Saturday 4 October 2014

शिवाजी 'खरच' कोण होता? भाग - ३

शिवाजी आणि मुसलमान !!

शिवाजी महाराजांचा मुख्य लढा कोणाशी होता? तो फक्त मुलामानांशी होता का अन्यायी राजवटीशी होत? स्वराज्यातल्या मुसलमानांविषयी कोणतं धोरण होत? शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुसलमान होते? धर्म, संस्कृती म्हणून इस्लाम विषयी शिवरायांचं काय मत होतं? या सर्वांविषयी पानसरे माझ्यामते जाणीवपूर्वक अपूर्ण माहिती देतात. मला असं वाटत कि जिथे ते रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापात्रांचा उल्लेख ते सोयीपुरता करतात. आपण एक वेळ मान्य करू कि, 'मुसलमानांनी' आपला इतिहास मान्य करण्याची दानत कधीही दाखवली नाही. पण आपण भारतीयांनी आणि हिंदुनी तरी 'राग,द्वेष, पूर्वग्रह विरहीत' इतिहास मान्य करायला शिकलं पाहिजे. पुन्हा एकच प्रश्न पडत राहतो कि का असा निम्मा, अपूर्ण, इतिहास सांगितला जात असेल. साध्य काय होत त्यानी? आपल्याच इतिहासाबद्दल अंधारात ठेवणाऱ्या इतिहासकारांना काय म्हंटल पाहिजे?

इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या इतिहासकारांना पानसरे 'आपमतलबी आणि खोडसाळ' म्हणतात. पण ते जेव्हा निम्मा इतिहास, सोयीचा इतिहास लिहितात तेव्हा दुटप्पीपणाचा वास येतो त्यांच्या लिखाणाला. रामचंद्रपंतांची आज्ञापत्र यांचा संदर्भ ते देतात पण फक्त आर्थिक बाबिंपुरता. जे मुद्दे योग्य आहेत, सर्वस्वी महत्वाचे आहेत ते त्यांनी दिले ते म्हणजे, "रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये" किंवा "झाडे म्हणजे रयतेची लेकरे" हे ठीक आहे कि. पण शिवाजी राजाचं राज्य म्हणजे काय आहे हे सांगताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात कि,

"अवनीमंडल निर्यावानी केले, यावनाक्रांत राज्य आक्रमिले हा निधुड चीत्ताभिप्राय प्रकट करून पूर्व, पश्चिम, दक्षिण या प्रांती यवनस्तोमी बद्धमूढ जाहली होती त्यावरी सेना समुदाय पेरून मारून काढिले, आपल्या बुद्धिवैभव पराक्रमे कुणाची गणना न धरिता कोणावरी चालोन जाऊन तुंबळ युद्ध करुनी रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कलहे लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात शिरोन मारामारी केली, कोणास एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे भेटीस आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करविले, ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवन्तापासून, चंदि(जिंजी) कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य केले. चाळीस हजार पागा, साठ-सत्तर हजार शिलेदार, दोन लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना तैसेच उत्तमोत्तम जवाहीर सकळवस्तुजात संपादिले. ९६ कुळीच्या मराठीयांचा उद्धार केला, सिहासानारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले, धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थाने स्थापून यजनयाजानादी षट्कर्मे वर्णविभागे चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.औरंगजेबासारखा महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न केला, दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते हे राज्य!"
 (हे मूळ आज्ञापत्र आहे) या आज्ञापत्रात हि पृथ्वी निर्यावानी याच अर्थ काय होतो? हा संदर्भ पानसरे जाणीवपूर्वक विसरतात. मला नाही वाटत कि या आज्ञापात्रावर अजून खुलासा करण्याची गरज आहे.   कवी भूषण हा एक समकालीन कवी आहे आणि तो विश्वासास पात्र आहे हेच पानसरे याना मान्य नाही. त्यामुळे त्याचा उल्लेख पूर्ण पुस्तकात कुठेही नाही पण,भूषण एके ठिकाणी म्हणतो कि, 
  ''दिन दयालु दुनि प्रतिपालक जे करता निर्म्लेंछ महिके" 
 अर्थ - हि भूमी निर्म्लेंछ करणारा दिन, दयाळू आणि प्रतिपालक असा शिवाजी राजाचं होता. भूषण मान्य न करण्याच हे कारण असू शकतं. जिथे पानसरे औरंगजेब सुद्धा कसा सहिष्णू होता असं सांगतात तिथे निर्म्लेंछ करणारा शिवाजी होता हे ते कसं सांगतील. अजून एके ठिकाणी भूषण म्हणतो,
''मन कवी भूषण को सिवकी भगती जेत्यो 
सिवकी भगती जेत्यो साधुजन सेवानी. साधुजन जीतेया कठीन काल कली 
काल महावीर महाराजमही मेवनी. 
जगत में जिते महावीर महाराजन ते महाराज  
बावन हु पातशाह लेवानी.पातशाह बावनो दिली 
के पातशाह जितीपातशाह हिंदुपती पातशाह सेवाने.''
अर्थ - कवीच्या मनास शिवभक्तीने शिवभक्तीस साधुजनाच्या सेसिने साधुजाणार कालीकालाने कालीकालास शुर आणि कीर्तिवान राजांनी, शूए आणि कीर्तिवान राजांना आणि बावन्न बादशह्या जिंकणाऱ्या दिल्ली च्या बादशहाला (म्हणजे औरंगजेबाला) हिंदुपती शिवाजीने जिंकले. भूषणावर विश्वासच न ठेवण्याचं कारण कळालं असेल. त्यांच्या सर्व लेखानावर, विचार पद्धतीवर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता होईल भूषणावर विश्वास ठेवल्याने. 

काही मुस्लीम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता या शीर्षकाखाली पानसरे मुसलमानी राजे कसे सहिष्णू होते याची विस्तृत माहिती देतात. दक्षिणेतील मुसलमान राजे हे उत्तरेतल्या मुस्लीमांपेक्षा कसे सहिष्णू होते हे ते सांगतात. यावर लिहिताना ते लिहितात कि जोवर मुस्लीम राजांना हिंदूंकडून धोका निर्माण होत नाही तोवर मुस्लीम राज्यकर्ते हिंदुंसंबंधी सहिष्णू होते. याचा अर्थ पानसरे यांना म्हणायचा आहे का कि परकी राजवटीविरुद्ध एतद्देशीय लोक लढले हि एतद्देशीयांची असहिष्णुता! (?) वा रे व!!! ब्रिटिशांना भारतीयांवर अत्याचार करावे लागले याच कारण भारतीयांनी स्वातंत्राचा लढा उभा केला. याच अर्थ ते मुसलमानाच्या अत्याचारच समर्थन करत आहेत का? मुस्लीम राज्यकर्ते यांच्या हिंदूंबद्दलच्या सहिष्णूतेच उदाहरण देताना पानसरे औरंगजेबालाहि धर्म सहिष्णू ठरवतात. त्याच्या गौरवार्थ ते म्हणतात कि बनारस आणि मथुरा इथल्या हिंदू देवस्थानांना औरंगजेबाने देणग्या दिल्या. औरंगजेबाने अहमदाबादच्या जगन्नाथाच्या मंदिराला २०० गावे इनाम दिल्याचा उल्लेख ते करतात. काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही? औरंगजेब कसा सहिष्णू होता? मी जे पूर्वी म्हणतलो कि कम्युनिस्ट इतिहासकारांनी जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न मोठ्या श्रद्धेनी केला. याच अजून एक उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी बिपीन चंद्र यांनी 'सेक्युलर औरंगजेब आणि जातीय शिवाजी' या नावाचा एक लेख लिहिला होता. बिपीन चंद्र कोणत्या विचारसरणीचे इतिहासकार होते हे सर्वांना माहिती आहे. मी जे पूर्वी लिहील आहे कि मुसलमानांनी आपला इतिहास मान्य करण्याची तयारी कधीही दाखवली नाही पण 'जतींद्रनाथ' म्हणून एक बंगाली इतिहासकार होते. त्यांनी मुस्लीम कागदपत्रांच्या आधारे एक पुस्तक प्रकाशित केला आहे. त्यामध्ये मुसलमानांनी ज्या कत्तली केल्या, जिथे जिथे मंदिरं पाडून मशिदी बांधल्या आणि गौरवानी सांगितल्या आहेत त्याचा परामर्श आहे. किमान जे मुसलमानांनी मान्य केलेलं आहे ते पानसरे यांनी वाचाव. आणि ज्यांना अजूनही वाटत कि मुसालमान सहिष्णू आहेत त्यांनीही वाचाव. (पुण्यात सुद्धा एक शिलालेख आहे कि ज्यामध्ये लिहिलेला आहे कि हि मशीद ३३ मंदिरे पडून उभारण्यात आली आहे)

शिवाजी आणि धर्म यामध्ये पानसरे लिहितात कि, "मुसलमान जरी मंदिरं पाडून मशिदी बांधत असले तरी निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी ती पडून मशीद बांधली तिथे ती मशीद पडून शिवाजी मंदिर बांधल्याची नोंद आहे का? मुळीच नाही!" अरे किती खोटं बोलाल!! आणि का खोटं बोलता? १६५६-५७ मध्ये स्वराज्याचा ध्वज कोकणात उतरला तेव्हा कल्याण आणि भिवंडी येथील सर्व मशिदी आणि मदरसे शिवाजी राजांनी जमीनदोस्त केल्या, तिथल्या काझी आणि मौलवींन अटक करून ठेवलं. हे शिवाजी करू शकतो का? तर निश्चित करू शकतो. सावंतवाडीच्या दक्षिणेला शिवाजी राजांच्या सैन्याने छापा घातला तीन ख्रिश्चन मिशन-यांना पकडून आणलं आणि त्यांना हिंदू केल्याचे उघड पुरावे आहे. मग शिवाजी मुल्ला मौलावींना का अटक करू शकत नाही? हे हि पुरावे द्यावेत असं माझं म्हणण आहे. कल्याण भिवंडीच्या मशिदी पडल्याचा पुरावा आपल्याला परमानंद देतो. शिवभारतात पुढील श्लोक येतो -
''त्वया गृहीत्वा कल्याणं तथा भिमपुरीमपी  
यावनानाम् महासिद्धी निलयः किलपातीतः||''
कम्युनिस्टांना किमान संस्कृत येत असेल अस मी गृहीत धरतो. पण ते जाऊदे! अरे 'श्रीमान योगी' सारख्या एका कादंबरीत असा उल्लेख आहे कि मुसलमानांनी तुरुअन्नमालाईच्या आणि समुद्र या गावातील पेरुमाळाच्या देवळांच मशिदीत रुपांतर केलं होतं. शिवराय दक्षिण दिग्विजय करून परत येत असताना ह्या मशिदी पडून पुन्हा मंदिरांची स्थापना केली आणि कार्तिकात पुन्हा दीपोत्सव सुरु केला. तो दीपोत्सव आजही सुरु आहे. राज्याभिषेकाच्या वेळेला जो ब्रिटीश अधिकारी महाराजांना भेटायला आला होता त्याच नाव 'हेन्री रेह्विंग्टन' त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात जी दोन विशेषणं शिवाजी राजांना वापरली आहे ती पानसरे आणि तथाकथित पुरोगाम्यांनी वाचली तर त्यांच्या तोंडच पाणी पळाल्याशिवाय राहणार नाही. तो शिवाजी राजांना "General of the Hindu forces" आणि "Desecrator of Mosques" असं म्हणतो 

संभाजी राजांच्या ज्या दानपत्राबद्दल मागे उल्लेख आला त्यात संभाजी राजे शिवाजी राजांना ''म्लेंच्छक्षयदिक्षित निर्धारित म्लेंच्छक्षयनिदान' हे विशेषण वापरतात. त्याच दानपत्रात संभाजीराजे म्हणतात "आता हे हिंदू राज्य झाले आहे" बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला जेव्हा शिवाजी राजांना भेटायला आला तेव्हा शिवाजी राजांच्या तोंडाची वाक्य आहेत राजे म्हणतात' "हिंदूंचा आणि तुर्कांचा मिलाफ कधी झालाय का! मिलाफ कसा होणार ह्या दोन संस्कृती अगदी भीन्न आहेत, त्या एकमेकात सामावणं अशक्य आहे.'' त्यांच्या ठिकाणी विवेक असा कशी मी पहिलाच नाही भवानीच्या आशीर्वादाने माझी तलवार नेहमीच त्यांच्या विरुद्ध तयार आहे. अंतःकरणात श्रीकृष्ण साठवा आणि घ्या हातात तलवार, बुंदेलखंडात परत जा मुघलांना या देशातून काढून टाका. मुघलांना मारण्यात आपल्या तलवारी तोडून घ्या. शिवाजी महाराज हिंदू मुस्लीम ऐक्य अशक्य असल्याच सांगत आहेत.    

हल्ली मराठ सेवा संघ प्रणीत आणि तथाकथित पुरोगामी संघटनांकडून महाराजांच्या सैन्यात किती जास्त मुसलमान होते हे सांगण्याची फँफन आली आहे. आणि जो जास्त आणि बनावट नावं सांगेल त्याला बक्षिस सुद्धा दिलं जात असेल बहुतेक. शिवाजी राजांच्या हाताखाली खूप मुसलमान होते अशी समजूत करून देण्यात आली आहे. बंगळुरहून शहाजी राजांनी शिवाजी महाराजांबरोबर जी माणस पाठवली त्यात ५ मुसलमान आहेत.  इब्राहिम खान, काझी हैदर(जो नंतर औरंगजेबाकडे पळून गेला),सिद्दी अंबर बगदादी, जैनाखन पिरजादे, बेहलीम खान आणि नूरखान बेग. १६५६ पर्यंत हि सर्व नाव मूळ कागदपत्रांमध्ये आहेत. १६५६ नंतर यातील एकही नाव कुठेच आढळत नाही. महाराजांच्या बरोबर जे १० जण अफझलखानाच्या भेटील गेले त्यात सिद्दी हिलाल हे नाव आहे. तो खेळोजी भोसले याच्या गुलाम आहे, विकत घेतलेला. अजून एक नवाच सतत उल्लेख येतो ते म्हणजे मदारी म्हेतर अहो या नावाचा उल्लेख मूळ कागदपत्रांमध्ये तर सोडूनच द्या, पण बखरीनंमध्येही नाही. पण हल्ली हिंदू मुस्लीम ऐक्याच्या खोट्या समजूतीपायी अशी चढाओढ चालताना दिसते कि किती जास्त मुसलमान शिवाजी राजांच्या पदरी होते. 
प्रसिद्ध इतिहासकार श. न्ना. जोशी यांनी शिवाजी राजांच्या विश्वासातल्या १२० जणांची यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात एकही मुसलमान नाही.

वरील सर्व मतं एकांगी वाटतीलही कदाचित. पण कोणाला ज्यांना पुरोगामित्वाची लागण झालेली आहे. शिवाजी महाराजांची मुसलमानांविषयी कोणती मतं होती हे आपण पाहिलं. पाहिलं म्हणजे त्याची काही महत्वाची पण प्रातिनिधिक उदाहरणं पहिली. पण त्याचा अर्थ लगेच शिवाजी मुस्लीम द्वेष्टा होता असं मानायचं काही कारण नाही. एक मुद्दा मुद्दाम इथे सांगायचा आहे तो म्हणजे 'वैयक्तिक पातळीवर मुसलमान चांगला असू शकतो, आणि असतातही. 'पण मुसलमान माणूस चांगला असणं आणि मुसलमानी राज्यव्यवस्था असणं यात फरक आहे.' वैयक्तिक पातळीवर माणूस चांगला असतो म्हणूनच हिंदवी स्वराज्याचा पहिला सरनौबत एक मुसलमान असतो. १७ व्या शतकात एतद्देशीय राजांपैकी स्वतः च आरमार असलं पाहिजे ह्या जाणीवेतून निर्माण झालेल्या मराठ्यांच्या अरमारचा प्रमुख हा 'दौलत खान' असतो. शिवाजी राजांचा अंग रक्षक एक मुसलमान असतो. पानिपतावर होळकर ऐन युद्धातून माघार घेतात किंवा पळून जातात पण 'इब्राहीम खान' हा तोफखान्याचा प्रमुख शेवटपर्यंत लढत राहतो. माणूस चांगला आहे म्हणून शिवाजी याकूत बाबांच्या दर्शनालाही जात असतो. त्यामुळे शिवाजी राजांच्या आणि एकूणच भारतातील हिंदू मुस्लीम संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. मुसलमान माणूस चांगला असणं आणि मुसलमानी राज्यव्यवस्था असणं यात फार फरक आहे. मुसलमानी राज्यव्यवस्थाही जर चांगली असेल तर मग नवीन राज्यची हाव असण्याचं काय कारण होता? हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे.
(म्हंटल जातं कि)
शिवाजी राजाचं मूळ चित्र 

संशोधन करून मिळणाऱ्या पुराव्यांच्या अन्वयार्थावर वाद निश्चित असू शकतात, ते असावेत. पण ऐतिहासिक Facts वर वाद असता कामा नयेत. Facts ची मोडतोड, आपल्याला हवे तसे पुरावे सदर करणं,  हे इतिहासाशी इमान राखणे होणार नव्हे.  


               निरपराध मुस्लिमांना त्रास दिल्याच्या कोणत्याही घटना स्वराज्यात घडलेल्या नाहीत. कोकणातील याकुतबाबा यान शिवाजी राजे भेटायला जात असतं. आणि शिवाजी राजांच्या हाताखाली (मराठ सेवा संघ म्हणतात त्याप्रमाणे) ४०% मुसलमान असले तरी बिघडत नाही. पण तसा नाहीये ना! पण जो असहिष्णू आहे त्या शत्रूशी त्याच्याच भाषेत वागाव लागतं हा मोठा धडा शिवाजे राजे शिकवत नाहीयेत का? वैयक्तिक पातळीवर मुसलमान माणूस शांत, सहिष्णू असण हि वेगळी बाब आहे आणि मुस्लीम राज्य हि वेगळी बाब आहे. एखाद्या अकबराच उदाहरण आपण सहिष्णू राजा म्हणून देणारं पण अकबर आणि राणा प्रताप या लढाईमध्ये आपण कोणाच्या बाजूचे हा विचार ज्यांनी त्यांनी करावं. या देशावर इस्लाम च आक्रमण झालं असं म्हणायचं नाही कारण वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढत. त्या सर्व आक्रमणांना पठाणांची किंवा तूर्कांची आक्रमणं म्हणायचं. हि भीती का आहे? काय मिळत खोटा इतिहास सांगून. समाज आपल्याच वैभवशाली इतिहासापासून लांब राहणार. आणि त्यांनी कोणाचा फायदा आहे. कोणाचाच नाही! हे सर्व चिंतन 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकापासून सुरु झालं, माझ्या लेखी त्या पुस्तकाच इतकंच महत्व आहे.


अधिक लिहावे? सुज्ञास अधिक लिहिणे न लगे!
राजते लेखनावधि:|| 
              
                
              

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....