Friday, 9 January 2015

भारत एक है..!! ( जम्मू आणि काश्मीर अभ्यास दौरा ) भाग - १

          सगळ्या भारतामध्ये सर्व रस्त्यांच्या बाजूला आपल्याला काही गंभीर( विनोदी ) पाट्या वाचायला मिळतात. 'नजर हटी, दुर्घटना घटी' किंवा 'दुर्घटना से दर भली' वगैरे. अश्या पाट्यांच्या रागेतच मला काश्मीर मध्ये एक वाचायला मिळाली. शाँकिंग होती. मिडिया मधून येणारी बातम्या आणि जे वाचत होतो काश्मीर बद्दल त्याच्यामुळे त्या पाटीच काश्मीरमधलं अस्तित्व जरा धक्कादायक होत. ती पाटी होती 'काश्मीर से कन्याकुमारी तक भारत एक है|' माझा राष्ट्रवादी मान जाणीवपूर्वक अभ्यास करायला लागल्यापासून हेच म्हणतं आहे. पण तो कश्यामुळे एक आहे हे तिथे जाऊन पाहण्यासाठी आम्ही गेलो. १० दिवस काश्मीर 'काश्मिरींच्या' नजरेतून पाहण्यासाठी गेलो. हा नुसता दौरा नव्हता, तो खरोखरीच अभ्यास दौरा होता. आम्ही जाणीवपूर्वक कोणतेही पिकनिक स्पॉट पहिले नाहीत. गुलमर्ग नाही, सोनमर्ग नाही.पण ते न पाहता हि आम्ही नंदनवन मात्र पहिल. मला वाट सौंदर्य शोधणारी दृष्टी हवी, आणि आम्हा सातही जणांमध्ये ती होती. १० दिवसांचा अनुभव समृद्ध करणारा तर होताच पण जास्त डोळे उघडणारा होता.काश्मीर च्या बाहेरून काश्मीर चा सौंदर्य आपण पाहतो ते फार वरवरच आहे. तो बर्फ, काश्मिरी माणसाचं सौंदर्य, तिथली पश्मीना, 'ये हसी वादिया' आणि म्हणून मधु आणि अरविंद स्वामी इतकाच आपल्याला दिसत किंवा आपण तेवढच पाहतो पण त्या सर्वांच्या मागे किती प्रचंड रक्तपात आहे, बलात्कार आहेत, आक्रोश आणि किंकाळ्या आहेत ते आपल्याला दिसत नाही. किंवा दाखवणारे आपल्याला दाखवत नाहीत. कधीतरी आपल्या देशाचं हा अविभाज्य भाग आपल्या डोळ्यांनी पहिला पाहिजे. प्रेमळ काश्मिरी लोकांबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले पाहिजेत. आपण जेव्हा ११ दिवस १० रात्री टाईप जम्मू काश्मीर पाहतो तेव्हा गुलमर्ग आणि सोनमर्ग चा सौंदर्य कोणत्या आधारावर उभं आहे ते लक्षात येत नाही. आम्हाला असा सांगण्यात आलं होता कि काश्मीर पाहताना कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवू नका, आणि ते अगदी योग्य आहे. अभ्यास करताना मोकळ्या मनानी करायचा आणि मग चिकित्सा!!
          जम्मू काश्मीर आणि लदाक राज्याचे अगदी नैसर्गिक ३ विभाग पडतात. जम्मू जो मुख्यतः हिंदू बहुल आहे. काराकोरम रेन्जे, जवाहर बोगदा, आणि पटनी टॉप ओलांडून गेलं कि सुरु होते श्रीनगर व्हॅली जी मुख्यतः मुस्लीम बहुल आहे. आणि शेवटी लदाक हा बौद्ध धर्मीय प्रदेश आहे. हा परिणाम state autonomy commission चा नसून अगदी नैसर्गिक आहे. state autonomy commission याच्या पुढे जाऊन या तीन भागांचे अजून तीन उपविभाग करू पाहत आहेत जे सरळ सरळ धार्मिक आधारावर आहे*. त्याच्या शिफारसी National Conference ने जम्मू काश्मीर च्या विधानसभेत मंजूर केला आणि केंद्र सरकारकडे पाठवला. केंद्रात कोणाचाही सरकार असो त्यांनी ह्या धार्मिक आधारावर विभाग पडण्याच्या शिफारशींना कधीही मजुरी दिलेली नाही.
*( state autonomy commission च्या शिफारशी http://www.frontline.in/static/html/fl1714/17140120.htm या साईट वर मिळतील )मला वाटलेली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तीनही प्रांतांना जोडणारा एकच रस्ता आहे. तो रस्ता म्हणजे दिल्ली ते श्रीनगर National highway No. 1. हा रस्ता आपण १९४८ साली बांधलं त्याच्या पूर्वी श्रीनगरला जायला रस्ता पाकिस्तानातून होता. फाळणी झाल्यावर भारतातून श्रीनगरला जायला रस्ता नव्हता.  म्हणजे ६० वर्षात आपण काश्मीर मध्ये जायला एकच रस्ता बंधू शकलो आणि तो सुद्धा रोज वापरता येत नाही. जवाहर बोगदा जो आहे त्यामधून एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते. म्हणून एक दिवसाआड रस्ता बंद असतो. सोमवारी फक्त जायचं मंगळवारी फक्त यायचं!!
हिवाळ्यात अशी परिस्थिती असते. अंदाजे पुढच्या वर्षभरात दुसऱ्या बोगद्याच काम पूर्ण होऊन तो वापरात येईल.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत लेह हा आहे. खर म्हणजे त्यापेक्षा मोठा प्रांत आपल्या नेत्यांच्या नादानपणामुळे किंवा United Nations च्या अकार्यक्षमतेमुळे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो ते हुंजा स्कार्डू आणि गीलगीट असे तीन जिल्हे आहेत जे पाकव्याप्त आहेत. त्यांना आपण पाकव्याप्त म्हणतो. आणि जम्मू श्रीनगर आणि लेह यांना पाकिस्तान भारत्व्याप्त काश्मीर म्हणतो. हे फक्त पाकिस्तान म्हणते असं नाही तर भारताव्याप्त काश्मीर मधील सुद्धा एक गट आहे जो म्हणतो कि ज्याप्रमाणे पाकिस्तानचं सैन्य ( पाकिस्तान त्याना घुसखोर म्हणत असलं तरी ) गीलागीट, स्कार्डू, हुंजा, ब्ल्तीस्तान, मुझफ्फराबाद या भागात आहे त्याच प्रमाणे जम्मू, श्रीनगर या भागात भारतच सैन्य आहे. अन्याय जो होतोय तो शेवटी काश्मिरी जनतेवरच होतोय ना! त्यामुळे काश्मीर प्रश्नाची जबाबदारी जितकी पाकिस्तानवर आहे तितकीच भारतावर सुद्धा आहे. who drew first blood च्या नादात आम्ही मारतो आहोत अशी भूमिका काश्मीर मधल्या एका गटाची आहे. सर्वांची नाही. त्याचं म्हणणं सर्वस्वी अमान्य करता येणार नाही करण असं म्हणणार्यांच्या संख्या दाखल घ्यावी अशी आहे. चिकित्सा जरूर करता येईल, आणि करावीच लागेल.
(क्रमशः...)
     

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....