही हिंदूंना त्रास सहन करावा लागला हे मान्य करताना ते म्हणाले की, संपूर्ण प्रकरण त्यांच्यासाठी बंद पुस्तक आहे. पण त्यांना शूर मोपलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी जाहीर केले की ते आणि त्यांचा भाऊ मुहम्मद अली प्रत्येकी एका मोपला अनाथाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतील.


सरकारच्या हातून मोपलांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचे कथन करण्यासाठी सदस्यानंतर सदस्य उठले, परंतु त्यांनी केलेल्या अमानुष रानटीपणाचा कोणताही संदर्भ नव्हता. खिलाफत परिषदेने शौकात अली यांनी मांडलेला ठराव स्वीकारला आणि मोपला अनाथांच्या देखभालीसाठी निधी गोळा करण्यात आला. पण मोपलांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंच्या मदतीसाठी काँग्रेस किंवा हिंदू नेत्यांनी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. 



(हा भाग ‘भारतीय विद्या भवन’च्या ‘History and culture of Indian People’ या ११ व्या खंडातील आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड या खंडात कव्हर झालेला आहे, आणि हा खंड एकट्या आर. सी मुजुमदार यांनी लिहिलेला आहे. मूळच्या इंग्लिश भागाचं मी भाषांतर केलं आहे.) 


(१) "अबुल कलाम आझाद आणि हकीम अजमल खान यांच्यासह खिलाफत आंदोलकांनी त्या भागात हिंसक भाषणे दिल्यानंतर ऑगस्टमध्ये मोपला बंड झाले. एप्रिलमध्ये इरोड येथे मजलिस-उल-उलेमा कॉन्फरन्स सुरू झाल्यापासून, त्या भागातल्या भावना दुखावल्या गेल्या. खिलाफतच्या संदर्भात मोपला सतत वाढत होते, तर अहिंसक असहकार चळवळ अधिकाधिक मागे पडत चालली होती."


ब्रिटिश सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या अधिकृत अहवालात दिलेला हा वृत्तांत आहे.


2 comments:

  1. Ranjit Chandawale14 November 2022 at 21:08

    @Mukulji - सुंदर लेख.
    दंगलीनंतर ज्या हिंदु नेत्यांनी मलबार येथे हिंदुंचे पुनर्वसन आणि शुद्धी संस्कार केले त्यामध्ये स्वामी श्रद्धानंद आणि पंडित ऋषिराम प्रमुख होते, या नेत्यांच्या कार्याबद्दल श्री मुजुमदार यांनी काही लेखन केले आहे काय ?

    ReplyDelete
  2. अभ्यासपूर्ण लेखन

    ReplyDelete

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....