Sunday 13 September 2015

तारांबळीचा हतबल 'राग'

कुमार सप्तर्षी यांनी दैनिक सकळ आणि लोकमत मंथन मध्ये शेषराव मोरे यांच्यावर टीका करणारे दोन लेख लिहिले. दोनीही लेख पहिल्यांदा वाचल्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, सार्वजनिक ठिकाणी कोणी एखाद्याच्या धोतराला हात घातला तर उडणाऱ्या तारांबळिचा हतबल राग या दोनीही लेखांतून व्यक्त होतं आहे. लेख लिहिताना सप्तर्षी कोणत्या अवस्थेत होते हे जरा तपासून घेतले पाहिजे.

सप्तर्षींच्या अनेक मुद्द्यावर मी त्यांना खोडून काढायला तयार आहे. पण मला तितका वेळ नाही. कुमार सप्तर्षींच्या मूर्खपणावर आपण आपला वेळ खर्च करावा हे मला शक्य नाही.

पण ही मूर्खपणाची एक व्यवस्था निर्माण होते ती जस्त धोकादायक आहे. म्हणून वेळ देणे आवश्यक वाटते. अखंड भारत का नाकारला? हा ग्रंथ मी शब्द न शब्द वाचला आहे असं सप्तर्षी याचं म्हणण आहे. तरीही ते म्हणतात कि मोरे यांना पुरावे देण्याची गरज वाटत नाही. हे मुद्दाम करतात कि समाजाची दिशाभूलच करायची आहे? फक्त अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाला मोरे यांनी ३२४ ग्रंथांची संदर्भ सूची जोडलेली आहे, ती जरा सप्तर्षीनी वाचावी. विकावू बोलण्याची समाजवादी लोकांप्रमाणे मोरे यांना गरज नाही. शेषराव मोरे यांच्यावर टीका करताना कुमार सप्तर्षी कुरुंदकरांवरही टीका करतात. कुरुंदकर कसे दलित आणि मुस्लीम समाजाबद्दल प्रतिगमी होते हे सांगण्यात त्यांना हौस जास्ती. म्हणजे एखादा माणूस निम्मा प्रतिगामी निम्मा पुरोगामी असू शकतो? हा नवीन जावईशोध.

अनेक विषयावर बोलणे गरजेचे आहे पण दोन मुद्द्यांवर जस वेळ देणे आवश्यक आहे.

कुमार सप्तर्षी या प्राण्यानी सावरकरांबद्दल आवक्षारही काढू नये. सप्तर्शीने सावरकरांबद्दल बोलाव इतकी त्याची लायकी नाही. 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या जुन्या आवृत्तीच्या आधारे सावरकरांचे आणि नथुराम यांचे समलैंगिक संबंध होते असं म्हणणारा हा माणूस आहे. ह्या पुस्तकाच्या मूळ लेखकांनी हे संदर्भ बदलले तरी सप्तर्षी बदलायला तयार नाही. त्यामुळे सावरकर यांच्याबद्दल बोलण्याची लायकी सप्तर्षी याची नाही. तरीसुद्धा ते बोलतात.

मुळातसावरकर गांधी हत्येतून निर्दोष मुक्त झाले आहेत हि गोष्टच ते मान्य करायला तयार नाहीत. ती गोष्ट वैयक्तिक जखमेसारखी त्यांना झोंबत असावी. मंथन मधल्या लेखात ते म्हणतात कि,
''गांधीहत्येच्या आरोपाखाली स्रुरू असलेल्या खटल्यात ८ नं. चे सावरकर आरोपी होते. पण ते हुशार होते. ते कधीही पुरावा मागे ठेवत नसत. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील तुरुंगात ते नथुराम गोडसे व अन्य आरोपींना ओळखही दाखवत नसत. म्हणून सरदार पटेलांनी पं. नेहरुंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले. त्यापूर्वी त्यांनी सौदा केला. सावरकरांना सोडण्याच्या मोबदल्यात त्यांनी राजकारण सोडून द्यायचे''

मुळात हा जावईशोध लावला कुठून? हि सर्व वाक्य 'गांधी हत्या आणि मी' या गोपाळ गोडसे च्या पुस्तकातील आहेत. म्हणजे गोपाळ गोडसे ची भूमिका सप्तर्शीन मान्य आहे का? दुसरा मुद्दा नथुराम गोडसे आणि अन्य आरोपींना ओळख दाखवत नाही म्हणून सरदार पटेलांनी सावरकरांना निर्दोष सोडलं?
तिसरा मुद्दा कोणत्याही पुराव्याशिवाय पटेल आणि नेहरूंनी सावरकरांना सोडलाच कसं काय? गांधीजींच्या हत्येमध्ये आरोपी असलेले सावरकर नथुराम आणि अन्य आरोपींना ओळख दाखवत नाहीत म्हणून सोडून देणे हि जर पटेल आणि नेहरूंची भूमिका असेल तर नी न्याय्य आहे का?

त्याच्या पुढे सावरकरांना असं पटेल किंवा नेहरूंनी सोडलेलं नाही. १९४८ साली स्पेशल कोर्टनी सावरकरांना निर्दोष सोडलेलं आहे. न्यायालयाच्या मूळ निर्णयातील पुढची वाक्य आहेत.

२० जानेवारी १९४८ आणि ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत जे काय झालं त्यात विनायक दामोदर सावरकरांचा कोणताही रीतीने संबंध होता असे मानण्यास कसलेच संयुक्तिक कारण नाही. विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध झाले नसून ते दोषी नाहीत असे आढळून आले आहे. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.

आपण जे सांगू ते समाज ऐकतो असं जर सप्तर्षीना वाटत असेल तर ते मूर्खपणाचे आहे. शेषराव मोरे यांच्यावर टीका करण्यासाठी आपण पटेल आणि नेहरुंनासुद्धा गुन्हेगार ठरवत आहोत हे लक्षात येत नाही का?

ज्यामुळे सप्तर्षीना सावरकर दोषी वाटतात त्याचं कारण आहे 'कपूर समितीचा अहवाल.'
काय आहे कपूर समिती?
गांधी हत्येतील आरोपी नथुरामला १९४९ मध्ये फाशी झाली. अन्य आरोपींना जन्मठेप झाली. त्यामध्ये गोपाल गोडसे होते. १९६५ मध्ये गोपाल गोडसे जन्मठेप भोगून परत आले तेव्हा पुण्यात त्यांचा एक सत्कार करण्यात आला. त्या सत्काराच्या सभेत ग.वि. केतकर ( तरुण भारत चे संपादक) म्हणाले कि गांधी हत्येचा कट शिजतो आहे हे आम्हाला पूर्वीपासून माहिती होते. तसे आम्ही मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना सांगितलेही होते. पण तरीही कोणाच्यातरी हलगर्जीपणा मुले गांधी हत्या झाली. म्हणून सरकारने १९६५ साली कपूर समितीची स्थापना केली. ३ गोष्टी पडताळून पाहण्यासाठी.

१. ग.वि. केतकर याचं म्हणणं खरं आहे का?  ( गांधी हत्येचा कट शिजतो आहे हे पूर्वी पासून माहिती होतं का?)
२. हे जर माहिती होतं तर कोणाच्या हलगर्जीपणामुळे हत्या झाली?
३. पुढे असं होऊ नये उपाययोजना? 
या तीनच विषयावर मत मागितलेल्या कपूर समितीने आपल्या अधिकारात नसताना आणि कोणत्याही विश्वसनीय पुराव्यांशिवाय निष्कर्ष काढला कि गाधीजींची हत्या सावरकरांच्या सूचनेनुसार झाली. हा घटनाबाह्य अहवाल मान्य करून सप्तर्षीसारखे लोक सावरकरांना अजुनही दोषी मानतात.

सर्वात शेवटी हिंदुत्वाबद्दल. इस्लाम कसा 'रझाकार' संस्कृती च्या विरोधात आहे. पण हिंदू म्हणजे जो पूर्वकर्मविपाक मानतो, जो जातीव्यवस्था मानतो, अस्पृश्यता मानतो तो हिंदू अशी हिंदू ची व्याख्या त्यांनी करून टाकली हीच भूमिका मानूस्मृतीची नाही का? मानूस्मृतीचीच भूमिका सप्तर्शीनी आधुनिक भाषेत मांडली आहे.

वैयक्तिक शेषराव मोरे यांच्यावर जी टीका केली आहे त्याला प्रतिउत्तर मोरेच देतील. पण सावरकर आणि हिंदुत्वाबद्दल जे काही ते ओकलेत ते आपण साफ केलं पाहिजे हि माझी भूमिका आहे.




No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....