वैद्य हाताची नाडी तपासत होते. वैद्यांचा चेहेरा बघायचाही भान आज रहिलेला नाही. भान राहावं असाही आज वाटत नाही. जसं आज पर्यत बेभान आयुष्य जगलो, तसच पुन्हा जगायला मिळेल का? जगलेलं आयुष्य स्वामींच्या डोळ्यासमोरून सरकून जाऊ लागलं. स्वामिनी तृप्तीने डोळे मिटले. वैद्यराज म्हणत राहिले,
"स्वामी सावध व्हा, शुद्धीत राहायचा प्रयत्न करा"
"सावध रहा?"
"शुद्धीत रहा?"
हे आयुष्य कधीरती बेसावध राहून जगलोय का? कधीतरी बेभान झालोय का? अत्यंत आनंदाच्या परिस्थितीतहि, अतिशय दुःखाच्या स्थीतीतही कधी बेसावध झालो नाही आणि आज अखेरच्या क्षणी हे वैद्यराज सावध व्हायला सांगत आहेत. स्वामींच्या चेहेर्यावर किंचित हास्य उमटलं. ओठ सुटे झाले. वैद्यानीही सुस्कारा सोडला. सगळी खोली एका छोट्याश्या हस्यानी भरून गेली. कोणीतरी एकमेकान कुजबुजत होतं. स्वामींच्या मनात मात्र वयाच्या १० व्या वर्षीचे बंगळुर चे प्रसंग उमटतं होते. आपण वडिलांना भेटायला गेलो होतो, आणि दाराच्या आड उभे राहून आपण आई-वडिलांचा संवाद ऐकलेला त्यांना आठवला. वडील आई ला सांगत होते, "...... अगं प्रयत्न मी पण केले होते गं! पण त्या मुरार जगदेवान, माझा दोस्तच बर का तो, तो फाटकी वाहण पुण्याच्या वेशीवर अडकवून तो गेलं गं! स्वराज्याची सगळी स्वप्न त्यांन पुण्याच्या वेशीवर टांगली. सगळी निजामशाही ह्या ह्या हातावर खेळवत होतो मी. मला जे जमलं नाही त्याची अपेक्षा तू आपल्या बाळाकडून करतीयेस? आगं त्याच वय ते काय? भलती स्वप्न बघू नकोस...."आणि त्यावर आई कडाडल्याचहि स्वामींना आठवलं, "हे तुम्ही सांगताय? पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची नाहीत? असे अपयशाचे संस्कार, निराशेचे संस्कार करायचेत मुलावर? मला जमणार नाही. मी त्याला स्वप्न पाहायला लावीन. पुरी करण्याचीही ताकद त्याच्यामध्ये निर्माण करीन. तुमचं स्वप्न आपला मुलगा पूर्ण करणार नाही तर कोण करणार? ती तुटकी वहाण काढीन टाकून, पुणे कसबा सोन्याच्या नांगरणी नांगरून काढीन आणि तेही शिवाजी च्या हातानी!!"
आपल्या नावाचा उच्चार आईच्या तोंडून ऐकताना अंगावर उभे राहिलेले रोमच स्वामींना आठवले. काय वय होतं १० फक्त. कोणती स्वप्न बघायचं वय होतं माझं आणि माझी आई काय अपेक्षा करत होती माझ्या कडून?? वडिलांच राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची, पुणे कसबा सोन्याच्या फाळनी नांगरण्याची? स्वामींच्या डोक्यात विचार आला कि खरच दाराच्या आड उभं राहीन आपल्या आई वडिलांचं बोलणं ऐकताना आपल्याला 'सोन्याच्या नांगरांनी पुणे नांगरणे' किंवा 'स्वराज्य' याचा अर्थ तरी कळत होता का? मनानी नकारार्थी उत्तर दिलं आणि स्वामींच्या चेहे-यावर पुन्हा एकदा हास्य खुललं. पुन्हा वैद्यांचा हात नाडीशी गेलं, पुन्हा खोलीत कुजबुज झाली. स्वामींना आज विचार शृंखला मोडायची नव्हती. त्यांनी खोलीतल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केला आणि मान पुन्हा भूतकाळात नेलं. त्यांना बंगलोर ते पुणे प्रवास आठवला.
प्रवासात आईनी सांगितलेली वडिलांची गोष्ट त्यांना आठवली. देवगिरीच्या यादवांची गोष्ट आई ने सांगितलेली त्यांना आठवली, विजयनगरच्या हरिहर आणि बुक्क यांची गोष्ट त्यांना आठवली. अश्या भारतवर्षातील सर्व भंगलेल्या गोष्टी आई ने सांगितली. इंद्रप्रस्थ, चितोड, कर्णावती, वारंगळ... आणि "असं रामराज्य, शिवाजी तुमच्या हातून निर्माण व्हायला हवं!" वयाच्या १० व्या वर्षी आई इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ इत्यादी उदाहरणं देऊन मुलाला सांगतीये असं राज्य तू निर्माण केल पाहिजेस. पुन्हा एकदा स्वामीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. संपूर्ण आयुष्य आपण भरपूर जाणीवेनी जगलो असं त्यांना वाटलं. आणि एक एक प्रसंग त्यांच्या समोर उभे राहू लागले. इतक्या लहान वयात 'स्वतंत्र' हेच जिवनाच उद्दिष्ट हे ठरवण्याची बुद्धी आपल्याला कशी झाली असेल. हि प्रेरणा आपल्यात कोणी निर्माण केली असले या विचारात स्वामी पडले आणि क्षणोक्षणी त्यांच्या पदरी फक्त आश्चर्यच पडत गेलं. रोज रात्री झोपताना आई ने सांगितलेल्या रामायण, महाभारताच्या गोष्टी, विजयनगरच्या गोष्टी, दादाजींनी आपल्याला शेजारी ठेऊन लालमहालाच्या ओसरीवर केलेले नीवाडे. लालमहालाशेजारची एक पडीक जमीन खरच सोन्याच्या फाळानी नांगरली गेली. आपल्या हातानी!!! नाही नाही, आपण नाहीच. आई आणि दादाजी होते म्हणूनच.. आपलं कर्तृत्व इतकाच कि आपण साधन झालो. जाणीवपूर्वक दादाजींनी आपल्याला बरोबर ठेवलं, मावळची व्यवस्था लावायला जाताना. आपल्या समोर देशमुख आणि बांदलांची भांडण सोडवली गेली. आपण जाणीवंपूर्वक जगलो नाही, आपल्याकडून तसं जागून घेतलं. खरं खरं त्यांचेच हे उपकार!! त्यांनी मनोमन आईचे आणि दादाजींचे आभार मानले ह्या स्वराज्याच्या प्रपंचाट आपल्याला साधन बनवलं. मनोमन हात जोडण्याकरतासुद्धा हात उचलले जात नाहीयेत हे स्वामींच्या लक्षात आलं. आपल्या पराधीनातेबद्दल त्यांना स्वतःची खरोखर दया आली. आपल्या दैवातापुढे आपण हात जोडू शकत नाही. मान वळवून आपले हात पाहण्याचा प्रयत्न केला. तो काळवंडलेला हात पाहताना त्यांना आठवलं कि, ह्याच हातांनी पुरंदरवर आपण दगडगोट्यांची व्यवस्था केली होती स्वराज्यावारच पाहिलं संकट परतवण्यासाठी. स्वामींना आश्चर्य वाटलं कि आपण कधी काळी दगडगोट्यां युद्ध जिंकू शकत होतो. आज आपल्याकडे ह्याच हाताच्या जोरावर कोट्यावधी कोटखजीना, दोन लक्ष पदाती, पचाळीस हजार पागा आहे. काही क्षण त्याचं मान या सर्व संपत्ती वरून फिरत राहिलं. अनेक किल्ल्यांवर जाऊन आलं. आज सुद्धा किल्यांवरची व्यवस्था उत्तम आहे का हेच आपलं मन शोधात आहे त्याचा त्यांना हर्ष झाला. पुन्हा एकदा चेहेर्यावर स्मित उमटलं...
पुन्हा खोलीत कुजबुज...
हातांकडे पाहताना त्यांना आठवलं कि याच हातांनी तो अजस्त्र राक्षस आपण प्रतापगडावर फाडला. आजची देहाची आणि हाताची पराधीनातेची आवस्थ पाहून स्वामींना एक क्षण आश्चर्य वाटलं. पण पुन्हा मन प्रतापगडावर धावलं. गडाची एकेक पायरी उतरताना एकेक प्रसंग त्यांना आठवत होते. आज आपण ज्याला भेटायला चलो आहे त्यांनीच आपल्या वडिलांना फसवून कैद केलं होतं. थोरल्या भावाला ह्यांनीच कपाटांनी मारल होतं. विठोबाच मंदिर ह्यांनीच फोडलं आहे, तुळजाभवानी ह्यांनीच फोडली आहे. अश्या माणसाला आपण आज भेटायला जात आहोत. खबरदारी तर सगळी घेतली आहे, नकळत त्यांचा हात डोक्याशी गेला जीरेटोपाखाली मंदिल आहे का नाही हे पाहण्यासाठी, दुसऱ्या हातांनी बाराबंदीच्या खाली चिलखत आहे ना त्यांनी खात्री करून घेतली. खानाला भेटायला जातानाही आपण पुढच्या मोहेमेची तयारी करत होतो. खानाच्या भेटीत काय होईल याचा पत्ता नाही आणि आपण पन्हाळ्यापर्यंत कसं जायचं याच विचार करत होतो. आपल्या आत्मविश्वासावर त्यांना हासू आलं... पुन्हा कुजबुज... खानाच पोट आपण फाडलं ते रक्ताळलेलं पोट घेऊन तो अजस्त्र देह शामियान्याच्या बाहेर चालला होता. त्यांच्या मनानी पक्क केलं कि आज आपला सामना आपल्या योग्यतेच्या शत्रूशी झाला. आपज आपलं सामर्थ्य खर पणाला लागलं. पुढच्या काही दिवसातच स्वराज्यात आलेला प्रचंड प्रगेश त्यांच्या डोळ्यासमोरून सरकून गेलं. त्याचं मन राजगडावर अडकलं. खिन्न झालं. कित्येक दिवसात आईच दर्शन झालेलं नाही, संभाजीच दर्शन झालेलं नाही.. खानाला मारायला आपण निघालो राजगडावरून तेव्हा सई आजारी होती. आणि अखेरच्या काळात आपण तिच्या जवळ राहु शकलो नाही. संभाजीचा चेहेरा आठवण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्यांना तो पुसटसाहि आठवेना याचं स्वामिना अपार वाईट वाटलं. पापण्यांच्या कडातून पाणी ओघळलेलं त्यांना जाणवलं. खर खर, घराकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळाला नाही. संभाजीला वाटत नसेल का वडिलांबरोबर थोडा वेळ घालवावा. आणि नंतर बराच वेळ राजगडावर रमले. आज भूतकाळात रमायचा आनंद स्वामी उपभोगीत होते. स्वामींना झोप लागली.
"त्यांना झोपू दे, आराम पडेल."
असं वैद्य म्हणाल्याच त्याना आठवत होत.
आपला बाजी गेला, तानाजी गेला, नेताजी गेला, मुरारबाजी गेला, प्रतापराव गेला, कान्होजी गेले. स्वराज्यासाठी मारण्याची आणि मरण्याची प्रेरणा आपण कशी निर्माण करू शकलो त्यांच्यात? छे, छे!!! ते काम आपला नाहीच. आपण ते करूही शकलो नसतो. लढाव केव्हा आणि पवित्र कोणते घ्यावेत याचीच बुद्धी आपल्याकडे असेल. हा प्रपंच कशासाठी आणि स्वराज्याच्या कामात मरण्याची तयारी, छे!! ते आपलं कामच नव्हे. खरच हा विचारच कधी केला नाही आपण. कोणी या लोकांमध्ये मारण्याच्या तयारीची प्रेरणा निर्माण केली असेल? अचानक त्यांना स्मरण झालं, ''खरचं त्याचाच हे कामं असू शकतं! बरोबर, अगदी बरोबर.." त्यांच मान सज्जनगडावर गेलं. समर्थांच्या नुसत्या स्मरणांनी त्यांचा अंगावर रोमांच उभे राहिले. स्वामींच्या डोळ्यासमोर समर्थांच संपूर्ण पत्र उभं राहिलं. "काय म्हणाले होते समर्थ आपल्याला?
''अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी?
परोपकाराचीया राशी?
सावधपणे नृपवर, सर्वज्ञपणे सुशीळ
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे???
माझ्यामुळे?? छे! छे!!
समर्थ आम्हामुळे कैसा ?आम्हा दोघांमुळे!!"
डोळे बंद करून स्वामी समर्थांच्या आठवणीत होते. त्यांना असं निश्चित वाटलं कि चाणक्य चंद्रगुप्त, विद्यारण्य हरिहर बुक्क यांच्या जोडीनी पुढच्या पिढ्या समर्थ शिवाजी हे नाव घेतील. स्वराज्य निर्माण केलं पाहिजे हि प्रेरणा समर्थांचीच. त्यांच्यामुळेच नेताजी, तानाजी, येसाजी अशी माणसं निर्माण होऊ शकतात. त्यांनी समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. पुन्हा त्यांना समर्थांच पत्र आठवलं. "बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला आनंदवनभुवनी." स्वामींच्या मानत आलं, "आपल्याला उठलं पाहिजे. आनंदवनभूवन निर्माण करायच्य अजून" इतक्यात थकून कसं चालेल, झोपून कसं चालेलं? उत्तिष्ठ जागृत:प्राप्तवारान्नीबोधात:|| अरे अजून सिंधूच्या त्या तीरापासून कावेरीपर्यंत कुठे पोहोचलोय आम्ही? उठलं पाहिजे. अचानक स्वामी बोलून गेले, " अरे कोणीतरी संभाजीला बोलवा...." वाक्य पूरं करण्याचाही भान त्यांना उरलं नाही. नको नको म्हणताना संभाजीचे विचार मनात सुरु झाले. आपला मुलगा दिलेरखानाला जाऊन मिळाला! स्वराज्याचा वारस होता तो.. तोच शत्रूला मिळाला!! त्याच्या शौर्याबद्दल आपल्याला कधीच शंका नव्हती. डोकं मात्र थोडं गरम आहे. आपण तो आपलाच दोष आहे. आपण संस्कार करण्यात कमी पडलो!! स्वामींना हुंदका अनावर झाला, डोळ्यातून पाणी सुरु झालं. तोंडात 'जगदंब जगदंब' सुरूच होत. त्यांनी प्रतापगडावरील तुळजाभवानीच दर्शन घेतलं. आणि स्वामींची मान कलंडली.. नाडी थांबली.. खोली आक्रोशानी भरून गेली...

No comments:
Post a Comment