Saturday, 3 October 2015

आपल्या सणांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन




प्रत्येक घटनेकडे बघायचे अनेक दृष्टीकोन आहेत. असतात. प्रत्येकजण आप्लाप्ल्या नजरेनी एखाद्या घटनेकडे बघत असतो. प्रत्येकाचा त्या मागचा विचार वेग आणि स्वतंत्र आहे. तो तसा असण्यात जास्त आनंद आहे. जेव्हा दुसऱ्याच्या स्वतंत्र विचाराविचाराचे आपण अस्तित्व मान्य कारण नाही तेव्हा वातावरण बिघडायला सुरवात होते. गेले बरेच दिवस एक विषय डोक्यात घोळत होता. पण तो लिहायला कोणताही निमित्त सापडत नव्हतं. काल-पर्वत अनंत चतुर्दशी झाली. गणपतीचे विसर्जन झाले. त्यानिमित्तानी पुरोगामी-प्रतीगामिंची बरीच (उथळ) चर्चा झाली. पुरोगामिंना गणपतीचं अस्तित्वच मान्य नसतं. पण समाजात थेट असं म्हणून चालत नाही, मग गणपतीचं दान करा. नदीत विसर्जन करू नका वगैरे गोष्टी सुरु होतात. काळानुसार आपण आपल्या सणांमध्ये बदल केला पाहिजे हे खरं आहे, आणि म्हणून 'वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन झाले पाहिजे' हा आग्रह आता कालबाह्य ठरला आहे. तो सर्वांनी प्रांजळपणे मान्य केला पाहिजे. हळू हळू हे चांगले बदल समाजात घडतानाही दिसतात. बहुसंख समाज या बदलांना अनुकुलही झाल्याचे चित्र आहे. क्रांतिकारी बदलांची सुरवात पुण्यातून होते म्हणतात, पुण्याच्या पाचही मनाच्या गणपतींनी ह्या वर्षी मूर्तींचे विसर्जन हौदात करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे समाज बदलतो आहे. वाहत्या पाण्यात खरं तर आपण मूर्तींचे विसर्जन करून त्या मूर्तीचीही विटंबनाच करतो. पुण्याजवळ एका पुलावरून वरून मूर्ती नदीत फेकण्यात आल्याची दृश्य सर्वांनी पहिली. हा उन्माद झाला. पण पर्यावरणाचा विचार करून आपण आपल्या सणांचं स्वरूप बदललंच पाहिजे. मातीच्या मूर्ती, त्याचं हौदात विसर्जन, एक गावं एक गणपती इत्यादीच सक्तीने अनुसरण झालं पाहिजे. त्यात कोणाच्याही धार्मिक भावनांचा प्रश्न असता कामा नये. असू नये. पण मला आज सांगायचाय तो मुद्दा वेगळाच आहे.

दर वर्षीच्या 'सामना' मध्ये 'ईद' नंतरच्या पेपर मध्ये एक फोटो असतो. 'नमाज पढताना मुसलमान' आणि त्याच्या खाली एक ओळ असते 'हिंदूंनो हे बघा ऐक्य', खरच आहे. आपण हिंदू कधी एक होत नाही. आपण सतत फुटलेले राहतो. हिंदू समाजात संघटना तत्वांचा अभाव आहे. यामुळेच आपण परकी आक्रमणांचे शिकार होत राहिलो. मुसलमान समाज एकसंध आहे. त्यांच्यात कितीही भांडणं असली तरीही बाहेरच्या शत्रूंबरोबर ते एकजुटीने लढतात. मुळात त्या समाजाची तत्व समाज जोडून ठेवणारी आहेत. ऐक्य नाही, ऐक्य नाही म्हणताना मला हिंदूंचे सण डोळ्यासमोर येतात. या एका  किरकोळ वाटणाऱ्या विषयाचा हात धरून बऱ्याच खोलात जायचं आहे.   विषय आहे 'हिंदू समाज आणि त्याची संघटना तत्व.'

गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा हे सर्व मोठे सन ही हिंदू धर्माची रूपं आहेत याची जाणीव ती साजरी करणाऱ्यांना असते का? मला वाटत नाही कि ही 'जाणीव' प्रत्येकाला आहे. हिंदू धर्माची म्हणजे कोणाची, त्यासाठी हिंदू कोण हे ठरवावं लागेल. त्यासाठी हिंदूची व्याख्या करावी लागेल. व्याख्या करायची म्हणजे खूपच मोठी जबाबदारी आहे. मला खूप साधी व्याख्या म्हणायची आहे. कणादांनी केलीली धर्माची व्याख्या प्रसिद्ध आहे. ज्याच्यामुळे भौतिक आणि पारलौकिक दोन्हीचा उत्कर्ष घडून येतो तो धर्म. पा.वां. काणे यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासात आणि महाभारतापासून ते सर्वपल्लीराधाकृष्णनांपर्यंत सर्वांनी 'धारण करणारा तो धर्म, पोषण करणारा तो धर्म' हीच मानली आहे. परंपरा मानणारे किंवा उपनिषद / ब्राह्मण आदि ग्रंथांमध्ये 'ज्याची उत्तरसीमा हिमालय आहे, ज्याची उत्तरसीमा सिंधू सागर आहे असा हा प्रदेश देव निर्मित आहे. त्या प्रदेशाचे नाव हिंदुस्थान आहे.' अशी सुद्धा व्याख्या सापडते. (१९३५ पूर्वी) बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हिंदू धर्माचा अभिमान बाळगत होते, तेव्हा त्यांना 'धारण करणारा धर्म' ही व्याख्या अपुरी वाटत असे. केवळ निर्बंध कळणारी ही व्याख्या आहे असं त्याचं मत होतं. 'वेद मानणारा तो हिंदू' ही टिळकांनी केलेली व्याख्या. ह्या भूमीला जो मातृभूमी आणि पितृभूमी मानतो तो कोणीही हिंदू आहे' असं सावरकर म्हंटले होते. केवळ सावरकरांनी 'हिंदू' ची भौगोलिक व्याख्या केली हा गैरसमज आहे. परंपरा वाद्यानीही भौगोलिक - इहवादी व्याख्या केलेली आहे. 

'हिंदू कोण' याच्या व्याख्याही अनेक आहेत तसेच त्याचे अन्वयार्थही अनेक आहेत. आज मी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जो माणूस स्वतःला मुसलमान किंवा ख्रिश्चन किंवा ज्यू समजत नाही असा प्रत्येक माणूस हिंदूच आहे. तुम्हाला धर्म नाकारण्याचेही स्वातंत्र्य केवळ हिंदू धर्मानेच दिलेलं आहे. तुम्हाला नास्तिक असण्याचाही स्वातंत्र्य हिंदू धर्माने दिलेलं आहे. देवावर टीका, त्याचा अस्तित्वावर प्रश्न या सर्वाचे स्वातंत्र्य तुम्हाला केवळ हिंदू धर्माने दिलेले आहे. विश्वाच्या निर्मितीचं काय रहस्य आहे, या सर्व नियमांमागे कोणी नियंता आहे का? या एका प्रश्नावर जगातील सर्व धर्म-तत्वज्ञानांची निर्मिती झालेली आहे. या तत्वज्ञानांचे जितके अविष्कार होतात, त्या सर्वांचा सखोल विचार भारतीय संस्कृतीने केलेला आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि ईश्वर आणि माणूस सदैव वेगळेच राहणार आहेत, ते कधीही एक होऊ शकत नाहीत. तर त्याला म्हणायचं द्वैती. आणि त्यालाच म्हणायचं मुसलमान. त्यांनाच म्हणायचं ख्रिश्चन. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि माझा देवावर विश्वास नाही.  तर त्या सांख्य तत्वज्ञानाचा विचारही भारतीय संस्कृतीने केलेला आहे. 'लोकायत परंपरा' ही भारतीय परंपरा आहे. अज्ञेयवादी ही भारतीय परंपरा आहे. ते कोणतं तत्वज्ञान तुम्हाला अचारायचं आहे, त्याचा सखोल विचार भारतीयांनी केलेला आहे. किती तऱ्हांनी भारतीयांनी विचार केला आहे बघा. इतका तत्वज्ञानांचा मेन्यू फक्त भारतात आहे. त्यांचे अनुयायी किती असतील विचार करा. अद्वैत, द्वैत, शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैत, केवलाद्वैत, राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हठयोग, प्रेमयोग, वैष्णव, शैव, चार्वाक, आर्यसामाजी, सत्यशोधाकी, नास्तिक, आस्तिक, अज्ञेयवादी, वैदिक, अवैदिक, जैन, बौद्ध, प्रार्थनासमाजी, ब्राह्मोसमाजी, लिंगायत, मराठ्यांची ९६ कुळे, ब्राह्मणांचे अनेक प्रकार ( ॠग्वेदी, यजुर्वेदी, सारस्वत, कोकणस्थ असे अनेक) सर्व प्रकारच्या जाती आणि संकरामुळे निर्माण झालेल्या असंख्य नवीन जाती. या सर्व शक्यतांचा तपशीलवार विचार भारतीयांनी केलेला आहे. हा तत्वज्ञानांचा मेन्यू हे भारताचे वैभव मानले जाते. शतकानुशतके हे भारताचे वैभव म्हणून सांगितले गेले. आम्ही किती वैविध्यपूर्ण आहोत हे सांगण्यात आमची शक्ती, बुद्धी खर्च झाली. पण मला असं वाटतं की या इतक्या विविधतेमुळेच आपले संघटन होऊ शकत नाही. या सर्वांपैकी तुम्ही कोणीही असा या सणांमध्ये सर्वांचा या ना त्या प्रकारे सहभाग असतो. मूळ गणेशोत्सव समान आहे, त्याची साजरे करण्याची अनेक रूपं असू शकतील. तर ही आपली संघटना तत्व होऊ शकत नाही का?

प्राचीन भारताच्या वैभवाच्या गोष्टी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा समाज एकवर्ण होता हे आपण वाचतो. वैभव नष्ट होण्याचं कारणच आहे कि समाज 'त्रै' किंवा 'चातुर्वर्ण' झाला ही आहेत. हा समाज एक व्हावा यासाठी कोणती 'तत्व' आपल्यासमोर आहे? इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी मध्ये जी टोकाची असहिष्णुता आहे, ती त्या धर्मामध्ये आहे, तीच त्या माणसांमध्ये उतरली आहे जे ज्यांना मान्य नाही तो प्रत्येक माणूस हिंदूच आहे. तुम्ही मना अथवा मानू नका. हे भारताचं संघटना तत्व होऊ शकत का? केवळ ढोल ऐकायला, विसर्जनाची मिरवणूक बघायला, दरवर्षीची सवय म्हणून, आंबट शौकीन ही वृत्तीच असलेले असे काही या विसर्जन मिरवणुकीला येतात. दहीहंडीचही तेच. नाचायला, परंपरा म्हणजे दरवर्षीची सवय म्हणून, कोणी अभिनेता अभिनेत्री येतात त्यांना बघायला म्हणून. दिवाळीचही तेच. सगळ्याच सणाचं तेच आहे. यामधला किती टक्के समाज ह्या जाणिवेनी हे सण साजरे करतो? या केवळ जाणीवेने समाज 'एक' व्यायला मदत होणार आहे. टिळकांनी याचं प्रेरणेने हा उत्सव सुरु केला नव्हता का?? त्याची पुन्हा एकदा आठवण होणे आवश्यक आहे.


आपल्या गणपती विसर्जनावर पोलीस महिना महिना बंदी घालतात आणि आपण हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून  आपण सोडूनही देतो. ही बंदी म्हणजे आपल्या धर्मस्वातंत्र्यावरही बंधन आहे असा विचार आपण करतच नाही. तो तसा विचार न करणं हे खरं प्रबोधनाचे लक्षण आहे खर, पण याचा अर्थ असा विचारायचं नाही करायचा असा होत नाही. आपण धर्माच्या कार्याला बाहेर पडतो आहोत ही एक 'जाणीव' ठेऊन समाज बाहेर पडेल तेव्हा त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होणार नाही का? ही हिंदूंची प्रचंड संख्या जी या सणांना बाहेर पडते ती एक शक्ती आहे त्याला डिवचण्याचा विचारही कोणी करेल का? हे आपलं संघटना  तत्व होऊ शकतं.           

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....