Tuesday 27 March 2018

‘हादीस’ साहित्य


‘इस्लाम’शी निगडीत बहुतेक सर्व बाबी हिंदूंना अपरिचित आहेत. कुराणचे स्वरूप कसे आहे, शरियत, म्हणजे काय, इस्लामी इतिहास आणि मुसलमानी इतिहास यात काही फरक आहे का, धर्म तत्वज्ञान आणि राजकीय तत्वज्ञान यात फरक आहे का, राजकारण अर्थकारण समाजकारण हे धर्मापासून वेगळं काढता येतं का. असे इस्लाम संदर्भातले बहुसंख्य प्रश्न हिंदूना पडलेले आहे. पण काही अपवाद वगळता कोणीही या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आज मी तो प्रयत्न करणार आहे. मागच्या लेखात ‘कुराण’ची प्रार्थमिक ओळख करून देण्याचा मी प्रयत्न केला होता. आता ‘हादीस’ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.

मूळ ‘इस्लाम’चे अभ्यास करायचे तीन प्रमुख सोर्स आहेत. सर्वप्रथम मुहंमद पैगंबर यांचे चरित्र, त्यानंतर कुराण आणि शेवटी हादीस. कुराणची निर्मिती कशी झाली हे मागच्या लेखात मांडले आहे. कुराणची निर्मिती आणि प्रेषित पैगंबर यांचे चरित्र एक एकत्र प्रवास करणारे आहे, त्यामुळे कुराणातील वचनांचा अर्थ तेव्हाच यथायोग्य कळू शकेल जेव्हा आपल्या समोर प्रेषितांचे चरित्र उपलब्ध असेल. ‘कुराण’ म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब म्हणता येईल. पण कुराणचा आवाका मर्यादित आहे. ११४ सुरह म्हणजे अध्याय आणि ६२२५ आयती. त्याच्या तुलनेत सुद्धा प्रेषितांचे चरित्र खूप मोठे आहे. विशिष्ट एका परिस्थितीमध्ये प्रेषित कसे वागले, कसे बोलले याचा कोश म्हणजे ‘हादीस’. ज्या प्रश्नांची उत्तरं कुराणातून मिळत नाहीत, त्याची उत्तरं हादीसमध्ये शोधली जातात. शिवाय कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी ‘हादीस’चा सुद्धा आधार घेतला जातो. गेल्या लेखात ‘कुराण’ म्हणजे इस्लामी धर्मशास्त्राचा सर्वश्रेष्ठ आधार आपण पहिला. आता कुराणनंतर महत्व आहे ते हादीसचे, त्याची थोडक्यात ओळख आपण करून घेऊ.

अरेबिक शब्द ‘हादिथ’ याचा अर्थ संवाद, संभाषण, गोष्ट असा होतो. कुराणात सुद्धा वेगवेगळ्या अर्थाने ‘हादीस’ या शब्दाचा वापर एकूण २३ वेळेला केला गेला आहे. हादीसला समानार्थी म्हणून मुख्य ३ शब्द आहे. त्यामध्ये ‘खबर’, ‘अथर’, आणि ‘सुन्ना’. ‘खबर’ या शब्दाचा अर्थ ‘हादीस’या शब्दाप्रमाणेच घेतला जातो. ‘अथर’ या शब्दाचा अर्थ मात्र ‘प्रेषितांच्या सहकाऱ्यांच्या कृतींशी संबधित आहे’. ‘हादीस’ला सर्वात जवळ जाणारा शब्द म्हणजे ‘सुन्ना’ हा आहे, किंबहुना त्याचा अर्थ ‘हादीस’पेक्षा वेगळा आहे.

‘सुन्ना’ या शब्दाचा अरेबिक भाषाशास्त्रानुसार अर्थ ‘मार्ग’, ‘दिशा’, ‘नियम’, ‘आचरणाचा धर्म’ इत्याही होतात. कुराणात ‘सुन्ना’ किंवा याचा एकवचनी ‘सुनान’ हा शब्द सुमारे १६ वेळा वापरला आहे. आणि सगळीकडे वर सांगितलेल्या अर्थाने वापरलेला आहे. ‘प्रेषितांच्या सुन्ना’ काटेकोर पाळणारे लोक म्हणजे ‘सुन्नी’. इस्लामी कायद्याचा ‘हादीस’ हा दोन नंबरचा आधार आहे. त्यामुळे ‘हादीस’ संकलनाचे, अभ्यासाचे शास्त्र तयार करण्यात आले आहे.
प्रेषितांच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे ‘कुराण’च्या अधिकृत आवृत्तीची गरज भासू लागली, त्याप्रमाणे कुराणच्या मर्यादासुद्धा जाणवू लागल्या. म्हणून प्रथम कुराणची अधिकृत आवृत्ती तयार केली गेली. तेव्हाच ‘हादीस’ म्हणजे प्रेषितांच्या कृती आणि उक्ती सुद्धी गोळा केल्या पाहिजेत अशी गरज निर्माण झाली, पण ‘हादीस’मुळे कुराणकडे दुर्लक्ष होईल या भीतीने ‘हादीस’ संकलनाचे काम सोडून देण्यात आले. खलिफा उमर दुसरा (६८२-७३२) यांच्या काळात आणि त्यांच्याच आज्ञेने हादीस संकलनाचे काम पुन्हा सुरु झाले. अनेक संशोधकांनी जगभर फिरून प्रेषितांच्या स्मृतीकथा गोळा केल्या होत्या, पण काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या.

आज उपलब्ध असणाऱ्या हादीस संग्रहांपैकी ‘इमाम मलिक’ यांचा सुमारे एक हजार कथांचा ‘मुवत्ता’ म्हणजे उपलब्ध आहे. पण त्यात केवळ प्रेषितांच्या कथा नाहीत, त्यात सुरवातीच्या खालीफांचे फतवे, तत्कालीन कायद्याच्या परंपरा असे सर्व त्यात आहे. पण त्यात हादीसचे पुरावे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इस्लामी परंपरेत ‘मुवत्ता’ हा हदीस संग्रह न मानता, कायद्याच्या परंपरेचा हादीस संग्रह मानतात.

आज ‘हादीस’चे संग्रह संकलकाच्या नावे प्रसिद्ध आहे. स्मृतीकाथांचे अनेक संकलक आहे, पण इस्लामी कायद्यात सर्वांचे स्थान सारखे नाही. हादीस संकलित करताना त्यांच्या विश्वासार्हता तपासून घेऊन संकलित केलेले सहा हादीसचे संग्रह सर्वात प्रमाण मानले जातात. त्यामध्ये १. सहिह बुखारी (हादीस संख्या – ७५६३) , २. सहिह मुस्लीम (हादीस संख्या – ७५६३), ३. अबू दावूद (हादीस संख्या – ५२७४), ४. जमियत त्रीमिधी (हादीस संख्या – ३९५६), ५. अन निसाई (हादीस संख्या – ५७७१) आणि ६. इब्न मजह (हादीस संख्या – ४३४१). या सहा संकालाकानी संग्रहित केलेले हादीस सर्व जास्त प्रमाण मानले जातात. या सहा पैकी सुद्धा पहिले दोन म्हणजे बुखारी आणि मुस्लीम सर्वात जास्त विश्वासार्ह आहेत, म्हणून त्यांना ‘सहिह’ म्हंटले आहे. यांच्या शिवाय शिया परंपरेचे सुद्धा चार संग्रह आहेत. पण शिया हादीस मध्ये प्रेषितांच्या गोष्टींबरोबर शिया इमामांच्या पण गोष्टी त्यात आहेत.

हादीसची रचना कशी असते ते सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. सर्व हादीसचे संकलक प्रेषितांच्या मृत्यूनंतर साधारण दीडशे वर्षांनी जन्माला आले आहेत. त्यामुळे प्रेषितांच्या गोष्टी त्यांनी इतर लोकाकांडून ऐकून संकलित केल्या आहेत. ‘अ’ ने ‘ब’ कडून ऐकलं, ‘ब’ ने ‘क’ कडून ऐकलं ‘क’ ने प्रेशितांकडून ऐकलं अशी एक साखळी निर्माण होते. या साखळीतला शेवटचा दुवा म्हणजे ‘अ’ तो हादीस संकलकाला तो गोष्ट सांगतो. मह त्याची सत्यता तपासून घेऊन संकलक त्याची नोंद करून ठेवतो. हादीसच्या सत्यातेच्या चार पातळ्या आहेत. ‘सहीह’ म्हणजे सर्वात विश्वासार्ह. त्यानंतर ‘हसन’ म्हणजे ‘सहिह पेक्षा कमी’, ‘दाईफ’ म्हणजे कमजोर आणि शेवट ‘मौदू’ म्हणजे प्रक्षिप्त, ढवळाढवळ केलेलं. प्रत्येक हादीसच्या वर त्याची सत्यतेची पातळी लिहिलेली असते. सहिह बुखारी आणि सहिह मुस्लीम यांच्या हादीस मध्ये सत्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून त्यांच्या संग्रहात असे शब्द दिसणार नाहीत, इतरांच्या संग्रहात दिसतील. मूळ नोंदवलेल्या गोष्टींची संख्या काही लाखाच्या घरात जाते, एकट्या बुखारी यांनी सुरवातीला नोंदवलेल्या गोष्टी काही लाखात जातात, पण त्यांची सत्यता आणि विश्वासार्हता तपासून घेऊन त्या सात हजाराच्या घरात आलेल्या आहेत.

आज मुसलमान कसे वागतात, किंवा असे का वागतात याची बहुतेक सर्व उत्तरं तुम्हाला ‘हादीस’ संग्रहात मिळतील. रोज भारतात ‘गज्वा ए हिंद’ ची चर्चा ‘तारेक फतेहच्या कृपेनी होती, त्या ‘गज्वा ए हिंद’ पासून मुसलमान दाढी वाढवतात पण मिशी कमी ठेवतात किंवा ठेवत नाहीत, इथपर्यंत सर्व गोष्टींची मूळं हादीसमध्ये सापडतील. उदाहरणादाखल काही हादीस इथे मुद्दाम सांगणार आहे.

अकबराच्या दरबारात ‘गोहत्येसंबंधात’ कुराण आणि हादीसचे काय म्हणणे आहे, अशी शंका अकबराने विचारली. तेव्हा त्याच्या दोन मौलवींनी नरकात जाणाऱ्या चार लोकांची यादी हादीसमध्ये आहे असं सांगितलं, ते चार लोकं कोण कोण तर – पिंपळाचे किंवा बोरीचे हिरवे झाड कापणारा, मनुष्य विक्री करणारा, गाईची वध करणारा आणि व्यभिचारी’. पण गोहत्या संदर्भात बुखारी (हादीस क्रमांक – १७०९) आणि मुस्लीम (हादीस क्रमांक – २४८६) यांची प्रत्येकी एक एक हादीस आहे, ज्यात प्रेषितांनी स्वतःच्या हाताने गाईची बळी दिला आहे, आणि ते गोमांस ‘धर्मादाय संस्थेला दान’ करावे असे सांगितले आहे. हे दोन्हीही हादीस बुखारी आणि मुस्लीम यांच्या संग्रहातील असल्यामुळे त्यांच्यासमोर त्यांची विश्वासार्हतेची पातळी सांगणारे शब्द दिलेले नाहीयेत.

पन तारेक फतेहच्या कृपेनी भारतात हल्ली ‘गज्वा ए हिंद’ बद्दल जागरूक झाली आहेत. त्यावर चर्चा करत आहेत. ते हादीस उदाहरणा दाखल सांगतो. अन निसाई यांनी ३१७७ क्रमांकाची हादीस नोंदवली आहे, त्यात ते म्हणतात थक़्बन नावाच्या मुक्त केलेल्या गुलामाने प्रेषित पैगंबर यांच्याकडून ऐकले होते कि, ‘माझ्या उम्माचे दोन गट आहेत, ज्यांना अल्लाह नरकाच्या आगीपासुन मुक्त करेल. पहिला गट जो भारतावर स्वारी करेल (invade india) आणि दुसरा गट जो ‘इसा बिन मार्याम’ बरोबर राहील’ यामध्ये invade india ला अरेबिक संकल्पना आहे ‘गज्वा ए हिंद’. अन निसाई यांनी या हादीसला ‘हसन’ चा दर्जा दिलेला आहे.

साधारणपणे फतवे जे काढले जातात ते ‘हादीस’चे संदर्भ देऊन काढले जातात. खऱ्या अर्थाने बेडरूम पासून युद्धमैदानापर्यंतचे सर्व आदेश किंवा दिशा हादीसमधून मिळतात.

- मुकुल रणभोर ©
- mukulranbhor111@gmail.com
- mukulranbhor.blogspot.in

कुराण


'कुराणया शब्दाची उत्पत्ती 'कराया मूळ अरबी शब्दापासून झाली आहे. 'करायाचा अर्थ एकत्र करणे असा होतो. प्रत्यक्ष 'कुराणग्रंथात मात्र या ईश्वरी ग्रंथाला अनेक नावे योजण्यात आली आहेत. काही ठिकाणी थेट 'कुराणअसा उल्लेख आहे काही ठिकाणी ग्रंथकाही ठिकाणी संभाषण असाही उल्लेख आहे. आमला जमालुद्दीन सियुती यांनी 'कुराणसाठी कुराणात आलेल्या पर्यायी विशेषणांची यादी बनवली आहे ती संख्या ५५ इतकी आहे.


इस्लामपूर्व अरबस्थानाचे नैतिक अधःपतन झाले होते. माणुसकी संपत चालली होती. दारूजुगारव्यसनंबदफैली चारित्र्य यामुळे लहानपणापासून मुहंमद दुःखी होते. ते सतत अरबांना योग्यसत्य धर्म सांगितलं पाहिजे याचा विचार करत असत. प्रेषित पहिल्यापासून स्वभावाने अत्यतं साधेमनमिळावूप्रामाणिकसत्यप्रिय होतेच. भवतालच्या परिस्थितीने व्याकुळ होऊन चिंतनासाठी प्रेषित अनेकदा मक्केच्या सीमेवर असलेल्या 'हिरापर्वतावर जाऊन चिंतन करत असत. चिंतनाचा विषय अरबांना योग्य धर्म कोणता सांगावाहाच मुख्यतः असे. वयाच्या ४० व्या वर्षी असेच चिंतनासाठी हिरा पर्वतातील एका गुहेत ते बसलेले असताना मानवी रूपातील देवदूत जिब्राइल मुहंमद यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने एक रेशमी रुमाल मुहम्मदांच्या समोर ठेवला. आणि आज्ञा केली रूमालावर लिहिलेलं वाचण्याची वाचण्याची. मुहंमद म्हणालेमी निरक्षर आहे. तेव्हा जिब्राइल या देवदूताने त्यांचा हात हातात घेतला आणि जोराने दाबला. आणि पुन्हा आज्ञा केली आता वाचतरीही मुहंमद म्हणाले मला वाचता येत नाही. असं एकूण तीन वेळेला झाल्यानंतर चौथ्या वेळेला कुराणातील पहिल्या आयती प्रेषितांच्या तोंडून निघाल्या. त्या आयती कुराणमध्ये सुरह ९६ मधल्या पहिल्या पाच आयती आहेत. ह्याची तारीख ६ ऑगस्ट ६१० हि आहेया दिवशी मुहंमद हे अल्लाहचे प्रेषित म्हणजे संदेश वाहून नेणारे 'रसूल'बनले. सर सय्यद अहमद म्हणतात कि जिब्राइल हि कोणी व्यक्ती नसून अल्लाहच्या संदेशाच्या स्वीकार करण्याची प्रेषितांच्या ठिकाणी असलेली एक दैवी शक्ती होतीतिचेच नाव जिब्राइल आहे.

कुराणचे स्वरूप -

इसवीसन ६१० ते ६३२ प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत कुराण निर्मितीचे काम सुरु होते. दिवसाच्या कोणत्याही वेळेला अल्लाहचा संदेश येत असे. तो आला कि प्रेषित आपल्या अनुयायांना तो लगोलग सांगत असतंमग ते अनुयायी दगडावरचामड्यावरकिंवा खजुराच्या पानावर लिहून घेत असत. काही जण चक्क त्या आयती पाठ करून ठेवत असत. प्रेषित जिवंत असताना कुराण कोणालाही एकत्र लिहून ठेवण्याची गरज वाटली नाही कारण प्रेषित म्हणजे अल्लाहचा पृथ्वीवरचा प्रतिनिधी जिवंत होता. प्रेषितांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र पहिले खलिफा अबू बकर याना कुराणाच्या अधिकृत आवृत्तीची गरज वाटू लागली. त्यांनी प्रेषितांच्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवून हि गरज समजावून सांगितली. त्यानंतर प्रेषितांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी 'झैदी बिन थाबितयांनी कुराणच्या आयती पाठ केलेल्या लोकांना भेटून त्या आयती लिहून घेतल्या. ते सर्व दगडचामड्याचे तुकडेखजुराच्या पानाचे तुकडे एकत्र करून कुराण एकत्र लिहून काढले. ते काम इसवीसन ६५१ मध्ये पूर्ण झालं. त्यावेळी प्रेषितांच्या पत्नी हफसा हिच्याकडून ती कुराणची आवृत्ती सर्टिफाय करून घेण्यात आली. शिवाय प्रेषितांच्या इतर सहकाऱ्यांनी सुद्धा ती सर्टिफाय केली. मग शंका आणि संदिग्धता टाळण्यासाठी इतर सर्व कुराणच्या आवृत्ती जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्या. आणि ६५१ मध्ये तयार केलेली कुराणची आवृत्ती अधिकृत म्हणून मान्य करण्यात आली. त्यातून काही भाग प्रक्षिप्त आहे काकिंवा पाठ केलेल्या लोकांनी खऱ्या आयती पाठ केल्या होत्या याचा पुरावा कायकिंवा काही भाग विस्मृतीत गेला नसल्याची हमी कोण घेतो वगैरे प्रश्न निर्माण झाले. त्यावर अनेक मुस्लिम इतिहासकार आणि पंडितांनी भाष्य केले आहे. त्यापैकी एक आपण पाहू. भारतातील जेष्ठ मुस्लिम अभ्यासक मौलाना वाहिदुद्दीन म्हणतात, "इस्लाम च्या पूर्वीचे धर्मग्रंथ भ्रष्ट झाले याचे कारण त्याचे पावित्र्य टिकवण्याचे कोणतेही मार्ग किंवा संस्था ईश्वराने निर्माण केले नव्हते. म्हणून ज्यू आणि ख्रिश्चन यांचे ग्रंथ भ्रष्ट झाले. म्हणून स्वतः अल्लाहनेच व प्रेषित मुहंमदानी विशेष काळजी घेऊन कुराण हा तंतोतंत व कायमचातसाच शुद्ध ठेवण्याची व्यवस्था केली आहे." म्हणून ज्या स्वरूपात प्रेषितांना कुराण अवतरित झाले त्याच स्वरूपात ते आज आपल्यासमोर आहे. प्रेषितांनंतर १३-१४ शतकं कुराण कायम विशुद्ध व अविकृत राहिले आहे. यात एखाद्या अक्षराचा वा कानामात्रेचाही फरक पडलेला नाही, असे मुसलमान मानतात.      

कुराणात ११४ सुरह म्हणजे अध्याय आहेत. कुराणात ६०० रुकू (विभाग), ६२२५ आयती (श्लोक), ७९,९३४ किलमा (शब्द) आणि ३,३८,६०६ हुरुफ (अक्षरं) आहेत. कुराणातील ११४ सुरहंपैकी ९० सुरह मक्काकालीन आहे, २४ मदिना कालीन. कुराण वाचताना प्रत्येक पानाच्या वर आयत मक्काकालीन आहे कि मदिना कालीन आहे त्याचा उल्लेख केलेला असतो. कुराण वाचताना मक्का काळ आणि मदिना काळ हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रेषितांचे एक अधिकृत चरित्र माहिती असणे, संग्रही असणे आवश्यक आहे. मदिना काळातील मुख्य फरक म्हणजे प्रेषितांनी राज्य स्थापन केलं होतं. मक्का काळात राज्य स्थापन केलेलं नव्हतं. मक्का काळ आणि मदिना काळ हे प्रकरण म्हणजे एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. कुराणच्या निर्मितीचा काल २२ वर्षाचा असल्यामुळे एक विषय आणि त्यावरचे विवेचन असं कुराणात नाही. प्रेषितांच्या आयुष्यातील घटनांनुसार विषय बदलेत गेलेले आहेत. त्यासाठी हादीस समजून घ्यावे लागतात.

इथे चर्चा केली पाहिजे असे दोन-तीन महत्वाचे विषय आहेत. १. कुराणचा हेतू, २. कुराणचा संदेश, ३. इस्लामम्हणजे काय? पण ते सुद्धा स्वतंत्र पोस्टमध्ये पण पाहूया. आत प्रथम कुराणचे भाष्य करण्याच्या पद्धती. आणि प्रमुख भाष्यकार याबद्दल विचार करू.

कुराणचा अन्वयार्थ लावण्याची पद्धत म्हणजे – तफसीर. कुराणचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार म्हणजे अर्थात स्वतः प्रेषितच. त्यासाठी त्याच्या हादीसचा आधार घेतला जातो. परंतु प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांचे जवळचे सहकारी इब्न अब्बास (मृत्यू ६८७) यांना कुराणचे प्रेषितांनंतरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानतात. (प्रेषितांच्या सहका-यांना ‘सलाफ’ म्हणतात) कुराणचे अन्वयार्थ लावण्याचे शास्त्र खूप विस्तृतपणे तयार करण्यात आले आहे. त्याच्या दोन सर्वात महत्वाच्या पद्धती आहेत. १. तफसीर बील मथुर आणि २. तफसीर बील राई. तफसीर बील मथुर म्हणजे कुराणचा प्रेषित आणि त्यांचे अनुयायी यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे अन्वयार्थ लावणे. तफसीर बील राई म्हणजे परंपरेपेक्षा कारण परंपरेला महत्व देऊन केलेलं भाष्य.

कुराण वरील पहिले भाष्य अल तबरी यांचे प्रसिद्ध आहे. तबरी यांनी दहाव्या शतकात सविस्तर आणि डिटेल भाष्य केलेलं आहे. त्याचे नाव ‘जामी अल बयान फी तफसीर अल कुराण’ असे आहे. त्यानंतर बाराव्या शतकातील ‘अबुल कासीम महमूद अल झमाक्षरी’ यांचे कुराणचे भाष्य प्रसिद्ध आहे. आज जमते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदुदी यांचे भाष्य जगप्रसिद्ध आहे. त्याच्या भाष्याचे नाव ‘Towords understanding Quran’ असे आहे. भारतातील मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुद्धा कुराणवर भाष्य केलेलं आहे. त्यांच्या भाष्य ग्रंथाचे नाव ‘तर्जुमन अल कुराण’ असे आहे. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लामचा एकांगी अभ्यास केला कारण बाबासाहेबांनी अभ्यास केला तेव्हा कुराणचे इंग्लिश भाषांतर झालेले नव्हते असा एक युक्तिवाद मांडण्यात आला. त्यांचासाठी. कालक्रमानुसार कुराणचे पहिले इंग्लिश भाषांतर १८६१ साली प्रसिद्ध झाले. भारतात कुराणची उर्दू-रोमन भाषांतर आवृत्ती १८४४ साली प्रसिद्ध झाली. सध्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारे मुस्लीम पंडित मोहंमद पिथकॉल व अलामा अब्दुल्ला युसुफ यांनी कुराणची केलेली इंग्लिश भाषांतरं भारतात १९३० आणि १९३४ साली उपलब्ध होती. आता तर जगातल्या अनेक भाषांत कुराण उपलब्ध आहे. मराठी इस्लामी पब्लिकेशन्स ट्रस्ट यांनी सय्यद अबुल आला मौदुदी यांनी केलेलं भाषांतर मराठी मध्ये उपलब्ध करून दिले आहे. शिवाय ‘दावतुल कुराण’ नावाने मुंबईहून ३ खंड प्रकाशित झाले आहेत. (क्रमशः)     

Sunday 25 March 2018

दार उल हरब

‘दार उल हरब’ – शब्दशः ‘दार उल हरब’ याचा अर्थ ‘युद्धभूमी’ असा होतो. जिहाद या संकल्पनेचा ज्यावेळी इस्लामी पंडितांनी विचार सुरु केला त्याच्याबरोबरच नेमकी युद्धभूमी कोणती याचा सुद्धा विचार सुरु केला गेला आहे. ज्या भूमीवर इस्लामी कायदा लागू नाही, जेथे मुसलमान राजा राज्य करत नाही, अशी भूमी जी ‘इस्लामीची भूमी नाही’ त्याला युद्धभूमी म्हणतात. साधारणपणे इस्लामीभूमीच्या सीमेवर असणारी ज्याच्या राजाला इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले आहे अशा भूमीला युद्धभूमी म्हणतात. ‘युद्धभूमी’ या शब्दात युद्ध करून ती भूमी इस्लामची भूमी बनवणे हे अभिप्रेत आहे. या युद्धाला इस्लामी धर्मशास्त्रात ‘पवित्र युद्ध’ (जिहाद) म्हंटले आहे. सर्व मुसलमानांसाठी ‘आपली अल्लाहप्रती श्रद्धा आणि इमान कायम आहे हे सिद्ध करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणून ‘जिहाद’ म्हणजे पवित्र युद्ध करण्याचा मार्ग कुराणात सांगण्यात आला आहे. हे पवित्र युद्ध श्रद्धावान मुसलमानांनी श्रद्धाहीन बिगर मुसलमानांविरुद्ध करायचे आहे, असेही कुराण सांगते. परंतु या युद्धांचा हेतू केवळ अन्याय करणे हा नसून बिगर इस्लामी प्रदेश जिंकून ती ‘इस्लामची भूमी’ बनवणे आणि त्याप्रदेशात शांतता प्रस्थापित करणे हा आहे. 

कुराण ‘शांतता, स्थैर्य’ असलेला प्रदेश वेगळा आणि ‘इस्लामी कायदा’ लागू असलेला प्रदेश वेगळा असा भेद करत नाही. इस्लामी धर्मशास्त्र असे मानते कि, ‘स्थैर्य आणि शांतता’ कि केवळ इस्लामच्या भूमीतच (दार उल इस्लाम मध्येच) असू शकते. त्यामुळे मुसलमानांच्या दृष्टीने ‘दार उल हरब’ मध्ये करायच्या युद्धाचा हेतू स्पष्ट आहे, बिगर मुसलमान यांना इस्लाम स्वीकारायला लावणे आणि त्या प्रांतात इस्लामची शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे. इस्लामी धर्मशास्त्रात या ‘युद्धभूमीचे’ वेगवेगळे संदर्भ येतात. काही ठिकाणी ‘शाश्वत मिशनरी (प्रचारी) युद्धाचा धोका असलेली भूमी’ असा उल्लेख येतो. तर काही ठिकाणी ‘बिगर मुसलमानांनी कर देऊन सुरक्षा मिळवलेली भूमी’ असा उल्लेख येतो. याला ‘दार उल अहद’ किंवा ‘दार उल सूलह’ असे अरबी शब्द आहेत. 

इसवीसन ६२२ मध्ये आपल्या अनुयायांसह प्रेषित पैगंबर मक्केतून हिजरत म्हणजे स्थलांतर करून मदिनेत गेले. मदिनेत प्रेषित पैगंबर यांनी पहिले इस्लामी राज्य स्थापन केले. त्या पहिल्या इस्लामी राज्याच्या सीमा ज्या बिगर इस्लामी राज्याच्या सीमांना भिडत होत्या त्या ‘बिगर इस्लामी’ राज्यांना ‘दार उल हरब’ म्हणण्याची प्रथा प्रथम पडली होती. प्रेषितांनी इस्लामी राज्यातर्फे त्या शेजारच्या बिगर इस्लामी राज्यांना इस्लामी राज्यात समाविष्ट होण्यासाठी अर्ज पाठवले होते. समाविष्ट होण्याचे दोनच मार्ग देण्यात येत असत. एकतर तुमचा धर्म सोडून इस्लाम स्वीकारणे किंवा इस्लामच्या आक्रमणाला तोंड देऊन युद्ध करणे. असे अर्ज प्रेषितांनी रोमन, पर्शियासारख्या त्यावेळेच्या बलाढ्य सम्राटांना सुद्धा पाठवले होते. ‘यामाम’च्या लोकांना प्रेषितांनी पाठवलेला अर्ज या प्रकारच्या अर्जांचे ऐतिहासिक उदाहरण आहे. या सर्वांचे संदर्भ प्रेषितांच्या हादीसमध्ये सापडतात. जेव्हा बिगर इस्लामी राजे इस्लाम स्वीकारत असत तेव्हा त्यांची भूमी ‘इस्लामची भूमी’ म्हणजे ‘दार उल इस्लाम’ होत असे. शिवाय तिथे इस्लामचा कायदा लागू होत असे, आणि मुसलमान आणि कर देऊन सुरक्षित झालेले झिम्मीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्याची असे.

सर्व मुस्लीम राजांचे आणि राज्यांचे आपल्या शेजारच्या बिगर मुस्लीम राजा आणि राज्याबरोबर उघड किंवा गुप्तपणे (शक्य त्या सर्व मार्गांनी) युद्ध सुरु ठेवणे, आणि इस्लामची भूमी बनवण्यासाठी प्रयत्न करत राहणे हा ‘दार उल हरब’चा पारंपारिक अर्थ आहे. इस्लामी धर्मशास्त्राच्या आद्य आणि प्रार्थमिक ग्रंथात हाच अर्थ सांगितला आहे. मुल्ला खुसारौ यांच्या ‘किताब उल जिहाद’ या ग्रंथात ते लिहितात, ‘इस्लामस्वीकारण्याच्या मुस्लीम राजाचा आणि राज्याचा शांततामय अर्ज ज्याने ज्याने फेटाळला आणि मुसलमान होण्यास नकार दिला असा प्रत्येक व्यक्तीबरोबर लढले पाहिजे, ‘दार उल हरब’ चा हाच अर्थ होतो. 

दार उल इस्लाम

दार उल इस्लाम म्हणजे काय? ‘दार उल इस्लाम’ म्हणजे इस्लामची भूमी. ज्या प्रदेशावर इस्लामी कायदा म्हणजे शरियतचे राज्य आहे असा भूप्रदेश म्हणजे ‘दार उल इस्लाम’. ‘ईश्वर एकमेव आहे आणि तो म्हणजे अल्लाह, आणि मुहंमद पैगंबर हे त्या एकमेव ईश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत’ यावर ज्यांची मनापासून श्रद्धा आहे असा ऐक्य असलेला समाज म्हणजे ‘दार उल इस्लाम.’ इस्लामच्या भूमीत मुसलमान माणसाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थान कोणतेही असेल तरी त्याला शरियत हा समान कायदा लागू होतो. इस्लामच्या राज्यात अशा श्रद्धावान माणसाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्थांना राजाचे संरक्षण मिळते. इस्लामच्या भूमीत ‘इस्लामच्या आदर्श’ तत्वानुसार जीवन जगेल त्याला ‘स्वर्गाची’ हमी सुद्धा देण्यात आली आहे. 

इस्लामी धर्मशास्त्राने जगाची वाटणी दोन गटांत केलेली आहे. पहिला गट म्हणजे ‘दार उल इस्लाम’ आणि दुसरा गट आहे ‘दार उल हरब’ (म्हणजे युद्धभूमी). कुराणात अशी आज्ञा ईश्वराने दिलेली आहे कि, ज्या प्रदेशात इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगता येत नाही अशा ठिकाणी शक्य त्या सर्व मार्गांनी लढा देऊन (जिहाद करून) तो प्रदेश इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगण्यासाठी अनुकूल बनवावा. असा लढा देणे कोणत्याही कारणाने शक्य नसेल तर जिथे ‘दार उल इस्लाम’ आहे तिकडे स्थलांतर (हिजरत) करून जाणे. सामर्थ्य असतानाही बिगर इस्लामी प्रदेशात राहिलात तर अल्लाह तुम्हाला जाब विचारेल. सामर्थ्य असतानाही इस्लामी तत्वानुसार जगण्यासाठी प्रतिकूल प्रदेशात राहणाऱ्या लोकांना नरकात जागा मिळेल असे सांगितले आहे. 

एक हनाफी परंपरा सोडली तर शरियतचा अन्वयार्थ लावणाऱ्या सर्व परंपरा ‘दार उल इस्लाम’ च्या तीन अटी सांगतात. पहिली – राज्य इस्लामी कायद्यानुसार चालणारे असले पाहिजे, दोन - राज्य करणारा मुसलमान असला पाहिजे आणि तीन – राज्यात मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे. जो दरडोई कर देऊन स्वतःचे संरक्षण करून घेतो त्याला कुराणने ‘झिम्मी’चा दर्जा दिला आहे. परंतु ‘झिम्मी’चा दर्जा केवळ एकेश्वरवादी (ज्यू, ख्रिश्चन आणि पारशी) धर्मांनाच मिळू शकतो असेही इस्लामी धर्मशास्त्र सांगते. हनफी परंपरा म्हणते कि इस्लामी राज्यानुसार चालणारा प्रदेश आणि मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे रक्षण करणारा प्रदेश जिंकून घेणारा श्रद्धाहीन असला तरी ती भूमी ‘दार उल इस्लाम’च राहते. 

मुसलमानांना प्रेषित पैगंबर यांनी संपूर्ण जग ‘दार उल इस्लाम’ करण्याचे उद्दिष्ट घालून दिले आहे. संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करावे याचा प्रेरणा मुसलमानांना प्रेषितांच्या हादीस मधून मिळतात. किंबहुन प्रत्येक मुसलमानाचे ‘दार उल इस्लाम’ साठी संघर्ष करणे कर्तव्य आहे.   

शिर्क

शिर्क – इस्लामी परंपरेत ‘अनेकेश्वरवादी’ आणि ‘मूर्तिपूजक’ या दोन अर्थाने ‘शिर्क’ हा शब्द वापरला जातो. ‘शिर्क’ असणे हा इस्लामी परंपरेने गुन्हा मानला आहे. आता आपण ‘शिर्क’ असण्याचे निकष कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत. ‘शिर्क’ या गुन्ह्याबद्दलच्या शिक्षा किंवा परिणाम आता बघणार नाही. इतर अनेक संकल्पनांप्रमाणे ‘शिर्क’ सुद्धा खूप विचारपूर्वक आणि सविस्तर विकसित केलेली आहे. सर्व मान्य पद्धतीप्रमाणे ‘शिर्क’चे चार महत्वाचे प्रकार पडतात. १. शिर्क-उल-इल्म, २. शिर्क-उल-तसर्रुफ, ३. शिर्क-उल-इबादत आणि शेवटचा आणि ४. शिर्क-उल-आदह. हे चारही प्रकार आपण सविस्तर पाहणार आहेत.

पहिला प्रकार आहे ‘शिर्क-उल-इलम’, याचा साधारणपणे अर्थ अल्लाहशिवाय ‘सत्य’ वेगळे आहे असे मानणे. यामध्ये मुख्यतः ‘गुपित गोष्टींचे’ ज्ञान असते आणि ते गुपित ज्ञान बाळगणे हा शिर्कचा प्रकार मानला गेला आहे. अल्लाहने त्याचा संदेश (म्हणजे कुराण) देवदूतांच्याबरोबर पाठवल्यानंतर सर्व गूढ सत्याचा उलगडा झाला असे मानले जाते. त्याच्याशिवाय अन्य ज्ञान असल्याचा दावा स्वतः प्रेषितांनीसुद्धा कधी केला नव्हता, असे परंपरा मानते. ‘गुप्त ज्ञान’ यामध्ये भविष्य सांगणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, खगोलशास्त्र सांगणारे, आणि अल्लाहची आपल्यावर कृपा आहे असे सांगणारे संत यांचा समावेश होतो. इस्लामी धर्मशास्त्र मानते कि सर्व ज्ञानाचा स्त्रोत अल्लाहकडे आहे. म्हणून असे जे गूढ ज्ञान आहे असा दावा करणारे ‘पापी’ मानले जातात. अल्लाह बरोबर दुसऱ्या कोणाकडे ज्ञान आहे असे मानणे म्हणजे अल्लाहच्या ज्ञानाला मर्यादा आहे असे मानणे असा अर्थ होतो. म्हणून ते पाप मानले आहे.

दुसरा प्रकार म्हणजे ‘शिर्क-उल-तसर्रुफ’. निवडा करण्याची शक्ती अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाकडे आहे असे मानणे, हा शिर्कचा प्रकार मानला गेला आहे. या प्रकारात साधारणपणे अल्लाह आणि मानव यांच्यात असणाऱ्या मध्यस्थांचा समावेश होतो. त्या मध्यास्थाकडे अल्लाहइतकीच क्षमता, दया, ताकद आहे असे मानून त्याची पूजा केली जाते. हे पाप आहे, असे मानले जाते. मध्यस्थ अल्लाहजवळ घेऊन जाण्याचा दावा करतो तो सुद्धा ‘शिर्क’ मानला गेला आहे. इस्लामी धर्मशास्त्राने ‘मध्यस्था’चे सुद्धा तीन प्रकार केले आहेत.

पहिला प्रकार – उदा. एखाद्या गुन्हेगराला राजासमोर उभे केले आहे. पण राजाचा वजीर मध्यस्थी करतो आणि राजाला शिक्षा माफ करण्याची विनंती करतो. वजिराचा शब्द आणि स्थान लक्षात घेऊन राजा शिक्षा माफ करतो. याचा अर्थ अल्लाहशिवाय शिक्षा देण्याचा किंवा माफ करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाला तरी आहे हे मान्य करणे. हा ‘शिर्क’चाच प्रकार मानला गेला आहे. याला अरबी ‘शफाअत-ए-वजाह’ असे म्हणतात. दुसरा प्रकार – उदा. राजाची राणी किंवा राजकन्या मध्यस्थी करतात आणि राजा त्यांच्यावरच्या प्रेमापोटी शिक्षा माफ करतो. हा प्रकार सुद्धा शिर्कमानला गेला आहे. अल्लाहशिवाय दुसरा कोणी दयावान आणि प्रेमळ आहे असे मानणे. या प्रकाराला अरबीमध्ये ‘शफाअत-ए-महाब्बह’ म्हणतात. शेवटचा आणि तिसरा प्रकार – उदा. राजा स्वतःच गुन्हेगाराला माफ करू इच्छितो, पण त्याच्या मनात कायद्याचा धाक आहे. त्यावेळी वजीर राजाची इच्छा लक्षात घेऊन मध्यस्थी करतो. त्याला ‘परवानगी घेऊन केलेली मध्यस्थी’ म्हणतात. बाकीच्या प्रकारांपेक्षा हि मध्यस्थी कायदेशीर मानली गेलेली आहे. एकूण काय अल्लाहशिवाय इतर कोणातही महानतेच गुण आहे असे मानणे हा गुन्हाच आहे.

‘शिर्क’ असण्याचा तिसरा निकष म्हणजे ‘शिर्क-उल-इबादह’. याचा शब्दशः अर्थ होतो ‘कृत्रिम’ रचनेसमोर दंडवत घालणे, त्याची पूजा करणे. यामध्ये प्रामुख्याने संतांच्या समाधीस्थळांचा समावेश होतो. अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचीही पूजा करणे, त्याच्या उत्सवासाठी पैसे खर्च करणे, त्याच्यासाठी उपवास करणे, त्याच्या समाधीचे दर्शन करणे, त्याच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेला जाणे, त्याच्यासमोर प्रार्थना करणे. कोणत्याही विशिष्ट दगडाचे चुंबन घेणे किंवा नाक घासणे या सगळ्याचा समावेश होतो. (हे सर्व हज यात्रेच्या वेळी केले जाणारे कर्म आहेत, पण अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासमोरही झुकणे हे अल्लाहला कमीपणा आणणारे असल्यामुळे पाप मानले आहे) ‘अल्लाह’ या शब्दाचा अर्थ बघताना आपण पहिले कि ईश्वर आणि अल्लाह यांच्यात फरक काय आहे तो. सेमेटिक परंपरेनुसार ईश्वर हा शब्द संत याला समानार्थी वापरता येऊ शकतो. पूर्वीच्या रानटी टोळ्यांना संस्कृती देण्यासाठी अल्लाहने किंवा ‘विशिष्ट देवा’ने पृथ्वीवर आपल्या देवदूतांच्या बरोबर ज्ञान पाठवले आणि प्रेषित तयार झाले. अशा प्रेषितांचे स्थान अल्लाहच्या बरोबर नसून त्याच्या खालचे आहे. आपण अज्ञानामुळे प्रेषितांना ईश्वर म्हणतो आणि त्यांचीच पूजा करतो हा इस्लामी परंपरेनुसार ‘शिर्क’चा एक प्रकार आहे.   
‘शिर्क’चा शेवटचा निकष ‘शिर्क-उल-आदह’, त प्रकारात अंधश्रद्धा बाळगणे, चांगले वाईट भाग्य असते असे मानणे किंवा शुभ अशुभ दिवस असतात यावर विश्वास ठेवणे हे सर्व ‘शिर्क’ असण्याचे निकष मानले गेले आहेत. शिवाय जादू किंवा तत्रशक्तीवर विश्वास ठेवणे सुद्धा शिर्कचाच प्रकार मानला गेला आहे. पहिला प्रकार (शिर्क-उल-इलम) आणि हा शेवटचा प्रकार यामध्ये फरक आहे, तो अधोरेखित करून सांगणे गरजेचे आहे. पहिल्या प्रकारात ‘ज्ञान गूढ’ असते यावर विश्वास ठेवला आहे म्हणून ‘शिर्क’ मानले आहे. या प्रकारात गूढ ज्ञान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहिलो, त्यांचा सल्ला घेतला म्हणून शिर्क मानले जाते. फक्त अंधश्रद्धा म्हणजे काय, चांगले वाईट हे ठरवण्याच्या पद्धती आधुनिक नैतिक शास्त्रानुसार ठरत नसून कुराणने घालून दिलेल्या चौकटीत ठरतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

‘शिर्क’ ठरविण्याची या पद्धती खूप सविस्तरपणे विकसित केल्या आहेत हे लक्षात येईलच. ‘शिर्क’ हे इस्लामी परंपरेनी पाप ठरवले आहे. त्यासाठी अनेक शिक्षांची तरतूदी कुराण, हादीस आणि इतर धर्मशास्त्रांच्या ग्रंथात केलेल्या आहेत. त्या शिक्षांचे प्रकार आणि कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा हे आता आपण बघणार नाही. आता केवळ ‘शिर्क’म्हणजे काय इतकेच आपण पहिले.

काफिर

काफीर  - ‘काफिर’ हा शब्द ‘कुफ्र’ या शब्दाचा कर्ता आहे. ‘कुफ्र’ या शब्दाचा अर्थ लपविणे. सत्य लपविणे, सत्याला नकार देणे असा ‘कुफ्र’ या शब्दाचा अर्थ आहे. त्याचे ‘काफिर’ होताना सत्य लापाविणारा, सत्याला नकार देणारा असा होतो, सत्यावर पांघरून घालणारा असा होतो. काफिर म्हणजे (सत्य) नाकारणारा. काफिर याचा अर्थ अल्लाहने मुहंमद पैगंबर यांच्यामार्फत पाठवलेल्या सत्य धर्माला (इस्लामला) नाकारणारा. इस्लाममध्ये श्रद्धेच्या ज्या पाच कसोट्या सांगण्यात आल्या आहेत त्या पाच पैकी एकावरही श्रद्धा न ठेवणारा इस्लामच्या दृष्टीने काफिर म्हणजे श्रद्धाहीन ठरतो. मुसलमानी पंडित श्रद्धाहीन म्हणजे काफिर आणि नास्तिक हे दोन शब्द समानार्थी वापरतात. याचे कारण श्रद्धेच्या पाच कसोट्यांपैकी पहिलीच कसोटी आहे ‘एकमेव अल्लाहवर श्रद्धा’, नास्तिक म्हणजे कोणताच अल्लाह किंवा देव न मानणारा असा होतो. देव आणि अल्लाह असे दोन समानार्थी वाटणारे शब्द मुद्दाम वेगळे वापरले आहेत. इस्लामच्या दृष्टीने देव आणि अल्लाहयात फरक आहे. तो सांगणे हा आताचा हेतू नाही. पण ईश्वर किंवा देव मानणे हे सुद्धा काफिर असल्याचेच लक्षण आहे. पूजा केवळ अल्लाहची करायची असते असे इस्लामी धर्मशास्त्र सांगते. अल्लाह प्रती श्रद्धा न ठेवणे हे श्रद्धाहीन असल्याचेच लक्षण आहे. त्याचबरोबर अल्लाहबरोबर इतर देव मानणे हे सुद्धा काफिर असल्याचे लक्षण आहे. म्हणून मुसलमान श्रद्धाहीन म्हणजे काफिर आणि नास्तिक हे दोन शब्द समानार्थी असल्यासारखे वापरतात.  

‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ मध्ये काफिर कोणाकोणाला म्हणायचे याच्या पाच कसोट्या सांगण्यात आल्या आहे. १. ज्यांनी पहिल्या महान करणावरच विश्वास ठेवला नाही, असे काफिर. पहिले महान कारण म्हणेज, ‘अल्लाहच्या आज्ञेनुसार मुहंमद सत्य धर्माचा प्रसार करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आहेत’, यावरच ज्यांचा विश्वास नाही असे ते काफिर. २. एकमेव ईश्वर आहे तो म्हणजे अल्लाह आहे यावरच ज्यांचा विश्वास नाही, असे काफिर. ३. असे जे एकमेव ईश्वर अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, पण त्याच्या संदेशावर (म्हणजे कुराणवर) विश्वास ठेवत नाहीत असे काफिर. ४. जे मूर्तीपूजक आहेत असे काफिर. ५. जे एकमेव अल्लाहवर आणि त्याच्या संदेश्वर (म्हणजे कुराणवर) विश्वास ठेवतात पण ज्यू आणि ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुहंमद यांच्या प्रेषितत्वावर विश्वास ठेवत नाहीत, असे काफिर. या पाच कसोट्यांवरून सुद्धा लक्षात येईल कि पाच श्रद्धांच्या प्रमाणे या पाच कसोट्या सुद्धा एकमेकांना अनुकूल आहेत. यापैकी एक जरी कसोटी खरी ठरत असेल तरी तो काफिर ठरतो. 

असगर आली इंजिनीअर यांच्या Rethinking issuess in Islam या ग्रंथात ते लिहितात, “कुफ्र किंवा काफिर याचा अर्थ लापाविणारा किंवा नकार देणारा असा आहे. कुराणाप्रमाणे काफिर तो कि जो सत्य मार्गदर्शन स्वीकारण्याचे नाकारतो व अनैतिक व दुराचारी जीवन जगतो.” परंतु नीती अनीतीच्या किंवा दुराचारी असणाच्या, सत्य म्हणजे नेमके कोणते हे ठरवण्याच्या कसोट्या आधुनिक नीतिशास्त्र किंवा तर्कशास्त्रावरून ठरत नसून कुराणावरून ठरतात. 

या संदर्भात एक उदाहरण देणे गरजेचे आहे. जेष्ठ समाज सुधारक हमीद दलवाई यांनी आपल्या मृत्यूपत्रात ‘आपण मेयावर दहन करावे, दफन करू नये’ असे लिहिले होते. याचा संदर्भ घेऊन उदारमतवादी मुस्लीम कवी आणि विचारवंत एहतेशाम देशमुख लिहितात, “अल्लाहवर श्रद्धा नाही आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा नाही, त्याला मुसलमाना म्हणता येत नाही. ‘हमीद दलवाई’ हे केवळ नाव इस्लामी पद्धतीचे आहे या कारणासाठी त्यांना मुसलमान म्हणता येणार नाही.” अशा प्रकारे हमीद दलवाई यांना बिगर मुसलमान किंवा श्रद्धाहीन ठरवले गेले आहे. एवढेच नव्हे तर जो मुसलमान किंवा श्रद्धावान राहिला नाही असा माणसाला ‘तकफिर’ म्हणतात. जो पूर्वी मुसलमान होता पण त्याच्या काही कृत्यांमुळे आता तो मुसलमान राहिला नाही अशा माणसाला ‘तकफिर’ म्हणतात. हमीद दलवाई यांना ‘तकफिर’ ठरवून ते पुढे लिहितात, “ज्याची आपल्या धर्मावर श्रद्धा नाही. ती व्यक्ती त्याच्या जाती-धर्माच्या व्यक्तींबद्दल व तत्वांबद्दल भाष्य करण्याचे अधिकारसुद्धा गमावून बसते.” 
काफिर म्हणजे कोण, कुफ्र म्हणजे काय, शिर्क (अनेक देव मानणारा – अनेकेश्वरवादी) म्हणजे काय याची अनेक भाष्य मुस्लीम पंडितांनी याच प्रकारची केली आहे. परंतु आता आपण केवळ ‘काफिर’ म्हणजे कोण आणि काय या व्याख्येपुरता विचार करत आहोत. काफिर असणे हा इस्लामच्या दृष्टीने किती मोठा गुन्हा आहे, त्या गुन्ह्याला शिक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या आहेत याचा विचार आपण आता करत नाही आहोत.काफिर असण्याच्या गुन्ह्याबद्दलच्या शिक्षा नंतरच्या भागात पाहू. 

इमान

श्रद्धा – इस्लाम धर्माची पाच सर्वात महत्वाची आणि मूलभूत तत्व आहे. त्यामध्ये श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आणि पहिले तत्व आहे. ‘एकूण पाच बाबींवर श्रद्धा ठेवणे’ असे या शब्दाचा अर्थ आहे. त्या पाच बाबी कोणत्या कोणत्या हे आता आपण पाहूया. पहिली – एकमेव अल्लाहवर श्रद्धा, दुसरी – स्वर्गात वास्तव्य असणाऱ्या अल्लाहकडून अल्लाहचा सत्य धर्माचा संदेश पृथ्वीवर आणणाऱ्या देवदूतांवर श्रद्धा, तिसरी – अल्लाहकडून देवदूतांच्या मार्फत संदेश मानवाला देण्यासाठी निवडलेल्या प्रेषितावर आणि त्याच्या प्रेषितत्वावर श्रद्धा, चौथी -  अल्लाहने प्रेषितांच्या मार्फत मानवासाठी दिलेल्या संदेशावर म्हणजे ‘कुराण’ या ईश्वरी ग्रंथावर श्रद्धा आणि पाचवी – अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा. काळाच्या एका टप्प्यावर गेल्यावर जगाचा नाश होणार आहे. त्यादिवशी सर्व मृत जीव पुन्हा जिवंत होतील. त्यावेळी कोण कोणत्या पद्धतीने जीवन जगले याच्या निकषावर अल्लाह स्वतः पाप पुण्याचा निवाडा करणार आहे. जे इस्लामच्या आदर्श तत्त्वांनुसार जीवन जगले आहे अशांना स्वर्ग आणि जे इस्लामच्या तत्त्वांनुसार जीवन जगले नाहीत अशांना नरक मिळेल. यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंतिम निर्णय दिना’वर श्रद्धा ठेवणे होय. 

या पाचही श्रद्धा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. यातल्या एकावरजरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारांवर श्राद्ध आपोआप ठेवली जाते. एकावर जरी श्रद्धा ठेवली नाही तरी संपूर्ण श्रद्धेचा डोलारा कोसळून जातो. या पाचही बाबींवर श्रद्धा ठेवणारा इस्लामी परिभाषेत ‘श्रद्धावान’ ठरतो, जो श्रद्धा ठेवत नाही तो ‘श्रद्धाहीन’ ठरतो. जर एखादा माणूस म्हंटला कि, ‘माझी इतर चार गोष्टींवर श्रद्धा आहे, पण देवदूतांवर नाही’ तर देवदूतांच्या शिवाय अल्लाहचा संदेश प्रेषितापर्यंत कसा पोहोचला याला गूढत्व प्राप्त होते. अल्लाह आणि माणूस यांच्यातला दुवा नाहीसा होतो. एखादा म्हणाला कि, ‘प्रेशितांवर किंवा कुराणावर श्रद्धा नाही’ याचा अर्थ संदेश कोणी पाठवला याच्यावरही विश्वास नाही असा होतो. ‘अंतिम निर्णय दिनावर’ श्रद्धा नसेल तर अल्लाहची आणि नरकाची भीती संपून जाऊन शुद्ध धर्माचे पालन होणार नाही. त्यामुळे वर एकमेव अल्लाहवर श्रद्धा, देवदूतांवर श्रद्धा, प्रेषित पैगंबर यांच्याबर श्रद्धा, कुराण या दिव्य ग्रंथावर श्रद्धा आणि अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा ह्या मूलभूत पूर्व अटी आहेत. या पाचही श्रद्धा एका वाक्यात एकत्र करण्यात आल्या आहे. ‘ला इलाहइल्लाल्लाह मुहंमद रसुल्लल्लाह’ याचा अर्थ ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे, मुहंमद हे त्याचे शेवटचे प्रेषित’. या वाक्याला ‘कलिमा’ म्हणतात. ‘कलिमा’चा उच्चार करताक्षणी माणूस मुसलमान होतो. अर्थात त्याचा अर्थ मनापासून पटायला हवा!

‘ला इलाहइल्लाल्लाह’ म्हणजे ‘एकमेव ईश्वर म्हणजे अल्लाह आहे’ या एका वाक्यावर जरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारही त्याच्याबरोबर येतात, त्याच्याबरोबरच तयार होतात. आणि एकमेव अल्लाहवर श्रद्धा नसेल तर इतर चार सुद्धा तयार होत नाही. या श्रद्धेचे इस्लाममधील आणि मुसलमान असण्याच्या दृष्टीने काय महत्व आहे हे कुराणचेअनेकांमधील एक सर्वश्रेष्ठ भाष्यकार सय्यद अब्दुल आला मौदुदी यांनी सांगितले आहे. मौदुदी यांनी Towards undrestanding Quran’ असे कुराणवरच्या भाष्याचे तीन खंड लिहिले आहेत, त्याच्या तिसऱ्या खंडात मौदुदी लिहितात, “मुस्लीम समाजाचे सदस्य असण्यासाठी किंवा त्या सदस्याचे कायदेशीर हक्क व जबाबदारी या संदर्भात जेव्हा श्रद्धा आणि श्रद्धाहीनता हा आधार मानला जातो, तेव्हा कोण श्रद्धावान आहे आणि कोण श्रद्धाहीन आहे यातील स्पष्ट सीमारेषा निश्चित करावी लागते. या संबंधात श्रद्धावान कोण आहे व कोण नाही हे श्रद्धेच्या गुणवत्तेपेक्षा किमान मूलभूत श्रद्धेच्या आधारावर अवलंबून असते. इस्लामिक समाजात जे (अशी किमान) श्रद्धा ठेवतात ते समान दर्जाचे कायदेशीर हक्कदार बनतात आणि श्रद्धेच्या गुणवत्तेचा विचार न करता त्यांना समान कर्तव्य पार पाडावी लागतात. त्याचप्रमाणे श्रद्धाहीनतेच्या दर्जातील फरक लक्षात न घेता सर्व श्रद्धाहीन हे श्रद्धाहीनांच्या एकाच वर्गातील मानले जातात. यासाठी त्यांची श्रद्धाहीनता हि सामान्य दर्जाची आहे का गंभीर स्वरुपाची आहे, हे विचारात घेतले जात नाही.”

‘कलिमा’ उच्चारण्याचे महत्व सांगताना मौलाना मौदुदी लिहितात, “एका माणसापासून दुसऱ्या माणसाला वेगळं करण्याचा पाया ‘कलिमा’ हा आहे. जे त्याचा उच्चार करतात, त्यांचे एक राष्ट्र बनत असते. उलट जे त्याचा उच्चार करण्याचे नाकारतात त्यांचे वेगळे राष्ट्र बनते. जे वडिलांनी त्याचा उच्च केला, परंतु त्याच्या पुत्राने उच्चार करण्यास नकार दिला तर ते त्याचे वडील राहत नाही, तो त्यांचा मुलगा राहत नाही. उलट जे एका पूर्णपणे परक्या मनुष्याने ‘कलिमा’चा उच्चार केला तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही बलवत्तर ठरते”

इस्लामची जी पाच मूलभूत तत्व आहे त्यापैकी पहिली (पाच बाबींवरची) श्रद्धा हे इतके महत्वाचे तत्व आहे. इतर चार तत्व म्हणजे नमाज, कर, उपवास आणि हजची यात्रा यापैकी काही पाळता नाही आलं तरी मुसलमान मुसलमान राहतो. फार तर तो परिपूर्ण मुसलमान असू शकणार नाही. पण त्याची श्रद्धा नसेल तर तो मुसलमानच राहणार नाही. त्यामुळे ‘श्रद्धा’ हे मुसलमान असण्याचे सर्वात महत्वाचे आणि प्रधान तत्व आहे.

श्रद्धेचे महत्व पटवून सांगणाऱ्या अनेक आयती आणि अनेक हादीस इस्लामी धारशास्त्रात सांगण्यात येतात. त्यापैकी काही उदाहरणे आपण पाहू. कुराणातील दुसरी सुरह ‘अल बकरा’ मध्ये २७७ क्रमांकाची आयत आहे. त्यात लिहिले आहे ‘जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील त्यांच्यासाठी कोणताही दुःखाचा आणि भयाचा प्रसंग नाही’ प्रेषितांची एक हादीस सहिह मुस्लिम आणि सहिह बुखारी दोघांनीही नोंदवून ठेवली आहे. त्यात एक जण प्रेषितांना विचारतो, “हे प्रेषित! श्रद्धा म्हणजे काय ते मला सांगा.” यावर प्रेषित उत्तर देतात, “म्हणजे तुमची श्रद्धा अल्लावर, त्याच्या देवदूतांवर, त्याच्या ग्रंथावर, त्याच्या (मरणोत्तर) भेटीवर, त्याच्या प्रेषितांवर आणि अंतिम निर्णय दिनानंतरच्या पुनर्जीवनावर असली पाहिजे” त्याने पुन्हा विचारले, “हे प्रेषित! इस्लाम म्हणजे काय ते सांगा” प्रेषितांनी उत्तर दिले, “इस्लाम म्हणजे तुम्ही (एकमात्र) अल्लाहची उपासना केली पाहिजे व त्याच्याबरोबर कोणालाही (देव) मानायचे नाही, तुम्ही अनिवार्य नमाज अदा केली पाहिजे, जकात दिली पाहिजे व रमजानचा उपास केला पाहिजे”  

अल्लाह

मुसलमान असण्याच्या पाच सर्वात प्रार्थमिक आणि महत्वाच्या अटी म्हणजे पाच श्रद्धा. त्या पाच श्रद्धा (इमान) कोणत्या हे आपण मागच्या लेखात पहिले. त्या पाच पैकी सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची श्रद्धा आहे ‘एकमेव ईश्वर अल्लाहवर श्रद्धा’. सहजपणे ईश्वर आणि अल्लाह हे दोन शब्द आपण समानार्थी म्हणून वापरतो. किंवा वापरले जातात. परंतु आपण (म्हणजे बिगर सेमेटिक परंपरा) वापरतो तो ईश्वर शब्द आणि अल्लाहच्या शब्दात फरक आहे. तो फरक नेमका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. अल्लाहची स्तुती करणाऱ्या असंख्य आयती आणि सुरह कुरणात आहेत. रोजच्या प्रार्थनेत जी एक सुरह कायम वाचली जाते ते पहिली सुरह त्यातील सात आयती या फक्त अल्लाहच्या स्तुतीच्या आहेत. कुराणचे आधुनिक भाष्यकार मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या कुराणच्या भाष्यग्रंथात अडीचशे पेक्षा जास्त पाने केवळ पहिल्या सात आयतींवर भाष्य करण्यासाठी खर्च केली आहेत. त्यामुळे अल्लाहच्या स्तुतीपर असणाऱ्या किंवा अल्लाहवर श्रद्धा न ठेवणाऱ्या काफिर नास्तिकांना असणाऱ्या शिक्षा यांबद्दल आपण आता बोलणार नाही. आता केवळ ‘अल्लाह’ ही काय संकल्पना आहे ते समजून घेणार आहोत.

विश्वाच्या निर्मात्याला कुराणात ‘अल्लाह’ या नावाने संबोधले आहे. ‘अल्लाह’ हा शब्द दोन अरबी शब्दांपासून बनलेला आहे. ‘इलाह’ या शब्दाचा अर्थ ‘ईश्वर’ असा होतो. इंग्रजी भाषेत ज्या प्रमाणे ‘द’ हा शब्द एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित करण्यासाठी वापरतात त्याप्रमाणे अरबी भाषेत ‘अल’ हा शब्द वापरतात. उदा. किताब या शब्दाचा अर्थ ‘पुस्तक’ असा होतो, त्याला ‘अल’ जोडले कि त्याचे ‘विशेष पुस्तक’ म्हणजे ‘कुराण’ असा अर्थ होतो. ‘इलाह’ याला ‘अल’ जोडल्यावर ‘ईश्वराचा’ विशिष्ट ईश्वर होतो. हा ‘विशिष्ट ईश्वर’ म्हणजे ‘अल्लाह’ आहे. पर्शियन किंवा हिंदुस्थानी भाषांत यालाच ‘खुदा’ म्हणतात. ईश्वरालाच अल्लाहनावाने संबोधणे त्यामुळे चुकीचे ठरते. कुरणात अल्लाहला ९९ नावांनी संबोधले आहे. ‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ मध्ये अल्लाहच्या सर्व ९९ नावांची यादी दिलेली आहे. परंतु या ९९ नावांपैकी ‘रहमान’, ‘रहीम’ आणि ‘मलिक’ ही तीन नावे वारंवार येतात. कुराण सांगते (६:१६२) कि, ‘श्रद्धावानाची प्रार्थना, त्याग, जीवन व मृत्यू (सर्वकाही) अल्लाहसाठीच असते’. कुरणात अल्लाह या शब्दाचा वापर २८०० वेळा तर इतर तीन शब्दांचा वापर ७९० वेळा झाला आहे. त्यावरून त्याचे महत्व लक्षात येईल. वर सांगितलेल्या ९९ नावांच्या यादीची सुरवात किंवा शेवट ‘अल्लाह’ या नावानेच होतो. त्यामुळे एकूण १०० नावे पूर्ण होतात. मुसलमान जप करताना वापरतात त्या माळेत ९९ किंवा ३३ मणी असतात. एका माळेचा एकदा किंवा तीनदा पूर्ण जप केल्यावर अल्लाहची सर्व ९९ नावे उच्चारली जातात. प्रेषितांच्या हादीसमध्ये प्रेषित सांगतात कि, ‘अल्लाहच्या नावाचा जो सतत जप करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.’

इस्लामपूर्व अरबस्थानातील अरब टोळ्यांचा ईश्वर सुद्धा अल्लाहच होती. परंतु त्या टोळ्या एकमात्र अल्लाहच्या बरोबरीने अल्लाहच्या तीन मुलींची सुद्धा पूजा करत असत. त्याला इस्लामी परंपरेने ‘शिर्क’ म्हणजे अनेकेश्वरवादी ठरवलेले आहे. आणि एकमेव अल्लाह हाच ईश्वर आहे असे प्रतिपादन केले आहे. शिर्क म्हणजे अनेकेश्वरवाद नष्ट करून शुद्ध एकेश्वरवादाची स्थापना करणे हे उदिष्ट कुराणने मांडले आहे. 

सुरवातीला सांगितलेला गैरसमज पुन्हा एकदा दूर करणे आवश्यक आहे. बिगर सेमेटिक किंवा बिगर इस्लामी परंपरा ज्याचा ‘ईश्वर’ म्हणून उच्चार करतात ते ईश्वरचे ‘सामान्य’ स्वरूप आहे. त्याच्या विरुद्ध अल्लाह हे ईश्वराचे असामान्य किंवा सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे. इस्लामी परंपरेने ईश्वरया शब्दाचा अर्थ ‘अल्लाह’ने सत्यधर्माचा संदेश युन पृथ्वीवर पाठवलेले देवदूत असा होतो. त्यांचे स्थान अल्लाह पेक्षा खालचे आहे. इस्लामी परंपरेनुसार अल्लाह सर्वश्रेष्ठ आणि त्याच्या खालोखाल देवदूत किंवा ईश्वर. मात्र पूजा केवळ अल्लाहची करायची असते. पूजा ईश्वराची करायची नसते. ईश्वर आणि अल्लाह या दोन संकल्पनात हा फरक आहे. म्हणून ईश्वर आणि अल्लाह हे दोन शब्द समानार्थाने वापरता येत नाही किंवा वापरू नयेत.  


Saturday 24 March 2018

शहीद

#शहीद – हा शब्द आपण रोज इतक्या सर्रास वापरतो कि त्याचा अर्थ सांगण्याची गरज पडू नये इतका आपण तो स्व स्पष्टीकरणात्मक करून टाकला आहे. पण त्याचा आपण वापरतो इतका साधा आणि सोपा अर्थ नाही आहे. हा शब्द मुळात भारतीय भाषांतला नाही. त्याचा उगम अरेबिक भाषेतला आहे. आपण वापरतो त्या ‘शहीद’ शब्दाचा उगम इस्लाम पूर्व अरब स्थानात सापडतो. इस्लाम पूर्व अरबस्थानात ‘शहीद’ हा शब्द पुरावा किंवा ‘घोषणा करणे’ या अर्थाने वापरात असत. इस्लामी संस्कृतीत त्याचा अर्थ अमुलाग्र बदलेलेला आहे. आपण ‘युध्दभूमीवर मरण आलेल्या’ला शहीद म्हणतो, परंतु ‘शहीद’ या शब्दाचा अर्थ खूप विचारपूर्वक निश्चित केला आहे.
अगदी सोप्या शब्दात ‘शहीद’ म्हणजे ‘जो अल्लाहच्या कार्यासाठी, अल्लाहचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी लढतो आहे, अशा युद्धात ज्याचा मृत्यू झाला आहे.’ इस्लामी धर्मशास्त्र मानते ‘अल्लाहच्या कार्यासाठी जो मरण पत्करतो’ त्याच्यावर अल्लाहची सर्वात जास्त कृपादृष्टी असणार आहे. अल्लाहने ‘शहीद’ झालेल्याला स्वर्गाची हमी दिलेली आहे. स्वर्गात ‘शहीद’ झालेल्यासाठी ७२ अप्सरासुद्धा आहेत. शिवाय शहीदाच्या मृतदेहाला सुद्धा इतरांपेक्षा काही विशिष्ट सेवांची तरतूद करण्यात आली आहे. कोणाही सामान्य मुसलमानाप्रमाणे ‘शहीदा’चा मृतदेह दफन करायचा नसतो. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे सर्व माणसे त्यांच्या दफन झालेल्या ठिकाणी पडून राहणार आहेत, अंतिम निर्णय दिवसाच्या वेळी त्यांना जिवंतपणा येईल. अल्लाह त्यांच्या कर्मांवरून, जीवन कसे जगले यावरून निवडा करेल. आणि पापं जास्त असतील तर नरक आणि पुण्य असतील तर स्वर्ग देईल, असे इस्लामी धर्मशास्त्र सांगते. पण अल्लाहच्या कार्यासाठी जो लढत असेल आणि त्या कार्यात ज्याला मरण आलेले असेल, म्हणजे जो ‘शहीद’ झाला असेल त्याला अंतिम निर्णय दिनाची वात बघावी न लागता तो थेट स्वर्गात जाईल. आणि हा खूप मोठा सन्मान मानला गेला आहे.
इस्लामी धर्मशास्त्राने ‘शहीद’ यांचे दोन प्रकार मानले आहेत. १. युद्धभूमीवर मरण आलेले, २. युद्धाशिवाय मरण आलेले. यापैकी युद्धभूमीवर मरण आलेल्या ‘शहीदां’साठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली आहे, ‘घुसल’ या प्रकारची विशिष्ट अंघोळ. सामान्य पणे मरण आलेल्या मुसलमानाच्या मृतदेहाला हि ‘घुसल’ नावाची अंघोळ घालण्याची प्रथा आहे. याचे विधी खूप विस्तृतपणे विकसित करण्यात आले आहेत. शिवाय संभोगानंतर निर्माण झालेली अशुद्धता धुवून टाकण्यासाठी हि अंघोळ करतात. ही अंघोळ ‘शरीर आणि मन शुद्ध आणि पवित्र’ करण्यासाठी केली जाते. परंतु जे अल्लाहच्या कार्यासाठी युद्धभूमीमध्ये मरण पावले आहेत त्या मृतदेहांना अशी अंघोळ घातली जाऊ नये असे बहुतेक सर्व परंपरा मानतात. शिया सुन्नी सुद्धा याविषयी एकमत व्यक्त करतात. याची करणे दोन आहेत. पहिले म्हणजे युद्धभूमीवरील जखमा या अभिमानाने दाखवण्याच्या असतात. शिवाय अल्लाह त्या जखमांवरून अल्लाहची कृपादृष्टी ठरणार आहे, असे इस्लामी धर्मशास्त्र मानते. त्या जखमांवरून त्याचे स्वर्गातले स्थान निश्चित होणार आहे. ‘उहूद’च्या युद्धात ‘शहीद’ झालेल्यांना प्रेषितांनी ‘अंघोळ’ घातली नव्हती, परंतु देवदूतांनी शहिदाचा मृतदेह धुवून स्वच्छ केला असे उल्लेख सापडतात.
दुसरे कारण ‘घुसल’ हि अंघोळ मन आणि शरीर पवित्र करण्यासाठी घातली जाते. इस्लामी धर्मशास्त्र मानते कि ‘शहीद’ झाला आहे याचा अर्थ तो अल्लाहच्या कार्यासाठी लढता लढता मरण पावला आहे,म= म्हणजे त्याने करू शकत होता ते सर्व पुण्याचे काम केले आहे. अल्लाहच्या कार्यासाठी युद्धात मरण आले याचा अर्थ त्याचे शरीर सर्व पापांतून मुक्त झाले आहे. त्याचे शरीर पवित्र आणि शुद्ध झालेले असताना पुन्हा शुद्ध होण्यासाठी ‘अंघोळ’ घालायची गरज नाही. या संदर्भात काही परंपरा असे मानतात कि ‘तो मुळातच शुद्ध आणि पवित्र झाला आहे’ तर अजून शुद्ध करणारी अंघोळ घातली तर तोटा काही होणार नाही म्हणून अंघोळ घालावी. पण सर्व परंपरा ‘अल्लाहच्या कार्यात मरण आले म्हणजे सर्वात पुण्याचे काम’ आहे असेच मानतात.
दुसरी तरतूद म्हणजे त्या शहीदाचे युद्धभूमीवरील कपडे – मरण आले त्यावेळी कोणते कपडे त्याच्या अंगावर होते त्या कपड्यांच्या समवेत त्याचे दफन केले जावे. शिवाय हातात हत्यार कोणते होते ते सुद्धा त्याच्या शरीराबरोबर ठेवावे, कारण रक्ताळलेले कपडे आणि त्याची हत्यारे हे त्याचे अभिमानाने दाखवण्याचे दागिने मानले गेले आहेत. शहीदांच्या शिवाय मरण आलेल्या समान्य मुसलमानाला हि विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. तिसरी विशेष तरदूत म्हणजे ‘उहूद’ च्या युद्धात शहीद मृतदेहांना स्वतः प्रेषित पैगंबर यांनी प्रार्थना केली होती. या प्रार्थनेत ‘अल्लाहला विनंती केली जाते कि, हे शरीर तू सांगितलेल्या कार्यात असताना मरण पावलेले आहे, तेव्हा उ याच्यावर कृपा कर.’ काही परंपरा मानतात शहीदाचा मृतदेह मुळात सर्व पापांतून मुक्त झालेला असताना प्रार्थना करण्याची गरज नाही. पण ‘शहीद’ व्यक्ती अल्लाहच्या कृपेचा आणि दयेचा सर्वात मोठा अधिकारी म्हणून सिद्ध झालेला असताना इतर कोणाहीपेक्षा प्रार्थनेचा त्याला सर्वात जास्त अधिकार आहे.
शतकानुशतके ‘शहीद’ होणे हा मृत्यूचा सर्वात पवित्र मार्ग आहे अशी मुसलमानांची श्रद्धा बनून राहिलेली आहे. अल्लाहची कृपा आणि दया मिळवण्याचा आणि अल्लाहच्या जवळ जाण्याचा, स्वर्गाची हमी मिळवण्याचा हा सर्वात पवित्र मार्ग आहे असेही मुसलमान मानतात. युद्धभूमीवर अल्लाहच्या कार्यासाठी मरण आलेल्या शहीदाबद्दल आपण बोललो. पण इतर काही कारणांनी मरण आले तरी त्याला शहीदाचा दर्जा मिळतो. जर युद्धात स्वतःच्या हत्याराने स्वतःला प्राणघातक जखम झाली आणि त्यात मृत्यू झाला तरी त्याला ‘शहीद’ म्हणतात. शिवाय मुस्लीम बंडखोरांनी आणि दरोडेखोरांनी मुसलमानाची हत्या केली तरी त्याला ‘शहीद’ मानतात. मुसलमान व्यक्ती स्वतःचा बचाव करताना मारला गेला तरी त्याला ‘शहीद’ म्हणण्याची पद्धत आहे.
युद्धाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या मार्गाने अल्लाहचे कार्य मुसलमान करत असेल, उदा. कुराणचे अध्ययन, अध्यापन करणारा, धर्म प्रसार करणारा, युद्ध शास्त्र तयार करणारा इ. कोणीही. त्या कार्यात त्याचा मृत्यू झाला तरी त्याला शहीद म्हणतात. अल्लाहवर श्रद्धा ठेवली आणि बिगर इस्लामी प्रदेशात हत्या झाली तरी त्याला शहीद म्हणतात. परंतु इतर कोणत्याही मार्गापेक्षा युद्धात आलेले मरण सर्वात पवित्र मानले गेले आहे.
अल्लाहच्या कार्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी मरण आहे तर त्याला ‘शहीद’ म्हणले जात नाही. विशिष्ट बिगर इस्लामी देशाचे, प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला मरण आले तर त्याला ‘शाहीदा’चा दर्जा मिळत नाही. ‘शहीद’ केवळ अल्लाहच्या कार्यात मरण आलेलाच असू शकतो.

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....