Monday, 16 February 2015

निषेधच केला पाहिजे!!!!

          आम्ही कितीही हिंदुत्ववादी असलो आणि कितीही कम्युनिस्ट विरोधी असलो तरीही जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे. विरोधी मताचा संपूर्ण आदर हे तर हिंदू विचाराचं सर्वात महत्वाच तत्व आहे. विरोध कितीही असला तरी तो विरोधकच संपवणे हि आमची संस्कृती कधीच नव्हती आणि पुढेही कधीच नसेल.  (आम्ही नथुराम गोडसे ला सर्व हिंदूंचा प्रतिनिधी मनात नाही, आणि गांधीजींच्या हत्येच समर्थनही करत नाही ). विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे हे आम्ही पाळतो. वैयक्तिक मी कॉ. पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर ३ लिख लिहिले आहेत. ते पूर्ण वाचून त्याच्यावर मला कोणाच कम्युनिस्टांची प्रतिक्रिया आली नाही. पण आज हा आजचा विषय नाही. पानसरे आणि त्यांच्या पत्नी यांची ताब्यात आज जास्त महत्वाची आहे.


          हा हल्ला हिंदुत्ववादी संघटनांनी केला असेल तर शिक्षा हि झालीच पाहिजे. पण किमान कायद्यावर विश्वास ठेवा, सरकारवर विश्वास नसला तरी चालेल, तो प्रत्येकाचा हक्क आहे. पण अफझल गुरूला फाशी मिळायला ९ वर्ष लागली, कसाबला फाशी व्हायला ६ वर्ष लागली हे काय हिंदुत्व वाद्यांच कारस्थान नव्हता ना! भारतात ती प्रक्रियाच संथ आहे. (पुन्हा दाभोळकर यांच्या हत्येचा सुगाव लागायला उशीर होतोय याचा काय मी समर्थक नाही, त्याचा आम्हा हिंदुत्ववादी लोकांना पण त्रासाच होतो). दाभोलकरांच्या वेळेलाही हत्या झाली हे चुकीचंच, पण काही वेळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे कृत्य नथुरामच्या विचारांनी झालेलं आहे असं म्हंटल होत. आताही काही कम्युनिस्ट लोकांच्या सेम प्रतिक्रिया मी फेसबुक वर पहिल्या. वाईटातल्या वाईट संदर्भात हिंदूंचा उच्चार हा भारतातला सेक्युलॅरीझम आहे. आम्हीही तुमच्यासारखी पातळी सोडून, विवेक वा-यावर सोडून  विधान करायची म्हंटली तर असाही अंदाज निघू शकतो कि कोणीतरी कम्युनिस्टच चळवळीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी असे हल्ले करतो आहे. असं आम्ही म्हणणार नाही. आम्हाला आमचा विवेक सोडायचा नाही. जे स्वतःला विवेकवादी म्हणवतात त्यांनी किमान असा उथळपणा करू नये. पुराव्याशिवाय बोलू नये.   

          अजून एक महत्वाचा मुद्धा म्हणजे नथुराम गोडसे हा काय सर्व हिंदूंचा प्रतिनिधी मानता का तुम्ही ( कम्युनिस्ट ) ? विरोधकाला संपवलं या नावाखाली दरवेळेला एकच नथुरामचं उदाहरण तुम्ही देता. गांधीजींची हत्या झाली आणि महाराष्ट्रात हिंदूंची आणि मुख्यतः ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली  तेव्हा सावरकरांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितल कि आता हि वेळ अशी आहे कि तेव्हा आपण उलटा हात उचलायचा नाहीये, लोकांचा राग समजून घ्या आणि सहन करा!  सावरकरांनी आम्हाला शिकवलंय कि ह्या वेळी उलटा हात उचलायचा नाही. नाही तर आम्ही पण माओ आणि स्टालिन चे दाखले देऊ शकतो ना? विरोधकांना संपवणं हि सवय हिंदूंची नाही कधीच नव्हती.

          कायद्यांनी स्थापन झालेल्या संस्थांवरही तुमचा विश्वास नसेल तर अप्रत्यक्षरीत्या तुमचा संविधानावर विश्वास नाही असा अर्थ होतो त्याचा. किमान पोलीस खात्यावर विश्वास ठेवा, न्यायालयांवर विश्वास ठेवा.


           कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्हीपण निषेधाच करत आहोत. कोणत्याही पुराव्याशिवाय दर वेळेला आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका.

Wednesday, 14 January 2015

भारत एक है..!! ( जम्मू आणि काश्मीर अभ्यास दौरा ) भाग - २

इतिहास :-         

          मला कोणत्याही देशप्रश्नाची हि अपरिहार्यता वाटते कि त्याच्या इतिहासात शिरावाच लागतं. जो वाद काश्मीर मध्ये आणि पाकिस्तानातही सुरु असतो कि इतिहास कुठून सुरु होतो? काश्मीर मधले फुटीरतावादी गट, पाकिस्तानवादी गट काश्मीरचा इतिहास इसवीसनाच्या ८ व्या शतकापासून मानतात. म्हणजे इस्लामच आक्रमण. ज्यांना फक्त विषच पसरवायचं असत ते ८ व्या शतकाच्या आधीचा इतिहास मान्य करत नाहीत. जो इतिहास गौतम बुद्धाचा आहे, सिंधू संस्कृतीचा आहे, तक्षशीला आणि नालंदा चा आहे. या सर्वांचा वारसा भारत अभिमानाने सांगतो, पाकिस्तान सांगत नाही. भौगोलिकदृष्ट्या नालंदा आणि तक्षशीला आताच्या पाकिस्तानमध्ये असले, पूर्ण सिंधु संस्कृती पाकिस्तानात असेल तरी त्याचा वारसा भारत सांगतो, पाकिस्तान वारसा सांगतो तो फक्त बिन कासीम, घोरी, तुघलक यांचा. काश्मीर मधले सुद्धा पाकिस्तानधार्जिणे जे गट आहेत ते हीच भाषा बोलतात. या मध्ये एक आश्चर्यकारक अपवाद सांगावाच लागेल तो म्हणजे Jammu Kashmir Liberation Front (JKLF) चा आताचा नेता 'यासीन मलिक' ला मात्र हे मान्य नाही. तो आझाद काश्मीर ची मागणी करतो पण काश्मीर चा ५००० वर्षाचा इतिहास मान्य करतो. यासीन मलिक हे मान्य करतो कि चार वेळा वेगळ्या वेगळ्या धर्माचं प्रभुत्व होतं. 
          काश्मीर हा शब्द 'कश्यप' आणि 'मिहीर' या दोन वैदिक ऋषींच्या नावाच्या अपभ्रंशातून आलेला आहे, असं सांगितला जातं. म्हणजे कधीतरी पूर्वी वैदिक संस्कृती काश्मीर मध्ये प्रचलित होत. वैदिक संस्कृतीतून निर्माण झालेल्या कर्मकांडाला आणि जातीव्यवस्थेला उत्तर म्हणून निघालेल्या गौतम बुद्धाचाही प्रभाव जम्मू काश्मीर वर दिसतो. अगदी अलीकडे काही कॅथॉलिक अभ्यासकांनी मांडलाय कि ख्रिश्चन धर्माची स्थापन करण्यापूर्वी जिझस भारतात येऊ राहिला होता आणि योग साधनेचा आणि बौद्ध विचारच त्यांनी अभ्यास केला. श्रीनगरजवळ बौद्ध आश्रम होता तिथे राहून जिझस ने हा सर्व अभ्यास केला मग तो पुन्हा मध्यपूर्वेत गेलं आणि मग त्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. मुद्द्याची गोष्ट अशी कि काश्मीरवरचा बौद्ध धर्मचा प्रभाव. पण आठव्या शतकामध्ये विज्ञाननिष्ठ अद्वैत वेदांताचा विचार घेऊन संपूर्ण भारत विचारांनी जिंकत आद्य शंकराचार्य काश्मीर पर्यंत पोचले. त्या श्रीनगर मध्ये शंकराचार्यांनी काही काळ साधना केली. त्याचं खूप सुंदर मंदिर श्रीनगर मध्ये आहे. काही फुटीरतावादी लोकांचा प्रयत्न सुरु आहे कि त्या जागेचा नाव बदलून 'तख्ते- सुलेमान' करायचं. पण म्हणजे हिंदू धर्माचं विचार काश्मीर मध्ये पुनः पोचला. त्यानंतर आला इस्लाम. पण जे जगात कुठेही घडलं नाही ते काश्मीर मध्ये घडलं. इथे तो इस्लाम चा विचार वेदांत आणि बौद्ध विचारातून काश्मीर मध्ये पसरला. त्यामुळे मुलतत्ववादाची लागण त्या इस्लाम ला नाही. काश्मीर मधला इस्लाम हा सुफी विचार सांगतो. तो सुफी विचार वेदांताशी सुसंगत आहे. तो सहिष्णू आहे. इस्लाम आणि सहिष्णू एका वेळी म्हणणं खर तर विरोधाभास आहे. पण काश्मीर मध्ये खरच इस्लाम सहिष्णू आहे. तात्पर्य काय कि ह्या प्रदेशावर कोणत्याच धर्माचा राक्षसी आक्रमण झालं नाही. इस्लामच्या नावावर जे अत्याचार जगात सर्वत्र झाले ते काश्मीर मध्ये पाहायला मिळत नाहीत. आता आधुनिक काळात काही शक्ती मुलतत्वावाद पेरण्याचा प्रयत्न करतात. पण काश्मीर चा तो वारसा नाही. याचा परिणाम असा झाला आहे कि काश्मिरी माणूस खूप प्रेमळ, नम्र, दयाळू आहे. तो चार शांततामय धार्मिक आक्रमणाचा परिणाम आहे. सगळीकडेच पेटीत एक सडका आंबा असतो, तसा तो काश्मीर मध्ये पण आहे. तो काश्मीर ला नासवतो आहे. 
शंकराचार्य मंदिर श्रीनगर
          मुघल राजे सुट्टीला काश्मीर मध्ये जात असत हे आपल्याला माहिती असेल म्हणजे काश्मीर हा पण मुघल साम्राज्याचा भाग होता. नंतर तो शिखांकडे गेलं. १८४९ च्या दरम्यान त्यावेळच्या आशियातला सर्वात बलाढ्य राजा महाराज रणजितसिंग. महाराजा रणजितसिंग आणि ब्रिटीश यांच्यात सतलज चा करार झालं होता. सतलज नदी हि सीमा. सतलजच्या दक्षिणेला रणजितसिंहानी यायचा नाही, सतलजच्या पूर्वेला ब्रिटीशानी जायचं नाही. महाराज रणजितसिंग यांचा मृत्यू १८४९. त्यानंतर जम्मू काश्मीर हा भाग डोग्र समाजाचा राजा, राजा गुलाबसिंग यांनी ब्रिटिशांच्याकडून ७० लाख रुपायाल विकत घेतला. तिथपासून पुढे डोग्र राजे जम्मू काश्मीर वर राज्य करत होते. काश्मीर वरच्या शिखांच्या आणि डोग्रा राजांच्या राजवटीला काश्मीर मधले स्थानिक, आणि मुख्यतः मुस्लीम इतिहासकार Aline Rule असं संबोधतात. जणू ब्रिटीश बाहेरून कुठून तरी आले आणि इथे राज्य केलं, त्याप्रमाणे शीख आणि डोग्रा बाहेरून आले आणि इथे राज्य केलं. भारताच्या स्वातंत्र चळवळीच्या काळात म्हणजे १९२७ साली महाराज हरिसिंग सत्तेवर आला तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काश्मीर चा काही वाटा नाही असं म्हणव लागेल, कारण सरते शेवटी ते होता संस्थान. काश्मीर भारतातील इतर संस्थानापेक्षा वेगळ होता. कारण पूर्ण भारतातील हे एकमेव संस्थान होतं कि जिथे बहुसंख्य लोकसंख्या धर्मानी मुस्लीम होती, आणि राजा 'हिंदू' होता. हा हिंदू राजा संस्थानामधली सर्व महत्वाची पद देताना पक्षपात करत होता. तो बहुसंख्य पडे हिंदुनच देत असे. १९२९-३० मध्ये अलिगढ विद्यापीठातून M. Sc. पर्यंत शिक्षण झालेला एक मुलगा शिक्षण पूर्ण करून पुन्हा काश्मीर मध्येच गेलं. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्षात आलं कि राजा हिंदू मुसलमानांमध्ये भेद करतो आहे. आपलं उच्च शिक्षण झालेलं असूनही जर आपल्याला काम मिळताना त्रास होत असेल तर अशिक्षित लोकांना काय हाल सोसावे लागतं असतील. म्हणून त्या मुलाने मुख्यतः मुसलमानाच्या न्याय्य हक्कांसाठी एक चळवळ उभी केली. त्या मुलगा म्हणजे 'शेर-ऐ-काश्मीर' (काश्मीरचा वाघ) शेख अब्दुल्ला. या चळवळीचे दोन मुख्य हेतू होते. पहिला मुसलमानाच्या न्याय्य हक्कासाठी हिंदू राज्य उलथवून टाकणे आणि दुसर आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं  स्वतंत्र काश्मीर राज्य स्थापन करणे. या चळवळीला संघटनेचा पाया मिळावा, ताकद मिळावी म्हणून शेख अब्दुल्लांनी 'मुस्लीम कॉन्फरन्स' (मुस्लीम कॉन्फरन्सचच नंतर भारतीय नेत्यांच्या आग्रहामुळे नॅशनल कॉन्फरन्स करण्यात आलं.)
          ३१ सालातल्या जुलै महिन्यात हे मुस्लीम कॉन्फरन्स चे लोकं श्रीनगर मधल्या सुप्रसिद्ध लाल चौकात आंदोलन करत असताना राजाच्या पोलिसांनी निशस्र लोकांवर गोळीबार केला. हा गोळीबार आणि जालियानवाला बागेत झालेला गोळीबार सारखाच होता असं काही लोकांच म्हणणं आहे. १३ जुलै १९३१ साली लाल चौकात झालेल्या या गोळीबाराने आंदोलन आणखी तीव्र झालं. भारतात ज्या प्रमाणे 'भारत छोडे' सुरु होती त्याच प्रमाणे काश्मीर मध्ये 'काश्मीर छोडो' सुरु होती. काश्मीर च्या स्वातंत्र्यासाठी आणि कदाचित गांधीजिंप्रमाणे त्याचा एकमेवाद्वितीय नेता होता शेख अब्दुल्ला. कदाचित आझाद काश्मीर चा राष्ट्रपिता.            


     

Friday, 9 January 2015

भारत एक है..!! ( जम्मू आणि काश्मीर अभ्यास दौरा ) भाग - १

          सगळ्या भारतामध्ये सर्व रस्त्यांच्या बाजूला आपल्याला काही गंभीर( विनोदी ) पाट्या वाचायला मिळतात. 'नजर हटी, दुर्घटना घटी' किंवा 'दुर्घटना से दर भली' वगैरे. अश्या पाट्यांच्या रागेतच मला काश्मीर मध्ये एक वाचायला मिळाली. शाँकिंग होती. मिडिया मधून येणारी बातम्या आणि जे वाचत होतो काश्मीर बद्दल त्याच्यामुळे त्या पाटीच काश्मीरमधलं अस्तित्व जरा धक्कादायक होत. ती पाटी होती 'काश्मीर से कन्याकुमारी तक भारत एक है|' माझा राष्ट्रवादी मान जाणीवपूर्वक अभ्यास करायला लागल्यापासून हेच म्हणतं आहे. पण तो कश्यामुळे एक आहे हे तिथे जाऊन पाहण्यासाठी आम्ही गेलो. १० दिवस काश्मीर 'काश्मिरींच्या' नजरेतून पाहण्यासाठी गेलो. हा नुसता दौरा नव्हता, तो खरोखरीच अभ्यास दौरा होता. आम्ही जाणीवपूर्वक कोणतेही पिकनिक स्पॉट पहिले नाहीत. गुलमर्ग नाही, सोनमर्ग नाही.पण ते न पाहता हि आम्ही नंदनवन मात्र पहिल. मला वाट सौंदर्य शोधणारी दृष्टी हवी, आणि आम्हा सातही जणांमध्ये ती होती. १० दिवसांचा अनुभव समृद्ध करणारा तर होताच पण जास्त डोळे उघडणारा होता.काश्मीर च्या बाहेरून काश्मीर चा सौंदर्य आपण पाहतो ते फार वरवरच आहे. तो बर्फ, काश्मिरी माणसाचं सौंदर्य, तिथली पश्मीना, 'ये हसी वादिया' आणि म्हणून मधु आणि अरविंद स्वामी इतकाच आपल्याला दिसत किंवा आपण तेवढच पाहतो पण त्या सर्वांच्या मागे किती प्रचंड रक्तपात आहे, बलात्कार आहेत, आक्रोश आणि किंकाळ्या आहेत ते आपल्याला दिसत नाही. किंवा दाखवणारे आपल्याला दाखवत नाहीत. कधीतरी आपल्या देशाचं हा अविभाज्य भाग आपल्या डोळ्यांनी पहिला पाहिजे. प्रेमळ काश्मिरी लोकांबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले पाहिजेत. आपण जेव्हा ११ दिवस १० रात्री टाईप जम्मू काश्मीर पाहतो तेव्हा गुलमर्ग आणि सोनमर्ग चा सौंदर्य कोणत्या आधारावर उभं आहे ते लक्षात येत नाही. आम्हाला असा सांगण्यात आलं होता कि काश्मीर पाहताना कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवू नका, आणि ते अगदी योग्य आहे. अभ्यास करताना मोकळ्या मनानी करायचा आणि मग चिकित्सा!!
          जम्मू काश्मीर आणि लदाक राज्याचे अगदी नैसर्गिक ३ विभाग पडतात. जम्मू जो मुख्यतः हिंदू बहुल आहे. काराकोरम रेन्जे, जवाहर बोगदा, आणि पटनी टॉप ओलांडून गेलं कि सुरु होते श्रीनगर व्हॅली जी मुख्यतः मुस्लीम बहुल आहे. आणि शेवटी लदाक हा बौद्ध धर्मीय प्रदेश आहे. हा परिणाम state autonomy commission चा नसून अगदी नैसर्गिक आहे. state autonomy commission याच्या पुढे जाऊन या तीन भागांचे अजून तीन उपविभाग करू पाहत आहेत जे सरळ सरळ धार्मिक आधारावर आहे*. त्याच्या शिफारसी National Conference ने जम्मू काश्मीर च्या विधानसभेत मंजूर केला आणि केंद्र सरकारकडे पाठवला. केंद्रात कोणाचाही सरकार असो त्यांनी ह्या धार्मिक आधारावर विभाग पडण्याच्या शिफारशींना कधीही मजुरी दिलेली नाही.
*( state autonomy commission च्या शिफारशी http://www.frontline.in/static/html/fl1714/17140120.htm या साईट वर मिळतील )मला वाटलेली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तीनही प्रांतांना जोडणारा एकच रस्ता आहे. तो रस्ता म्हणजे दिल्ली ते श्रीनगर National highway No. 1. हा रस्ता आपण १९४८ साली बांधलं त्याच्या पूर्वी श्रीनगरला जायला रस्ता पाकिस्तानातून होता. फाळणी झाल्यावर भारतातून श्रीनगरला जायला रस्ता नव्हता.  म्हणजे ६० वर्षात आपण काश्मीर मध्ये जायला एकच रस्ता बंधू शकलो आणि तो सुद्धा रोज वापरता येत नाही. जवाहर बोगदा जो आहे त्यामधून एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते. म्हणून एक दिवसाआड रस्ता बंद असतो. सोमवारी फक्त जायचं मंगळवारी फक्त यायचं!!
हिवाळ्यात अशी परिस्थिती असते. अंदाजे पुढच्या वर्षभरात दुसऱ्या बोगद्याच काम पूर्ण होऊन तो वापरात येईल.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत लेह हा आहे. खर म्हणजे त्यापेक्षा मोठा प्रांत आपल्या नेत्यांच्या नादानपणामुळे किंवा United Nations च्या अकार्यक्षमतेमुळे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो ते हुंजा स्कार्डू आणि गीलगीट असे तीन जिल्हे आहेत जे पाकव्याप्त आहेत. त्यांना आपण पाकव्याप्त म्हणतो. आणि जम्मू श्रीनगर आणि लेह यांना पाकिस्तान भारत्व्याप्त काश्मीर म्हणतो. हे फक्त पाकिस्तान म्हणते असं नाही तर भारताव्याप्त काश्मीर मधील सुद्धा एक गट आहे जो म्हणतो कि ज्याप्रमाणे पाकिस्तानचं सैन्य ( पाकिस्तान त्याना घुसखोर म्हणत असलं तरी ) गीलागीट, स्कार्डू, हुंजा, ब्ल्तीस्तान, मुझफ्फराबाद या भागात आहे त्याच प्रमाणे जम्मू, श्रीनगर या भागात भारतच सैन्य आहे. अन्याय जो होतोय तो शेवटी काश्मिरी जनतेवरच होतोय ना! त्यामुळे काश्मीर प्रश्नाची जबाबदारी जितकी पाकिस्तानवर आहे तितकीच भारतावर सुद्धा आहे. who drew first blood च्या नादात आम्ही मारतो आहोत अशी भूमिका काश्मीर मधल्या एका गटाची आहे. सर्वांची नाही. त्याचं म्हणणं सर्वस्वी अमान्य करता येणार नाही करण असं म्हणणार्यांच्या संख्या दाखल घ्यावी अशी आहे. चिकित्सा जरूर करता येईल, आणि करावीच लागेल.
(क्रमशः...)
     

Wednesday, 19 November 2014

अखेर...

वैद्य हाताची नाडी तपासत होते.  वैद्यांचा चेहेरा बघायचाही भान आज रहिलेला नाही. भान राहावं असाही आज वाटत नाही. जसं आज पर्यत बेभान आयुष्य जगलो, तसच पुन्हा जगायला मिळेल का? जगलेलं आयुष्य स्वामींच्या डोळ्यासमोरून सरकून जाऊ लागलं. स्वामिनी तृप्तीने डोळे मिटले. वैद्यराज म्हणत राहिले,
"स्वामी सावध व्हा, शुद्धीत राहायचा प्रयत्न करा"
"सावध रहा?"
"शुद्धीत रहा?"
हे आयुष्य कधीरती बेसावध राहून जगलोय का? कधीतरी बेभान झालोय का? अत्यंत आनंदाच्या परिस्थितीतहि, अतिशय दुःखाच्या स्थीतीतही कधी बेसावध झालो नाही आणि आज अखेरच्या क्षणी हे वैद्यराज सावध व्हायला सांगत आहेत. स्वामींच्या चेहेर्यावर किंचित हास्य उमटलं. ओठ सुटे झाले. वैद्यानीही सुस्कारा सोडला. सगळी खोली एका छोट्याश्या हस्यानी भरून गेली. कोणीतरी एकमेकान कुजबुजत होतं. स्वामींच्या मनात मात्र वयाच्या १० व्या वर्षीचे बंगळुर चे प्रसंग उमटतं होते. आपण वडिलांना भेटायला गेलो होतो, आणि दाराच्या आड उभे राहून आपण आई-वडिलांचा संवाद ऐकलेला त्यांना आठवला. वडील आई ला सांगत होते, "...... अगं प्रयत्न मी पण केले होते गं! पण त्या मुरार जगदेवान, माझा दोस्तच बर का तो, तो फाटकी वाहण पुण्याच्या वेशीवर अडकवून तो गेलं गं! स्वराज्याची सगळी स्वप्न त्यांन पुण्याच्या वेशीवर टांगली. सगळी निजामशाही ह्या ह्या हातावर खेळवत होतो मी. मला जे जमलं नाही त्याची अपेक्षा तू आपल्या बाळाकडून करतीयेस? आगं  त्याच वय ते काय? भलती स्वप्न बघू नकोस...."आणि त्यावर आई कडाडल्याचहि स्वामींना आठवलं, "हे तुम्ही सांगताय? पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची नाहीत? असे अपयशाचे संस्कार, निराशेचे संस्कार करायचेत मुलावर? मला जमणार नाही. मी त्याला स्वप्न पाहायला लावीन. पुरी करण्याचीही ताकद त्याच्यामध्ये निर्माण करीन. तुमचं स्वप्न आपला मुलगा पूर्ण करणार नाही तर कोण करणार? ती तुटकी वहाण काढीन टाकून, पुणे कसबा सोन्याच्या नांगरणी नांगरून काढीन आणि तेही शिवाजी च्या हातानी!!"

आपल्या नावाचा उच्चार आईच्या तोंडून ऐकताना अंगावर उभे राहिलेले रोमच स्वामींना आठवले. काय वय होतं १० फक्त. कोणती स्वप्न बघायचं वय होतं माझं आणि माझी आई काय अपेक्षा करत होती माझ्या कडून?? वडिलांच राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची, पुणे कसबा सोन्याच्या फाळनी नांगरण्याची? स्वामींच्या डोक्यात विचार आला कि खरच दाराच्या आड उभं राहीन आपल्या आई वडिलांचं बोलणं ऐकताना आपल्याला 'सोन्याच्या नांगरांनी पुणे नांगरणे' किंवा 'स्वराज्य' याचा अर्थ तरी कळत होता का? मनानी नकारार्थी उत्तर दिलं आणि स्वामींच्या चेहे-यावर पुन्हा एकदा हास्य खुललं. पुन्हा वैद्यांचा हात नाडीशी गेलं, पुन्हा खोलीत कुजबुज झाली. स्वामींना आज विचार शृंखला मोडायची नव्हती. त्यांनी खोलीतल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केला आणि मान पुन्हा भूतकाळात नेलं. त्यांना बंगलोर ते पुणे प्रवास आठवला.

प्रवासात आईनी सांगितलेली वडिलांची गोष्ट त्यांना आठवली. देवगिरीच्या यादवांची गोष्ट आई ने सांगितलेली त्यांना आठवली, विजयनगरच्या हरिहर आणि बुक्क यांची गोष्ट त्यांना आठवली. अश्या भारतवर्षातील सर्व भंगलेल्या गोष्टी आई ने सांगितली. इंद्रप्रस्थ, चितोड, कर्णावती, वारंगळ... आणि "असं रामराज्य, शिवाजी तुमच्या हातून निर्माण व्हायला हवं!" वयाच्या १० व्या वर्षी आई इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ इत्यादी उदाहरणं देऊन मुलाला सांगतीये असं राज्य तू निर्माण केल पाहिजेस. पुन्हा एकदा स्वामीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. संपूर्ण आयुष्य आपण भरपूर जाणीवेनी जगलो असं त्यांना वाटलं. आणि एक एक प्रसंग  त्यांच्या  समोर  उभे राहू लागले. इतक्या लहान वयात 'स्वतंत्र' हेच जिवनाच उद्दिष्ट हे ठरवण्याची बुद्धी आपल्याला कशी झाली असेल. हि प्रेरणा आपल्यात कोणी निर्माण केली असले या विचारात स्वामी पडले आणि क्षणोक्षणी त्यांच्या पदरी फक्त आश्चर्यच पडत गेलं. रोज रात्री झोपताना आई ने सांगितलेल्या रामायण, महाभारताच्या गोष्टी, विजयनगरच्या गोष्टी, दादाजींनी आपल्याला शेजारी ठेऊन लालमहालाच्या ओसरीवर केलेले नीवाडे. लालमहालाशेजारची एक पडीक जमीन खरच सोन्याच्या फाळानी नांगरली गेली. आपल्या हातानी!!! नाही नाही, आपण नाहीच. आई आणि दादाजी होते म्हणूनच.. आपलं कर्तृत्व इतकाच कि आपण साधन झालो. जाणीवपूर्वक दादाजींनी आपल्याला बरोबर ठेवलं, मावळची व्यवस्था लावायला जाताना. आपल्या समोर देशमुख आणि बांदलांची भांडण सोडवली गेली. आपण जाणीवंपूर्वक जगलो नाही, आपल्याकडून तसं जागून घेतलं. खरं खरं त्यांचेच हे उपकार!! त्यांनी मनोमन आईचे आणि दादाजींचे आभार मानले ह्या स्वराज्याच्या प्रपंचाट आपल्याला साधन बनवलं. मनोमन हात जोडण्याकरतासुद्धा हात उचलले जात नाहीयेत हे स्वामींच्या लक्षात आलं. आपल्या पराधीनातेबद्दल त्यांना स्वतःची खरोखर दया आली. आपल्या दैवातापुढे आपण हात जोडू शकत नाही. मान वळवून आपले हात पाहण्याचा प्रयत्न केला. तो काळवंडलेला हात पाहताना त्यांना आठवलं कि, ह्याच हातांनी पुरंदरवर आपण दगडगोट्यांची व्यवस्था केली होती स्वराज्यावारच पाहिलं संकट परतवण्यासाठी. स्वामींना आश्चर्य वाटलं कि आपण कधी काळी दगडगोट्यां युद्ध जिंकू शकत होतो. आज आपल्याकडे ह्याच हाताच्या जोरावर कोट्यावधी कोटखजीना, दोन लक्ष पदाती, पचाळीस हजार पागा आहे. काही क्षण त्याचं मान या सर्व संपत्ती वरून फिरत राहिलं. अनेक किल्ल्यांवर जाऊन आलं. आज सुद्धा किल्यांवरची व्यवस्था उत्तम आहे का हेच आपलं मन शोधात आहे त्याचा त्यांना हर्ष झाला. पुन्हा एकदा चेहेर्यावर स्मित उमटलं...
पुन्हा खोलीत कुजबुज...

हातांकडे पाहताना त्यांना आठवलं कि याच हातांनी तो अजस्त्र राक्षस आपण प्रतापगडावर फाडला. आजची देहाची आणि हाताची पराधीनातेची आवस्थ पाहून स्वामींना एक क्षण आश्चर्य वाटलं. पण पुन्हा मन प्रतापगडावर धावलं. गडाची एकेक पायरी उतरताना एकेक प्रसंग त्यांना आठवत होते. आज आपण ज्याला भेटायला चलो आहे त्यांनीच आपल्या वडिलांना फसवून कैद केलं होतं. थोरल्या भावाला ह्यांनीच कपाटांनी मारल होतं. विठोबाच मंदिर ह्यांनीच फोडलं आहे, तुळजाभवानी ह्यांनीच फोडली आहे. अश्या माणसाला आपण आज भेटायला जात आहोत. खबरदारी तर सगळी घेतली आहे, नकळत त्यांचा हात डोक्याशी गेला जीरेटोपाखाली मंदिल आहे का नाही हे पाहण्यासाठी, दुसऱ्या हातांनी बाराबंदीच्या खाली चिलखत आहे ना त्यांनी खात्री करून घेतली. खानाला भेटायला जातानाही आपण पुढच्या मोहेमेची तयारी करत होतो. खानाच्या भेटीत काय होईल याचा पत्ता नाही आणि आपण पन्हाळ्यापर्यंत कसं जायचं याच विचार करत होतो. आपल्या आत्मविश्वासावर त्यांना हासू आलं... पुन्हा कुजबुज... खानाच पोट आपण फाडलं ते रक्ताळलेलं पोट घेऊन तो अजस्त्र देह शामियान्याच्या बाहेर चालला होता. त्यांच्या मनानी पक्क केलं कि आज आपला सामना आपल्या योग्यतेच्या शत्रूशी झाला. आपज आपलं सामर्थ्य खर पणाला लागलं. पुढच्या काही दिवसातच स्वराज्यात आलेला प्रचंड प्रगेश त्यांच्या डोळ्यासमोरून सरकून गेलं. त्याचं मन राजगडावर अडकलं. खिन्न झालं. कित्येक दिवसात आईच दर्शन झालेलं नाही, संभाजीच दर्शन झालेलं नाही.. खानाला मारायला आपण निघालो राजगडावरून तेव्हा सई आजारी होती. आणि अखेरच्या काळात आपण तिच्या जवळ राहु शकलो नाही. संभाजीचा चेहेरा आठवण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्यांना तो पुसटसाहि आठवेना याचं स्वामिना अपार वाईट वाटलं. पापण्यांच्या कडातून पाणी ओघळलेलं त्यांना जाणवलं. खर खर, घराकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळाला नाही. संभाजीला वाटत नसेल का वडिलांबरोबर थोडा वेळ घालवावा. आणि नंतर बराच वेळ राजगडावर रमले. आज भूतकाळात रमायचा आनंद स्वामी उपभोगीत होते. स्वामींना झोप लागली.
"त्यांना झोपू दे, आराम पडेल."
असं वैद्य म्हणाल्याच त्याना आठवत होत.

आपला बाजी गेला, तानाजी गेला, नेताजी गेला, मुरारबाजी गेला, प्रतापराव गेला, कान्होजी गेले. स्वराज्यासाठी मारण्याची आणि मरण्याची प्रेरणा आपण कशी निर्माण करू शकलो त्यांच्यात? छे, छे!!! ते काम आपला नाहीच. आपण ते करूही शकलो नसतो. लढाव केव्हा आणि पवित्र कोणते घ्यावेत याचीच बुद्धी आपल्याकडे असेल. हा प्रपंच कशासाठी आणि स्वराज्याच्या कामात मरण्याची तयारी, छे!! ते आपलं कामच नव्हे. खरच हा विचारच कधी केला नाही आपण. कोणी या लोकांमध्ये मारण्याच्या तयारीची प्रेरणा निर्माण केली असेल? अचानक त्यांना स्मरण झालं, ''खरचं त्याचाच हे कामं असू शकतं! बरोबर, अगदी बरोबर.." त्यांच मान सज्जनगडावर गेलं. समर्थांच्या नुसत्या स्मरणांनी त्यांचा अंगावर रोमांच उभे राहिले. स्वामींच्या डोळ्यासमोर समर्थांच संपूर्ण पत्र उभं राहिलं. "काय म्हणाले होते समर्थ आपल्याला?
''अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी?
परोपकाराचीया राशी?
सावधपणे नृपवर, सर्वज्ञपणे सुशीळ
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे???
माझ्यामुळे?? छे! छे!!
समर्थ आम्हामुळे कैसा ?आम्हा दोघांमुळे!!"



डोळे बंद करून स्वामी समर्थांच्या आठवणीत होते. त्यांना असं निश्चित वाटलं कि चाणक्य चंद्रगुप्त, विद्यारण्य हरिहर बुक्क यांच्या जोडीनी पुढच्या पिढ्या समर्थ शिवाजी हे नाव घेतील. स्वराज्य निर्माण केलं पाहिजे हि प्रेरणा समर्थांचीच. त्यांच्यामुळेच नेताजी, तानाजी, येसाजी अशी माणसं निर्माण होऊ शकतात. त्यांनी समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. पुन्हा त्यांना समर्थांच पत्र आठवलं. "बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला आनंदवनभुवनी." स्वामींच्या मानत आलं, "आपल्याला उठलं पाहिजे. आनंदवनभूवन निर्माण करायच्य अजून" इतक्यात थकून कसं चालेल, झोपून कसं चालेलं? उत्तिष्ठ जागृत:प्राप्तवारान्नीबोधात:|| अरे अजून सिंधूच्या त्या तीरापासून कावेरीपर्यंत कुठे पोहोचलोय आम्ही? उठलं पाहिजे. अचानक स्वामी बोलून गेले, " अरे कोणीतरी संभाजीला बोलवा...." वाक्य पूरं करण्याचाही भान त्यांना उरलं नाही. नको नको म्हणताना संभाजीचे विचार मनात सुरु झाले. आपला मुलगा दिलेरखानाला जाऊन मिळाला! स्वराज्याचा वारस होता तो.. तोच शत्रूला मिळाला!! त्याच्या शौर्याबद्दल आपल्याला कधीच शंका नव्हती. डोकं मात्र थोडं गरम आहे. आपण तो आपलाच दोष आहे. आपण संस्कार करण्यात कमी पडलो!! स्वामींना हुंदका अनावर झाला, डोळ्यातून पाणी सुरु झालं. तोंडात 'जगदंब जगदंब' सुरूच होत. त्यांनी प्रतापगडावरील तुळजाभवानीच दर्शन घेतलं. आणि स्वामींची मान कलंडली.. नाडी थांबली.. खोली आक्रोशानी भरून गेली...             

Wednesday, 29 October 2014

कुमार गंधर्व : एक पुण्यस्मरण



       गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीचं एक दुर्दैव कायम असणार आहे. असं म्हटलं जातं कि कोणत्याही कलेचा, साहित्याचा विकास फक्त स्वातंत्र्यातच होऊ शकतो. तसं झाल्याचा परिणाम आल्याला दिसतो कि सर्व क्षेत्रातील असामान्य प्रतिभा आणि ती प्रतिभा लाभलेली माणसं या शतकांनी पहिली. त्या माणसांना बघण्याच, ऐकण्याच, अनुभवण्याच भाग्य या पिढीला लाभलेला नाही. लेखक, गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार सर्वच क्षेत्रात २० व्या शतकात अनेक माणस निर्माण झाली. आपल्या पिढीच्या नशिबी त्या लोकांचा फार सहवास नाही. प्रेरणादायी चरित्राने दिपून जावं, स्वर्गीय आवाजाने खरोखर स्वर्गसुखाचा आनंद देणारे आवाज आता फार राहिलेले नाहीत. एखाद्या विशाल झाडाच्या पायाशी बसावं, दोन क्षण शांततेचा थंडगार सावलीचा अनुभव घ्यावं पुढे निघावं, किंवा नुसत्या षड्जानी अजस्त्र सह्याद्रीची आठवण व्हावी अशीही माणसं आता राहिलेली नाहीत. म्हणून अशा चरित्र नायकाची आठवण येत राहते. यातली बऱ्यापैकी माणसे आपण जाणते होण्याआधीच निघून गेली याच दोष कोणाला द्यायचा?
      त्यातल्या ‘कुमार गंधर्व’ यांची आज विशेषत्वाने आठवण होते आहे याचं कारण येत्या १ नोव्हेंबरला ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन होणार आहे. हा ग्रंथ इंग्लिश आणि मराठी या दोनीही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि मुख्य म्हणजे हा ग्रंथ दोन खंडांमध्ये असणार आहे. कदाची ‘कुमार गंधर्व’ यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकाचा उद्योग प्रथमच होत असेल. म्हणून आज त्यांची आठव होते आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे चरित्र प्रेरणादायी आहे. शांततेचा अनुभव देणारे आहे. विशाल झाडाच्या सावलीमध्ये बसल्याचा आनंद देणारे आहे. पण एक गोष्ट सर्वात महत्वाची जी जाणवते ती अशी कि ‘अत्यंत दुःखाच्या परिस्थितीमध्ये खचून जायचं नसतं तर त्या दुःखाने, निराशेने आणि Negativity ने भरून राहिलेल्या स्थितीतही आपल्या व्यक्तीमत्वातील सर्वोत्कृष्ट ते बाहेर येऊ द्यायचं असत. सर्व लोकांना शुद्ध शास्त्रीय संगीत आवडेलच अस नाही, तसा आग्रह पण नाही पण कुमार गंधर्वांकडे पाहून ‘दुःखाच्या परिस्थितीत निराश व्ह्यायचं नाही तर आपल्यातून सर्वोत्कृष्टला बाहेर येऊन द्यायचं’ हे जरी समजलं तरी आनंद मानला पाहिजे.
      लोकमान्य टिळकांच्या “अरे, हा तो बालगंधर्व!” याच चालीवर कोणीतरी छोट्या ‘शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीनाथ’ नावाच्या मुलाकडे बोट करून “अरे, हा तो कुमारगंधर्व!” असे म्हटले. ते वयाच्या १०व्या वर्षी. छोटा शिवपुत गाण्याकडे वळण्याच कारण मात्र मोठं गमतीदार आणि विचित्र आहे. शिवपुत्राचे वडील किरान घराण्याचे गायक होते. आईसुद्धा गोड गाणारी होती. वडील शिवपुत्राच्या थोरल्या भावाला बालगंधर्वांच्या रेकॉर्ड ऐकवायचे आणि त्याप्रमाणे म्हणायला सांगायचे. तोपर्यंत शिवपुत्र कोमकलीनाथ अजून कुमार गंधर्व झालेले नव्हते इतकेच नव्हे तर शिवपुत्र म्हणूनही त्यांना कोणीच विचारत नव्हतं. बालगंधर्वांची पद म्हणून जुन्या बेळगावमध्ये शिवपुत्राचा थोरला भाऊ मात्र मोठ कौतुक मिळवत होता. लोकं आपल्याला मात्र विचारीतही नाहीत आणि मोठ्या भावाचं मात्र भरपुर कौतुक करतात याच छोट्या शिवपुत्राला त्रास होत असेल. लहान शिवपुत्राला ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवण्याची स्वाभाविक भावना निर्माण झाली. थोरल्या भावासाठी आणलेल्या रेकॉर्ड्स तो एकून म्हणू लागला. वय वर्ष ७. एका आसुयेपोटीच शिवपुत्र गाण्याकडे वळला. वयाच्या ७ व्या वर्षी आपण पण कोणी कमी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी म्हटलेलं बालगंधर्व याचं एक पद, हा प्रवास पुढे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ इथपर्यंत पोचतो. ५२-५३ साली मुंबईला बालगंधर्वांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांनी हा कार्यक्रम केला. हा त्यांचा एक सन्मान मानला गेला. हा प्रवास ९० साली मिळालेलं पद्मविभूषण आणि ९२ साली मृत्यूपर्यंत सुरूच होता.
      भावाला हरवण्यासाठी सुरु झालेला प्रवास पद्मविभूषण पर्यंत सहज, सरळ झालेला नाही. माझ्या मते चरित्रनायकाच्या आयुष्यात तसं अपेक्षितही नाही. चाळीसच्या दशकात त्यांना टीबी झाला, तो ५ वर्ष टिकला. म्हणजे पाच वर्ष गाणं पूर्ण बंद. अशाच एक दीर्घ आजारात एक फुफुस काढून ताकाव लागलं. शास्त्रीय गायकाला एक फुफुस नाही म्हणजे काय करिअर उरलं? पण दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपल्यातलं उत्तम ते बाहेर येऊ द्यायचं म्हणजे काय? एक फुफुस नसल्यामुळे श्वास फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पूर्वीच्या ३२-३२ आवर्तनाच्या ताना ८ आवर्तानापर्यंत लहान केल्या. आणि लहान ताना हि एक नवीन परंपराच त्यांनी जन्माला घातली. हॉस्पिटलच्या दीर्घ काळात त्यांनी मध्य प्रदेशातील लोकसंगीताचा अभ्यास केला. तो सुद्धा हॉस्पिटलच्या खोलीत बसून. रस्त्यावर सुरु असलेलं संगीत त्यांनी ऐकल आणि लोकगीताच्या स्वरबिजातून त्यांनी सहेल तोडी, मधसुरजा, मालवती, मघवा यांच्यासारख्या धुनरागांचे व्रुक्ष फुलविले. नवीन राग जन्माला घातले. ७१ च्या युद्धात भारताने प्रचंड विजय मिळवला त्याचा आनंद त्यांनी नवीन राग जन्माला घालून साजरा केला. इंदिरा गांधींच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून त्या रागाचे नाव ‘प्रियदर्शनी’ ठेवले आणि तो राग त्यांनी इंदिरा गांधीना अर्पण केला.
      भारतीय शास्त्रीय संगीतच एक महत्वाच वैशिष्ट्य आहे. राग हा प्रकार एका विशिष्ट format मध्ये बांधलेला असतो. तो राग सदर करण्याचे नियमही काटेकोर असतात. कोणत्या रागाचे कोणते सूर कोमल, कोणते मध्यम, कोणते तीव्र हे सगळा ठरलेलं असत. तानांची निवड कशी करायची, सरगम कसा असावा हे सर्व ठरलेलं असतं. ते सर्व आत्मसात करून, पचवून आपली प्रतिभा त्याला जोडून नवीन भर घालता येते. या वैशिष्ट्यामुळे कोणताही बंधन सादरीकरणाच्या आड येत नाही. याच संदर्भात पुलंनी मस्त किस्सा सांगितला आहे. आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांची एक मैफल झाली. त्यावेळी त्यांनी ‘हमीर’ हा राग सादर केला, पण ते कोणाच्याच लक्षात आलं नाही. अत्र्यांनी विचारलं हमीर सारखा सर्वश्रुत राग असून सुद्धा तो कोणाच्याच लक्षात आलं नाही हे कसा काय? त्यावर कुमारजी म्हणाले; “लोकांची चूक नाही, आत्रेसाहेब ह्या लोकांना राग जर समोरून आला तरच ओळखता येतो. मी ‘हमीर’च प्रोफाईल रंगवत होतो. कुमारजी म्हणत असत, “एखाद्या प्रियकराची प्रयासिशी प्रथम “पहिली वळख गोडीची” व्हावी, तशीच रागाच्या कुल्मार्यादेत वाढलेल्या चीजेचा अंतर्यामी जाऊन तिची ओळख करून घ्यावी लागते. सौंदर्याच्या नानाप्रकारात दडलेल्या स्थानांचा शोध घ्यावा लागतो. चीजेची आधी सगळी फिगर दाखवायला पाहिजे. एखादी सुंदर जागा असते. म्हणजे काय पुन्हा पुन्हा तीच दाखवायची? बाईच नाक सुंदर आहे म्हणून फक्त नाकाच चित्र काढतात का? अरे, चेहे-याच्या प्रपोर्शन मध्ये नाक छान दिसत! समाज डोळे तिरळे असले, तर नाक कितीही छान असुदे इम्प्रेशन राहील का? म्हणून चीजेची ओळख चांगले हवी. तर प्रोफाईल वगैरे जमतं!”
      बेगम अख्तर यांनी गायलेली एक सुंदर गझल आहे, ‘जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया है|’ त्यात थोडासा बदल करून म्हणाव असं वाटतं कि, ‘जाने क्यू आज तेरे ना होने पें रोना आया है| रोना आया है||’                                   

Thursday, 16 October 2014

अर्पणपत्रिका ...

पण जराशा वेगळ्या वाटलेल्या!!




माझ्या मोठ्या भावानी मला वाचनाची आवड लावली.

आईनी सगळ्या प्रकारचं वाचायची सवय लावली. आणि आई चा आग्रह आहे कि पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत सगळ वाचायचं. सखाराम गटणे मध्ये समालोचन आहे ना? तस्सच !!  पुस्तकच नाव, लेखकांच नाव,प्रकाशकाच नाव, पत्ता, किमत आवृत्ती सगळ. ते वाचण्यात कधीच कोणतं problem वाटला नाही म्हणा, पण एक फायदा मात्र नक्की झाला. लेखकाची प्रतिभा मला अर्पणपत्रिकेपासूनच दिसायला सुरवात झाली. बऱ्याच वेळेला ते एखाद्या व्यक्तीला अर्पण केलेलं असलं तरीसुद्धा त्यामागची भावना किती महत्वाची आहे हे अर्पणपत्रिकेतुनच लक्षात येत. माझ्या वाचनात आलेल्या काही हटके अर्पणपत्रिकांचा हा संग्रह. यात केवळ व्यक्तींना केलेली पुस्तके नाहीत. तर सर्वस्वी वेगळा विचार त्यामागे आहेत अशा काही खास अर्पणपत्रिका.


१. दिपस्थंभ - प्रा. शिवाजीराव भोसले : 
उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीस



 २. त्रिवेणी - गुलजार :
शांताबाई - आप सरस्वती  कि तरह हि मिली 
 और सरस्वती कि तरह हि गुम हो गायी |
ये 'त्रिवेणी' 
आप हि कॉ अर्पित करता हुं |
-गुलजार    


३. कोसला - भालचंद्र नेमाडे :
शंभरातील नव्याण्णवांस


                                              ४. कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण :
                                               आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला
                                               आकार आणि आशय देणारी माझी 
                                               प्रिय पत्नी 'सौ. वेणूताई' हिच्या स्मृतीस. 


५. स्वतः विषयी - अनिल अवचट :
सुनंदा - हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला काही काळ 
माझ्यातून बाहेर काढव लागतंय, त्याबद्दल थोडी रुखरुख आहे. 


६. भारतीय लोकसत्ता -डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे :
भारताच्या जागृत लोकशक्तीस


७. उरलंसुरलं - पु. ल. देशपांडे :
माझ लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणाऱ्या 
माझ्या वाचकवर्गालाच हे 'उरलंसुरलं' कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.


८. आपण सारे अर्जुन - व. पु. काळे :
संसारात माणसाला काय हव असत?
इंग्रजी भाषेत योग्य शब्द आहे -
CONCERN
याच्या जोरावर बाकीचे सगळे मतभेत दृष्टीआड करता येतात.
यशस्वी संसारच हेच सूत्र आहे, CONCERN
हि आवृत्ती त्या संसाराला !


९. गुलमोहर - व. पु. काळे :
काही काही व्यक्तींच्या बाबतीत 
'त्याचं आणि तुमचं नातं काय?' 
असा प्रश्न विचारला जातो. 
नातेवाईकांकडून फटके खाऊनही 
नात्याचं महत्व संपत नाही. 
नुसती मैत्रि एवढ्यावर समाधान होत नाही. मैत्री आणि नातेवाइक यांच्यामध्ये एक धूसर पडदा असतो
तो दिसत नाही पण जाणवतो.
हा 'गुलमोहर' त्या धूसर जाणीवेला.


१०. पुर्णामाईची लेकरे - गो. नी. दांडेकर
मायबोली मराठीचे कवतिक 
परम शिवभक्त 
श्री. बाबासाहेब पुरंदरे 
यांस. 
गोपाल नीलकंठ दांडेकर


११. आम्ही भगीरथाचे पुत्र - गो. नी. दांडेकर:
त्या शूर कामगारांच्या पावन स्मृतीस 
भाकरा धरण बांधित असता
आपल्या अमोल प्राणाचे बलिदान केले.


१२. कुणा एकाची भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर :
 युगा अठ्ठावीसांची वेदना.....
- तिला 
-कुणी एक


१३. अजुनी नाही जागे गोकुळ - गो. नी. दांडेकर :
व्यथा अनादी काळापासूनची 
तिला- 


१४. विज्ञानेश्वरी - दत्तप्रसाद दाभोलकर
सातशे वर्षापूर्वी 
विज्ञान सहजपणे 
माझ्या भाषेत आणणाऱ्या 
माझ्या ज्ञानेश्वराना.


१५. मौनाची भाषांतरे - संदीप खरे :
 या ठिकाणी नाव नसल्यास  
ज्यांना वाईट वाटेल, वा राग येईल
अशा सर्वास..


१६. तुझ्यावरच्या कविता - संदीप खरे :
कुणालाच नको... मलाच राहूदे !!


१७. गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे :
खेड, दाभोळपासून बंदरपत्त्यावरील 
मुरुड, मुर्डी 
अंजर्ल्यापर्यंत गेलेल्या 
दापोलीच्या लाल मातीस 

या मातीचे मी देणे लागतो.



१८. तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे :
त्या थोर कादंबरीकरांना 
ज्यांनी
माझी जागा मला दाखवली


१९. पानिपत - विश्वास पाटील :
-मराठी मातीस..

२०. हे counting सुरूच राहील ....

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....