Saturday, 27 September 2014

'सेक्युलॅरिझम' म्हणजे काय रे भाऊ?


रोज भारतात या 'सेक्युलॅरिझम' वर चर्चा होतेच. प्रत्येक विद्यापीठामध्ये या विषयावर अभ्यास होतोच. प्रत्येकजण स्वतः 'सेक्युलर' म्हणवतो, दुसरा 'सेक्युलर' नाही म्हणतो. तर मुळात 'सेक्युलॅरिझम' आहे काय? हे जरा समजून घेऊ.

भारत हा बहुधर्मीय देश आहे. भारतात अनेक धर्म (गुण्यागोविंदाने?) नांदत आहेत. भारतात प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि पुढेही अनेक धर्म असणारच आहेत. दोन धर्मांतील भांडणे हा प्रश्न काय गृहयुद्धाने सोडवण्याची भारताची मानसिकता नाही, ती कधीच नव्हती. अनेक धर्मांचे सहअस्तित्व हेच भारताचे वैभव आहे. 'सेक्युलॅरिझम' हे धर्माधर्मातील कलह दूर करण्यावरचे उत्तर नाही. 'सेक्युलॅरिझम' हि भारतातली सर्वात गैरसमजुतीती अडकलेली संकल्पना आहे. भारतातले हिंदू मुस्लीम संबंध किंवा हिंदू मुस्लीम प्रश्न हा 'सर्वधर्मसमभावा'ने सोडवला जाऊ शकत नाही. तो 'सेक्युलॅरिझम'ने सोडवला जाऊ शकतो. हा फरक मुद्दाम दाखवायचा प्रयत्न आहे. 'सेक्युलॅरिझम' आणि त्याचे मराठी शब्द (उदा. सर्वधर्मसमभाव, धर्मसहिष्णुता, निधर्मी) यांच्यात फरक आहे. भारतात एकापेक्षा जास्त धर्म आहेत म्हणून भारतात 'सेक्युलॅरिझम'ची आवश्यकता आहे हा युक्तिवाद चुकीचा आहे. भारत समजा फक्त हिंदू धर्मीय प्रदेश असता तरीही आज जितकी 'सेक्युलॅरिझम'ची गरज आहे तितकीच त्यावेळी पडली असती. ऐहिक जग आणि पारलौकिक जग यांच्यात फरक करणारी हि 'सेक्युलॅरिझम' संकल्पना आहे. 'सेक्युलॅरिझम' हे दोन धर्मातील कलहावरचे उत्तर नाही.

भूतकाळाच्या अंधविश्वासातून बाहेर आणून आधुनिक विज्ञानाच्या वाटेवर आणून सोडणारी 'सेक्युलॅरिझम' हि कल्पना आहे.

कॉंग्रेसच्या किंवा स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या 'सेक्युलॅरिझम' बद्दल आपण बोलूच नकोयत. त्यांना हिंदूंच्या विरोधात 'सेक्युलॅरिझम'ला उधाण येतं.  पण हे पुरोगामीही (स्वयंघोषित) चुकीचे आहेत. आणि त्यांच्या खोट्या 'सेक्युलॅरिझम' च्या विरोधात बोलणारे उजवेही चुकीचे आहेत. 

शीर्षक अस लिहिण्यामागचं कारण secularism चा राज्यघटनेला जो अभिप्रेत अर्थ आहे तो इहवाद असाच आहे. राज्यघटनेच्या कलम २५ मध्ये जो धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे त्यात (२) (अ) : धर्माशी संबंधित असणा-या (associated with religious practices) कोणत्याही आर्थिक, राजकीय व अन्य इहालौकिक (Secular) बाबी नियंत्रित वं प्रतिबंधित करणारे कायदे करण्याचा संसदेला किंवा शासन संस्थेला अधिकार असेल अस आजे. त्यामुळे हे तर उघड आहे कि शासनव्यवस्थेनी धर्म हि संस्था फक्त परलोकाचा विचार करणारी आहे अस गृहीत धरलं आहे. आणि त्यानुसार आर्थिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सर्व बाबतीतले कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. आणि Secularism या शब्दाचाही एक अर्थ असा होतो कि 'नैतिकतेचा पाया या जगात आहे.' पण राज्यशास्त्रा मध्ये जो Secularism येतो त्याचा एक अर्थ होतो तो म्हणजे 'राज्यव्यवस्था लोकांमध्ये धर्मावरून भेद करणार नाही' किंवा 'राज्य व्यवस्थेला कोणताही धर्म नसतो.' पण याचा अर्थ शासन व्यवस्था सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य व दुसर्याचे मुलभूत हक्क यांच्या आधीन राहून धर्म मुक्तपणे आचरण्याचा अधिकार लोकांना देते. उदा. शासन व्यवस्था लोकांच्या आरोग्याबाबत उत्तरदायी आहे म्हणजे काय उदय सरकारला वाटल कि उपास करणं हे आरोग्याला हानिकारक आहे तर सरकार उपसाविरुद्ध कायदा करून उपास नियमबाह्य ठरवू शकतो. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमुळे सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याचा प्रसंग आलं तर सरकार मिरवणुकीवर बंदि आणू शकते. आणि असे कायदे किंवा नियम सरकारनी यापूर्वी सुद्धा काढलेले आहे. याचा अर्थ असा होतो कि धर्म स्वातंत्र्य आपल्याला फक्त पारलौकिक बाबिंपुरत आहे. जे काही धर्माच आचरण करायचं असेल ते फक्त मनात. देश सेक्युलर या तत्वावर उभं करायचा आहे याचा अर्थ सर्व धर्म पाळण्याच स्वतंत्र्य आहे पण मनात. 

इहलोक आणि पारलोक हे एका पुसट अशा रेशेनी वेगळे काढलेले आहेत. जोपर्यंत एखादी गोष्ट मनात आहे तोपर्यंत ती पारलोकात, ती मनातून शब्दाद्वारे व्यक्त झाली कि ती इहलोकात. याचा अर्थ दरवर्षी गणपती जो आपण बसवतो तो तो मनात बसवायचा आणि १० दिवसांनी मनातल्या नदीत विसर्जन करायचा. मनातच हज यात्रेला जाऊन यायचा. बकरी ईदला बकरी जी कापायची ती मनातच कापायची, ती प्रत्यक्षात कापली तर तो इहलोक झाला. किंवा नमाज मनातच पढायची तो सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन म्हंटली म्हणजे इहलोक झाला. मग धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय?? राजाला किंवा आता शासनसंस्थेला कोणताही धर्म नसतो याचा अर्थ फक्त पारलौकिक धर्म नसतो असा याचा अर्थ होत नाही. चाणक्यांनी जी राजधर्माची सूत्र सांगितली आहेत त्यामध्ये तो म्हणतो एकादशी करणं हा राजाचा धर्म नव्हे, कुंभमेळ्यात स्नान करणं हा राजाचा धर्म नव्हे. कोट्यावधी लोकांच्या एकादश्या सुरळीत झाल्या पाहीजेत त्यासाठी काम करणं हाच राजाचा धर्म असतो. मंदिराचा पुजारी नेमणं हि इहलौकिक बाब आहे त्यामुळे त्याबाबतीत शासन कायदा करू शकते. आरोग्याला हानी कारक आहे किंवा सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला जरा धोका निर्माण झाला आहे अस सांगून जर नमाज किंवा हज यात्रेवर सरकारनी बंदि घातली तर ते मुसलमानांना चालेल का? नाहीच चालणार!

भारतामध्ये पंचाईत अशी झाली आहे कि शासन व्यवस्था किंवा पोलीस सक्षम नसल्याने आपल्यावर बंधनं येतात.

एक वेगळा उदाहरण देतो म्हणजे समजेल. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी राजमाचीवर रात्री जायला बंदी घातली, कारण चोरांचा सुळसुळाट. मला रात्री जातं येत नाही हि माझ्या स्वातंत्र्यावर आलेली गदा आहे कारण पोलीस चोरांचा बंदोबस्त करू शकत नाहीत. चोरांचा बंदोबस्त करणं हा उपाय आहे माझी राजमाची रात्री बंद करणं हा उपाय नव्हे. धर्माच्या नवे चालणारी प्रत्येक कामे सुरळीत चालली पाहिजेत हि जबाबदारी सरकारची आहे, ती ते व्यवस्थित पर पडू शकत नाहीत म्हणून ते त्या कामांवर बंदी घालणार. हा मार्ग बरोबर नव्हे. हे धर्म स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे. माझ्यामते मूळ घोळ जो सुरु होतो तो या मुद्ध्या पासून सुरु होतो कि धर्म ही संस्था  फक्त परलोकाचा विचार करणारी संस्था आहे. अंतिम ध्येय जरी ते असलं तरी त्यासाठीची सर्व कर्म इह्लोकताच येतात. गणपतीची स्थापना, दहीहंडी, नवरात्र उत्सव किंवा हज यात्रा किंवा रविवारी चर्च मध्ये जाऊन केलेली प्रार्थना या सर्व गोष्टी धर्माच्या आहेत पण इहलोकात येतात. Secularism दिशेनी जर प्रवास करायचा असेल तर धर्माच्या सर्व गोष्टी मनात बंदकरून ठेवाव्या लागतील, आणि हे अशक्य आहे का? 

ज्या निधर्मी राज्य व्यवस्थेचा निश्चय नेहरूंनी केला होता आणि त्यांचे वारसदार तो वारसा चालवतात तो निश्चयच किती पोकळ, ढोंगी आहे याचा विचार सर्वांनी करावा. धर्म सार्वजनिक जीवनात आणायचा नाही हे जर मूळ तत्व देशानी स्वीकारलं तर धर्माच्या सर्व गोष्टी सार्वजनिक जीवनातून काढून टाकाव्या लागतील. सर्वात बेसिक म्हणजे 'सत्यमेव जयते' सारखी किमान २५० केंद्रीय संस्थांची बोधवाक्य हिंदू धर्माच्या 'उपनिषदा'तून घेतलेली आहेत. धर्म जर सार्वजनिक जीवनात आणायचा नाही असा ठरवलं तर हि सर्व बोधवाक्य काढून टाकावी लागतील.तरच ते खा-या अर्थानी सेक्युलर राज्य असेल. ज्या धर्माबद्दल आपण बोलतो आहोत तो आजच्या काळाला किती लागू होतो असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण सेक्युलर राज्य आणायचा असेल तर हा विचार कराव लागेल. पण मुळात हा मुद्धाच चुकीचा आहे कि धर्म हा फक्त परलोकाचा विचार करतो. मानवी जिवनाच जे आदर्श वर्णन केलं जातं ते म्हणजे हिंदू धर्मानी सांगितलेली आश्रमव्यवस्था, चार वर्ण, भारतातल्या प्रत्येक घरात असणार देवघर, सर्व मंदिरे, हज यात्रा मुसलमान आहेत तोपर्यंत सुरु राहणारच आहे. त्यामुळे आजच्या कळला किती लागू हा मुद्धाच येत नाही. जर सेक्युलर चा इहवाद किंवा जडवाद असा अर्थ होत असेल तो तो व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित असावा. ते तत्व देशाच्या जडणघडणीला घटक आहे. जर सेक्युलर चा इहवाद किंवा जडवाद असा अर्थ होत असेल तर शासन व्यवस्था सार्वभौम होते. लोक नाही.लोकांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर जर सरकारची मर्यादा असेल तर लोक सार्वभौम असतील?? 


Wednesday, 9 July 2014

सुखं म्हणजे नक्की काय असत???

अजून एक खास पान
९ जुलै २०१४
बुधवार

५-६ दिवसापूर्वीच्या पेपर मध्ये 'अवतरले शिवकालीन वैभवाचे सक्षीदार : भाटघर कोरडे पडल्याने ऐतिहासिक वास्तू पाण्याबाहेर' अशी बातमी आली होती. आणि हे वैभव जवळ जवळ ११० वर्षांनी दिसतंय. कारण इतका कमी पाऊस याच वर्षी कमी झालाय, म्हणून हे दिसू शकतय. म्हणून मी ते पाहून यायचं ठरवलं. भोर म्हणजे पुण्यापासून ५० किमी पण नाही!!पुन्हा इतका कमी पाऊस कधीच पडू नये. आणि परत कधी असं बघायला मिळू नये.

मी ती पेपर मधली बातमी कापून घेतली, आणि तेवढ्याच माहितीवर जायचं ठरवलं. मी आणि माझे दोन मित्र. सकाळी सकाळी भोर ला पोचलो. तिथे पोचल्यावर कळल कि भोर परिसरातच अनेक मंदिर उघडी पडली आहेत. पण भोर पासून १७ किमी अंतरावर वेळवंडी नवाच गाव आहे तिथे जायचं आम्ही ठरवलं. त्याही गावात दिवसातून दोन वेळच ST जाते त्या दोनीही आमच्या miss झाल्या. ब-याच वेळच्या प्रतिक्षेनंतर आम्ही त्या गावात पोचलो. २-२.५ किमी चालत आम्ही वेळवंडी नदीच्या पत्रात पोचलो. आणि वैभव म्हणजे काय असत ते समोर अवतरून आलं. आमच्यावर ढगांची सावली पडली होती, पण पहिल्या पावसात हिरवागार झालेला राजगड समोर दिसत होता. त्यावर माध्यान्हीच ऊन पडलं होत. मध्ये जेमतेम ५-६ फुट पत्र उरलेली वेळवंडी नदी ( Actually हे वैभवाच प्रतिक नाही ). आणि मागच्या बाजूला रायरेश्वराच पठार आणि त्याला लागून रोहिडा. रायरेश्वराच्या पठारावर भरपूर धुकं आणि रोहीडा मात्र कोरडाच. आषाढ सुरु असताना देखील श्रावणाचा फील याला वैभव म्हणाव का आरिष्ट याच उत्तर मला मिळालेला नाही.

तसाच पुढे चालत गेलो. नदीच्या पाण्याला लागून काही अंतरावर ते मंदिर होत. तिकडे चालायला सुरवात केली. हिंदवी स्वराज्याची पहिली सक्षिदार हि माती आहे. त्या मऊ मातीवरून चालण्यात काय मजा आहे ती पुण्यात बसून कळणार नाही. किती वेळा या मातिने राजाचं दर्शन घेतलं असेल!! कित्येकदा या मातीत खलबत शिजली असतील!! आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो त्या मंदिरात बसून राजांनी न्यायदान केल्याचे उल्लेख आहेत. आणि ते मंदिर आज ११० वर्षांनी उघड पडलंय पाऊस न पडल्यामुळे..

जेमतेम ५ फुट बाय ५ फुट एवढाच त्या मंदिरच गाभा होता.त्याच्यासमोर चांगला २ फुट उंच नंदी होता. आणि अनेक शिळा, त्यावर लढाईची दृश्य कोरलेली, त्याच्या खाली काही स्त्रिया शिवलिंगाची पूजा करत आहेत. पण हे सर्व गाळा मध्ये रुतलेलं. या गाळा खाली काय काय दडलेलं असू शकत? अस्य कित्येक शिळा या गाळात असू शकतात!!

मला एकदा खरच सांगा सुख म्हणजे नक्की काय असत? आणि काय पुण्य असलं कि ते मिळत?
हे वैभव पाहण्यातल सुख. समोर राजगड, मागे रायरेश्वर, रोहीडा, मध्ये हे मंदिर, आणि मऊ मातीतून चालताना नदीच्या पत्रातून वाहणारा गार वारा!!!

Wednesday, 4 June 2014

राजमाची...

माझ्या डायरी मधली काही खास पानं...

१९ सप्टेंबर २०१३
गुरूवार

काल होती अनंत चतुर्दशी.. १० दिवस गणपती भूतलावर येऊन गेले. ती विसर्जन मिरवणूक दर वर्षी बघायला जायच हे बहूतेक ठरूनच गेलेल असत. सकाळी लवकरात लवकर जाऊन शगुन किंवा कुंटे चौकात जाऊन वाट पहात ऊभ रहायच. पण या वेळेला माझा काही वेगळा प्लँन ठरलेला. पण मध्ये असा काही झालं त्यामुळे तो प्लँन फिसकटला 

नुकतच मी गो.नी. दांडेकरांच 'स्मरणगाथा' वाचून संपवलं. ज्या धैर्याने १३ व्या वर्षी घरातून पळून गेले. आणि जाणीवपूर्वक स्वतः च आयुष्य घडवत गेले, ते स्मरणात होतं. सेम विवेकानंद, रामदास.. मला पण त्याच प्रमाणे देश पहायची ईच्छा झाली होती. आणि आमच्या धर्माधिकारी सरांचं 'भिर भिर भ्रमंती' ते पण आठवत होत. त्यामुळे मी एकट्यानी राजमाची ला जायचं ठरवलेलं. उपचार म्हणूनच जे नक्की येणार नाहीत अश्यानाच विचारलं. आणि शेवटी 'एकला चलो रे' आई आणि बाबांना विचारालाही नाही आणि सांगितलहि नाही. तसाच निघालो.. 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गर्दीच व्यवस्थापन करायला चालोय असा सांगून घरातून सटकलो. धावत पळत जाऊन रिक्षा पकडली. आणि मला एकदम आठवलं आज सगळे रस्ते बंद.. माझा वेग एकदम कमी झाला. आणि मी त्या रिक्षावाल्याला विचारलं'
"आज शिवाजीनगर ला जायचा असेल तर कस जायचं?" तो म्हंटला
"आज जायचाच नाही!" माझा डोकच फिरलं, 
"अरे पण एखाद्याला इमर्जन्सी असेल तर?"
"तर काळ जायचं होता ना! किंवा आता उद्या दुपारनंतर.." तरी मला आठवल कि शिवाजीनगर ला जाणारे रस्ते बंद असतील, पुणे स्टेशन ला जाणारे तर नसतील ना. मी त्या रिक्षा मधून स्वारगेट पर्यंत आलो.. टेन्शन नी मी डोक्याला हात लावलेला. शेजारी बसलेले काका सांगत होते, कि ९३ च्या हिंदू मुस्लीम दंगली सुरु असताना त्यांची आसपास राहणारे मुसलमान लोक सुद्धा गणपती ची पूजा करत असत. ऐन दंगली सुरु असताना मोहोल्यांमध्ये सुद्धा रोज पुजाअर्चा व्यवस्थित होत असे. त्यावर तो रिक्षावल म्हणतो, 
"सगळे धर्म सारखेच असतात काका! आपल्या मानण्य न मानण्यावर असत सगळ!!"
त्याच्या या ऊद्गारांनी विवेकानंद, गांधीजींसकट सगळे भरून पावले असतील. माझ टेन्शन कमी झालं. आणि मी पुणे स्टेशन ला पोचलो. टीकिट काढून लोकल मध्ये जाऊन बसलो. मी असा एकटाच treaking ला चाललोय हे मी तृप्ती शिवाय कोणालाही सांगितला नव्हत. आणि शगुन चौकात मी अजून कसा पोचलो नाही म्हणून विष्णू चा सतत फोन येत होता आणि मी तो येऊ देत होतो. कासारवाडी सोडल्यावर मी त्याचा फोन उचलला आणि त्याला खर काय ते सांगितलं. तो अगदी थंडपणे ठीके म्हंटला. मला ते अपेक्षित नव्हत. मला वाटल तो चिडेल, शिव्या देईल, रागवेल.. पण त्यांनी तस काहीच केल नाही त्यामुळे मला मी काही thirrling करतोय अस मला वाटलच नाही. मग मात्र माझा पुढचा प्रवास बोर झाला.

लोणावळ्याला उतरलो, स्टेशन वरचा पैदल पूर पार करून 'रस्त्याला' लागलो, लोणावळा शहर मागे टाकून, तुंगार्ली गाव मागे टाकून, जुना मुंबई पुणे रस्ता पर करून टाटाच्या धरणापर्यंत पोचलो. मस्त घाम आलेला. धरणात तोंड धुतलं, आणि पुढे चालू लागलो. उजव्या हाताला एक छोटेखानी गाव लागता. गाव कसलं ते वस्ती छोटीशी. "हा कोण येडा एकटाच कुठे चाललय?" अश्या नजरेनी माझ्याकडे पाहत होते सगळे जण. आणि मी खरच वेडा आहे हे सांगायला माझी जीभ शिवशिवत होती..ते गाव सोडून एक छोटासा चढ चढून  एका टोकावर आलो. आणि बघतो तर काय? काहीच दिसत नव्हत. मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा त्या स्पॉट वरून धक्च्य बहिरी पर्यान्तचा जवळ जवळ ३०-३५ किमी चा परिसर दिसत होता. आणि आज ३० फुटावरच दिसत नव्हत. खरच निसर्गाच्या ठिकाणी दरवेळेला नवनवीन अनुभव येत असतात. मी जाताना बरोबर कॅमेरा घेतला होता. पण मला वाटायला लागलं कि उगाच आणला.. 

त्या गावापासून राजमाची सुमारे १८ किमी आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता चालत राहिलो! चालत राहिलो!! जवळ जवळ तास दीड तास चालल्यानंतर थोड धुक कमी झाल्यासारखा वाटल. पटकन कॅमेरा काढला भराभर क्लिक मारले. उगाच खाली बसून, झाडातून, वेगळ्या angle नी फोटो येतात का! तेवढ्यात मला काही गाड्यांचे आवाज ऐकले. पटकन कॅमेरा सॅक मध्ये टाकला आणि चालायला लागलो. कुठ कॅमेरावर नजर गेली, कुठ बघायला मागितला, आणि घेऊन पळाला म्हणजे?? तेवढ्यात त्या ३-४ गाड्या जवळ आल्या. माझ्या जवळ त्यांनी गाडी थांबवली. आणि मला विचारलं,
"एकटाच चाललायस?"
"हो"
"भीती नाही वाटत?"
"भीती काश्याची वाटायची तेव्हा?"
"कोणी लुटला तर?"
"मी अंगावरचे कपडे, पाण्याची एक बाटली, आणि केळी याच्या पलीकडे काही आणलेल नाही. काय चोरणार आणि कोण चोरणार!"
मग ते काहीच बोलले नाहीत, एकमेकांकडे पाहून हसले गाड्यांना किका मारल्या आणि निघून गेले. पुन्हा मी एकटाच. चालताना मी खरच विचार करू लागलो कि खरच एखाद्यानी लुटलं तर कॅमेरा, पैसे तर कसा करायचं.. मोबाईल, पाकिटातले विष्णू चे पैसे.. आता मला टेन्शन आलं. 'श्रीराम जय राम जय जय राम' चा जप सुरु केला. काही वेळ म्हणलो, चालण्याच्या नादात ते म्हणणं विसरून गेलो. पुन्हा केव्हा तरी आठवलं, मग परत जप सुरु केल, आणि परत विसरून गेलो. राजमाची ला चाललो असल्यामुळे मला 'माचीवरचा बुधा' आठवत होतं. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या समोर बुधा अवतरला. अंगावर बंडी, डोक्याला फडक गुंडाळलेलं, कमरेला पंचा, पायात भरपूर झिजलेल्या चपला, हातात काठी असलेला म्हातारा माणूस त्याची गुरं चरायला उधेवाडी पासून इतक्या लांब घेऊन आला होता. त्याच्याबरोबर त्याचा एक कुत्रा, तो माझ्याजवळ आला, मला चारीही बाजूनी न्याहाळल, माझा वास घेतला आणि पुन्हा रानात निघून गेला.. तो म्हातारा खाली बसला, कमरेच्या पुडीतून तंबाखू काढली, हातावर चोळली. आणि ती गोळी जीभेआड लपवून ठेवली. आणि मग रानातून गोळा करून आणलेले काटे एकत्र बांधून खेकडे पकडण्यासाठी तो आकडा तयार करायला लागला.. मी त्याचे फोटो काढले ते पाहून त्याचा झुडपाआड लपलेला त्याचा कदाचित नातू असावा तो बाहेर आला, मग मी त्याचे चार-सहा फोटो काढले त्याला दाखवले आणि त्याचा चेहेर्यावरचा आनंद न्याहाळत पुढे निघालो. 

टिव्ही वर एका मिनरल वाॅटरची जाहीरात करतात कि आमच पाणी direct हिमालयातून आणलेलं असत. त्यामुळे त्याच्यासारखा गोड आणि शुद्ध पाणी जगात मिळणार नाही, वगैरे वगैरे वगैरे!! मी ते direct हिमालयातलं पाणी काही पिलेला नाही पण माझा त्या मिनरल वाॅटरला चॅलेंज ला आहे कि काळ्या खडकातून झिरपणा-या पाण्यापेक्षा गोड आणि शुद्द पाणी मला हिमालयातून आणून दाखवावं. मनसोक्तपणे मी ते गोड पाणी प्यालो. गो.नी. दांडेकरांना संपूर्ण महाराष्ट्रात फक्त राजमाचीला जाताना भुताचा अनुभव आला होता. त्या अमानवीय शक्तीला दूर ठेवण्यासाठी मी रामरक्षा म्हणायला सुरु केली. मग अथर्वशीर्ष, असा पर राजमाची पर्यंत चालू ठेवला.. भुताचा अनुभव येवो न येवो  माझ्या खात्यात पुण्य नक्की जमा होत असणार.!!
एका वळणावर डोंगरावरून कोसळणा-या धबधब्यानी माझी वाट आडवली. ते कोसळणार पाणी रस्त्यावरून वाहत होत, आणि पाणी पर करायला मध्ये दगडही दिसत नव्हते. काय कराव सुचेना! इतक्यात एक फोरव्हीलर त्या पाण्यातून गेली, सगळ पाणी डहुळल गेलं. जो तळ दिसत होता तोही दिसेनासा झाला. मग मी बूट काढले, सॉक्स काढले हातातल्या काठीला बांधले आणि ती काठी पैलतीरावर भिरकावली. आणि चालत चालत त्या तीराला पोचलो. पुन्हा पायात बूट अडकवले, हातात काठी घेऊन चालायला सुरुवात केली. वाटेत एक मारुतीचे मंदिर लागते तिथे त्या मूर्तीसमोर माथा टेकला आणि पुढे चालू लगलो.

मिनी कोकण कडा त्यावरून दरीत कोसळणा-या  पाण्याच्या धारा, त्याचा तो अर्धवर्तुळात घुमणारा आवाज
, आसमंतात उडणारे त्याचे तुषार पाहून मी पुढची वाट धरलॆ. रामरक्षेचे पुढचे आवर्तन संपेपर्यंत मला उधे वाडीचा टोलनाका दिसलाच . मी मोबाईल काढून घड्याळ बघितले. घड्याळाचे काटे २.३७ वाजलेले दाखवत होते. चटकन डोक्याने गणित केले आपण ११. ५० ला चालायला सुरुवात केलेली. मी जवळ जवळ ३ तासात १८ ते २० किमी अंतर पार केले होते. हेच अंतर आम्हाला पार करायला ७ तास लागले होते. मी माझ्या चालण्याच्या स्पीड वर निहायत खुश झालो. आणि चालत राहिलो. गावातल्या एकमेव दुमजली घराजवळ पोहोचलो. घराच्या ओट्यावर ५ मिनिटे विसावलो. घरातून कमरेला पदर खोचलेल्या , ५० शी पार केलेल्या काकू बाहेर आल्या. त्यांना मागच्या वेळेची ओळख सांगितली. ह्यावेळी एकटाच आलोय हे पाहून त्याही आश्चर्यचकित झाल्या.


खर म्हणजे हयावेळेची माझी ट्रीप कोंडाण्याच्या लेण्या पाहण्यासाठीची होती. कार्ले, भाजे, बेडसे आणि कोंडाण्याच्या लेणी ह्या समकालीन आहेत. ह्या चारापैकी कोंडाण्याच्या लेणी  ह्या सर्वात जुन्या आहेत. गावात मला माहिती कळली ती उधेवाडीतुन अजून जवळ जवळ दिड तास चालावे लागेल तेव्हा कुठे मी लेण्यात पोहोचेन. अजून इतका वेळ चालाय्चे आहे हे ऐकून मी दचकलो खरा पण धीर धरून चालू लागलो. राजमाची रुरल development plan ला गो. नि. दा चे नाव दिलेले पाहून मला फ़ारच आनंद झाला. इतका मोठा माणुस पण  पुण्यात फारसे कोणाला नाव ठावूक नाहि. पण या गावात त्यांच्या नावाने वाडी वसवलिये .. ग्रेट!!!  ती वाडी पार करून मी पुढे गेलो. आतापर्यंतचा  रस्ता सरळ होता पण आता त्याला अजून एक फुटला. त्याला अजून एक. आणि असे किती ! त्यातल्या त्यात जास्त मळलेली वाट धरायचा प्रयत्न करत होतो. आणि पाउस सुरु झाला. लोणावळ्याला उतरल्या पासून ढग होतेच आलेले पण पाउस नव्हता आता तो ही सुरु झाला. आणि तो ही साधासुधा नाही कडकडाटासह कोकणातला पाउस सुरु झाला. मग मात्र मी जरा माझा स्पीड वाढवला उजव्या  हाताला एक खोपटे होते त्यात शिरलो. पावसापासून वाचायला. १० मि. थांबलो.पाउस ही थांबला, मग मी पुन्हा चालायला सुरुवात केली.

ते खोपट अशा ठिकाणी होत. की तिथेपर्यंत थोडेसे चढत जायचे मग ते खोपट आणि मग फक्त उतरत जायच.
उतरत जायच.. उतरत जायच..  पूर्वी एकदा पानशेत ते रायगड चालत गेलो होतो तेव्हा ही तो सह्याद्री  असाच उतरायचा होता. दाट झाडीतून निघालेली पायवाट माझ्याबरोबरच पुढे पळत होती. कधी गवतात विरून जात होती. कधी अचानक प्रकट होत होती. शेजारून धबधबा कोसळत होता. अस अर्धा तास चालून मी अचानक एक वळण घेउन मोकळ्या मैदानात आलो. तिथे एक काका उभे होते. पायात स्पोर्ट शूज, अंगात बनियान, पॅन्ट घालून काहीतरी बांधत उभे होते. त्यांच्याजवळ जाउन बसलो. खूप आधार वाटला. जिवंत कोणीतरी भेटले. त्यांच्याशी बोलायच्या हेतूने मी बसलो. त्यांनी विचारले,
"एकटाच आला आहेस?"
"हो"
"एकट यायच नाही बाळा!"
मला फ़ारच बर वाटल. गावातली माणस असातातच प्रेमळ म्हणा..
"अहो काका आज अनंत चतुर्दशी! कोण येणार माझ्याबरोबर? आणि मी एकटा नाही आलोय."
त्यांनी माझ्या मागून झुडपातून कोणी येतंय का ते पाहिलं. मी saak मधून 'माचीवरला बुधा' काढल, त्यांच्या समोर धरलं. आणि म्हणलो,
"अप्पासाहेबाना आणि बुधाला घेऊन आलोय बरोबर."
त्यांनी हातातून पुस्तक घेतलं, त्याच्यावरून हात फ़िरवला आणि बोलू लागले,
"७७ साली मी डोंबिवली सोडली आणि हे गाव दत्तक घेतलं. तेव्हा अप्पासाहेब आणि बाबासाहेब पुरंदरे माझ्याबरोबर उधेवाडीत आले होते."
"तुम्ही त्यांना ओळखत होता?"
"अरे नुसतं ओळखायच काय! राजमाचीला आले कि दोघाही माझ्याच घरी हक्कानी रहायला  यायचे."
"कित्ती lucky आहात तुम्ही!"
"भरपूर"
पुस्तक चाळत त्यांनी मला विचारला,
"आधी किती वेळास आलायस?"
"आलोय ८-१० वेळा! पण या वेळी किल्ला नाही बघायचा ."
"मग रे"
"कोंडाण्याच्या लेण्या बघायला चाललोय!"
"एकटाच?"
"हो! त्याला काय झालं?"
"माझं ऐक, एकटा जाऊ नकोस. हमखास रस्ता हरवशील."
"मी तेवढ्यासाठी आलोय आज"
"परत जाशील रे! भरपूर आयुष्य पडलय अजुन. अजून कोणाला तरी घेऊन परत ये."
"मग आता काय परत लोणावळ्यापर्यंत परत जाऊ?"
"कशाला? आता असाच चालत जा खाली कोंडणे गावात, तिथून तुला रिक्षा वगैरे मिळेल, त्यांनी कर्जत पर्यंत जा, तिथून पुणे!"
"मी पुण्याला जाणार हे कस कळल तुम्हाला?"
"गोनीदा मुंबईत कोणाला माहिती!! मुंबईतली लोक इतकी हौशी नाहीत कि एखाद पुस्तक वाचून ट्रेकला येतील."
मी खळखळून हसलो, उठलो त्यांच्या पाया पडलो, त्यांनी डोक्यावर हात ठेवला काहीतरी पुटपुटले. आशीर्वादच दिला असणार. मी चालू लागलो. जाता जाता त्यांनी सांगितलं कि,
"जास्तीत जास्त मळलेल्या वाटेनी जा. प्लास्टिक, कचरा अस शोधात जा म्हणजे गावापर्यंत पोहोचशील."
मी मन डोलावली, हसलो आणी झाडात शिरलो.

प्रचंड उतार सुरु झाला. चालणहि कठीण व्हायला लागलं. जास्तीत जास्त मळलेल्या वाटेनी जायचा माझा प्रयत्न होता. चोकलेट चे कागद, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे कागद जिथे जास्त असतील तो रस्ता मी धरायचं मी प्रयत्न करत होतो. भोवती गच्च झाडी, शेजारून खळाळून वाहणारा धबधबा, अन कचरा!! हेच माझ्यासाठीच चैतन्य. माझ्याजवळच पाणी संपलं म्हणून मी पायवाट सोडली आणि पाण्याकडे गेलो. भरपूर पाणी पिलं. बाटलीत भरून घेतलं. आणि परत चालायला सुरवात केली पण घात झाला, माझी वाट हरवली, म्हणजे मी वाट चुकलो. छातीची धडधड धडधड सुरु झाली. आता मात्र फारच घाबरलो. थोडा मागे चालत गेलो. कचरा शोधायचा प्रयत्न केला. पण नाहीच रस्ता गेला तो गेलाच.

Discovery वरच man vs wild आठवलं, त्याच्या काही ट्रिक्स आठवायला सुरवात केली, आणि मला एकदम मला आठवल कि पाण्याच्या कडेकडेनी चालत राहिलो तर आपण कोणत्या ना कोणत्या गावात पोहोचु. अरे पण तो बेअर ग्रिल ला ते ठीक आहे ना. त्याचं तीन - साडेतीन वर्षाचं ट्रेनिंग झालाय. दुसरं मन सांगतो तुझाही २ वर्ष NCC झालाय घाबरायला काय झाला?  मी ऐकल दुस-या मनाचं. आणि मी चालायला सुरुवात केली. प्रत्येक तीस-या पावलाला मी पडत होतो. भरपूर पावसामुळे प्रत्येक दगडावर शेवाळ साठलेलं. त्यामुळे हात पाय त्यावर ठेवला कि सटकन सटकायचा आणि जोरात लागायचं. पण एक जमेची बाजू म्हणजे इतक्या वेक पडलो तरी बघायला कोणीही नव्हतं. चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत आपटत पण चालत राहिलो. भूक आणि तहान तर भीतीनी पूर्ण मरून गेली. एक दोन वेळा तर मला चकवा लागल्याची पण भीती वाटू लागली. भोवताली प्रचंड जंगल, सूर्याचा पत्ता नाही, पावसाचा पत्ता नाही, आणि माणसांचाही पत्ता नाही. ज्या
कच-याच्या भरवश्यावर मी वाट धरली होती, तो कचराही एकदम गुप्त झाला. काय कराव सुचेना. आकाशाकडे बघितल ते दिसतच नव्हतं इतकी दाट झाडी, तरीही हात जोडले देवाला म्हणलो,
"आता माझी जबाबदारी तू घे, आणि मला सुखरूप कर्जत पर्यंत पोहोचव."
आणि त्यांनी माझं लगेचच ऐकल, समोरच्या न दिसणाऱ्या डोंगरावरून, न दिसणाऱ्या रेल्वे चा आवाज मला एकू आला. त्या आवाजाचा मला आधार वाटला. आणि मी उत्साहानी मी चालू लागलो. पाचच मिनिट चाललो असेन डाव्या हाताला मला एक झोपडी दिसली. आनंदानी मी जोरात ओरडलो तर दचकून शेजारच्या झाडावरचे पक्षी उडले. मी पळतच निघालो. 'आजी म्या ब्रह्म' पहिल्याच आनंद मला झाला कारण गुरं चरत असलेली मला दिसली त्यांच्या मागे माणसंही.  तो पर्यंत ५ वाजले होते. पुन्हा एकदा चैतन्याचा अनुभव.

कोंडणे गाव मागे टाकलं. कोंदिवडे गावातून रिक्षा पकडली तिने मला कर्जत पर्यंत आणून सोडला. स्टेशन वर डेक्कन क्वीन उभी होती. त्यावर 'पुणे-मुंबई-पुणे' वाचल तो आनंद शब्दात मांडता येत नाही. राजमाची ची डोंगररांग आणि रेल्वे जाते तो डोंगररांग एकमेकांना समांतर आहेत. यामध्ये प्रचंड दरी  या दरी मध्ये आता अंधार झोपायला आला होता त्यावर धुक्यानी शाल पसरली होती. ट्रेन मध्ये सुखरूप असून सुद्धा मला त्या अंधाराची भयानक भीती वाटली. जर या अंधाराच्या तावडीत  असतो तर त्यांनी काय मला जिवंत सोडल नसत.. त्यांनी काय केला असतं या विचारात मला झोप लागली.. जाग पुणे स्टेशन वर आली. आणि मी पुण्याच्या गर्दीत शिरलो. मी कोणी वेगळा नाहीच, तो मी नव्हेच हे दाखवण्यासाठी..



Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....