Saturday 4 April 2020

तबलीग आणि कोरोन - एक अभद्र युती

(source - ORF online)

भारतामध्ये कोरोन व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ३० जानेवारी रोजी सापडला. आज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातील कोरोना बाधितांची संख्या २५४७ पर्यंत पोहोचलेली आहे. यावर कठोर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. आणि २४ तारखेपासून २१ दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तो अजूनही सुरू आहे. कोरोना या जागतिक संकटाचा हवाला देताना अभ्यासक आणि पत्रकार चौदाव्या शतकातील ‘ब्लॅक डेथ’पासून पहिल्या महायुद्धानंतर उद्भवलेल्या स्पॅनिश फ्लूचे दाखले देऊन कोरोनाचं संकट समजून देण्याचा प्रयत्न करत आहेत. इटली, स्पेन आणि आता अमेरिका आणि उर्वरीत युरोप खंडात हा व्हायरस ज्या वेगाने पसरतो आहे आणि तिथली वैद्यकीय सेवा आणि उपलब्धता यांचा विचार केला आणि भारताचा विचार केला तर त्याचं गांभीर्य आपल्याला समजू शकतं. पण या कशाचंही गांभीर्य न समजल्यासारखा भारतातील मुस्लीम समाज वागतो आहे का? अशी शंका यावी अशा घटना गेल्या ४-५ दिवसांत भारतभर घडलेल्या दिसत आहेत. 


जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी म्हणजे २१ मार्च रोजी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकार आणि केद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून ८२४ परदेशी लोकांवर लक्ष ठेवून काळजी घेण्याविषयी कळवलं होतं. हे ८२४ लोकं दिल्लीतील निजामुद्दीन येथे होत असलेल्या तबलीग जमातीच्या वार्षिक संमेलनासाठी विविध देशांतून आलेले होते. २१ मार्चच्या केंद्र सरकारच्या पत्रात परदेशातून तबलीगच्या संमेलनासाठी आलेल्यांची संख्या ८२४ नोंदवली  होती.(1) तबलीगच्या संमेलनाला विविध देशांतून आलेले लोकं भारतातही वेगवेगळ्या भागांत फिरले. काल म्हणजे २ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे, त्यात ताबलीगच्या दिल्लीतील कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेल्यांची संख्या १०६२ इतकी नोंदवली आहे.(2)  मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून २१ तारखेपर्यंत ३ आठवड्याला तीन वेगळ्या मिटींग्ज पार पडलेल्या आहेत. १ मार्च ते २१ मार्च या काळात परदेशातून या संमेलनासाठी नेमके किती लोकं देशात आले, त्यापैकी किती लोकं आपल्याबरोबर हा व्हायरस घेऊन आले आणि ते पुन्हा भारतभर फिरले याचा नेमका आकडा मात्र अजूनही कळू शकलेला नाही. ‘लल्लनटॉप’ या मिडीया हाऊसने तो आकडा चार हजारहून अधिक असू शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.(3)  भारतातून अशाही बातम्या अनेक ठिकाणाहून बाहेर येत आहेत, की परदेशी मुसलमान तिथल्या तिथल्या मशिदीमध्ये लपून बसले आहेत. आणि त्यांना तिथले मुसलमान अभय देत आहेत किंवा त्यांचा बचावासाठी पुढे येत आहेत. याचे निश्चित आकडे एएनआय ही न्यूज एजन्सी त्यांचा ट्विटरवर दर मिनिटाला अपडेट करत आहेत.(4)  पण या आकड्यांपेक्षा अधिक धोकादायक बातम्या पुढे आल्या आहेत, त्या म्हणजे उपचार करणाऱ्या नर्सेस बरोबर गैरवर्तन केलेल्या रूग्णांमध्ये तबलीगचे लोकं सापडले आहेत. जे कोरोना बाधित संशयित म्हणून डॉक्टर तपासणीसाठी त्यांना घेऊन जात आहेत त्या डॉक्टरांवर ते थुंकले काय, पाणी पिऊन त्याच्या चुळा भरल्या काय! 


‘तबलीग जमात’ हे नेमकं काय प्रकरण आहे, मरकझ म्हणजे नेमकं काय ते आपण जरा पाहू.कारण दिल्ली सरकारने आज जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या ३८६ आहे त्यापैकी २५९ रुग्ण तबलीगशी संबंधित आहेत. हे आकडे फक्त राजधानीतील आहेत. आज भारत देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या २५४७ झाली आहे, त्यापैकी ६४७ रुग्ण तबलीगी आहेत.(5)  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात हे तबलीगशी संबंधित लोकं वीसपेक्षा अधिक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात फिरले आहेत. तर केवळ कल्पना करा की हा आकडा कुठेपर्यंत जाईल. कोरोना या समस्येशी सध्या संपूर्ण जग लढत आहे. अशी जागतिक समस्या समोर उभी असताना आणि सरकारचे जमावबंदीचे आदेश असताना चार हजारहून अधिक लोकं दिल्लीमधील एका भागात जमतात, नंतर ते भारतभर प्रवास करतात, डॉक्टरांना त्रास देतात. पोलिसांना सहकार्य करत नाही, उपचार करणाऱ्या नर्सेसशी असभ्य वर्तन करतात, तेव्हा हे नेमके कोण आहेत हे जाणून घेतलच पाहिजे. 


भारतात ब्रिटीशांचं राज्य पूर्णपणे प्रस्थापित झालं होतं. आणि भारत ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ताब्यात घेतला होता. या सगळ्या काळात मुसलमान समाज सत्तेपासून दूर गेला तसा तो इस्लामपासूनही दूर दूर गेला. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर दिल्लीच्या उपनगरातील एक ठिकाण म्हणजे आताचं ‘गुरगाव’. १८७७ सालच्या अलवार गॅझेटियरमध्ये तिथल्या ब्रिटीश अधिकाऱ्याने नोंदावेला अभिप्राय असा आहे की, ‘इथले मुसलमान केवळ नावापुरते मुसलमान उरले आहेत. त्यांच्या ग्रामीण देवता या हिंदूंप्रमाणेच आहेत आणि ते हिंदू सणही साजरे करतात. होळी हा सण ते मुहर्रम आणि ईद प्रमाणेच साजरे करत आहेत. लग्नाच्या तिथ्या ठरवण्यामध्ये ते ब्राह्मणांची मदत घेतात. त्यांनी त्यांची नावंही हिंदूंप्रमाणेच ठेवायला सुरवात केली आहेत. अर्थात ‘राम’ हे नाव त्याला अपवाद आहे. ते त्यांच्या धर्मापासून, त्यांच्या श्रद्धेपासून दूर गेले आहेत.’(6) १८६६ साली सहारणपूर येथे देवबंद स्कूलची स्थापन झाली होती. ज्यासाठी देवबंद स्कूल आणि अलीगड विद्यापीठाची स्थापन झाली त्याची कारणं दिल्लीच्याच आसपास अजूनही शिल्लक होती. 


१८८४ साली जन्म झाला मुहंमद इलियास इब्न मुहंमद इस्माईल यांचा. मुझफ्फरनगर जवळच्या कंधाल गावात यांचा जन्म झाला. मुहंमद इलियास देवबंद स्कूलमध्ये इस्लामी धर्मशास्त्र आणि हादीस शिकवत असत. मक्केच्या दुसऱ्या यात्रेहून परत आल्यावर आणि त्यांच्या भारताच्या यात्रेच्या दरम्यान ब्रिटीश अधिकाऱ्याने नोंदवलेलं वर्णन त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. इस्लामचं हरवलेलं वैभव पुन्हा एकदा मिळवण्यासाठी एका संघटनेची त्यांना गरज वाटली. पूर्वी तसा प्रयत्न त्यांनी देवबंदमध्ये असताना एकदा केला होता. जो अभिप्राय ब्रिटीश अधिकाऱ्याने नोंदवला होता तो दिल्लीच्या जवळचा मेवात भागातला. तर त्या भागातील मुसलमानांच्या धार्मिक शिक्षणासाठी मशिदींची संघटना बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना अपेक्षित होतं की यातून ‘धर्मप्रसारक’ तयार व्हावेत. पण त्यांना असं लक्षात आलं की, इथून केवळ अभ्यासक तयार होत आहेत. त्यांनी देवबंद येथील नोकरी सोडली आणि ते दिल्लीमध्ये निझामुद्दीन येथे येऊन स्थायिक झाले. तिथे १९२७ साली त्यांनी ‘तबलीग़ी जमात’ची स्थापना केली. जमात म्हणजे assembly, गट किंवा संघटना. आणि ताबलीग म्हणजे propagating the faith, ‘श्रद्धेचा प्रसार’. मुहंमद इलियास यांचं असं मत होतं की, मूळच्या अधिक शुद्ध इस्लामपासून आपण दूर गेलो म्हणून आपल्यावर अशी वेळ आली आहे. तेव्हा मूळच्या इस्लामचा प्रसार करण्यासाठी आपल्याला धर्मप्रसारक हवे आहेत. असे मिशनरी आपल्याला निर्माण करण्यासाठी एक संघटना पाहिजे. म्हणून त्यांनी ताबलीग या जमातीची स्थापना केली. 


इस्लामचा संदेश जाहीरपणे सांगत राहणे, त्याचा शक्य असेल तितका प्रसार करत राहणे हेच या संघटनेचे धेय्य आहे. म्हणूनच या संघटनेने त्याच्या प्रारंभापासून कधीही राजकीय-आर्थिक महत्त्वाकांक्षा ठेवलेल्या नाहीत.(7) राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत या कारणासाठी दिल्लीच्या इतक्या जवळ असूनसुद्धा एका मूलतत्ववादी संघटनेच्या स्थापनेला आणि प्रसाराला ब्रिटिशांनी कधी विरोध केला नाही. धर्माचा प्रसार हा कोण्या मूठभर लोकांची जबाबदारी नाही, तर ती सर्व मुसलमान समाजाची जबाबदारी आहे, असं संघटनेचं मत होतं.(8)  आणि म्हणून प्रत्येक मुसलमान व्यक्तीने आपल्याकडे जे असेल त्याच्यासह धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी झालं पाहिजे, असं ते मानीत. मुस्लीम ब्रदरहूड या जागतिक संघटनेचा एक मुख्य नेता आणि इस्लामी पुनरुज्जीवनाच्या चळवळीतील एक महत्त्वाचं नाव रशीद रीदा यांनी असं म्हटलं होतं की, tabligh was and is a duty of all muslims.(9)  या धर्मप्रसारामध्ये धर्मांतर अन्युस्युत आहे. अगदी प्रारंभीच्या काळी धर्मांतर ही धर्मप्रसाराकाची जबाबदारी मानण्यात आली नव्हती. पण ते कायम गृहीत धरलेलं आहे. 


ज्या मेवात भागातील मुसलमानांसाठी मुख्यतः ही संघटना उभी राहिली होती, त्यांच्यासाठी मग इलियास यांनी दीर्घ प्रवचनं होत असतं. ज्या सहा तत्त्वांवर ताबलीगची स्थापन झाली होती, त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे ‘ज्ञान’, धर्माचं ज्ञान. ज्या धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनरी तयार करायचे आहेत त्या धर्माचं पुरेसं ज्ञान मिळालं पाहिजे, यासाठी इलियास यांनी प्रवचनं होत असतं. १९२८ ते १९६२ या कळात Teachings of Islam या नावाने ९ खंड तबलीग तर्फे प्रकाशित करण्यात आले आहेत. ९ खंडातील ते साहित्य सध्या दोन खंडात एकत्रित करण्यात आले आहेत. सर्व मुस्लीम ‘सुधारकां’प्रमाणे इलीयास यांचंही असंच म्हणणं होतं की, Aim is to unite muslims socially in embracing the lifestyle of Muhammad. ते असं म्हणत असतं की, ‘इस्लामच्या अगदी सुरवातीच्या काळात जेव्हा इस्लामचे अनुयायी खूप कमी होते, तेव्हा स्वतः प्रेषितसुद्धा धर्मप्रचारासाठी बाहेर पडत असत. आणि जे थोडेफार अनुयायी होते ते सुद्धा धर्मप्रसारासाठी बाहेर पडत असतं. त्यानंतर प्रेषितांनी धर्मप्रसारासाठी बाहेरच्या प्रदेशात तुकड्या पाठविण्यास प्रारंभ केला होता. तो इस्लामचा वैभवाचा काळ होता, कारण इस्लामला खूप थोड्या कालावधीत बहुसंख्य अनुयायी मिळाले. तेव्हा समाजाला चारित्र्य प्राप्त झालं होतं. या सगळ्याचं कारण असं होतं की, धर्मप्रसाराचा उत्साह प्रेषितांसह सगळ्यांत होता. धर्मप्रसाराचा तो उत्साह जेव्हा कमी पडला तेव्हा आदर्श खिलाफतही नष्ट झाली.’(10) 


‘लाईफ आणि मिशन ऑफ मौलाना मुहम्मद इलियास’ या पुस्तकात ताबलीगची उद्दिष्टे सविस्तरपणे दिलेली आहेत. त्यात लेखक सांगतो, की ताबलीगचा मुख्य हेतू होता, ‘जे मुसलमान आहेत त्यांच्या श्रद्धा बळकट व्हाव्यात’ यासाठी काम करायचं. मुस्लीम ऐक्य हेही तसच प्राथमिक उद्दिष्ट होतं. आणि धर्मप्रसारक तयार करणे हे एक. इलियास यांच्या शब्दात सांगायचं तर, The basic aim of Tabligh movement is the revival of the glory of these tenets and duties to bring about a change from scoffing to reverence. इलियास सांगतात की तबलीगचे काम दोन पातळ्यांवर चालेल. एक भौतिक आणि एक अध्यात्मिक. त्याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात, भौतिक म्हणजे, Revival of the practice of travelling in batches from place to place and country to country for the propagation of the Guidance brought by the Prophet.(11)  प्रेषितांनी दिलेला संदेश अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी तुकड्या-तुकड्यांनी विविध देश, विविध ठिकाणं फिरलं पाहिजे. तबलीगच्या दिल्लीतील कार्यक्रमानंतर ते देशभर का विखुरले गेले लक्षात आलं का? आणि आध्यात्मिक काम हे स्वतःवर करायचं आहे. जे अल्लाहने कुराणमध्ये सांगितलं आहे, त्याप्रमाणे आपण वागतो आहोत की नाही, ते सतत तपासून पाहणे म्हणजे अध्यात्मिक उन्नती.  


ज्या सहा तत्वांचा वर उल्लेख केला ती अशी, १. नमाज, २. श्रद्धेचा जाहीरनामा, ३. ज्ञान, ४. इतर मुसलमानांचा आदर, ५. हेतूवरची निष्ठा, ६. धर्मांतर.(12) 


मुसलमान समाजात असणारे समाजिक वर्ग दूर करणे हेही संघटनेचे आद्य तत्त्व होते. या सहामधलं पाहिलं तत्व ‘नमाज’ हे ही त्याचाच एक भाग मानले आहे. सामुहिक नमाजसाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकं एकत्र येतात त्याने सामाजिक दरी दूर होऊन इस्लामसाठी सगळे एकत्र कार्य करू शकतात, अशी त्यामागची भावना होती. ‘इतर मुसलमानांचा आदर’ हे तत्व ही त्याच्यासाठीच आहे. या सगळ्या कार्यासाठी ‘मरकझ’ म्हणजे केंद्र, इलियास आणि निवडला तो दिल्लीतील निझामुद्दीन हा भाग. आज जगभरात १८० ते २०० देशांत पसरलेल्या आणि २० ते २५ कोटी समर्थक असलेल्या या संघटनेचे मुख्यालय म्हणजे ‘मरकझ’ही दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीन हाच भाग आहे. (13)  भारतात असलेल्या प्रत्येक मुसलमानापैकी दुसरा मुसलमान तबलीगी आहे. इलियास यांच्या सगळ्या कार्याचा आढावा, त्यांनी जी घोषणा संघटनेच्या स्थापनेच्या वेळी दिली त्यातून घेता येतो. ‘O Muslims, become [true] Muslims!", मुसलमानांनो, खरे मुसलमान व्हा! 


१९२७ साली स्थापन झालेल्या या संघटनेच्या वार्षिक संमेलनाला १९४१ साली २५००० लोक आले होते. १९४३ साली संघटनेचे संस्थापक मुहंमद इलियास यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा मुहंमद युसुफ कंधालवी हे तबलीगचे मुख्य म्हणजे आमीर झाले. यांच्या काळात तबलीगचा जगभर अतिशय वेगाने प्रसार झाला. २०१८ साली तबलीगची वार्षिक सभा औरंगाबाद येथे झाली होती. त्याला ४० लाख लोकं आली होती.(14)  त्याच्या आधीच्या वर्षी अशी सभा ढाक्यात झाली होती त्याला ३० लाख लोकं आली होती. धर्मप्रसार आणि धर्मांतरासाठीच्या जागतिक यात्रा यांच्या काळातच निघाल्या. १९४६ साली सौदी अरेबिया आणि इंग्लंडला या यात्रा गेल्या. ७० आणि ८० च्या दशकात अशा यात्रा अमेरिका, फ्रान्स आणि युरोपातील अन्य राष्ट्रे यांच्यात गेल्या. मध्यआशियातील देशांत आणि नंतर रशियामध्येही या यात्रा पोहोचल्या. १९९५ साली तबलीगचे अमीर इमाम अल हसन यांच्या मृत्यूनंतर असं ठरलं की १४ जणांचं शूरा कौन्सिल तबलीगचा कारभार पाहिल. तबलीगच्या स्थापनेपासूनच अशी शूरा कौन्सिल अस्तित्त्वात होती, पण ती शूरा कौन्सिल एक नेता निवडत होती. १९९५ पासून ते पद्धत बंद करून एका ट्रस्ट प्रमाणे ही समिती काम करू लागली. शूरा कौन्सिलच्या निमित्ताने एक आठवण करून देतो की, प्रेषितांनंतर खलिफा कोणी व्हायचं हे ठरवण्यासाठी पहिल्या चार आदर्श खलिफांनीही शूरा कौन्सिलचीच मदत आणि सल्ला घेतला होता. शूरा कौन्सिल हा संस्था इस्लामच्या जन्मापासून आजपर्यंत टिकून आहे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ यांचा ‘खलिफा अबू बकर अल बगदादी’ यालाही सल्ला देणारी शूरा कौन्सिल अस्तित्वात होती.(15)  तबलीगचा आताचा नेता मौलाना साद कंधालवी हा संस्थापक इलियास याचा पणतू. पण तो तबलीगच्या एका गटाचा नेता आहे. 


कुराण आणि हादीस यांचेच संदर्भ देऊन इलियास बोलत असत त्यामुळे ते कोणत्या परंपरेचे आहेत ही चर्चा गौण आहे. तरी एक अभ्यास म्हणून सांगणे महत्त्वाचे आहे. इस्लामी धर्मशास्त्रीच्या हनाफी परंपरेचे ते होते. पण हे धर्मशास्त्र कायदा या अर्थाने वापरले जाते. ‘तबलीग’च्या संपूर्ण मांडणीत राज्य कोणत्या कायद्यानुसार चालेल, हे येतच नाही. केवळ धर्मप्रसार आणि धर्मांतर इतकीच उद्दिष्टे ठेवल्याने शरियत त्याच्या परंपरा तबलीगच्या संदर्भात अस्थानी ठरतात. 


तबलीगचा अनेक दहशतवादी कारवायांमध्येही सहभाग असल्याचे दिसून आले आहे. काही काही देशांमध्येतर या संघटनेवर बंदीदेखील घालण्यात आली आहे. पण संघटनेच्या मूळ उद्दिष्टांनुसार धर्मप्रसार आणि धर्मांतर हीच मुख्य कामं ठरवण्यात आली आहेत. पण त्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून तसं वाटत नाही. शिवाय जे साडेसहाशे कोरोना बाधित रुग्ण तबलीगशी संबंधित आहेत त्यांच्याशिवाय बाकीचे आपणहून पुढे का येत नाहीत? देशातले मुसलमान परदेशी मुसलमानांना वाचवण्यासाठी या देशातील पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना त्रास का देत आहेत. मौलाना साद यांची समोर आलेली ऑडीयो क्लिप काय सांगते? तबलीगशी संबंधित नसलेले मुसलमान इतक्या आणीबाणीच्या काळात मशिदीमध्ये एकत्र का येत आहेत? एकत्र येण्यावर बंदी असतानाही पोलिसांना सहकार्य का करत नाहीत? याची कारणं शोधताना निःसंशयरीत्या इस्लामचा अभ्यास करावा लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही.   






संदर्भ - 
  1. महाराष्ट्र राज्य २ एप्रिल २०२० प्रेस नोट - नवीन करोना विषाणू (कोिवड -१९) - सद्यस्थिती आणि उपाय योजना
  2. Life And Mission Of Maulana Mohammad Ilyas - Abul Hasan Nadvi - page 24

  3. Encyclopedia of Islam - VOL 8 - Page 48
  4. Encyclopedia of Islam - VOL 8 - Page 48
  5. Tabligh - Oxford Islamic Studies Online
  6. Life And Mission Of Maulana Mohammad Ilyas - Abul Hasan Nadvi - page 135

  7. Life And Mission Of Maulana Mohammad Ilyas - Abul Hasan Nadvi - page 136

  8. Life And Mission Of Maulana Mohammad Ilyas - Abul Hasan Nadvi - page 137

  9. Sameer Arshad (22 July 2007). "Tabligh, or the enigma of revival". The Times of India
  10. Uddin, Sufia M. (2006). Constructing Bangladesh (illustrated ed.). UNC Press. p. 224. ISBN 0-8078-3021-6.

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....